Maharashtra Ladki Bahin Yojana Documents Requirement : महिलांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. वर्षभरापूर्वी राज्य सरकारने या योजनेला मंजुरी दिली. राज्यातील लाखो महिला या योजनेचा लाभ घेत आहेत. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना सरकारने आणली. महिलांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू करण्यास महाराष्ट्र सरकारने २८ जून २०२४ रोजी मान्यता दिली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ या वयोगटातील पात्र महिलांना दर महिना १,५०० रुपयांचा आर्थिक लाभ दिला जातो.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चा लाभ फक्त पात्र लाभार्थ्यांनाच मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात, ते जाणून घेऊयात.

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी पात्रता

१. महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक.
२. राज्यातील विवाहीत, विधवा, घटस्फोटीत, परित्यक्ता आणि निराधार महिला तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला.
३. किमान वयाची २१ वर्षे पूर्ण व कमाल वयाची ६५ वर्ष पूर्ण होईपर्यंत.
४. लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते असावे.
५. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांची यादी

  • मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज.
  • लाभार्थी महिलेचे आधार कार्ड
  • लाभार्थी महिलांच्या महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र, महाराष्ट्रातील जन्माच्या दाखला, राशन कार्ड, मतदान कार्ड.
  • अधिकाऱ्याकडून दिलेल्या कुटुंबप्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला, राशन कार्ड.
  • बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स कॉपी.
  • फोटो KYC साठी.
  • राशन कार्ड.
  • लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्थीचे पालन करण्याबद्दलचे हमीपत्र.
  • आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले असावे

डोमिसाइल प्रमाणपत्र. जर डोमिसाइल प्रमाणपत्र उपलब्ध नसेल, तर खालीलपैकी कोणतेही एक डॉक्युमेंट सादर करावे लागेल:

  • गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले रेशन कार्ड
  • गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला

जर एखाद्या महिलेचा जन्म दुसऱ्या राज्यात झाला असेल; पण तिचा पती महाराष्ट्राचा असेल, तर खालीलपैकी कोणतेही एक कागदपत्र सादर करावे लागेल –

  • गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले रेशन कार्ड
  • गेल्या १५ वर्षांपासून वैध असलेले मतदार ओळखपत्र
  • जन्म प्रमाणपत्र
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • रहिवाशी प्रमाणपत्र
  • पांढऱ्या रेशन कार्डाच्या बाबतीत उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे. जर रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी कार्ड असेल, तर उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही.
  • जर महिला नवविवाहित असेल आणि तिचे नाव रेशन कार्डवर नमूद केलेले नसेल, तर विवाह प्रमाणपत्रासह पतीचे रेशन कार्ड सादर करावे लागेल.
  • बँक खात्याची माहिती.
  • अर्जदाराचा फोटो.

लाडकी बहीण योजनेचा लाभ कोणाला घेता येत नाही?

१. ज्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न २.५० लाख रुपयापेक्षा अधिक आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही.

२. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकर भरतात, त्या महिला या योजनेत अपात्र ठरतात.

३. ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य नियमित/ कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग / उपक्रम/मंडळ / भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत आहेत, त्या अपात्र ठरतील. मात्र, २.५० लाखापर्यंत उत्पन्न असलेले बाह्य यंत्रणाद्वारे कार्यरत असलेले कर्मचारी, स्वयंसेवी कामगार आणि कंत्राटी कर्मचारी पात्र ठरतील.

४. सदर लाभार्थी महिला शासनाच्या इतर विभागा मार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे दरमहा १५०० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेचा लाभ घेत असेल.

५. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार / आमदार आहे.

६. ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड/कॉर्पोरेशन / उपक्रमाचे अध्यक्ष/उपाध्यक्ष/संचालक/सदस्य आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

७. ज्यांच्याकडे चारचाकी वाहन (ट्रॅक्टर वगळून) त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे, त्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतात.