मुंबई: राज्यातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने जुलै २०२४ मध्ये सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची गेली पंधरा महिने सुरू झालेली पडताळणी मार्च अखेर संपली. या पडताळणीत एकूण दोन कोटी ४७ लाख लाडक्या बहिणी पैकी ७२ लाख लाडक्या बहिणी नावडत्या ठरल्या आहेत. सरकार आता एक कोटी ७५ लाख लाडक्या बहिणींना दरमहा १५०० रुपये अनुदान देणार आहे.
सरकारचे या योजनेवर महिन्याला दोन हजार ६०० कोटी खर्च होतील. वर्षाला हा खर्च तीस हजार कोटी पर्यंत जाईल. शासन यापूर्वी या योजनेवर वर्षाला ४६ हजार कोटी रुपये खर्च होत होते. पडताळणी नंतर सुमारे १५ हजार कोटी रुपये सरकारचे बचत होणार आहेत. महायुती सरकार साठी संजीवनी ठरलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना फायदेशीर ठरली. या योजनेमुळे महायुती पुन्हा सत्तेत येऊ शकली असे म्हटले जाते.
जुलै २०२४ मध्ये ही योजना सुरू करण्यात आली. दोन कोटी ४७ लाख महिलांनी या योजनेसाठी अर्ज होते. त्या सर्वांना महिन्याला १५०० रुपये दिले गेले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मागील पंधरा महिन्यात ७२ लाख लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या असून नावडत्या झाल्या आहेत.
