Maharashtra Board HSC 12th Result Highlights: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBSHSE आज (२ मे २०२६) रोजी दुपारी १ वाजता बारावीचा निकाल (Maharashtra HSC Board Results 2026) जाहीर करणार आहे. निकालाबरोबरच विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका (Provisional Marksheet) तसेच ई-मार्कशीट (e-Marksheet) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांच्या निकालाची आणि गुणपत्रिकेची प्रत सहज डाउनलोड करता येणार आहे.
तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली असून बारावीच्या निकालाची टक्केवारी जाहीर करण्यात आली आहे. मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, राज्यात यंदा कोकण विभाग आणि विद्यार्थ्यांपैकी मुलींनी निकालात बाजी मारली आहे.
बारावीचा निकाल ऑनलाईन पाहण्यासाठी वेबसाईट्स लिंक
१) mahahsscboard.in
२) hscresult.mkcl.org
३) sscboardpune.in
४) sscresult.mkcl.org
५) https://results.digilocker.gov.in/
६) https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-hsc-12-results
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पत्रकार परिषद पाहा
ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल?
- विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- सर्वप्रथम संबंधित वेबसाइट उघडा.
- ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
- ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
- ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
Maharashtra 12th Board Result 2026 Live Updates | बारावी बोर्ड निकाल लाईव्ह अपडेट्स
व्हीलचेअरवरून परीक्षा देणारी 'ही' मुलगी ७१% कशी मिळवते? जाणून घ्या...
बारावी निकाल! नाशिकचा निकाल ९०.७२ टक्के, छापील गुणपत्रकासाठी करावी लागणार प्रतीक्षा...
बारावी निकाल : गडचिरोली जिल्हा नागपूर विभागात शेवटून पहिला, मुलींचे वर्चस्व कायम…
Nanded HSC Result 2026 : निकालाची टक्केवारी घसरली, तरीही मुलीच ठरल्या सरस; जिल्ह्याचा ७७.७० टक्के निकाल… अर्धापूर तालुका अव्वल
बारावीच्या निकालात यंदाही कोकण अव्वल का?
HSC Result 2026 Live Updates: बारावीच्या कॉपीमूक्त मोहिमेत १०० कर्मचाऱ्यांचे निलंबन, १५ FIR दाखल
राज्य मंडळाने यावर्षी कॉपीमूक्त मोहिमेत शिस्त आणली होती. गैरप्रकार झाल्यानंतर १५ एफआयआर दाखल करण्यात आले आहेत. तर १०० कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे, अशी माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.
विद्यार्थ्यांसाठी सुट्टीच्या दिवशी उघडले न्यायालयाचे दार, नीटच्या परीक्षा केंद्रांवरील अपुऱ्या सुविधांची दखल…
मुंबई विभागातील १० महाविद्यालयांतील सगळेच अनुत्तीर्ण; शून्य टक्के निकालाची सर्वाधिक महाविद्यालये ठाण्यात तर रायगडमध्ये एकही नाही
Palghar HSC Result 2026: पालघर जिल्ह्याचा १२ वीचा निकाल ८६.६८ टक्के; निकालात सलग दुसऱ्या वर्षी घट, मुलींचीच सरस कामगिरी
HSC Result 2026 : मुंबई विभागात रायगड ठरला अव्वल; एचएससीचा निकाल ९३.६९ टक्के
वसईत बारावीचा निकाल ८६.६५ टक्के; मुलींची पुन्हा बाजी, मात्र गतवर्षीच्या तुलनेत टक्का घसरला
चाकणमध्ये ३ वर्षांच्या मुलावर अनैसर्गिक अत्याचार करून खून; बिहारला पळून जाण्याच्या तयारीत असलेला अल्पवयीन आरोपी ताब्यात
HSC Result 2026 Live Updates: बोर्ड सर्टिफिकेटवर नावात बदल
मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर यापूर्वी आडनाव, मग विद्यार्थी आणि शेवटी वडिलांचे नाव यायचे. यावेळी त्यात बदल करण्यात आला आहे. आता अपार आयडी किंवा आधार कार्डवर ज्याप्रमाणे नाव असते, तसे नाव देण्यात येणार आहे.
कोकण बोर्डाचा विजयरथ सुसाट; सलग १५ व्या वर्षी राज्यात अव्वल
HSC Result 2026 Live Updates: मार्कशीटवर विद्यार्थ्याचा फोटो असेल
मार्कशीट आणि सर्टिफिकेटसाठी ए४ साईजचा कागद वापरला गेला आहे. त्यावर विद्यार्थ्यांचा फोटो, क्युआर कोड वापरला गेला आहे. यातून जवळपास ३ कोटी रुपयांची बचत करण्यात आली आहे.
HSC Result : बारावीच्या निकालात 'गुणवंत' घटले, ७ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांहून अधिक गुण
HSC Result 2026 Live Updates: मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट आता लवकर मिळणार
यापूर्वी निकाल लागल्यानंतर १० दिवसांनी मार्कशीट आणि बोर्ड सर्टिफिकेट सहा महिन्यांनी मिळत होते. यंदा आपण मार्कशीट आणि सर्टिफिकेट एकत्रच देत आहोत. आजपासून १५ दिवसांनी शाळांमध्ये सर्वांना या दोन्ही गोष्टी मिळतील.
HSC Result 2026 Live Updates: कॉपीमूक्त अभियानामुळे यंदा बारावीच्या निकालात २.९ टक्क्यांची घट, राज्य मंडळाची कबुली
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल ८९.७९ टक्के निकाल लागला. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सुमारे २.९ टक्क्याने निकाल घटला आहे. राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी सांगितले की, कॉपीमुक्त अभियान यावेळी चांगल्या पद्धतीने राबवले गेले, त्यामुळे कदाचित निकालात घट झाल्याचे दिसते.
HSC Result 2026 Live Updates: प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून आधुनिक तंत्रज्ञान वापरले
प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून उच्च तंत्रज्ञान वापरल्याची माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. यावेळी बारामतीच्या कस्टडीवरून केंद्रावर पेपर नेण्यासाठी जीपीएस आधारीत ट्रंक वापरली होती. ज्यामुळे कस्टडी ते केंद्रापर्यंत कुणीही प्रश्नपत्रिकेत छेडछाड करू नये, यासाठी ही खबरदारी घेण्यात आली.
HSC Result 2026 Live Updates: परीक्षेसाठी २००० मेट्रिक टन कागद वापरावा लागला
मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी पुढे म्हणाले, बारावीच्या परीक्षेसाठी एकूण २००० मेट्रिक टन कागद वापरण्यात आला.
HSC Result 2026 Live Updates: बारावीच्या निकालात राज्यात मुलींची बाजी
सर्व विभागीय मंडळातून मुलींनी बाजी मारली असून मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.१५ टक्के आहे, तर मुलांची टक्केवारी ८६.८० टक्के आहे. म्हणजेच ६.३५ टक्के मुली मुलांपेक्षा अधिक उत्तीर्ण झालेल्या आहेत.
HSC Result 2026 Live Updates: लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल
राज्याच्या नऊ विभागांपैकी लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल लागला आहे. ८४.१४ टक्के इतका हा निकाल आहे. मागच्या वर्षीही लातूर विभागाचा सर्वात कमी निकाल होता.
HSC Result 2026 Live Updates: नऊ विभागातून कोकण विभाग टॉप
राज्याच्या सर्व नऊ विभागातून कोकण विभाग टॉप असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली. कोकण विभागाचा निकाल ९४.१४ टक्के इतका लागल आहे.
HSC Result 2026 Live Updates: पुर्नपरीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांचा निकाल सर्वात कमी
५०,३४६ विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षा दिली होती. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ३६.४४ टक्के उत्तीर्ण झाले आहेत.
HSC Result 2026 Live Updates: फॉर्म १७ भरलेले किती विद्यार्थी उत्तीर्ण?
यंदा बारावीच्या परीक्षेला फॉर्म १७ भरून ३६,९४१ खासगी विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी २९,६३४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८०.२१ टक्के इतकी आहे, अशी माहिती राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली.
HSC Result: बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, गेल्या वर्षीपेक्षा २.९ टक्क्यांनी घट
HSC Result 2026 Live Updates: बारावीच्या परीक्षेत एकूण विद्यार्थ्यांपैकी किती जण उत्तीर्ण झाले?
राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या परीक्षेत नऊ विभागीय मंडळातून राज्यभरातून १४ लाख ३३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी १२ लाख ८६ हजार ८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. ८९.७९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
HSC Result 2026 Live Updates: बारावीसाठी एकूण १५३ विषयांची परिक्षा घेण्यात आली
बोर्डाकडून बारावीसाठी एकूण १५३ विषयांची परिक्षा घेण्यात आली. विज्ञान शाखेसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी आणि उर्दू आणि इतर शाखांसाठी इंग्रजी, मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती आणि कन्नड या सहा भाषांसाठी नोंदणी करण्यात आली होती, अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली.
HSC Result 2026 Live Updates: बारावीच्या निकालात यंदाही कोकण विभागाची बाजी
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच बारावीच्या (HSC) निकालात यंदाही कोकण विभाग आणि राज्यातून मुलींनी बाजी मारली आहे. कोकणाचा निकाल सर्वाधिक ९४.१४ टक्के इतका लागला आहे.

