Maharashtra Legislature Monsoon Session : आजपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरूवात झाली आहे. मंत्रीमंडळ विस्तार, खातेपाटप ते अतिवृष्टीग्रस्तांना मदत जाहीर करण्यासही झालेला विलंब अशा विविध प्रश्नांवर विरोधी पक्ष सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहे.  पहिल्याच अधिवेशनात शिंदे-फडणवीस सरकारची कसोटी लागणार आहे.  शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस, आता विरोधक म्हणून त्यांच्यात एकजूट राहणार का, या प्रश्नाचे उत्तरही या अधिवेशनात मिळणे अपेक्षित आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates : महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर!

20:22 (IST) 17 Aug 2022
बुलढाणा :  अंत्ययात्रा थांबवून शोकाकुल सोयरे अन् ग्रामस्थ सामूहिक राष्ट्रगानमध्ये सहभागी! ;  काजेगाववासीयांनी दिला राष्ट्रभक्तीचा अनोखा प्रत्यय!

कुटुंबातील अन् गावातील राष्ट्रप्रेमी महिलेचे निधन झाल्याने शोकाकुल कुटुंबातील सदस्य, सोयरे आणि ग्रामस्थ त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले. ही अंत्ययात्रा ग्रामपंचायतजवळ सकाळी ११ वाजताच्या सुमारास पोहोचली तेव्हा तिथे सामूहिक राष्ट्रगीत गायनाची लगबग सुरू होती. अंत्ययात्रा तिथेच थांबवून सर्व जण राष्ट्रगीत गायनात सहभागी झाले.

सविस्तर वाचा…

19:15 (IST) 17 Aug 2022
डोंबिवली जवळील भोपर गावातील घटना व्यायमशाळेमध्ये भाजप-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची हाणामारी

डोंबिवली जवळील २७ गावातील भोपर गावातील व्यायम शाळेत बुधवारी सकाळी राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांची जोरदार हमरीतुमरी झाली. राजकीय आणि पाणी प्रश्नावरुन ही वादावादी आणि त्यानंतर हाणामारीची घटना घडल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे. याप्रकरणी दोन्ही गटांनी परस्पर विरोधी तक्रारी मानपाडा पोलीस ठाण्यात केल्या आहेत.

सविस्तर वाचा…

19:05 (IST) 17 Aug 2022
मुंबईकरांना ‘बेस्ट’ भेट ; ताफ्यात दुमजली आणि प्रीमियम बस दाखल

प्रवाशांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी बेस्ट उपक्रमाने दुमजली बस आणि आसन आगाऊ आरक्षित करण्याची सुविधा असलेली प्रीमियम वातानुकूलित बसही दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १८ ऑगस्ट रोजी या दोन्ही बसना हिरवा कंदिल दाखविण्यात येणार आहे. सविस्तर वाचा…

18:55 (IST) 17 Aug 2022
सिंचन घोटाळ्यात अजित पवारांना क्लीन चिट मिळालीच नाही? मुंबई हायकोर्टातील अहवालाबाबत मोठी माहिती आली समोर

भारतीय जनता पार्टीचे नेते मोहित कंबोज यांनी मंगळवारी रात्री काही ट्वीट्स करून सिंचन घोटाळ्याची पुन्हा चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. कंबोज यांच्या ट्वीटमुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापलं आहे. असं असताना आता अजित पवार यांना सिंचन घोटाळ्यात अद्याप पूर्णपणे क्लीन चिट मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. २०१९ मध्ये एसीबीनं दिलेल्या क्लीन चिटबाबतचा अहवाल मुंबई उच्च न्यायालयाने अद्याप स्वीकारला नसल्याची बाब समोर आली आहे. सविस्तर बातमी

18:32 (IST) 17 Aug 2022
यंदा ठाण्याच्या जांभ‌ळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर ; खासदार विचारे यांचा शिंदे गटावर अप्रत्यक्ष निशाणा

शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच साजरा होणाऱ्या दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटांकडून शक्तीप्रदर्शन केले जाणार असल्याचे चित्र असतानाच, ठाकरे समर्थक खासदार राजन विचारे यांनी यंदा ठाण्याच्या जांभ‌ळीनाक्यावरील दहीहंडीत निष्ठेचे थर लावणार असल्याचे सांगत शिंदे गटावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा…

18:03 (IST) 17 Aug 2022
वाई : खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवला

भाजपा खासदार उदयनराजे भोसले यांनी सातारा शहरातील गोडोली येथे वाढदिवसानिमित्त आपल्या कार्यकर्त्यांला अनोख्या पद्धतीने पेढा भरवल्याची जोरदार चर्चा साताऱ्यात आहे.

गोडोली (सातारा)येथील कार्यकर्ते विनोद मोरे यांचा आज वाढदिवस आहे.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 17 Aug 2022
चंद्रपूर : ब्रम्हपुरीत वाघांचा उच्छाद; आठवडाभरात घेतले चार बळी , अड्याळ शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार

ब्रम्हपुरी तालुक्यात वाघांनी उच्छाद मांडला आहे. आठवडाभरात वाघांनी चार बळी घेतल्याने संपूर्ण तालुक्यात दहशतीचे वातावरण आहे.तालुक्यातील अड्याळ शेतशिवारात आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास वाघाने केलेल्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाला.

सविस्तर वाचा

17:35 (IST) 17 Aug 2022
तीन कोटींच्या खंडणीसाठी क्रिकेट बुकीच्या अपहरणाचा प्रयत्न

ऑनलाईन क्रिकेट सट्टा व जुगाराचे रॅकेट चालविणाऱ्या प्रदीप गंगमवार व त्याचा मित्र राजेश झाडे या दोघांचे चौघांनी मिळून सरताज या मित्राच्या मदतीने अपहरण केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. तीन कोटींच्या खंडणीसाठी हे अपहरण करण्यात आले.दरम्यान, अपहरणकर्त्यांच्या तावडीतून गंगमवार व झाडे यांनी सुटका करून घेण्यात यश मिळवले. सविस्तर वाचा…

17:27 (IST) 17 Aug 2022
येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरी रेल्वेतील आसनांवर ; रेल्वेचा निर्णय

येरवडा कारागृहात कैद्यांनी तयार केलेल्या चादरींचा वापर आता रेल्वे गाड्यांमध्ये करण्यात येणार आहे. वातानुकूलित डब्यांमध्ये या चादरी प्रवाशांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय मध्य रेल्वेच्या प्रशासनाने घेतला आहे.स्थानिक उद्योगांना प्रोत्साहन देण्याचे धोरण रेल्वेने अवलंबले आहे.

सविस्तर वाचा

17:13 (IST) 17 Aug 2022
संघाची बदनामी करण्याच्या हेतूने समाजमाध्यमातून मजकूर प्रसारित ; सखोल तपासाची रा. स्व. संघाची मागणी

जातीय तेढ निर्माण करण्याच्या हेतूने तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ विचारांनी चालविल्या जाणाऱ्या संघटनांची बदनामी करण्याचे कारस्थान सुरू आहे. पोलिसांनी अशा घटनांची वेळीच दखल घ्यावी, समाजात तेढ निर्माण करणारा अपप्रचार आणि महापुरूषांची बदनामी रोखावी, अशी विनंती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे महानगराचे कार्यवाह महेश करपे यांनी केली आहे. सविस्तर वाचा…

16:58 (IST) 17 Aug 2022
‘डेटिंग ॲप’वरून संपर्क साधून अपहरण व खंडणी उकळण्याचा प्रयत्न ;  तीन आरोपींना अटक – मुख्य आरोपी नर्तक

पाच लाख रुपयांची खंडणी उकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ओशिवरा पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.  आरोपींनी एका डेटिंग ॲपद्वारे तक्रारदार तरुणाशी संपर्क साधला व उच्चभ्रू महिलांसोबत मैत्री करण्यासाठी १० हजार रुपये देण्याचे आमीष दाखवून भेटण्यास बोलवले होते.  सविस्तर वाचा…

16:46 (IST) 17 Aug 2022
विना परवाना बसचे सारथ्य ; जयंत पाटलांवर गुन्हा दाखल करण्याची भाजपची मागणी

इस्लामपूर आगारातील सजवलेल्या विठाई बसचे सारथ्य विनापरवाना केल्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची आग्रही मागणी भाजपने बुधवारी पोलीस ठाण्यात केली. या प्रकरणी चौकशी करून उद्या सायंकाळपर्यंत  योग्य ती कारवाई करू असे आश्‍वासन पोलीस अधिकार्‍यांनी दिले.

सविस्तर वाचा…

16:45 (IST) 17 Aug 2022
पुणे : तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच हिसकावला

पादचारी तरुणीकडील ४० हजारांचा मोबाइल संच दुचाकीस्वार चोरट्याने हिसकावून नेल्याची घटना कात्रज-कोंढवा रस्त्यावर घडली. याबाबत एका तरुणीने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बिबवेवाडीतील अप्पर इंदिरानगर भागात राहायला आहे.

सविस्तर वाचा

16:30 (IST) 17 Aug 2022
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणः ईडीची मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. त्यात पूर्व उपनगरातील काही ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने सुमारे १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही शोध मोहीम राबवली.

सविस्तर वाचा

16:29 (IST) 17 Aug 2022
पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणः ईडीची मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम

पत्राचाळ गैरव्यवहाराप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी शोध मोहीम राबवली. त्यात पूर्व उपनगरातील काही ठिकाणांचा समावेश आहे. ईडीने सुमारे १०३९ कोटी रुपयांच्या गैरव्यवहाराप्रकरणी ही शोध मोहीम राबवली.

सविस्तर वाचा

16:18 (IST) 17 Aug 2022
पिंपरी पालिकेच्या सर्व कार्यालयांत गुरुवारपासून दररोज सकाळी राष्ट्रगीत

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यभरात सुरू असलेल्या स्वराज्य महोत्सवांतर्गत बुधवारी (१७ ऑगस्ट) सकाळी पिंपरी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीसह सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सामूहिक राष्ट्रगीत उपक्रम राबवण्यात आला.

सविस्तर वाचा

16:03 (IST) 17 Aug 2022
BJP Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय राजकारणात? भाजपाकडून मोठी जबाबदारी

भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी पक्षाचं संसदीय मंडळ (Parliamentary Board) आणि केंद्रीय निवडणूक समिती (Central Election Committee) नव्याने तयार केली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंग चौहान आणि नितीन गडकरी यांना यामधून वगळण्यात आलं आहे. जे पी नड्डा संसदीय मंडळाचे आणि भाजपाच्या निवडणूक समितीचे अध्यक्ष असतील. विशेष बाब म्हणजे निवडणूक समितीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा समावेश करण्यात आला आहे. यामुळे देवेंद्र फडणवीसांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रवेशाची चर्चा रंगली आहे.

सविस्तर बातमी

15:40 (IST) 17 Aug 2022
यंदा ठाण्यात राजकीय दहीहंड्यांचा थरार

करोना संकटामुळे गेली दोन वर्षे दहीहंडी उत्सव साजरा होऊ शकलेला नसून यंदा करोनाचे संकट कमी झाल्याने दहीहंडी उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार असल्याचे दिसून येते. संपुर्ण राज्याचे लक्ष वेधणाऱ्या ठाणे शहरातील विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांनी दहीहंडी उत्सवाचे आयोजन केले असून या उत्सवाच्या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील विविध पक्षाचे प्रमुख नेते उपस्थिती लावणार आहेत.

सविस्तर वाचा

15:23 (IST) 17 Aug 2022
कोळसा खाण कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनाबाबत नवीन कायदा करणार ; कोळसा मंत्रालयाचे सचिव अनिल कुमार जैन यांची माहिती

कोळसा खाणीत काम करणाऱ्या कामगारांच्या निवृत्ती वेतनाबाबत कोळसा मंत्रालयाकडून लवकरच नवीन कायदा केला जाईल. त्यानुसार खासगी कंपन्यांनाही प्रतिटन कोळसा उत्पादनातून कामगारांच्या निवृत्ती वेतनासाठी निश्चित आर्थिक योगदान देण्यासह सरकारी कंपन्यांनाही पूर्वीहून जास्त योगदान द्यावे लागेल सविस्तर वाचा…

15:21 (IST) 17 Aug 2022
कन्नड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस प्रशासन हादरले

कन्नड तालुक्यातील एका लहानशा गावातील १७ वर्षीय मुलीवर सहा जणांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 17 Aug 2022
पुणे : प्रायोगिक तत्वावर कचरामुक्त वडारवाडी उपक्रम

वडारवाडी परिसरातील रहिवाश्यांमध्ये शाश्वत घनकचरा व्यवस्थापन पद्धतीबाबत जनजागृती करण्यासाठी कचरामुक्त वडारवाडी हा उपक्रम प्रायोगिक तत्वावर राबविण्याचे महापालिकेने निश्चित केले आहे. कचऱ्याचे प्रकार, कचऱ्याचे परिणाम आणि कचरा विलगीकरणाच्या पद्धतीबाबत वडारवाडी परिसरात पुढील तीन महिने जनजागृती केली जाणार आहे.

सविस्तर वाचा

15:20 (IST) 17 Aug 2022
भंडारा बलात्कार प्रकरण : पीडितेच्या जबाबाबाबत मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला मागितला

भंडारा बलात्कार प्रकरणातील पीडितेच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. त्यामुळे मेडिकल रुग्णालयातील डॉक्टरांनी पीडितेचा जबाब घेण्याबाबत मानसोपचार विभागाचा सल्ला मागितला आहे. कारण, या जबाबनंतरच घटनेची वास्तविकता पुढे येणार आहे.

सविस्तर वाचा…

15:07 (IST) 17 Aug 2022
पुणे : दहशत माजविण्यासाठी पिस्तुल बाळगणाऱ्या सराईतांना पकडले

कोंढवा परिसरातील टिळेकरनगर परिसरात पोलिसांचे पथक गस्त घालत होते. त्या वेळी एकजण पिस्तुल घेऊन थांबल्याची माहिती पोलीस कर्मचारी गणेश चिंचकर, अमोल हिरवे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून जाधवला पकडले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली.

सविस्तर वाचा

15:01 (IST) 17 Aug 2022
पुणे : पादचाऱ्यांची सुरक्षा वाऱ्यावर ; महिन्यात ४८ पादचाऱ्यांचा मृत्यू

भरधाव वाहनांमुळे शहराच्या वेगवेगळ्या भागात गेल्या सात महिन्यात ४८ पादचारी मृत्युमुखी पडले आहेत. पादचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील वाहतुकीचे समस्या दिवसेंदिवस जटील होत चालली आहे.

सविस्तर वाचा

14:56 (IST) 17 Aug 2022
“…त्या सर्वांना मंत्रीपद मिळणारच” बंडखोर आमदार संजय गायकवाड यांचं विधान चर्चेत

महाराष्ट्रात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर बराच काळ मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. अलीकडेच या नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला आहे. मलाईदार खाती भारतीय जनता पार्टीला गेल्याने शिंदे गटातील आमदार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहेत. त्याचबरोबर शिंदे गटातील काही आमदारांना मंत्रीपदच मिळालं नाही, यामुळे तेही नाराज असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. सविस्तर बातमी

14:55 (IST) 17 Aug 2022
“दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा भाजपाचा मुख्य व्यवसाय” नाना पटोलेंची बोचरी टीका!

ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स सारख्या केंद्रीय तपास यंत्रणांची भीती घालण्याचा प्रकार भारतीय जनता पार्टीकडून सातत्याने केला जात आहे. मागील सात-आठ वर्षातील भाजपा नेत्यांची विधाने पाहिली तर विरोधकांना घाबरवण्यासाठी, त्यांचा आवाज बंद करण्यासाठी ते कारवायांच्या धमक्या देत असतात. भाजपाचा आता दहशतवाद आणि ब्लॅकमेलिंग हा मुख्य व्यवसाय झाला आहे. परंतु लोकशाहीत हे फार काळ टिकणार नाही, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. सविस्तर बातमी

14:47 (IST) 17 Aug 2022
समाधान हॉटेलच्या व्यवस्थापकावर तरुणांचा हल्ला ; काटई-बदलापूर पाईपलाईन रस्त्यावरील घटना

काटई-बदलापूर पाईप लाईन रस्त्यावरील समाधान हाॅटेलच्या व्यवस्थापकावर दोन अनोळखी इसमांनी त्यांची दुचाकी अडवून चाकुने हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी केले. त्यांच्या खिशातील लाख रुपये किमतीचा मोबाईल जबरदस्तीने काढून घेऊन हल्लेखोर पळून गेले. सोमवारी रात्री ही घटना घडली. सविस्तर वाचा…

14:13 (IST) 17 Aug 2022
शिळफाटा रस्त्याचा मोबदला न मिळाल्याचे सत्य प्रतिज्ञापत्र लिहून देण्याची शेतकऱ्यांची तयारी ; जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदन

मागील ३० ते ३५ वर्षाच्या कालावधीत कल्याण-शिळफाटा रस्त्या लगतच्या शेतकरी, जमीन मालकांना शासनाकडून कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. आता शासनाने मोबदला देण्याविषयी एक समिती स्थापन करुन शेतकऱ्यांची मते जाणून घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. सविस्तर वाचा…

14:08 (IST) 17 Aug 2022
भंडारा : आयटीआय परिसरात बिबट्याचा मुक्तसंचार; शहरात दहशत

भंडारा शहरातील स्टेशन मार्गावरील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) परिसरात आज सकाळी १० वाजता बिबट्या संचार करताना दिसून आला. यामुळे शहरात दहशत पसरली आहे.सुरक्षा रक्षक विनायक शिवाजी देशमुख यांना त्यांच्या संरक्षण चौकीसमोरील गवतामध्ये बिबट्या असल्याचे लक्षात आले.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 17 Aug 2022
कन्नड तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार ; औरंगाबाद ग्रामीणचे पोलीस प्रशासन हादरले

कन्नड तालुक्यातील एका लहानशा गावातील १७ वर्षीय मुलीवर सहा जणांनी वारंवार अत्याचार केल्याची घटना १३ ऑगस्ट रोजी कन्नड ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने पोलिसांना घडलेल्या घटनेची माहिती दिली. सविस्तर वाचा…

13:18 (IST) 17 Aug 2022
श्रावणातील मागणीमुळे रानभाज्यांचे दर कडाडले

श्रावण महिन्यात रानावनात उगविणाऱ्या जंगली भाज्यांना भोजनात विशेष स्थान असते. रानभाज्यांना श्रावण महिन्यात असलेली वाढती मागणी आणि त्याचा पुरेसा पुर‌वठा बाजारात होत नसल्याने रानभाज्यांचे दर अव्वाच्या सव्वा झाले आहेत. रानभाजी खरेदी करणाऱ्यांना भाजीचा दर ऐकून चटका बसत आहे. सविस्तर वाचा…

12:35 (IST) 17 Aug 2022
कल्याण-शिळफाटा रस्त्यावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी

डोंबिवलीतून सकाळी आठ वाजता खासगी वाहनाने बाहेर पडलेला प्रवासी सकाळी १० वाजेपर्यंत काटई नाका परिसरात अडकून पडला होता. या अभूतपूर्व वाहन कोंडीत विद्यार्थी, रुग्ण अडकून पडले आहेत.

सविस्तर वाचा…

12:30 (IST) 17 Aug 2022
उल्हासनगर : ६२ गुन्ह्यांची उकल, ३१ लाखांचा मुद्देमाल हस्तांतरीत ; नगर परिमंडळ चारच्या पोलिसांची चमकदार कामगिरी

उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या तीनही शहरांच्या परिमंडळ चारमध्ये गेल्या काही महिन्यात झालेल्या विविध चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांना ६२ गुन्ह्यांची उकल केली असून यात ३१ लाख ६९ हजार रूपयांचा मुद्देमाल परत मिळवण्यात यश आले आहे.

सविस्तर वाचा

12:29 (IST) 17 Aug 2022
पुणे : एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग ; सविस्तर प्रकल्प अहवाल अंतिम टप्प्यात

एकवीरा देवी गडावर जाण्यासाठी रज्जू मार्ग (रोप-वे) प्रस्तावित करण्यात आला आहे. भारतीय पुरातत्त्व विभाग, वनविभाग यांच्या सहकार्याने पर्यटन विभागाकडून हा प्रकल्प करण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट – डीपीआर) अंतिम टप्प्यात आहे.

सविस्तर वाचा

12:29 (IST) 17 Aug 2022
मुंबई : महागडया वाहनांच्या खरेदीत उपनगरवासी आघाडीवर

करोनामुळे लागू झालेले कडक निर्बंध आणि आर्थिक मंदी याचा उद्योधंद्याना बसलेला फटका, अनेकांच्या नोकऱ्यांवर आलेली गदा, तर काही कर्मचाऱ्यांच्या वेतनात झालेली कपात यामुळे नागरिक त्रस्त होते. मात्र असे असले तरी महागड्या वाहनांच्या खरेदीमध्ये मुंबई उपनगर परिसराने आघाडी घेतली आहे.

सविस्तर वाचा

12:28 (IST) 17 Aug 2022
ठाणे : अपघातात एकाचा मृत्यू

शिळफाटा येथील दहीसर भागात एका वाहनाच्या धडकेत बिलाल शेख (३५) याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली. याप्रकरणी शिळफाटा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.बिलाल हा शिळफाटा भागात राहत होता.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 17 Aug 2022
गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूंचा ‘ईमेल हॅक’ ; संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न

गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांचे ‘जीमेल’ खाते ‘हॅक’ करून त्यांच्या संबंधितांना फसविण्याचा प्रयत्न करण्यात आला. या संदर्भात विद्यापीठ प्रशासनाने गडचिरोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 17 Aug 2022
पुणे : ‘आरएसएस संघराज्य’ या खोट्या खातेधारकावर गुन्हा दाखल ; समाज माध्यमावर आक्षेपार्ह लिखाण

‘आरएसएस संघराज्य’ या नावाने खोटे खाते उघडून त्याद्वारे समाज माध्यमात, छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबाबत आक्षेपार्ह लिखाण केल्याप्रकरणी पुण्यातील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 17 Aug 2022
उल्हासनगरः घरकामगार महिलेची ‘हातसफाई’ ; घरातून १३ लाखांची रोकड केली लंपास, गुन्हा दाखल

घरकाम करणाऱ्या एका महिलेने घरातील साफ सफाई करता करता तब्बल १३ लाख रूपयांची रोकड लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. उल्हासनगरच्या कॅम्प पाच भागात हा प्रकार घडला. याप्रकरणी उल्हासगरच्या हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा

12:26 (IST) 17 Aug 2022
ठाण्यातील सेवा रस्त्यांवर बेकायदा पार्किंग सुरूच

शहरातील सेवा रस्त्यांवर बेकायदा उभी केल्या जाणाऱ्या वाहनांवर पालिका प्रशासनाने काही दिवसांपूर्वी कारवाई सुरू केली होती मात्र, या करवाईचे फारसे अधिकार नसल्यामुळे वाहनचालक त्यांच्या कारवाईला जुमानत नसल्याचे चित्र असून रस्त्याच्या दुतर्फा बेकायदा वाहने उभी केली जात असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण कोंडी होत आहे.

सविस्तर वाचा

12:25 (IST) 17 Aug 2022
मुंबईत वार्षिक सरासरीच्या ६९ टक्के पाऊस ; बुधवारीही पावसाची शक्यता

मुंबईत मंगळवारी पुन्हा एकदा दमदार हजेरी लावणाऱ्या पावसाचा बुधवारी मुक्काम कायम होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा ९६ टक्क्यांवर पोहोचला आहे. मुंबईकरांना पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमधील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.

सविस्तर वाचा

12:06 (IST) 17 Aug 2022
Aditya Thackeray on Rebel MLA: आदित्य ठाकरेंनी बंडखोर आमदारांसमोर ठेवली अट; म्हणाले “त्यांचा गेम केला”

जे गद्दार सोबत गेले त्यांचा गेम कसा केला हे सर्वांनाच दिसत आहे. मंत्रीमंडळ विस्तारात खऱा मुख्यमंत्री कोण हे सर्वांना कळलं आहे. अपक्षांना, महिलांना काही स्थान देण्यात आलेलं नाही. मुंबईकरांनाही काही स्थान देण्यात आलेलं नाही. सर्वात प्रथम जाणारे १४-१५ जण जे निष्ठावंत होते, त्यांनाही स्थान दिलं नाही. निष्ठेला मनात स्थान नाही हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे अशी टीका शिवेसना आमदार आदित्य ठाकरे यांनी केली आहे. आजपासून पावसाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून, विधीमंडळाबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

सविस्तर बातमी

11:31 (IST) 17 Aug 2022
पुणे : महात्मा फुले महामंडळाकडे माहितीची वानवा ; माहिती संकलन सुरू असल्याचे माहिती अर्जाला उत्तर

राज्य शासनाच्या महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाकडे विविध योजनांसाठी केलेली तरतूद, केलेला खर्च आदींबाबतचा तपशीलच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे. माहिती अधिकार अर्जाला माहितीचे संकलन सुरू असल्याचे त्रोटक उत्तर देण्यात आले असून, महामंडळाकडे माहिती संकलित का नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा

11:29 (IST) 17 Aug 2022
मुंबई : परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक

परदेशी चलनाचे आमिष दाखवून महिलेची सुमारे चार लाख रुपयांची फसवणूक करुन पळून गेलेल्या दोन आरोपींना निर्मलनगर पोलिसांनी अटक केली. नूर आलम नसरुद्दीन शेख आणि मेहबूब आलम अमरुद्दीन शेख अशी या दोघांची नावे आहेत.

सविस्तर वाचा

11:28 (IST) 17 Aug 2022
Congress Ghulam Nabi Azad: काँग्रेसला मोठा धक्का! गुलाम नबी आझाद बंडखोरीच्या तयारीत?

काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाला मोठा धक्का दिला आहे. गुलाम नबी आझाद यांनी पक्षाने जम्मू काश्मीरच्या प्रचार समितीच्या प्रमुखपदी नियुक्ती केल्यानंतर काही तासातच राजीनामा दिला आहे. इंडिया टुडेने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, प्रकृतीच्या कारणास्तव गुलाम नबी आझाद यांनी नवी जबाबदारी स्वीकारण्यास नकार दिला आहे. दरम्यान पक्षावर गेल्या काही काळापासून नाराज असलेले गुलाम नबी आझाद पक्षाविरोधात बंड पुकारण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे.

सविस्तर बातमी

11:26 (IST) 17 Aug 2022
शिंदे गटातील ८ मंत्र्यांवर अतिरिक्त खात्यांची जबाबदारी; कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून

राज्यात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर जवळपास ४० दिवसानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. पहिल्या टप्प्यात शिंदे गट आणि भाजपाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण १८ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील ८ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

सविस्तर बातमी

11:26 (IST) 17 Aug 2022
SC on Talaq-E-Hasan – तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नाही – सुप्रीम कोर्ट

तलाक-ए-हसन प्रथा अयोग्य नसल्याचं सर्वोच्च न्यायालायने म्हटलं आहे. मुस्लिम पुरुषांनी पत्नीला महिन्यातून एकदा असे सलग तीन महिने ‘तलाक’ म्हणत घटस्फोटासाठी अनुसरलेली ही प्रथा इतकी अयोग्य नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे.

सविस्तर बातमी

11:25 (IST) 17 Aug 2022
Aditya Thackeray on Maharashtra Government: आदित्य ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले “हे बेईमानांचं सरकार…”

सत्तांतरानंतरचे राज्य विधिमंडळाचे पहिले अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारची अधिवेशनात कसोटी लागणार आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक आक्रमक झाले असून विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ‘५० खोके, गद्दार हाय हाय’ अशा घोषणा देत विरोधकांनी शिंदे गटातील सत्ताधारी आमदारांना लक्ष्य केलं. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना हे सरकार लवकरच कोसळणार असल्याचा दावा केला आहे.

सविस्तर बातमी

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह टुडे