बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला पॉर्नोग्राफी प्रकरणात अटक झाली असून सध्या तो पोलीस कोठडीत आहे. पोलिसांकडून राज कुंद्राची चौकशी सुरु असून यावेळी त्याच्या घरावर छापा टाकत तपास केला जात आहे. यावेळी अनेक खळबळजनक खुलासे होते आहे. दरम्यान राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पहिल्यांदाच राज कुंद्रा प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. पुण्यात एका कार्यक्रमासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आले होते.

यावेळी राज कुंद्रा प्रकरणी विचारले असता ते म्हणाले की, “समाजामध्ये जो विषय निषिद्ध आहे, त्यामध्ये जर कोणी चुकीचे वागत असेल तर पोलिसांनी कारवाई सुरू केलेली आहे. ही कारवाई एकाच केसपुरती मर्यादित राहणार नाही. तर अशा गोष्टी कशा थांबवता किंवा मर्यादित ठेवता येईल, किंवा यातून कसा मार्ग काढता येईल यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत”.

Porn films case : राज कुंद्रांच्या अडचणी वाढल्या?; चार कर्मचारीच बनणार मुख्य साक्षीदार

पेगॅसस प्रकरणावर बोलताना त्यांनी सांगितलं की, “हा विषय एका राज्यापुरता मर्यादित नाही. देशासोबत जगालाही याचा फटका बसला आहे. आम्ही नक्कीच महाराष्ट्रातील वस्तुस्थिती तपासणार असून, ते काम सुरू केलं आहे”.

कुंद्राचे चुकले काय?

रायगडमधील दुर्घटनेवरही केलं भाष्य

रायगड येथील तळीये दुर्घटनेत नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आता या घटनेवरून अनेक प्रश्न विचारले जात आहेत. त्याचदरम्यान पश्चिम घाटाबाबत गाडगीळ समितीमार्फत जो अहवाल देण्यात आला होता त्यावरून चर्चा रंगली आहे. त्यावर ते म्हणाले की, “अशा प्रकाराच्या दुर्देवी घटना जेव्हा घडतात तेव्हा त्यावर बरीच चर्चा होत असते. मात्र नंतर त्यासंबंधी नियोजन करायला पाहिजे. पण ते होत नाही. दरड प्रवण क्षेत्राची माहिती प्रशासनाकडे असते. पण काल जी घटना घडली तो भाग दरड प्रवण क्षेत्र नव्हता. तसंच माळीण दुर्घटनेनंतर येथील नागरिकांचे पुनर्वसन ज्याप्रकारे केले गेले. त्याच धर्तीवर शरद पवार यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृहनिर्माण मंत्री यांनी निर्णय घेतला आहे. तसेच पश्चिम घाटाच्या बाबतीतला गाडगीळ समितीचा अहवाल का स्विकारला नाही याबाबत मला माहिती नाही”.