Mumbai Maharashtra News Updates, 11 September 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी भाजपाने अंतर्गत सर्व्हे केला असून त्यामध्ये अजित पवार गट आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाला अतिशय कमी जागा मिळणार असल्याचा दावा, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केला. त्यानंतर राज्यातील राजकारणात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. असा कोणताही सर्व्हे झालेला नसल्याचे भाजपाने सांगितले आहे. तर अमित शाह यांच्या मुंबई दौऱ्यानंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण? महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबविण्याची चर्चा झाली का? याबद्दल अटकळ बांधली जात आहे. तसेच मैत्रीपूर्ण लढतीसंदर्भातही महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या सर्व घडामोडींवर राजकीय क्षेत्रातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे लक्ष असणार आहे.
Maharashtra News Today, 11 September 2024 | सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी एका क्लिकवर
झाडाला पकडून त्याने एक – दोन नव्हे तब्बल ३६ तास काढले. चोहोबाजूने घनदाट जंगल, किर्रर्र अंधार अन् धो- धो वाहणारे पाणी यामुळे तो पुरता हादरलाही, पण संकटांनी घेरलेल्या स्थितीत संयम राखला. शेवटी दोर घेऊन गावातील युवक मदतीला धावले अन् ३६ तासांनी तो सुरक्षित पुरातून बाहेर आला.
रत्नागिरी : जिल्ह्यातील दापोली- खेड - मंडणगड तालुक्याचे आमदार योगेश कदम यांच्या गणेशोत्सव शुभेच्छा बॅनरवरील त्यांच्या सौभाग्यवतींच्या फोटोचे विडंबन करण्यात आल्याच्या निषेधार्थ दापोली खेड रस्त्यावर टाळसूरे वाकण येथे शिवसेना नेते नीलेश शेठ यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको करण्यात आले.
अज्ञाताने मंगळवारी रात्री शुभेच्छा बॅनर फाडून विटंबना केल्याचे बुधवारी सकाळी लक्षात आल्यानंतर त्या विकृत आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी टाळसूरे येथे रस्ता रोको करण्यात आले. यामुळे वहातुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.
नाशिक - सार्वजनिक गणेशोत्सवात आरास, सजावट पाहण्यासाठी भक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी मध्यवर्ती भागातील एकूण ११ मार्गांवर दुपारी तीन ते रात्री १२ या वेळेत वाहतुकीचे निर्बंध लागू केले आहेत.
नागपूर : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिकने राज्यातील डॉक्टरांच्या कौशल्य विकासासाठी डिजिटल हेल्थ फाऊंडेशन अभ्यासक्रम (डीएचएफसी) सुरू केला आहे.
नाशिक - धरणे तुडूंब भरलेली असताना महानगरपालिकेच्या वितरण प्रणालीतील गोंधळामुळे शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. जलवाहिन्या व प्रणालीतील दोष आधी युद्ध पातळीवर दूर करावेत, जलकुंभ किती प्रमाणात भरले जातात, पाणी कसे सोडले जाते, याची पडताळणी करुन पाणी पुरवठ्याच्या समस्या तातडीने सोडवाव्यात, तोपर्यंत नागरिकांना सल्ले देऊ नयेत, असे टिकास्त्र भाजप आमदारांनी मनपा प्रशासनावर सोडले आहे.
मुंबई : परदेशामध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी परदेशी वैद्यकीय पदवी परीक्षा (एफएमजीई) देणे बंधनकारक असते. ही परीक्षा डिसेंबर २०२४ मध्ये होण्याची शक्यता आहे. मात्र या परीक्षेसाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने जारी केलेले पात्रता प्रमाणपत्र आवश्यक आहे.
मुंबई : ‘धारावी रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ने (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने गुरुवारी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र धारावी बचाव आंदोलनाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुत्र संकेत बावनकुळेच्या कारने रविवारी मध्यरात्री नागपुरात दोन चारचाकी आणि एका दुचाकीला धडक दिल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला आहे. एकीकडे लोकसभेत खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि दुसरीकडे विदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा बोलायची, हे खेदजनक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान काँग्रेसने कधीच केला नाही. आंबेडकरांचा दोन वेळा पराभव काँग्रेसने केला होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेसचा आरक्षण विरोधी चेहरा उघड झाला आहे. एकीकडे लोकसभेत खोटा नरेटिव्ह सेट करायचा आणि दुसरीकडे विदेशात जाऊन आरक्षण संपविण्याची भाषा बोलायची, हे खेदजनक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा सन्मान काँग्रेसने कधीच केला नाही. आंबेडकरांचा दोन वेळा पराभव काँग्रेसने केला होता, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून अतिदुर्गम, नक्षलप्रभावित व आदिवासीबहुल भामरागडचा संपर्क तुटलेला आहे.
पावसामुळे वैनगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून जिल्ह्यात पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण झाली आहे.
आता टोलानाक्यावर जेवढे अंतर कापाल तेवढाच टोल आकारला जाणार आहे. सॅटेलाईटवर आधारीत असलेली Global Navigation Satellite System (GNSS) ही प्रणाली आता कार्यान्वित करण्यात आली आहे. ज्या वाहनांमध्ये GNSS यंत्रणा असेल त्यांना अंतर पाहून टोल आकारला जाईल. तसेच राज्य महामार्ग आणि द्रुतगती महामार्गावरून दररोज २० किमी एवढाच प्रवास करणाऱ्यांना टोल माफी देण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.
मुंबई : ‘धारावी रिडेव्हलपमेन्ट प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड’ने (डीआरपीपीएल) धारावी पुनर्विकास प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्याच्या दृष्टीने गुरुवारी भूमिपूजन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र धारावी बचाव आंदोलनाने याविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याने भूमिपूजनाचा कार्यक्रम रद्द करण्यात आला.
नागपूर : ‘हिट अँड रन’प्रकरणात नागपूर पोलिसांवर दबाव असल्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्यावर अद्यापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी लोकमान्य टिळकांनी शोधून काढली, असे विधान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले होते. या विधानावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केली आहे. छत्रपतींचा इतिहास चुकीच्या पद्धतीने मांडण्याची सुरुवात भाजपा, संघाने केली आहे. त्यांचा आम्ही निषेध करतो, असे विधान सुप्रिया सुळे यांनी केले.
चंद्रपूर: अयोध्येतील श्रीरामाचे मंदीर, नवीन संसद भवन, जी-२० शिखर परिषदेसाठी तयार केलेला भारत मंडपम, अशा एक ना अनेक नामांकित प्रकल्पांना बांधून ठेवणारा एक समान धागा चंद्रपूर जिल्ह्याचा आहे.
Chandrapur Farmers Death: चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यातील गणेशपुर येथे शेतात शेतकरी सकाळी शेतीच्या कामासाठी गेले होते. तिथे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली.
मुंबई : यशवंतराव चव्हाण सेंटरकडून देण्यात येणाऱ्या कविवर्य ना. धों. महानोर पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे.
संशयितांनी फसवणुकीसाठी वापरलेल्या बँकेच्या खात्यावरून फसवणूक झाल्याप्रकरणी 'एनसीसीआर पोर्टल'वर ५६ तक्रारी दाखल आहेत.
अजित पवार यांनी निवडणुकीची तयारी सुरू केली असताना बारामती विधानसभा मतदारसंघात शरद पवार गटाकडून कोण निवडणूक लढविणार? याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न विचारण्यात आला. यावर त्या म्हणाल्या, "हा मतदारसंघ महाविकास आघाडीत कोणत्या पक्षाला मिळणार? हे अद्याप ठरलेले नाही. जर आमच्या पक्षाला मतदारसंघ मिळाला तर त्यानंतर उमेदवाराचा विचार केला जाईल."
स्पष्टीकरण वेळेत दिले नाही तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा आयुक्त डाॅ. जाखड यांनी दिला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात पाणी पुरवठा करणाऱ्या जलवाहिन्यांवरून बेकायदा नळजोडण्या घेण्यात येतात.
राजर्षी शाहू महाराज यांनी उभारलेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला ८ ऑगस्ट रोजी रात्री आग लागली. ऐतिहासिक ठेवा नजरेसमोर बेचिराख होताना पाहण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली.
डिजेच्या दणादणाटाला पर्याय आणि आदिवासी जमातीच्या कलेला मंच मिळवून देण्यासाठी गणेशोत्सव काळात आदिवासी कला सादर करण्याचा पर्याय पुढे आला. मात्र पुणेकरांनी या कलेला फारसा प्रतिसाद दिलेला नाही. सविस्तर वृत्त वाचा
मुरबाड विधानसभा मतदारसंघात भाजप विरूद्ध भाजप आणि भाजप विरूद्ध शिवसेना असा थेट संघर्ष पहायला मिळतो आहे.
भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे मित्रांसमवेत बसलेल्या आलिशान गाडीने नागपूरात अनेक वाहनांना धडक दिली. त्यानंतर शिवसेना उबाठा गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी बावनकुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. संकेत बावनकुळेची वैद्यकीय तपासणी का केली गेली नाही? एफआयआर मागे घेण्यासाठी फिर्यादीवर कुणी दबाव आणला? संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का? असे अनेक प्रश्न सुषमा अंधारे यांनी उपस्थित केले आहेत.
जवळपास दोन शतकांचा वारसा लाभलेली सराफ पेढी पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स लिमिटेडच्या (पीएनजी ज्वेलर्स) मंगळवारपासून सुरू झालेल्या प्रारंभिक समभाग विक्रीने (आयपीओ) गुंतवणूकदारांच्या दमदार प्रतिसादातून पहिल्या काही तासांतच भरणा पूर्ण केला आणि पहिला दिवस संपला त्यावेळी त्यात दुपटीहून अधिक भरणा झाल्याचे उपलब्ध आकडेवारीने स्पष्ट केले. सविस्तर वृत्त वाचा
जर कर्जतमध्ये लुडबुड केली तर आम्ही श्रीवर्धनमध्ये प्रमोद घोसाळकर यांना उभे करू असा इशारा कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिला होता.
ध्वनिप्रदूषणामुळे डोकेदुखी, ऐकायला कमी येणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार आणि निद्रानाश यांसारख्या समस्या निर्माण होतात.