महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न तापला असताना कोल्हापूर जिल्ह्यात आज मध्यरात्रीपासून बंद आदेश लागू करण्यात आला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नसंदर्भात महाविकास आघाडीने १० डिसेंबरला आंदोलनाची हाक दिली आहे. या आंदोलनात सीमा भागातील मराठी भाषीक देखील सहभागी होण्याची शक्यता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा- कन्नडिगांकडून पुन्हा ट्रकला फासलं काळं : आदित्य ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल; म्हणाले, “घाबरटांनी शिवसेना…”

याचवेळी कोल्हापूर जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या निवडणुकांचा होत आहेत. यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने कोल्हापूर जिल्ह्यात बंदी आदेश लागू केला आहे. ९ ते २३ डिसेंबर या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यात राहणार बंदी आदेश लागू करण्यात आला अहड. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Maharashtra karnataka border controversy prohibition order enforced in kolhapur from midnight dpj
First published on: 08-12-2022 at 23:14 IST