एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय - आदित्य ठाकरे | Maharashtra is falling behind because of one man monstrous ambition Aditya Thackeray msr 87 | Loksatta

“दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय”; मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र!

महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना दिली प्रतिक्रिया, जाणून घ्या आणखी काय म्हणाले आहेत.

“दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षेसाठी महाराष्ट्र मागे पडतोय”; मुख्यमंत्री शिंदेंवर आदित्य ठाकरेंचे टीकास्त्र!
(लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

आगामी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना बैठकीत झालेल्या चर्चेविषयी माहिती देताना शिवसेना(ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, “आज महाविकास आघाडीची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. येणाऱ्या अधिवेशनावर चर्चा झाली आणि हे होत असताना आपण बघत असाल की महाराष्ट्रात जे काही सध्या सुरू आहे, जी परिस्थिती आहे. हे घटनाबाह्य सरकार जसं न काम करता, नुसतं रोज घोषणा करत आहे त्यावरही चर्चा झाली.”

हेही वाचा – एकनाथ शिंदेंच्या बंडाची आग्र्यातून शिवरायांच्या सुटकेशी तुलना करणाऱ्या लोंढाच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले…

याचबरोबर “कालदेखील मी एक महत्त्वाचा विषय आपल्या समोर आणला तो म्हणजे वेदांता फॉक्सकॉनला लिहिलेलं पत्र होतं. अशा अनेक गोष्टी आहेत, अनेक घडामोडी आहेत जिथे शेतकऱ्यांना न मिळालेली मदत असेल, पीक विम्याचा विषय असेल, यावर आम्ही अर्थात चर्चा तर करतच होतो. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे चर्चा न करूनही महाराष्ट्राच्या डोळ्यासमोर सर्व घडामोडी होत आहेत. दु:ख हेच आहे की एका माणसाच्या राक्षसी महत्त्वकांक्षांसाठी महाराष्ट्र मागे चाललेला आहे.” असं म्हणत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली.

हेही वाचा – “अशा मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन…”; संजय राऊतांचं विधान!

याशिवाय, मुंबईत पसरत असलेल्या गोवरच्या साथीबाबत बोलताना आदित्य ठाकरेंनी म्हटले की, “आजपण मी वाचलं आहे की बारा मुलांचा मृत्यू झालेला आहे. मात्र सरकारकडू किंवा मंत्र्यांकडून काहीही बुलेटीन आलेलं नाही. अद्यापही कुठलही ब्रिफिंग झालेलं नाही, जसं आम्ही हाताळत होतो. प्रत्येक दिवशी बुलेटीन यायचं. मुख्यमंत्री स्वत: फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सगळ्यांशी संवाद साधायचे. तसं कुठेही सत्य परिस्थिती लोकांच्या समोर आलेली नाही. दुसऱ्या बाजूला सचिवांची बदली होते, तसेच जर आपण बघितलं तर एकंदरितच केंद्र सरकारकडून एक सूचना आलेली आहे, ज्यात सांगितलेलं आहे की महाराष्ट्राने जास्त काळजी घेणं गरजेचं आहे. अशी नोट कधी कोविडच्या काळात आली नव्हती.”

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 30-11-2022 at 13:43 IST
Next Story
मंगल प्रभात लोढांकडून शिवरायांच्या आग्र्यातील सुटकेची तुलना शिंदेंच्या बंडाशी; म्हणाले, “शिवराय आग्र्यातून बाहेर पडले, त्याचप्रमाणे…”