Maharashtra News : दिवसभरातील सर्व महत्वाच्या घडामोडी एकाच क्लिकवर, जाणून घ्या प्रत्येक क्षणाचे अपडेट

Maharashtra Breaking News Today : राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावरील तसंच इतर क्षेत्रातील सर्व घडामोडी जाणून घ्या

Maharashtra News Live Updates 23 May
Maharashtra Breaking News Live

Maharashtra News Live Updates, 23 May : केंद्र सरकारपाठोपाठ राज्यातील महाविकास आघाडी सरकारनेही रविवारी इंधन करकपात करून नागरिकांना दिलासा दिला. राज्य सरकारने पेट्रोलवरील मूल्यवर्धित करात २ रुपये ०८ पैसे, तर डिझेलवरील करात १ रुपया ४४ पैसे कपात केली आहे. तर राज्यसभेच्या उमेदवारीकरिता कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांनी शिवसेनेत  प्रवेश करावा अशी अट घातली असली तरी शिवसेनेत प्रवेश करण्याची संभाजीराजे अनुकूल नाहीत. महाविकास आघाडी म्हणून पाठिंबा द्यावा, अशी भूमिका त्यांनी मांडली आहे.

दरम्यान, मागील आठवडाभरात राज्यातील दैनंदिन रुग्णसंख्या तीनशेच्याही वर गेली आहे. परिणामी उपचाराधीन रुग्णांची संख्या ही १८०० च्या घरात गेली आहे. बाधितांचे प्रमाणही जवळपास दीड टक्क्यांवर गेले आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

10:19 (IST) 23 May 2022
कल्याणमधील १२ गुंडांविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई

मागील काही दिवसापासून कल्याण-डोंबिवलीत वाढलेल्या सामूहिक गुंडगिरी विरोधात कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ यांनी कारवाईचे निर्देश दिले आहेत. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सराईत गुन्हेगारांविरोधात एमपीडीएअंतर्गत कारवाई केल्यानंतर आता कल्याण कोळसेवाडी पोलिसांनी एका खंडणीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या आणि सहभागी असलेल्या १२ आरोपींविरोधात मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. एकाचवेळी १२ आरोपींवर मोक्का लावण्याची कल्याणातील ही पहिलीच घटना आहे.

सविस्तर बातमी

10:18 (IST) 23 May 2022
रस्त्यावरील नमाज पठणाबाबत योगी आदित्यनाथ यांचं विधान

उत्तर प्रदेशमध्ये भाजपाचं सरकार आल्यापासून ईदच्या दिवशी रस्त्यावर नमाज पठण करणं बंद झालं असल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यालाही अधोरेखित केलं आणि उत्तर प्रदेशात रामनवमीच्या दिवशी कोणतीही जातीय दंगल झाली नसल्याचं सांगितलं.

सविस्तर बातमी

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Web Title: Maharashtra live news updates latest marathi news mumbai pune thane nagpur breaking covid 19 updates on 23 may

Next Story
“ताई…मी तुझ्याशिवाय कशी जगू,” बहिणीला फासावर लटकलेले पाहून लहान बहिणीने घेतले विष
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी