आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवजयंती साजरी करण्याचं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. तसंच या निमित्ताने होणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण तर जन्मोत्सव सोहळ्यासाठी ५०० जणांना परवानगी देण्यात आली आहे. त्यावरून भाजपाने सरकारवर टीका केली आहे. हिंदूंच्या उत्सवांवर निर्बंध घालत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. त्यावर आता राज्याच्या गृहमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवजयंती साजरी करताना करोना नियमांचं उल्लंघन करू नये असं आवाहन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्याच्या जनतेला केलं आहे. ते आज माध्यमांशी बोलत होते. यावेळी वळसे पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांवरील प्रेम मी समजू शकतो. मात्र जे नियम घालण्यात आले आहेत, त्यांचं पालन करावं. करोनाशी लढताना केंद्र सरकारकडून बंधनं घालण्यात आली आहेत. त्यामुळे असे नियम घालून केवळ हिंदूना टार्गेट केलं जात आहे, असं म्हणणं चुकीचं आहे. त्यामुळे समाजात अस्वस्थता निर्माण होत आहे.

shiv sena spent rs 70 thousand on sakhi mahotsav
शिवसेनेच्या सखी महोत्सवासाठी केवळ ७० हजार खर्च ? माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार
Rashmi Thackeray in Thane for Chaitra Navratri festival
ठाण्यात चैत्र नवरात्रौत्सवासाठी रश्मी ठाकरे उपस्थिती… ठाकरे गटाचे शक्तीप्रदर्शन
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?
gaanewali program at tarun tejankit
सक्षम भविष्याचे स्वप्न सत्यात उतरवणाऱ्या प्रज्ञेचा सन्मान

हेही वाचा – “शिवजयंती साजरी करण्यासाठी अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेच नियम?”

काय आहे हे प्रकरण?

शिवजयंतीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या शिवज्योत दौडीत २०० जण आणि जन्मोत्सव सोहळ्याकरिता ५०० जणांना उपस्थित राहता येणार आहे. यासंबंधीच्या गृह विभागाच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली. तथापि, आरोग्य नियमांचे पालन करून, सर्वांच्या आऱोग्याची आणि स्वच्छतेची काळजी घेत शिवछत्रपतींचा जन्मोत्सव सोहळ्याचे क्षण साजरे करावेत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
दरम्यान भाजपा आमदार राम कदम यांनी मात्र यावरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. शिवजयंती साजरी करण्यासाठी अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेच नियम? अशा शब्दांत त्यांनी संताप व्यक्त केला आहे. तसंच शिवजयंती धूम धडाक्यात करणारच असं आव्हान दिलं आहे.

शिवजयंतीसाठीचे नियम जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा…

राम कदम यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, “शिवजयंती साजरी करण्यात ठाकरे सरकारच्या कोणत्याही जाचक अटी आम्ही शिवभक्त ऐकणार नाही. अटी कसल्या टाकताय? हिंदूंचा उत्सव आला की लगेचच नियम? वा रे वा ! करायचे ते करा. शिवजयंती उत्सव आम्ही धूम धडाक्यात करणारच”.