Maharashtra News updates today: राज्यात गेले काही दिवस सर्वदूर मोठा पाऊस कोसळत होता. भारतीय हवामान विभागानं आता मात्र पुढचे काही दिवस पावसाच्या विश्रांतीचा अंदाज वर्तवला आहे. तर दुसरीकडे पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोत कचऱ्याचा डोंगर कोसळून मोठी दुर्घटना घडली. अजूनही ८ कामगार ढिगाऱ्याखाली अडकले असून, युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आतापर्यंत बचावकार्य राबवून नऊ जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले, तर एका कामगाराचा मृतदेह हाती लागला आहे. दुर्घटनाग्रस्त इमारतीभोवतालचा मलबा हटवला जात असून इमारतीचा अस्थिर भाग स्थिर करण्याचे काम जलद गतीने सुरू आहे. दुर्घटनास्थळी आज सकाळी प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिली आहे.
राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे, शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ असल्याचं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे; मात्र खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा फेटाळला आहे.
टीईटी पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे, यात आता आणखी दोघांना अटक झाली आहे, आरोपींची संख्या १२ वर पोहोचली आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, परिचारिका आणि अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिवसेना (शिंदे) नगरसेवक रमेश म्हात्रे यांना आज न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
राज्यात अतिवृष्टीमुळे १० दिवसांत ६३ नागरिकांचा मृत्यू झाला असून वीज पडणे व भिंत कोसळल्याने सर्वाधिक बळी गेले आहेत, अशी माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी विधानसभेत दिली. आज विधिमंडळात काय घडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या बातम्यांसहच राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Mumbai Pune Thane Live News Updates, 10 July 2026 | महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
लोकांना जाणीव होत नाही तोपर्यंत ''रवी'' उगवणार नाही, मनसेचे राजू पाटील यांची भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका
ठाण्यात घराचा भाग कोसळून १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू, तर दोनजण जखमी
भारतीय तरुणांना जाळ्यात ओढणाऱ्या पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टीच्या संपर्कात राज्यातील १०२ व्यक्ती; एटीएसकडून पालकांना सतर्कतेचे आवाहन
मध्य रेल्वेवर रविवारी मेगाब्लाॅक
नाशिकहून ३०० सायकल वारकरी पंढरपूरकडे रवाना; 'अवयवदान हेच श्रेष्ठ दान'चा संदेश
कंपन्यांना 'अच्छे दिन'! जूनमध्ये कंपन्यांनी स्वस्त कर्जरूपात उभारले सव्वा लाख कोटी?
अकोल्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांना गटनेते पदावरून हटवले; माजी आमदार वैभव पिचड यांना धक्का
माजी खासदार राजन विचारे यांच्या नावाने बनावट संदेश, सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचा प्रयत्न
तुकाराम मुंढेंच्या एफडीएची भिवंडीत कारवाई, व्यवसाय गोळ्या-बिस्किटांचा अन् विक्री गुटख्याची
डोंबिवलीचे ‘पप्पा’ गेले कुठे?
परभणी जिल्हा सहकारी बँकेत घराणेशाही, वरपूडकर-बोर्डीकरांच्या कुटुंबातले पाच संचालक, २१ पैकी १३ जागा बिनविरोध
डोंबिवलीतील मुजोर नगरसेवक रमेश म्हात्रेंना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी
चित्र स्पष्ट होण्यापूर्वीच धनिकांकडून ‘लक्ष्मीदर्शन’ सुरू! खा.चव्हाणांचे धोरण; अनिश्चिततेचे कारण, अनेक इच्छूक सैरभैर…नांदेड जिल्हा सह.बँक निवडणूक
रिलायन्स अनिल अंबानी समुहाच्या बोगस कंपन्यांचे पोलखोल! बँकांना करोडोंची कर्जे दिलीच कशी? सक्तवसुली संचालनालयाचा सवाल
आता घरगुती ग्राहकांना अवघ्या अडीच हजारात सौर प्रकल्प लावता येणार; … तर वीज बिलातून सुटका; जाणून घ्या, योजना काय? लाभ कसा घ्याल?
मुलांच्या शाळेत महिला शिक्षकांना नोकरी देता येते? उच्च न्यायालयाने दिला महत्वपूर्ण निर्णय…
मीरा रोडच्या ''स्टार मार्केट''चा अन्न व्यवसाय परवाना एफडीएकडून निलंबित; उंदरांचा वावर, बुरशी लागलेली फळे-भाज्या, मुदतबाह्य अन्नपदार्थांचा साठा
पिंपरी-चिंचवड! मोशी कचरा डेपो दुर्घटनेची त्रयस्थ यंत्रणेमार्फत चौकशी, आयुक्तांची माहिती, शिवसेनेचे आयुक्त दालनात आंदोलन
नाशिकमध्ये एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा ठाकरे गटाच्या सहा नगरसेवकांशी संपर्क, पाच कोटींचे आमिष, ठाकरे गटनेत्यांचा आरोप
वेलंकनीला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा ; रेल्वे प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था उपलब्ध
मराठी ग्रंथ संग्रहालयात उभारणार अत्याधुनिक मिनी नाट्यगृह
नागरी आरोग्याशी खेळ : नालासोपाऱ्यात साचलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्यात चहाच्या किटल्या धुतल्याचा धक्कादायक व्हिडिओ व्हायरल
जिल्ह्यातील क्रीडापटूंच्या प्रशिक्षणासाठी सामाजिक संस्थेचे पाठबळ ; विणव्हळ आश्रमशाळेचे क्रीडा शाळेत होणारा रूपांतर
कोल्हापुरात ३०० झाडांची कत्तल; वन विभागाकडून याच जागेवर वृक्षारोपण
मुसळधार पावसानंतर वसई-विरारमधील जनजीवन पूर्वपदावर; शाळा आणि महाविद्यालये पुन्हा सुरू
मुंबईतील १३ हजार उपकरप्राप्त पागडी इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; म्हाडा सुधारणा विधेयक मंजूर, सुमारे २० लाख रहिवाशांना लाभ
नगरसेवक रमेश म्हात्रेंवर कायद्याच्या चौकटीतून सर्व प्रकारची अत्यावश्यक कठोर कारवाई होणार, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची माहिती
हिंगोलीत भूकंपानंतर १०५ घरांचे नुकसान ; भूकंप लहरी मोजण्याचे यंत्र बसण्याची मागणी
सालाबादप्रमाणे यंदाही नेवाळी रस्त्याची डोकेदुखी कायम, तो वादग्रस्त पट्टा यंदाही खड्ड्यात, खड्ड्यांमुळे एकेरी वाहतूक
भाईंदरमध्ये नगरसेवकावर झाड कोसळले , नाकाला दुखापत

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
