Mumbai-Maharashtra Breaking News Live Updates, 01 June 2026: पुणे विधानपरिषदेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार कोण असणार? यावरून पुण्यातील ‘जिजाई’ बंगल्यावर हायव्होल्टेज ड्रामा सुरु आहे. जुन्या निष्ठावंतांचा विरोध आणि अंतर्गत नाराजी नाट्यानंतर अखेर माजी खासदार संजय काकडे यांचे पुत्र विक्रम काकडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. उमेदवारी निश्चित झाल्यानंतर संजय काकडे आणि विक्रम काकडे यांनी सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला.

देशात आज पुन्हा व्यावसायिक सिलेंडरच्या दरात वाढ झाली असून त्यामुळे आता हॉटेलमध्ये खाण्या-पिण्याचे दर वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागू शकते. विधानसभा निवडणुकीत महायुतीसाठी राजकीयदृष्ट्या फायदेशीर ठरलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेतील ८१ लाख बहिणी अपात्र ठरल्या आहेत. तर दुसरीकडे काल भाजपाने विधान परिषदेसाठी आपली ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या निवडणुकांसाठी महायुतीने त्यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला आहे. १७ जागांमध्ये भाजप ११ जागा लढवणार आहे. त्यापाठोपाठ शिवसेना ४ तर अंतिम जागावाटपानुसार राष्ट्रवादी पुणे आणि कोकण या २ जागा लढवणार आहे. या बातम्यांसहच दिवसभरातील ताज्या बातम्या, ब्रेकिंग न्यूज वाचा एका क्लिकवर…

Live Updates

Today's Marathi News Live Updates, 01 June 2026

19:23 (IST) 1 Jun 2026

मच्छीमारांच्या सहाशेहून अधिक बोटी किनाऱ्याला; पावसाळ्याच्या तोंडावर मच्छिमारांची आवरा आवर

मासेमारी बंदी ही दोन महिन्यांसाठी केली आहे. या काळात ही काही मच्छीमार बांधव छुप्या मार्गाने, पर्ससीन नेट द्वारे बेकायदेशीर मासेमारी करण्याचा प्रयत्न करीत असतात. ...वाचा सविस्तर
19:22 (IST) 1 Jun 2026

JEE Advanced : जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेचा निकाल जाहीर! शुभम, आरोही देशात अव्वल; भारताचे भाग्यविधाते म्हणतात…

यंदाच्या परीक्षेत शुभम कुमार याने ऑल इंडिया रँक (AIR 1) मिळवत देशात प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे, तर मुलींच्या प्रवर्गात आरोही देशपांडे हिने अव्वल स्थान मिळवून बाजी मारली आहे. ...सविस्तर बातमी
19:02 (IST) 1 Jun 2026

कोल्हापूरच्या रस्त्यांचे भाग्य उजळले! ८ वाहनांकरवी स्वच्छता; पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले…

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सोमवारी या वाहनांचे लोकार्पण करण्यात आले. ...अधिक वाचा
18:51 (IST) 1 Jun 2026

परभणी - हिंगोली विधान परिषद निवडणुकीसाठी सात उमेदवारी अर्ज दाखल; आयात उमेदवार नाही, सर्व उमेदवार स्थानिकचेच

यामध्ये शिवसेना (उबाठा) पक्षाकडून डॉ. विवेक नावंदर आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून सईद खान यांच्यात मुख्य लढत होणार आहे. ...सविस्तर वाचा
18:51 (IST) 1 Jun 2026

सांगली सातारा स्थानिक स्वराज्य निवडणुकीत ९ जणांचे उमेदवारी अर्ज दाखल

महायुतीकडून भाजपचे धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रशांत उर्फ बाळासाहेब पाटील यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत आपली उमेदवारी दाखल केली. ...सविस्तर वाचा
18:51 (IST) 1 Jun 2026

अहिल्यानगरमध्ये महाविकास आघाडीला अधिकृत उमेदवार रिंगणात उतरवण्यात अपयश !

भाजपचे प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात काँग्रेसचे करण ससाने यांनी अपक्ष शड्डू ठोकला असून मविआवर अधिकृत उमेदवार न देता आल्याची नामुष्की ओढवली आहे. ...वाचा सविस्तर
18:51 (IST) 1 Jun 2026

गोकुळची बदनामी महायुतीतील वादामुळे - सतेज पाटील

महायुतीचे नेते आगामी निवडणुकीसाठी एकत्र येणार असले तरी आम्ही ही निवडणूक स्वबळावर लढून जिंकू," असा ठाम विश्वास काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापुरात व्यक्त केला. तसेच आपल्या वाढदिवसानिमित्त त्यांनी आतापर्यंत ७६ लाख वह्यांचे गरजू विद्यार्थ्यांना वाटप केल्याचेही सांगितले. ...अधिक वाचा
18:46 (IST) 1 Jun 2026

शिंदेंच्या सैनिकासमोर जितेंद्र आव्हाडांच्या माजी स्वीय साहाय्यकाचे आव्हान

ठाणे-पालघर स्थानिक प्राधिकारी विधान परिषद मतदारसंघासाठी महायुतीकडून शिंदे गटाचे माजी आमदार रवींद्र फाटक आणि महाविकास आघाडीकडून शरद पवार गटाचे नगरसेवक अभिजीत पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...सविस्तर बातमी
18:36 (IST) 1 Jun 2026

Pimpri Crime :  पोलिसांच्या २३ कारवाया! दारू विक्री करणाऱ्या ११ महिलांसह २९ जणांवर गुन्हे

पिंपरी-चिंचवड शहरात पोलिसांनी अवैध दारूविक्री विरोधात मोठी मोहीम उघडत ११ महिलांसह २९ जणांवर २३ गुन्हे दाखल केले आहेत. ...सविस्तर बातमी
18:28 (IST) 1 Jun 2026

सुप्रिया सुळेंच्या टीकेनंतर पोलीस आयुक्तांचे पत्र; सुळे यांना पाठविलेल्या पत्रात पुण्यातील गुन्हेगारीत घटल्याचा दावा

पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत २०२६ मध्ये पुण्यात खुनाचा प्रयत्न, लूटमार आणि वाहन तोडफोडीसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये मोठी घट झाल्याचा दावा या पत्रात केला आहे. ...अधिक वाचा
18:20 (IST) 1 Jun 2026

"माझ्या मुलीसोबत झाले ते हिच्यासोबत नको", ७ वर्षांच्या बेपत्ता मुलीचा वडिलांप्रमाणे केला सांभाळ, ३ दिवसांनी मुलगी पुन्हा वडिलांकडे

पोलिसांनी ९४८ सीसीटीव्ही चित्रीकरण तपासून अखेर मुलीचा शोध घेतला. मुलीला तिच्या वडिलांकडे सूपूर्त करण्यात आले आहे. ...वाचा सविस्तर
18:07 (IST) 1 Jun 2026

४० वर्षांपासून रेल्वेच्या जमिनीवर अतिक्रमण; अखेर जेसीबीद्वारे उद्ध्वस्त, चोख पोलीस बंदोबस्तात व्यापक….

या कारवाईमुळे सुमारे २५ कोटी रुपये मूल्याची २२ हजार ७५० चौरस मीटर जमीन अतिक्रमणमुक्त झाली असून, स्थानिक काँग्रेस व वंचित बहुजन आघाडीच्या विरोधाला झुगारून ही मोहीम यशस्वी करण्यात आली. ...वाचा सविस्तर
17:55 (IST) 1 Jun 2026

...तर त्यांचे उमेदवारी अर्ज मागे घेतले जातील - उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महायुतीमधील काही ठिकाणच्या बंडखोरीबाबत विचारले असता शिंदे म्हणाले की, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत ४ तारखेपर्यंत आहे. महायुतीचे सर्व पदाधिकारी एकत्र बसून याबाबत योग्य निर्णय घेतील. ...सविस्तर बातमी
17:38 (IST) 1 Jun 2026

विधान परिषद निवडणूक : अमरावतीत बंडखोरी? शिवसेना शिंदे गटाचे विप्‍लव बाजोरियांची अपक्ष उमेदवारी

बाजोरिया यांच्या या नाट्यमय बंडखोरीमुळे अमरावती विधान परिषद निवडणुकीत भाजपचे अधिकृत उमेदवार प्रवीण पोटे यांच्यासमोरील अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली असून, महायुतीमध्ये तीव्र धुसफूस सुरू झाली आहे. ...वाचा सविस्तर
17:36 (IST) 1 Jun 2026

चक्रव्यूह ते वाघबकरी…वसई किल्ल्यात रंगली पालघर जिल्ह्यातील पहिली 'प्राचीन खेळ कार्यशाळा

आजच्या आधुनिक पिढीवर मोबाईल आणि इंटरनेटचा प्रभाव सातत्याने वाढत असताना, वसईत पार पडलेल्या या अनोख्या कार्यशाळेला लहान मुलांसह पालकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ...सविस्तर वाचा
17:31 (IST) 1 Jun 2026

नितीन गडकरींची 'घर की मुर्गी..' टिप्पणी उमेदवारीसाठी आली कामी; देवेंद्र फडणवीसांनी अखेर दिली उमेदवारी!

गडकरींच्या सूचक इशाऱ्याचा मान राखत फडणवीसांनी घेतलेल्या या निर्णयामुळे नागपूर भाजपच्या वर्तुळात आणि निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. ...वाचा सविस्तर
17:31 (IST) 1 Jun 2026

विधान परिषदेसाठी भाजपतर्फे प्रवीण पोटेंचा उमेदवारी अर्ज दाखल; पण, राणा दाम्पत्याची नाराजी कायम?

यावेळी महायुतीचे प्रमुख नेते उपस्थित होते, मात्र आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांच्या अनुपस्थितीमुळे महायुतीत आलबेल नसल्याची चर्चा रंगली आहे. ...वाचा सविस्तर
17:28 (IST) 1 Jun 2026

Maharashtra News Live Updates : शायना एन.सी. यांची शिवसेनेच्या 'प्रभारी राष्ट्रीय सचिव' पदी नियुक्ती

शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या श्रीमती शायना एन.सी. यांच्याकडे पक्षाची एक मोठी आणि महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यांची शिवसेनेच्या 'प्रभारी राष्ट्रीय सचिव' पदी अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे.

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या आशीर्वादाने हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली असल्याचे शिवसेनेच्या अधिकृत (X) वर पोस्ट वरून जाहीर करण्यात आले.

17:21 (IST) 1 Jun 2026

Konkan Railway Update: ठाणे, मुंबई, पालघरहून कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; सूरत मंगळूरु नियमित, कोकणातील या स्थानकांवर थांबेल गाडी

Surat Mangaluru Express train updates: ठाणे, मुंबई आणि पालघर जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...सविस्तर वाचा
17:10 (IST) 1 Jun 2026

महापालिकेत भाजपसोबत असलेली ठाकरे सेना विधान परिषदेत काँग्रेससोबत?, शैलेश अग्रवाल यांचे नामांकन दाखल; मविआचे शक्तिप्रदर्शन…

या निवडणुकीच्या निमित्ताने चंद्रपूर महापालिकेतील जुनी राजकीय समीकरणे आणि ठाकरे गटाची भाजपसोबत असलेली अंतर्गत चर्चा पुन्हा एकदा ऐरणीवर आली ...वाचा सविस्तर
17:10 (IST) 1 Jun 2026

‘महायुती’मध्ये बेबनाव; अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीव समीर यांचा अपक्ष अर्ज, अब्दुल सत्तार यांच्या चिरंजीव समीर यांचा अपक्ष अर्ज

भाजप उमेदवार सुहास शिरसाट यांचा अर्ज दाखल करताना, सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपवर शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला. ...सविस्तर बातमी
16:55 (IST) 1 Jun 2026

नीट पुनर्परीक्षेबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय, संगणक आधारित परीक्षा घेण्यास नकार…

परीक्षा यंत्रणांवर आधीच मोठा ताण असल्याने या टप्प्यावर असा आदेश देता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती पी. एस. नरसिंहा आणि न्यायमूर्ती अरविंद कुमार यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी जुलै महिन्यापर्यंत पुढे ढकलली आहे. ...अधिक वाचा
16:45 (IST) 1 Jun 2026

तुकाराम मुंढेंची कारवाई आणि पालकमंत्र्यांची मध्यस्थी, गोरस भंडारसाठी काय निघाला तोडगा? वाचा सविस्तर…

या कारवाईमुळे उत्पादक शेतकरी आक्रमक झाले असून, त्यांनी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांना घेराव घातला. ...सविस्तर वाचा
16:35 (IST) 1 Jun 2026

गरज सरो वैद्य मरो! तब्बल ८० लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून डच्चू देणे अत्यंत दुर्दैवी - विजय वडेट्टीवार

कॉग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी लाडकी बहीण योजने संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

सत्ता हस्तगत करण्यासाठी लाडक्या बहिणींची गरज संपली, आता लाडक्या बहिणी डोईजड ठरू लागताच त्यांना वाऱ्यावर सोडण्याची भूमिका सरकारने घेतली आहे. म्हणूनच तब्बल ८० लाख महिलांना लाडकी बहीण योजनेतून डच्चू देण्यात आल्याची बाब अत्यंत दुर्दैवी आहे.

या ८० लाख महिलांचा तळतळाट घेऊन हे सरकार जास्त काळ तग धरू शकणार नाही.

16:29 (IST) 1 Jun 2026

लाडकी बहिणी योजनेच्या पात्रतेबाबत पुनर्तपासणी, बावनकुळेंनी सांगितले कारण!

या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात स्पष्टीकरण दिले असून, अपात्र ठरलेल्या महिलांची समितीमार्फत पुनर्तपासणी करून पात्र महिलांना न्याय दिला जाईल, अशी ग्वाही दिली. ...सविस्तर बातमी
16:18 (IST) 1 Jun 2026

मध्यरात्री झालं उमेदवारीवर शिक्कामोर्तब, भाजपातील निष्ठावंताला न्याय मिळाल्याची भावना; कोण आहेत डॉ. राजीव पोतदार?

मूळचे अमरावतीचे असलेले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी लाभलेले डॉ. पोतदार गेल्या ४० वर्षांपासून नागपूर ग्रामीण भागात पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी कार्यरत आहेत. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 1 Jun 2026

Pune Crime : शहरात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांचा उच्छाद; पादचाऱ्यांकडील साडेआठ लाखांचे दागिने हिसकावले

पुण्यात दागिने हिसकावणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून रविवारी दिवसभरात अशा अनेक घटना समोर आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
16:08 (IST) 1 Jun 2026

भाजपात निष्ठवंतांना डावलून उद्योगपतींना संधी? कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, वडेट्टीवारांची टीका

भाजपने तळागाळातील निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलून धनदांडग्या उद्योगपतींना आणि आयारामांना संधी दिल्याचा आरोप त्यांनी केला ...वाचा सविस्तर
16:01 (IST) 1 Jun 2026

विधान परिषद निवडणूक : काँग्रेसच्या दोन उमेदवारांमुळे नागपूरात राजकीय उत्सुकता

नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत काँग्रेसने दिनेश ढोले आणि अतुल लोंढे या दोन इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सांगितल्याने राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे. ...सविस्तर बातमी
16:01 (IST) 1 Jun 2026

नांदेडमध्ये राजूरकर, पाटील, जवळगावकर यांचे अर्ज दाखल! विधान परिषदेसाठी आठ उमेदवार

नांदेड विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आठ उमेदवारांचे एकूण १७ अर्ज दाखल झाल्याने राजकीय चुरस कमालीची वाढली आहे. ...वाचा सविस्तर

Maharashtra News Live Updates| CNG Price Today

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स