Maharashtra News Live Updates, 03 June 2022 : राज्यात करोना पुन्हा डोके वर काढत असून, दैनंदिन रुग्णांची संख्या वाढत आहे. पुढील १५ दिवस महत्त्वाचे असून, शासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहे. पुन्हा निर्बंध नको असतील तर नागरिकांनी मुखपट्टीचा वापर करावा, स्वयंशिस्त पाळावी, लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांना उद्देशून केले. रुग्णसंख्या वाढल्यास प्रसंगी कठोर निर्णय घेण्याचा इशाराही ठाकरे यांनी दिला आहे.

भोंग्याविरोधातील आंदोलन अधिक व्यापक करताना आता त्याला जनआंदोलनाची जोड देण्याचा निर्णय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतला आहे. त्यानुसार भोंग्याचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी एक सुजाण नागरिक म्हणून आपल्या भागात भोंग्याचा त्रास होत असेल तर त्याविरोधात स्वाक्षरी मोहीम राबवून किंवा नियंत्रण कक्षाला फोन करून पोलिसांना कळवा आणि या आंदोलनात सहभागी व्हा, असे आवाहन ठाकरे यांनी पत्राद्वारे जनतेला केले आहे.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

21:56 (IST) 3 Jun 2022
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उद्याची पदवी परीक्षा पुढे ढकलली

औरंगाबाद – केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या ५ जून रोजीच्या परीक्षेच्या पाश्र्वभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची उद्या (४ जून) रोजी होणारी सर्व अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. विद्यापीठाने संलग्नीत महाविद्यालयांना ही माहिती एका पत्राव्दारे कळवली आहे. वाचा सविस्तर बातमी

21:41 (IST) 3 Jun 2022
डॉ. सच्चिदानंद मुनगंटीवार यांचे हृदयविकाराने निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी विभाग संघचालक तथा चंद्रपूरातील प्रसिध्द डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी आज (३ जून) सायंकाळी ७ वाजून १४ मिनिटांनी नागपूर येथील किंग्जवे रूग्णालयात हृदयविकाराने निधन झाले.

20:50 (IST) 3 Jun 2022
बीड : आंघोळीसाठी नदीपात्रात उतरलेल्या दोघींचा बुडून मृत्यू

गोदावरी नदीपात्रातील पाण्यात अंघोळीसाठी गेलेल्या दोन मावस बहिणींचा वाळू उपशासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना माजलगाव तालुक्यातील महातपुरी येथे शुक्रवारी घडली. मृत दोघींपैकी एक मन्यारवाडी (ता.गेवराई) तर दुसरी आनंदवाडी (ता.परतूर जि.जालना) येथील रहिवासी असून त्या सुटीत मावशीकडे आल्या होत्या. वाचा सविस्तर बातमी…

20:19 (IST) 3 Jun 2022
“मारुतीराया देखील म्हणत असतील, माझा जन्म…”, अजित पवारांची पिंपरी-चिंचवडमधील मेळाव्यात चौफेर फटकेबाजी!

(सध्याच्या वादानंतर) मारुती राया देखील म्हणत असतील माझा जन्म कुठं झाला ते मला माहित आहे, तुम्ही का भांडताय? कोण म्हणतंय कर्नाटक, कोण म्हणतंय नाशिक, कोण म्हणतंय यूपीत…ठीक आहे, झाला असेल.. पण ते मारुती रायाच आहेत, अशा शब्दांत अजित पवारांनी पिंपरीत बोलताना टोलेबाजी केली!

वाचा सविस्तर!

19:56 (IST) 3 Jun 2022
ऑनलाइन प्रशिक्षणाची प्रणाली बंद; नोंदणी केलेल्या ९४ हजार प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मनस्ताप

राज्यभरातील शिक्षकांच्या निवडश्रेणी आणि वरिष्ठश्रेणीच्या ऑनलाइन प्रशिक्षणासाठीच्या प्रणालीत निर्माण झालेल्या अडचणींमुळे प्रणाली दोन ते तीन दिवसांसाठी बंद करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या प्रशिक्षणार्थी शिक्षकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.  येथे वाचा सविस्तर वृत्त.

19:55 (IST) 3 Jun 2022
विश्लेषण : कसा असेल यंदाचा खरीप हंगाम?

नैर्ऋत्य मोसमी पाऊस सरासरी इतका पडणार असल्याची सुवार्ता हवामान विभागाने दिल्यानंतर राज्यातील खरीप हंगामाच्या तयारीला वेग आला आहे. कृषी विभागाने आगामी हंगामासाठी जय्यत तयारी केली आहे. हा हंगाम नेमका कसा असेल? राज्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ३०७.५८ लाख हेक्टर आहे. त्यातील पेरणी योग्य क्षेत्र १६६.५० लाख हेक्टर आहे. प्रत्यक्षात खरीप हंगामातील पेरणी योग्य क्षेत्र १५१.३३ लाख हेक्टर आहे. येथे क्लिक करुन वाचा सविस्तर लेख.

19:52 (IST) 3 Jun 2022
मे महिन्यात पुणेकरांकडून अडीच कोटींची दंड वसूल; पुणे रेल्वे विभागाचा नवा विक्रम

पुणे रेल्वेने एप्रिलमध्ये फुकट्या प्रवाशांवर विक्रमी दंडवसुलीची कारवाई केली होती. मात्र, विनातिकीट प्रवास करणाऱ्यांची संख्या आणि कारवाईचा वेगही वाढत असल्याने एप्रिलमधील हा विक्रम मे महिन्यात मोडीस निघाला आहे. रेल्वेने ३६ हजारांहून अधिक फुकट्या प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून अडीच कोटींहून अधिकच्या दंडाची वसुली केली आहे. पुणे रेल्च्च्या कारवाईत कोणत्याही एका महिन्यात वसूल झालेला हा आजवरचा सर्वाधिक दंड ठरला आहे. सविस्तर वृत्त वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

19:52 (IST) 3 Jun 2022
पुणे : कासेवाडी पोलीस चौकीत तरुणींचा गोंधळ; महिला पोलिसांना धक्काबुक्की

पोलीस चौकीत गोंधळ घालणाऱ्या तीन तरुणींना समजावून सांगणाऱ्या पोलिसांच्या दामिनी पथकातील तीन महिला पोलीस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आल्याची घटना भवानी पेठेतील कासेवाडी भागात घडली. सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीन तरुणीं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:51 (IST) 3 Jun 2022
पुणे : मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला ४० लाखांच्या खंडणीसाठी फोन; पैसे घेऊन कात्रज घाटात बोलावलं, पोलिसांनी सापळा रचला पण…

मार्केट यार्डातील व्यापाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देऊन अज्ञातांनी ४० लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एका व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. व्यापाऱ्याच्या मोबाइल क्रमांकावर दोन दिवसांपूर्वी एकाने संपर्क साधला होता. ४० लाख रुपयांची खंडणी न दिल्यास जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. नेमकं घडलं काय वाचा येथे क्लिक करुन.

19:49 (IST) 3 Jun 2022
म्हाडाकडून पुणे, पिंपरी-चिंचवडमध्ये ४७४४ घरांसाठी लवकरच सोडत

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे विभागाच्या वतीने ४७४४ घरांची ऑनलाइन पद्धतीने सोडत जाहीर करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसांत या सोडतीची जाहीरात प्रसिद्ध होणार असून त्यानंतर इच्छुकांना अर्ज भरता येणार आहे. या सोडतीमध्ये पुणे, पिंपरी-चिंचवड, ताथवडे, कोल्हापूर, सोलापूर या भागातील घरांचा समावेश आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:48 (IST) 3 Jun 2022
पुण्यात करोना लसीकरणसाठी ‘हर घर दस्तक’ मोहीम

करोना संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर हर घर दस्त मोहीम पुन्हा राबविण्याचा निर्णय महापालिकेच्या आरोग्य विभागाने घेतला आहे. त्याअंतर्गत घरोघरी जाऊन तसेच दूरध्वनी आणि लघुसंदेशाच्या माध्यमातून लसीकरण न झालेल्या नागरिकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:47 (IST) 3 Jun 2022
पुणे महापालिकेचे कंत्राटी सुरक्षारक्षक वेतनपासून वंचित; तीन महिन्यांपासून वेतन रखडले

कंत्राटी पद्धतीने नियुक्त केलेल्या सुरक्षारक्षकांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, येत्या काही दिवसांत सुरक्षा रक्षकांना वेतन दिले जाईल, असा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:47 (IST) 3 Jun 2022
वीज खरेदीसाठी महाप्रीतबरोबर करार; स्वतंत्र हेतू कंपनी स्थापन करण्यास मान्यता

खुल्या बाजारातून वीज खरेदी करण्यासाठी महापालिकेने महाप्रीत या शासकीय संस्थेबरोबर करार केला आहे. त्याअंतर्गत महाप्रीतबरोबर स्वतंत्र हेतू कंपनी (स्पेशल पर्पज व्हेईकल- एसपीव्ही) स्थापन करण्यात येणार असून समिती स्थापन करण्याच्या प्रस्तावाला महापालिकेच्या स्थायी समितीने मान्यता दिली आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:45 (IST) 3 Jun 2022
‘सुहाना- प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद चोरडिया यांचे ९२ व्या वर्षी निधन

ज्येष्ठ उद्योजक आणि ‘सुहाना-प्रवीण मसालेवाले’चे संस्थापक हुकमीचंद सुखलाल चोरडिया (वय ९२) यांचे वृद्धापकाळाने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे राजकुमार, डॉ. प्रवीण, प्रदीप, धन्यकुमार हे चार मुलगे, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाचे माजी सभापती विशाल चोरडिया हे त्यांचे नातू होत. येथे वाचा सविस्तर वृत्त.

19:42 (IST) 3 Jun 2022
“गांधी परिवाराला हात लावाल तर…”; नाना पटोलेंचा भाजपाला इशारा

“भाजपाला सत्तेच्या बाहेर जायची जेव्हा वेळ येते, तेव्हा तेव्हा गांधी, नेहरु परिवाराला लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला जातो. जर, गांधी कुटुंबाला हात लावण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस कार्यकर्ते पेटून उठतील,” असा इशारा नाना पटोले यांनी भाजपाला दिला आहे. धनगर समाज कार्यकर्ता मेळाव्यानिमित्त नाना पटोले आज अमरावतीत आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. येथे वाचा सविस्तर वृत्त

19:41 (IST) 3 Jun 2022
Rajyasabha Election :पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादीला खिंडार पडू शकते – प्रकाश आंबेडकर

वंचित बहूजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक सूचक विधान केले आहे. भाजपा या निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह देण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर बातमी…

18:16 (IST) 3 Jun 2022
प्रेयसीकडून सातत्याने धमकी, कंटाळून प्रियकराची गळफास लावून आत्महत्या

प्रेयसीच्या धमकीपोटी प्रियकराने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. विरुळ गावातील आशिष बोकडे नावाच्या 22 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

18:14 (IST) 3 Jun 2022
चंद्रपूरमध्ये बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्याला सील

चंद्रपूर : तलोधी बाळापूर येथून जवळच असलेल्या वलनी येथील सचिन वैद्य यांच्या फर्महाऊसवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून बनावट सुगंधी तंबाखू तयार करणाऱ्या कारखान्याला सील ठोकले. यावेळी 25 लाखाची सुगंधी तंबाखू जप्त करण्यात आली असून एकूण आठ आरोपींना अटक करण्यात आलं आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा.

18:13 (IST) 3 Jun 2022
जलवाहिनी फुटून झाले २२ दिवस, अद्याप दुरुस्ती नाही

यवतमाळ : शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून युद्धस्तरावर जलवाहिनी, जलकुंभाची कामे सुरू आहेत. २०१८ मध्ये पूर्ण होणारी अमृत योजना २०२२ हे वर्ष संपत असतानाही अपूर्ण आहे. असे असताना या योजनेसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्याने शहरात सर्वत्र गटारगंगा अवतरली आहे. पूर्ण बातमी वाचताना येथे क्लीक करा

18:12 (IST) 3 Jun 2022
विधानपरिषद उमेदवारीबाबत आदेश बांदेकर यांची मोठी प्रतिक्रिया

राजकारणात येण्याचा कुठलाच विचार नव्हता मात्र, बाळासाहेबांवर माझी श्रद्धा होती. कलावंत म्हणून काम करताना काही न मागता मला शिवसेनेचा कार्यकर्ता म्हणून राज्यमंत्रिपदाचा दर्जा मिळाला. त्यामुळे आता विधानपरिषदेबाबत मी विचार केलेला नाही. पक्षाकडून काही मागण्यापेक्षा काम करत राहिले तर पक्षच तुमची दखल घेतो असे अभिनेते आदेश बांदेकर म्हणाले. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

18:07 (IST) 3 Jun 2022
दिल्लीमध्ये मेट्रो स्टेशन परिसरात तरुणीशी अश्लील वर्तन

निर्भया बलात्कार प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या राजधानी दिल्लीच्या सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. आज दिल्लीमधील जोरबाग मेट्रो स्टेशन परिसरात एका तरुणीशी अश्लील वर्तन करण्यात आले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

18:05 (IST) 3 Jun 2022
अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाची अज्ञाताकडून विटंबना झाल्याने तणाव

सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी येथे काल (गुरुवार) रात्री अहिल्यादेवी होळकर यांच्या फलकाची अज्ञाताकडून विटंबना करण्यात आली असून, यामुळे गावातील वातावरण तणावपूर्ण आहे. यामुळे गावात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून या घटनेच्या निषेधार्थ करगणीमध्ये आज (शुक्रवार) बंद पाळण्यात आला. वाचा सविस्तर बातमी…

17:53 (IST) 3 Jun 2022
माझा पराभव मला खूप शिकवून गेला – पंकजा मुंडेंचं गोपीनाथ गडावर विधान!

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन आहे. या निमित्त बीड येथील गोपीनाथ गडावर आयोजित कार्यक्रमास मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी भाषण करताना शिवराजसिंह चौहान यांचे कौतुक केले. तसेच, माझ्या पराभवाने मला खूप शिकवले असल्याचेही बोलून दाखवले. वाचा सविस्तर बातमी…

17:52 (IST) 3 Jun 2022
Rajya Sabha election : आमचा सहावा उमेदवार देखील निवडून येणार – संजय राऊत

राज्यात राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण गरम झालेलं आहे. सहाव्या जागेवरून भाजपा आणि शिवसेनेत थेट लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कारण, आज निवडणूक अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी दोन्ही पक्षांनी आपले उमेदवार कायम ठेवले आहेत. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर बातमी…

17:51 (IST) 3 Jun 2022
मोदींची बुलडोजर नीती देशाच्या एकात्मतेला घातक – वृंदा कारत

“महागाई, पेट्रोल डिझेल दरवाढ व इतर जीवनावश्यक सुविधांच्या मुद्यांकडे दुर्लक्ष करून धार्मिक आणि राजकीय ध्रुवीकरणाकडे लक्ष देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सार्वजनिक व्यवस्था, उध्वस्त करणारी बुलडोजर नीती देशाच्या राष्ट्रीय एकात्मतेला अतिशय धोकादायक आहे.” अशी टीका मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या माजी खासदार वृंदा कारत यांनी साताऱ्यात केली. वाचा सविस्तर बातमी...

17:50 (IST) 3 Jun 2022
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यादरम्यान कानपूरमध्ये तुफान दगडफेक; पोलिसांकडून लाठीचार्ज

भाजपा नेत्या नुपूर शर्मा यांच्या मोहम्मद पैगंबरांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर गदारोळ झाला. यावेळी दोन समाजांमध्ये तुफान दगडफेक करण्यात आली. त्यानंतर मोठा पोलीस फौजफाटा घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कानपूरच्या दौऱ्यावर आहेत. पोलिसांनी काही स्थानिकांवर लाठीमार केल्यानंतर यतिमखानाजवळील बेकोनगंज भागात हिंसाचार झाला. या निषेधार्थ शेकडो लोक रस्त्यावर उतरले. वाचा सविस्तर…

16:57 (IST) 3 Jun 2022
काश्मीरमधील हत्यासत्रानंतर अमित शाह काय निर्णय घेणार? बोलावली उच्चस्तरीय बैठक

जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्या्ंकडून कश्मिरी पंडितांच्या होणाऱ्या हत्यांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, लष्करप्रमुख मनोज पांडे, जम्मू काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंग आणि गुप्तचर यंत्रणा ‘रॉ’चे प्रमुख समंत गोएल उपस्थित राहणार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून कश्मिरी पंडितांच्या हत्यांचे प्रमाण वाढत चाललं आहे. १ मेपासून आतापर्यंत आठ लोकांची हत्या करण्यात आल्या आहेत.

सविस्तर बातमी

14:34 (IST) 3 Jun 2022
“काही ठिकाणी मंदिरे होती आणि तिथे मशिदी आल्या ही गोष्ट खरी,पण…”; ज्ञानवापी प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया

ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची, तसंच दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे. याबाबत पुण्यात बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मोहन भागवत यांनी मांडलेली भूमिका योग्य आहे असे म्हटले आहे. वाचा सविस्तर…

14:32 (IST) 3 Jun 2022
हैदराबादमध्ये अल्पवयीन मुलीवर शाळकरी मुलांचा सामूहिक बलात्कार

हैदराबादमध्ये शाळकरी मुलांनी अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केला आहे. मुलांनी मर्सिडीज कारमध्ये हे कृत्य केलं. पीडित मुलगी एका पार्टीसाठी पबमध्ये गेली होती. यावेळी तिची भेट या आरोपी मुलांसोबत झाली होती. आरोपी विद्यार्थी असून अकरावी, बारावीत शिकत आहेत. यामध्ये आमदाराचा मुलगाही सहभागी असल्याचं बोललं जात आहे. पोलीस सध्या तपास करत आहेत.

सविस्तर बातमी

14:05 (IST) 3 Jun 2022
विश्लेषण: मुसेवालांची हत्या AN-94 ने; जाणून घ्या मिनिटाला १८०० गोळ्या झाडणाऱ्या या रशियन रायफलचं चीन, पाकिस्तान कनेक्शन

पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांची पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी जवाहरके गावामध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या हत्येसाठी एएन-९४ ही रशियन बनावटीची असॉल्ट रायफल वापरण्यात आली. अशाप्रकारे पंजाबमधील गँगवॉरदरम्यान एएन-९४ रायफल वापरण्याची ही पहिलीच वेळ आहे. सिद्धू मुसेवाला यांच्यावर २ मिनिटांमध्ये ३० गोळ्या झाडण्यात आल्या. येथे क्लिक करुन जाणून घ्या या रायफलबद्दल…

13:54 (IST) 3 Jun 2022
देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते; संजय राऊतांनी केलं कौतुक

महाराष्ट्रात राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ विधानसभा विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला पोहोचलं होतं. या पार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलं आहे. देवेंद्र फडणवीस परिपक्व नेते असल्याचं संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटलं आहे.

सविस्तर बातमी

13:18 (IST) 3 Jun 2022
उष्माघाताने दीड हजार कोंबड्या दगावल्या!

वर्ध्याच्या देवळी तालुक्यातील बाबापूर शिवारातील एका पोल्त्री फार्ममधल्या दीड हजारावर कोंबड्या उष्माघाताने ठार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे सागर पचगडे या युवा शेतकऱ्याने हिंमतीने उभ्या केलेल्या व्यवसायास एकाच दिवसात पाच लाख रुपयांचा फटका बसला आहे.

वाचा सविस्तर

13:17 (IST) 3 Jun 2022
निसर्ग वादळाला दोन वर्ष पूर्ण; चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पाची कामे कागदावरच

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय चक्रीवादळ धोके निवारण प्रकल्पा अंतर्गत प्रस्तावित केलेली जवळपास चारशे कोंटीची कामे सध्या रखडली आहे. निसर्ग वादळानंतर ही कामे मार्गी लागणे अपेक्षित होते. मात्र तसे झालेले नाही. वाचा सविस्तर…

13:05 (IST) 3 Jun 2022
वर्धा जिल्ह्यात उष्माघातामुळे दीड हजार कोंबड्यांचा मृत्यू

देवळी तालुक्यातील बाबापूर शिवारातील एका पोल्ट्री फार्ममधील दीड हजारपेक्षा जास्त कोंबड्या उष्माघाताने ठार झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. सागर पचगडे नावाच्या शेतकऱ्याने हा कुक्कुटपालनाचा व्यवसाय उभारला होता. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

13:04 (IST) 3 Jun 2022
यवतमाळमध्ये हजारो लीटर पाण्याची गळती

शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी अमृत योजनेंतर्गत गेल्या पाच वर्षांपासून युद्धस्तरावर जलवाहिनी, जलकुंभाची कामे सुरू आहेत. २०१८ मध्ये पूर्ण होणारी अमृत योजना २०२२ हे वर्ष संपत असतानाही अपूर्ण आहे. असे असताना या योजनेसाठी टाकण्यात आलेल्या जलवाहिन्या ठिकठिकाणी फुटल्याने शहरात सर्वत्र गटारगंगा अवतरली आहे. येथील टिळकवाडी परिसरात गेल्या २२ दिवंसापूर्वी फुटलेली जलवाहिनी अद्यापही दुरूस्त न केल्याने या परिसरात तलावासदृश चित्र निर्माण झाले आहे. सविस्तर बातमी वाचण्यासाठी येथे क्लीक करा

12:54 (IST) 3 Jun 2022
“आमचा राष्ट्रीय पक्ष आहे त्यामुळे…”; राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याबाबत भाजपाने स्पष्ट केली भूमिका

राज्यसभेच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात असल्याने राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. भाजपाने तिसरा तर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केल्याने चुरस वाढली आहे. उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत शुक्रवारी दुपारी तीनपर्यंत असल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी भाजपा नेत्यांची भेट घेतली आहे. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही तिथे उपस्थित होते. यानंतर माध्यमांशी बोलताना भाजपा तीन जागा लढण्यावर ठाम असल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. वाचा सविस्तर…

12:46 (IST) 3 Jun 2022
राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी वाटाघाटी सुरू!

राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले असून यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने आज देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली.

https://twitter.com/LoksattaLive/status/1532620244464054274

12:39 (IST) 3 Jun 2022
परिस्थिती १९९० पेक्षाही भयनाक असल्याचं सांगत काश्मीर खोऱ्यातून सरकारी कर्मचारी, स्थानिकांचं मध्यरात्री पलायन

जम्मू-काश्मीरमध्ये मागील काही दिवसांपासून होत असणाऱ्या हिंदू पंडितांच्या हत्यांच्या घटनांमुळे येथील स्थानिक हिंदू पंडितांच्या कुटुंबियांनी आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांनी काश्मीरच्या खोऱ्यामधून पलायन करण्यास सुरुवात केलीय. गुरुवारी रात्रीच अनेक खासगी वाहनांमधून केंद्र सरकारच्या योजनांसाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबरोबरच अनेक स्थानिक काश्मिरी पंडितांची कुटुंबं जम्मूच्या दिशेने रवाना झाली. आज पहाटे हे कर्मचारी आणि स्थानिक काश्मिरी पंडीत जम्मूमध्ये दाखल झाले. येथे वाचा सविस्तर वृत्त

12:37 (IST) 3 Jun 2022
मुसेवाला हत्या : हत्याकांडांनंतर पाच दिवसांनी स्थानिक AAP आमदार सांत्वनासाठी मुसेवालांच्या घरी गेले असता स्थानिकांनी…

पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात रविवारी सायंकाळी गोळ्या झाडून हत्या करण्यात आलेले पंजाबी गायक आणि काँग्रेसचे नेते सिद्धू मुसेवाला यांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आम आदमी पक्षाचे स्थानिक आमदार शुक्रवारी सकाळी मुसेवाला यांच्या घरी पोहोचले. मात्र यावेळी त्यांना स्थानिकांनी चांगलाच विरोध केल्याचं पहायला मिळालं. यासंदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. येथे वाचा सविस्तर वृत्त…

12:35 (IST) 3 Jun 2022
World Bicycle Day 2022: गियर की नॉन गियर?; नवी की जुनी? सायकल घ्यायच्या विचारात असाल तर या १२ गोष्टींची काळजी घ्या

नवीन सायकल घ्यायची म्हणजे ती कोणत्या कंपनीची घ्यायची, त्यावर किती पैसे खर्च करायचे, नक्की कोणत्या बाबी तपासायच्या असे मूलभूत प्रश्न उपस्थित होतात. पण, या प्रश्नांच्या आधी एक साधा प्रश्न स्वत:ला विचारणे आवश्यक आहे. तो म्हणजे, सायकलचा वापर नक्की कशासाठी करणार आहात? त्याचे एकदा उत्तर मिळाले की सायकल घेताना गरजेनुसार कोणत्या गोष्टी पडताळून पाहायच्या याचं उत्तर शोधणं सोप्प होईल. येथे वाचा सविस्तर लेख…

12:33 (IST) 3 Jun 2022
“अंबानींच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या वाझेला माफीचा साक्षीदार करून उद्या भाजपावासी केले तर…”; शिवसेनेचा टोला

“सचिन वाझेला माफीचा साक्षीदार करणे म्हणजे गुन्हेगारांचे उदात्तीकरण करण्यासारखेच आहे व कायद्याला हे अपेक्षित नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय. अंबानी यांच्या घरासमोर स्फोटके ठेवणाऱ्या आरोपीसदेखील आज माफीचा साक्षीदार करणारी भाजपा उद्या त्याला पक्षात घेऊ शकते, असा टोलाही शिवसेनेनं लागवला आहे. येथे क्लिक करुन वाचा शिवसेनेनं नेमकं काय म्हटलंय…

12:28 (IST) 3 Jun 2022
विजय वडेट्टीवारांकडून मोहन भागवतांच्या वक्तव्याचं स्वागत

सरसंघचालक मोहन भागवत यांनी मशिदींसंबंधी केलेल्या वक्तव्याचं राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्वागत केलं आहे. जुन्या गोष्टी उकरुन काढून, नवे वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करण्याचे तसंच वातावरण गढूळ करण्यासाठी होत असलेले प्रयत्न टाळण्याचा त्यांचा हेतू असावा. आम्ही मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो असं विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत. ते आज नागपूर येथील निवासस्थानी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते.

सविस्तर बातमी

11:51 (IST) 3 Jun 2022
विधानपरिषद उमेदवारीवरुन पंकजा मुंडे यांचे मोठे विधान

मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यातून राज्यसभेची उमेदवारी मिळण्यावरुन अनेक तर्कवितर्क लावले जात होते. मात्र भाजपाने दोन्ही राज्यसभा उमेदवारांची नावे घोषित केल्याने या चर्चेला पूर्मविराम मिळाला. तर अता विधानपरिषद निवडणुकीसाठी पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळणार का? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्ली करा

11:33 (IST) 3 Jun 2022
कश्मीर फाईल्स २ काढून सत्य समोर आणा – संजय राऊत

काश्मीरमधील स्थिती फार गंभीर आहे. राज्यपालांसोबत गृहमंत्र्यांनी काल एक तातडीची बैठक बोलावली होती. सरकार प्रयत्न करत आहे, पण आज १९९० मध्ये होती तशीच स्थिती निर्माण झाली आहे. तुम्ही काश्मिरी पंडितांच्या घऱवापसीबद्दल सांगितलं होतं आणि त्यावर हिंदुत्वाच्या नावे मतंही मिळवली होती. पण कलम ३७० हटवल्यानंरही काश्मिरी पंडित, तेथील जनतेच्या स्थितीत कोणताही बदल झालेला नाही अशी टीका शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

सविस्तर बातमी

11:22 (IST) 3 Jun 2022
सोनिया गांधींनंतर प्रियंका गांधी करोना पॉझिटिव्ह; ट्विट करत दिली माहिती

काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनंतर आता प्रियंका गांधी वाड्रा यांनाही कोविडची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करून ही माहिती दिली आहे. प्रियंका यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असल्याचे म्हटले आहे. वाचा सविस्तर…

10:03 (IST) 3 Jun 2022
हिंदूंना सरकारने बंदुका चालवण्याचे प्रशिक्षण दिले पाहिजे – संदीप देशपांडे

जम्मू-काश्मीरमध्ये टार्गेट किलिंगमुळे लोकांमध्ये घबराट पसरली आहे. एकट्या मे महिन्यात ४० नागरिक दहशतवाद्यांच्या गोळ्यांना बळी पडले. दहशतवाद्यांनी दोन जणांची हत्या केल्यानंतर गुरुवारी ताजी प्रकरणे समोर आली. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून हत्यासत्र सुरूच आहे. कुलगाममध्ये गुरुवारी दहशतवाद्यांनी एका बँक व्यवस्थापकाची हत्या केली. दहशतवाद्यांनी १ मेपासून काश्मीरमध्ये केलेली ही आठवी हत्या असून, या हत्यासत्राचे तीव्र पडसाद उमटत आहेत. वाचा सविस्तर…

09:52 (IST) 3 Jun 2022
“जरा बारीक व्हा”, पोलीस आयुक्तांसमोरच अजित पवारांनी अधिकाऱ्याला दिला सल्ला

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शिस्तप्रिय स्वभावासाठी ओळखले जातात. याशिवाय शारिरीक तंदरुस्तीच्या बाबतीतही ते नेहमी जागरुक असतात. याचा प्रत्यय नुकताच पिंपरी चिंचवडमधील एका कार्यक्रमात आला. अजित पवार यांनी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासमोरच पोलीस उपायुक्तांना ‘थोडं बारीक व्हा’ असा सल्ला दिला.

सविस्तर बातमी

09:40 (IST) 3 Jun 2022
“प्रत्येक मशिदीत शिवलिंग कशाला शोधायचं?,” मोहन भागवत यांचा सवाल

ज्ञानवापी प्रकरण श्रद्धेचा विषय असून न्यायालय जो निर्णय देईल तो सर्वांनी मान्य केला पाहिजे असं सरसंघचालक मोहन भागवत यांनी सांगितलं आहे. यासोबतच त्यांनी प्रत्येक मशिदीत ‘शिवलिंग’ शोधण्याची दरदिवशी नवा वाद निर्माण कऱण्याची गरज नाही असंही स्पष्ट मत मांडलं आहे.

सविस्तर बातमी

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.