Maharashtra News Live Updates, 23 May : केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली आहे. तर राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.
दरम्यान, मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे.
अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
स्वित्झर्लंडमधील दावोस याठिकाणी पार पडलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत परदेशातील २३ कंपन्यांनी महाराष्ट्रासोबत सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले आहेत. यामुळे महाराष्ट्रात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. सविस्तर बातमी
गेल्या आठवड्यात अनिल बैजल यांनी दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अनिल बैजल यांचा राजीनामा स्वीकारला असून विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे नवे उपराज्यपाल म्हणून नियुक्ती केली आहे. बैजल यांनी वैयक्तिक कारणांमुळे दिल्लीच्या उप राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता. यानंतर सोमवारी राष्ट्रपती भवनाकडून एक निवेदन जारी करत विनय कुमार सक्सेना यांची दिल्लीचे उप राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली. सविस्तर बातमी
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज औरंगाबादेत जल आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चाला औरंगाबादेतील हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. यावेळी केलेल्या भाषणातून देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. सविस्तर बातमी
केंद्रातील मोदी सरकार आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यावरुन ममता बॅनर्जी मोदी सरकारला लक्ष्य करत असतात. तर दुसरीकडे भाजपाचे नेतेदेखील पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वातील सरकारवर टीका करताना दिसतात. दरम्यान आता पुन्हा एकदा ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारला घेरलं आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
“या सरकरला महाविकास आघाडीचं सरकार म्हणायचं नाही, तर उद्यापासून या सरकारचे नाव जुम्मे के जुम्मे सरकार”.अशी टीका केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे नेते रावसाहेब दानवे यांनी केली आहे. औरंगाबादमधल्या पाणीटंचाईवरुन आक्रमक होत भाजपाच्यावतीने जल आक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या सभेत दानवेंनी राज्यसरकारवर टीका केली आहे.
श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील १०९.५७ कोटींच्या पहिल्या टप्प्याच्या कामास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या शिखर समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. ऐतिहासिक वास्तूंचे जतन आणि संवर्धन करताना त्या वास्तूची मूळ शैली जपणे आवश्यक असून पुरातत्त्वीय जाण असलेल्या संस्थेमार्फत ही कामे करण्यात यावीत, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा
मोदी सध्या जपानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. येथे ते क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेत भाग घेणार आहेत. याआधी त्यांनी जपानमधील टोकियो येथे भारतीय जनसमुदायाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी जपान आणि भारत यांच्यातील संबध तसेच भारतीय संस्कृती आणि लोकशाही याबद्दल भाष्य केले. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा
औरंगाबाद शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून भाजपाकडून जलआक्रोश मोर्च्याला सुरुवात झाली आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यात भाजपा नेते गिरीश महाजन यांच्यासह केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे सहभागी झाले आहेत.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला़ राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. फडणवीस यांनी केलेल्या या टीकेला आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त
कर्नाटकातील मंगळुरुच्या बाहेरील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरासारखी रचना सापडल्याची घटना घडली आहे. मशिदीच्या नुतनीकरणाचे काम सुरू असताना या वास्तूशिल्पाचा शोध लागला आहे.
निलंगा तालुक्यातील केदारपूर काटेजवळगा येथे लग्नाच्या जेवणातून विषबाधा झाल्याची घटना घडली. या लग्नसंरभात जवळपास २५० जणांना विषबाधा झाली असून त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार करण्यात आले. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
केंद्र सरकारने इंधनावरील अबकारी दरात कपात केल्यानंतर राज्यात महाविकास आघाडी सरकारनेदेखील इंधनावरील कर कमी करण्याचा निर्णय घेतला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली़. मात्र राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयावर विरोधी पक्ष म्हणजेच भाजपने आक्षेप घेतला आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.
थॉमस चषक स्पर्धेतील विजयानंतर सर्वच स्तरामधून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव होत असतानाच महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनीही या संघाचं कौतुक करत त्यांचं अभिनंदन केलं. मात्र या ट्विटवरुन एक नवाच संवाद सुरु झाला अन् त्यावर आनंद महिंद्रांनी त्यांच्या पत्नीसंदर्भातील एक खास गोष्ट एका ट्विटला रिप्लाय देताना सांगितली. जाणून घ्या आनंद महिंद्रा नेमकं काय म्हणाले
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रात आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ओबीसी आरक्षणावर भाष्य केलं आहे.
पावसाळ्यात मुंबईसह आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात पाणी तुंबण्याच्या घटना घडतात. अशा घटना टाळण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिकेनं देखभाल दुरुस्तीची कामं हाती घेतली आहेत. याचाच एक भाग म्हणून नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) हद्दीतील मोरबे धरण ते दिघा मेनलाइन दरम्यान देखभाल दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका आणि सिडकोच्या काही भागात उद्या (२४ मे) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सविस्तर बातमी
ठाणे महापालिका क्षेत्रातील नालेसफाईची कामं करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हातमोजे, गमबूट तसेच इतर आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली साधनं पुरवली जात नसल्याची ओरड सुरू आहे. असं असताना नालेसफाईच्या कामासाठी वापरली जाणारी पद्धत कर्मचाऱ्यांसाठी जीवघेणी ठरत असल्याची एक चित्रफित समाज माध्यमांवर प्रसारित झाली आहे. ज्यामध्ये काही नालेसफाई कामगार आपला जीव धोक्यात घालून नालेसफाई करत आहेत. त्यांना नाल्यात उतरण्यासाठी हातमोजे अथवा गमबूट देखील पुरवला नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात वेगानं व्हायरल होतं आहे. सविस्तर बातमी
नवनीत राणांनी संसदीय अधिकार समितीसमोर आपली बाजू मांडली आहे. मुंबई पोलिसांविरोधातील तक्रारीनंतर नवनीत राणा यांनी आपली बाजू मांडली आहे. त्यानंतर आता मुंबई पोलिसांना आपली बाजू मांडण्यासाठी बोलवण्यात येणार आहे. यावरुन आता शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे. वाचा सविस्तर…
खासदार नवनीत राणा मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांची तक्रार करणार असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. राणा यांनी मुंबई पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. अटकेत असताना पोलिसांकडून अयोग्य वागणूक मिळाल्याचा आरोप नवनीत राणा यांनी केला आहे.
करोना विषाणूच्या संसर्गानंतर आता जगभर मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत आहेत. आफ्रिकन देशांसोबत युरोपातही मंकीपॉक्सचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जगभराची चिंता वाढताना दिसत आहे. मंकीपॉक्सच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर पालिकेनं तयारी सुरू केली आहे. अद्याप मुंबईत मंकीपॉक्सचा एकही रुग्ण आढळलेला नाही. मात्र सतर्कतेचं पाऊल म्हणून मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं योग्य ती पावलं उचलायला सुरुवात केली आहे. सविस्तर बातमी
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून यावर प्रतिक्रिया आली आहे. राज्याचे आरोग्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजेश टोपे यांनी नागपुरात पत्रकारांनी बोलताना यावर भाष्य केलं. सविस्तर बातमी
हडपसरमधील मगरपट्टा परिसरात एका मोटारीवर (कारवर) तसेच रिक्षावर झाड कोसळण्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. येथे वाचा सविस्तर वृत्त
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या पुण्यातील सभेनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया नोंदवल्या जात असतानाच शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरेंच्या या सभेचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांना आणि समर्थकांना त्यांनी एक सल्लाही दिलाय. भास्कर जाधव नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या…
जम्मू काश्मीरमध्ये नोंदणी नसलेली प्रसारमाध्यमे सरकारविरोधात बातम्या देत आहेत. अशा प्रसारमाध्यमांवर कारवाई करण्याची मागणी जम्मू काश्मीरचे दंडाधिकारी डीएम रामबन यांनी केली आहेत. रामबन यांनी पोलीस अधीक्षकांना याबाबत पत्रही लिहले आहे.
देशभरात हिंदुत्ववादी संघटनांकडून वेगवेगळ्या मशिदींच्या जागेंवर मंदिरं होती. ती पाडून मशिदी बांधल्याचा दावा होत आहे. यातील अयोध्या, काशी येथील प्रकरणं न्यायालयात पोहचली आहेत. आता या वादाची मालिका पुण्यापर्यंत पोहचली आहे. मनसेचे सरचिटणीस अजय शिंदे यांनी पुण्यातील बडा शेख दर्गा आणि छोटा शेख दर्गा पुण्येश्वर आणि नारायणेश्वर मंदिरं उद्ध्वस्त करून बांधल्याचा दावा केलाय.
२०१७ साली अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथील शेतकऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन उभं केलं होतं. पुणतांबा गावातून सुरू झालेल्या या आंदोलनाची धग संपूर्ण राज्यभर पसरली होती. केवळ राज्य सरकारलाच नव्हे तर केंद्रालाही या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी पुणतांब्यातील शेतकरी एकत्र आले आहेत. त्यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. या आंदोलनाची दिशा ठरण्यासाठी आज पुणतांबा येथे ग्रामसभा पार पडली. यामध्ये एकूण १६ ठराव मंजूर करण्यात आले आहेत. सविस्तर बातमी
रोड रेज प्रकरणात कारागृहात शिक्षा भोगत असणाऱ्या पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांची तब्येत बिघडली असून त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी पटियाळा येथील राजेंद्र रुग्णालयात नेण्यात आले आहे.
कल्याण येथील मांडा-टिटवाळा भागात खासगी शिकवणी घेणाऱ्या एका शिक्षकाने शिकवणीसाठी येणाऱ्या एका १३ वर्षाच्या विद्यार्थिनीला प्रेमाची फूस लावून उत्तरप्रदेशातील मूळ गावी पळवून नेनेल्याची घटना उघडकीस आली आहे. या संशयित आरोपी शिक्षकाचा मोबाईल गेली अनेक दिवस बंद असल्याने पोलीस त्याचा माग काढू शकत नव्हते. सविस्तर बातमी
अकोल्यात पोलीस कर्मचाऱ्याने शहरातील दक्षता नगर येथील पोलीस वसाहत परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. संजय सोळंके असे मृत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून पोलीस कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलल्याची माहिती आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहुन ठेवली होती. या घटनेमुळे अकोला जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
औरंगाबादेतील पुंडलिकनगरमध्ये गल्ली नं. ४ मधील हनुमान मंदिर शेजारीच राहणाऱ्या श्यामसुंदर हिरालाल कळंत्री (५५) व किरण श्यामसुंदर (४१) या दाम्पत्याची हत्या झाल्याची घटना समोर आलीय. पोलीस घटनास्थळावर दाखल झाले आहेत.
भाजपा नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला आहे. सोमय्या यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात जाऊन हा दावा दाखल केला आहे. यावेळी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांना माफी मागावी लागेल असे म्हटले आहे. वाचा सविस्तर…
“ज्याला तोंडाची भाषा कळते त्याला ती भाषा आणि ज्याला हाताची भाषा कळते त्याला हाताची भाषा दाखवावीच लागते. कर्मचाऱ्यांना न्याय बाजारात मिळत नाही, तर तो मनगटाच्या जोरावर मिळवावा लागतो. त्यामुळे लढा उभा करताना, साम, दाम, दंड आणि भेद या नीतीचा वापर करावाच लागेल,” असं मत माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी व्यक्त केलं.
केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला़ राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली. मात्र राज्य सरकारने केलेली ही दरकपात म्हणजे सर्वसामान्यांनी थट्टा असल्याची टीका राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केलीय. फडणवीस नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या
डोंबिवली पश्चिमेतील देवी चौकात राहणाऱ्या एका १३ वर्षाच्या तबला वादकाला लुटणाऱ्या रिक्षाचालकाला विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. रिक्षाचालक सम्राट अनंत मगरे (१९) हा सिद्धार्थनगर झोपडपट्टीत राहतो. त्याने युवा तबला वादकाला लुटल्याची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीची सोनसाखळी आणि चोरीसाठी वापरलेली रिक्षा विष्णुनगर पोलिसांनी जप्त केली आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलीय. मात्र, दुसरीकडे मध्य प्रदेशचा अहवाल गृहित धरत त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसार घेण्यास परवानगी दिली आहे. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणाचा पारा चढलाय. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नात महाराष्ट्राचे अॅडव्होकेट जनरल यांच्या चुका असल्याचा गंभीर आरोप केलाय.
शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिल्याची आणि ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारल्याची चर्चा आहे. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
सोलापूरच्या वैरागच्या बाजारातील एक लिंबू विक्रेता शेतकरी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या लिंबू विक्रेता शेतकऱ्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
चंद्रपुरातील ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील १७ वर्षीय वाघाडोह या वाघाचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला. दोन दिवसांपूर्वी वाघाडोह वाघाच्या हल्ल्यात सिनाला येथे गुराख्याचा मृत्यु झाला होता. तेव्हापासून वाघाडोह वाघावर ताडोबाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष होते. त्याची प्रकृती ठीक नव्हती. १७ वर्ष वय असल्याने तो म्हातारा झाला होता. अशातच आज सोमवारी सकाळी त्याचा नैसर्गिक मृत्यू झाला. सविस्तर बातमी

राज्यात करोना नियंत्रणात आहे. लोकांना आग्रह नाही, पण त्यांनी करोनाविरोधात लढणारे प्रतिपिंड (अँटीबॉडी) तपासून तिसऱ्या डोससंदर्भात निर्णय घ्यावा, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे. नागपुरातील रवी भवन येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. राजेश टोपे नागपूर दौऱ्यावर असून डागा आणि मेंटल हॉस्पिटलला भेट देणार आहेत.
एकीकडे शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे आता शिवसेनेनं दिलेल्या या ऑफरवर राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नाशिकमध्ये पत्रकारांनी या प्रकरणासंदर्भात फडणवीस यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी अगदी मोजक्या शब्दांमध्ये या प्रश्नावर उत्तर दिलं. फडणवीस नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन
रिक्षात येऊन बसत असल्याने उल्हासनगरात एका रिक्षाचालकाने कुत्र्याच्या लहान पिलाला लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत गंभीर जखमी केले. या मारहाणीत या मादी पिलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. याप्रकरणी रिक्षाचालक धर्मा कुंठे याच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारानंतर प्राणीप्रेमींमधून संपात व्यक्त होत आहे.
सहा महिन्यांपूर्वी हडपसर भागातील एका घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरट्यांनी साडेचौदा लाखांचा ऐवज लंपास केला होता. चोरलेल्या दागिन्यांच्या विक्रीतून चोरट्यांनी महागड्या वस्तू खरेदी करण्यास सुरूवात केली अन् ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. मात्र आता शिवसेनेने अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देणार नाही असे स्पष्ट केले आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत माध्यमांशी बोलताना याबाबत भूमिका स्पष्ट केली. वाचा सविस्तर…
राज्यसभेच्या निवडणुकीत सहाव्या जागेसाठी शिवसेना उमेदवाराला मतदान करण्यात येणार असल्याची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) पत्रकारांशी बोलताना जाहीर केली. यावेळेस त्यांनी केलेल्या एका वक्तव्यावरुन निलेश राणेंनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवलीय. काय आहे हे नेमकं प्रकरण जाणून घ्या येथे क्लिक करुन
“केंद्रीय तपास यंत्रणांतील अधिकाऱ्यांना ‘फतवे’ देण्याचे काम फडणवीस करतात, ही त्यांना आज मजा वाटत आहे,” असंही शिवसेनेनं म्हटलं आहे. शिवसेनेनं फडणवीस यांच्यासंदर्भात कोणते दावे केलेत आणि या प्रकरणासंदर्भात काय म्हटलंय जाणून घ्या
एकीकडे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि संभाजीराजेंदरम्यान चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा प्रदेश सचिव तसेच माजी खासदार निलेश राणे यांनी ट्विटरवरुन या प्रकरणावर भाष्य करताना संभाजीराजेंना सल्ला दिलाय. निलेश राणे काय म्हणालेत जाणून घ्या येथे क्लिक करुन
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गमधील देवबाग येथील जाहीर सभेमध्ये राज्य सरकारवर निशाणा साधतानाच केंद्र सरकारच्या कामांचं कौतुक केलं आहे. येथील सभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान राणेंनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन
राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत प्रवेश करावा अशी अट घालण्यात आली आहे. मात्र शिवसेनेत प्रवेश करण्यासाठी संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे. दरम्यान दुपारी १२ वाजता होणाऱ्या बैठकीआधीच संभाजीराजे कोल्हापूरला रवाना झाले आहेत. त्यामुळे संभाजीराजेंनी शिवसेनेच्या पक्ष प्रवेशासाठी दिलेल्या निमंत्रणाकडे पाठ फिरवल्याची चर्चा रंगली आहे.
टोमॅटो लागवडीत घट झाल्याने घाऊक बाजारात टोमॅटोची आवक कमी होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ आणि घाऊक बाजारात गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोचे दर तेजीत आहेत. येथे वाचा सविस्तर वृत्त
जगभरातील १९४ देशांचा सहभाग असणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जागतिक आरोग्य परिषदेत बोलताना जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख ट्रेड्रोस गेब्रेयसस यांनी दिला इशारा. ते नेमकं काय म्हणाले जाणून घ्या येथे क्लिक करुन…
मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे. वाचा सविस्तर…
अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.