मुंबई: जून २०२४ मध्ये सुरू झालेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणयोजनेत आता १कोटी ८९ लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत.ई केवायसी करण्याच्या शेवटच्या दिवशी(३०एप्रिल )अल्प   प्रमाणात लाडक्या बहिणीने केवायसी केलेली आहे. मार्च आणि एप्रिल महिन्यात केलेल्या इ केवायसी नंतर १ कोटी ८९ लाख लाडक्या बहिणीं पात्र ठरल्या आहेत तर ५४ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत. 

मार्च अखेर हा आकडा ६८ लाख होता. एक महिन्यात १४ लाख लाडक्या बहिणींनी इ केवायसी पूर्ण करताना सरकारी कर्मचारी नाही हे स्पष्ट केले आहे. त्यापूर्वी त्यांनी चुकून सरकारी कर्मचारी आहोत असे नमूद केले होते. महायुती सरकारने जून २०२४ मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. राज्यातील दोन कोटी 43 लाख लाडक्या बहिणींनी त्यावेळी अंतिम नोंदणी केली होती. त्यापूर्वी हा आकडा दोन कोटी ४७ लाख होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच दिवशी या योजनेची पडताळणी केली जाईल असे  जाहीर केले. तेव्हापासून गेली दीड वर्षे या योजनेची विविध मार्गांनी पडताळणी केली जात आहे. यात बहिणींनी निकषात बसत नसताना या योजनेचा लाभ घेतला असल्याचे उघड झाले आहे. यात सरकारी कर्मचारी असलेल्या बहिणींचा समावेश आहे तर पुरुष असताना बहिणींचा लाभ घेतलेला असल्याचे दिसून आले आहे. पडताळणी साठी  तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

इ केवायसी द्वारे होणाऱ्या पडताळणी साठी शेवटची मुदत ही मार्च अखेर होती. त्यावेळी एक कोटी 75 लाख लाडक्या बहिणी पात्र ठरल्या होत्या. मात्र राज्यातील अवकाळी पाऊस, प्रचंड उष्णता यामुळे मार्च नंतर आणखी एक महिना या योजनेच्या ई केवायसी  पडताळणीसाठी मुदतवाड देण्यात आली. ती आज 30 एप्रिल रोजी संपली.शेवटच्या दिवशी ही संख्या जवळपास एक कोटी ८९ लाख पात्र ठरल्या आहेत.

राज्यातील लाडक्या बहिणीची पात्र अपात्र संख्या अद्याप निश्चित झालेली नाही. ही संख्या निश्चित होण्यास आणखी एक दोन जातील.मार्च अखेर केवायसी करणाऱ्या २६ लाख ३४ हजार लाडक्या बहिणीने शिल्लक होत्या  यातील १४ लाख लाडक्या बहिणीने योग्य प्रकारे केवायसी केल्याने त्या आता पात्र ठरलेले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री लाडक्या बहिणी योजनेतील एकूण पात्र लाडक्या बहिणी ह्या एक कोटी ८९ लाख झाल्या असून अपात्र लाडक्या वहिनी ५४ लाख ठरल्या आहेत.