महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच MSBSHSE २ मे २०२६ रोजी दुपारी १ वाजता बारावी (HSC) परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. निकालासोबतच विद्यार्थ्यांना तात्पुरती गुणपत्रिका (Provisional Marksheet) तसेच ई-मार्कशीट (e-Marksheet) ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या त्यांच्या निकालाची आणि गुणपत्रिकेची प्रत सहज डाउनलोड करता येणार आहे.
बारावीची गुणपत्रिका ही विद्यार्थ्याच्या शैक्षणिक प्रवासातील अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे असून ती पुढील शिक्षण, प्रवेश प्रक्रिया आणि विविध स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असते. मात्र, ऑनलाइन उपलब्ध होणारी मार्कशीट ही तात्पुरती (Provisional) असते. विद्यार्थ्यांनी काही दिवसांनी त्यांच्या संबंधित महाविद्यालय किंवा शाळेतून मूळ (Original) गुणपत्रिका घेणे आवश्यक आहे.
ऑनलाइन बारावीची मार्कशीट कशी डाउनलोड कराल?
- विद्यार्थी त्यांचा निकाल आणि मार्कशीट mahresult.nic.in किंवा mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळांवरून पाहू शकतात. प्रक्रिया पुढीलप्रमाणे आहे:
- सर्वप्रथम संबंधित वेबसाइट उघडा.
- ‘HSC Examination March 2026 Result’ या लिंकवर क्लिक करा.
- त्यानंतर तुमचा रोल नंबर आणि आईचे पहिले नाव प्रविष्ट करा.
- ‘View Result’ किंवा ‘निकाल पहा’ या बटणावर क्लिक करा.
- स्क्रीनवर तुमची ऑनलाइन गुणपत्रिका दिसेल.
- ती डाउनलोड करून प्रिंटआउट घ्या.
ई-मार्कशीट (e-Marksheet) कशी डाउनलोड कराल?
- महाराष्ट्र बोर्ड विद्यार्थ्यांना ई-मार्कशीट आणि प्रमाणपत्र डिजिटल स्वरूपात डाउनलोड करण्याची सुविधा देते. यासाठी https://www.boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/INDEX.jsp या पोर्टलचा वापर करावा लागतो.
- प्रथम पोर्टलवर लॉगिन करा.
- ‘Download/Verify HSC /12th Marksheet’ या पर्यायावर क्लिक करा.
- परीक्षेचे वर्ष, परीक्षा सत्र, सीट नंबर आणि एकूण गुण भरा.
- कॅप्चा पडताळणी करून ‘Submit’ बटणावर क्लिक करा.
- यानंतर तुमची ई-मार्कशीट स्क्रीनवर दिसेल.
- ‘Get Marksheet PDF’ वर क्लिक करून PDF डाउनलोड करा.
- पासिंग सर्टिफिकेटही डाउनलोड करा
याच पोर्टलवरून विद्यार्थी बारावीचे उत्तीर्ण प्रमाणपत्र (Passing Certificate) देखील डाउनलोड करू शकतात. त्यासाठी वरीलप्रमाणेच प्रक्रिया पूर्ण करून ‘Get Certificate PDF’ या पर्यायावर क्लिक करावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कागदपत्रांची डिजिटल प्रत सुरक्षित ठेवता येते.
संपूर्ण प्रक्रिया जाणून घेण्यासाठी या लिंकव क्लिक करा – https://boardmarksheet.maharashtra.gov.in/emarksheet/images/EmarksheetDownload.pdf

महत्त्वाच्या सूचना (Important instructions)
- ऑनलाइन मार्कशीट ही तात्पुरती असते; मूळ मार्कशीट शाळेतून घ्यावी.
- ई-मार्कशीट डाउनलोड करण्यासाठी सीट नंबर आणि इतर तपशील आवश्यक आहेत.
- ही सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.
- विद्यार्थी त्यांच्या कागदपत्रांची सुरक्षित साठवण DigiLocker वरही करू शकतात.
- ई-मार्कशीटद्वारे गुणपत्रिकेची सत्यता पडताळणी करणेही शक्य आहे.
- एकूणच, महाराष्ट्र बोर्डाने विद्यार्थ्यांसाठी निकाल आणि मार्कशीट डाउनलोड प्रक्रिया सुलभ केली आहे. योग्य तपशील भरून विद्यार्थी काही मिनिटांतच त्यांची HSC Marksheet 2026 डाउनलोड करू शकतात.
