Maharashtra Latest News Updates, 13 February 2023: राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वारंवार मविआ सरकारवर आरोप करत आहेत की, मविआ सरकारच्या काळात मला अटक करण्याचा डाव रचण्यात आला होता. टीव्ही ९ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये फडणवीस यांनी पुन्हा या आरोपाचा पुर्नच्चार केला. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी या विषयावर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी असा कोणता गुन्हा केला होता? ज्यामुळे त्यांना अटक होणार होती, हे त्यांनी एकदा स्पष्ट करावे, असे सांगितले. त्याउपर मी मविआ सरकारमध्ये असलो तरी या विषयातली मला फार अधिक माहिती नाही, असे स्पष्टीकरण आदित्य ठाकरे यांनी दिले.

राज्यातील अशा विविध घडामोडींचे सर्व ताजे अपडेट्स एका क्लिकवर…

Lok Sabha Election 2024 Live Updates Maharashtra Politics News
Maharashtra News : “यंदाची निवडणूक शेवटची ठरू नये”, शरद पवारांनी व्यक्त केली चिंता; म्हणाले, “ज्यांच्या हाती…”
gondia bhandara lok sabha constituency, bjp, ajit pawar ncp, office bearers, reconciliation, booth karyakartas confused, lok sabha 2024, election 2024, polling booth, mahayuti, politics news, marathi news, bhandara gondia news,
तुझं माझं जमेना, तुझ्या वाचून… गोंदिया-भंडारात भाजप–राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचे मनोमिलन, बूथ कार्यकर्ते मात्र संभ्रमात
Raj Thackeray
Heat Wave: राज ठाकरेंचं मुक्या प्राण्यांसाठी भावनिक आवाहन
nana patole prakash ambedkar
“…तेव्हा वरिष्ठांनी नाना पटोलेंना पकडलं, त्यानंतर मविआच्या बैठकीला थोरातांना पाठवू लागले”, ‘वंचित’चा गंभीर आरोप
Live Updates
19:34 (IST) 13 Feb 2023
एकनाथ शिंदे चटर-पटर तर अजित पवार अमूल बटर - प्रवीण दरेकर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चटर-पटर नसून राज्यात सर्वात 'बेटर' आहेत. उलट आरोप करणारे अजित पवार हे अमूल बटर आहेत, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली. अजित पवार हे विरोधी पक्षनेते असल्यामुळे त्यांना रोज टीका करावी लागते, असेही प्रवीण दरेकर म्हणाले.

19:24 (IST) 13 Feb 2023
उद्योग गुजरातला गेले मुख्यमंत्री - उद्योग मंत्र्यांना माहीत देखील नव्हते - आदित्य ठाकरे

शिंदे - फडणवीस सरकार आल्यानंतर राज्यातील उद्योग गुजरातला गेले, हे मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्र्यांना माहीत देखील नव्हते. मी जेव्हा ट्विट केले, तेव्हा हा विषय सर्वांसमोर आला, असा दावा शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये केला.

19:22 (IST) 13 Feb 2023
मनमोहन सिंग यांचं कौतुक करत केसीआर यांचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव ( केसीआर ) यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं कौतुक करत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्लाबोल केला आहे. भाजपाचे सरकार आल्यापासून देश आगीतून फुफूट्यात पडला असून, मोदी हे देशाचे सर्वात अकार्यक्षम पंतप्रधान असल्याचं सिद्ध झालं, अशी टीका केसीआर यांनी केली.

सविस्तर वाचा...

19:21 (IST) 13 Feb 2023
काँग्रेसचा मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण? नाना पटोलेंनी दिले थेट उत्तर

“मी मुख्यमंत्री होण्यासाठी पक्ष वाढवण्याचे काम करतोय, असे काही नाही. शेवटी हायकमांड जो निर्णय घेईल, त्या निर्णयाला मान्यता देणे माझी जबाबदारी आहे,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

सविस्तर वाचा...

19:20 (IST) 13 Feb 2023
पहाटेचा शपथविधी शरद पवार यांच्या चर्चेनंतरच

देवेंद्र फडणवीस यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. शरद पवारांशी चर्चा झाल्यानंतरच २३ नोव्हेंबर २०१९ रोजी अजित पवार - देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र शपथ घेतली होती, असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

सविस्तर वाचा...

18:22 (IST) 13 Feb 2023
नागपूर : चिमुकलीने मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातली आणि….

मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सक्करदरा परीसरात उघडकीस आली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे. दिनेश चौधरी यांचे औषधालय असून त्यावरील मजल्यावर कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुली आहेत. सविस्तर वाचा…

18:21 (IST) 13 Feb 2023
नागपूर : जामिनावर सुटका झाली याचे भान अनिल देशमुख यांनी ठेवावे – बावनकुळे

अनिल देशमुख यांची तुरुंगातून जामिनावर सुटका झाली आहे, त्यांना त्यांच्यावरील आरोपातून क्लिनचिट मिळाली नाही, त्यामुळे त्यांनी बोलताना संयम ठेवून बोलावे,असा सल्ला, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अनिल देशमुख यांना दिला. ते नागपूरमध्ये माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. सविस्तर वाचा…

17:59 (IST) 13 Feb 2023
नवी मुंबईत मनसे मनपा कामगार सेनेचे आंदोलन, कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी आयुक्तांच्या दालनासमोर ठिय्या

नवी मुंबई मनपातील ६५०० कंत्राटी कामगारांच्या मागण्यांसाठी मनसे मनपा कामगार सेनेने नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन केले.

कामगारांची कुशल वर्गवारी, मंजूर वार्षिक ८ सुट्ट्या, उद्यान व सफाई कामगारांचा वाढीव महागाई भत्ता २ वर्षांपासून देणे बाकी आहे, सफाई कामगारांच्या हजेरी शेड नाहीत, एनएनएमटी कामगारांचा किमान वेतनाचा फरक देणे बाकी आहे, मयत कामगारांच्या वारसांना ५० लाख विम्याचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवणे, या सर्व विषयांसाठी आज आंदोलन करण्यात आले.

17:45 (IST) 13 Feb 2023
कार्तिक आर्यनचा ‘शहजादा’ प्रदर्शनपूर्व ८ कोटी कमाईच्या अपेक्षेत

दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जूनची निर्मित, कार्तिक आर्यन अभिनीत ‘शहजादा’ या येत्या शुक्रवारी प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या चित्रपटासाठी आगाऊ तिकीटविक्री सुरू झाली आहे. बहुचर्चित ‘शहजादा’ चित्रपटाच्या तिकीटविक्रीला मिळणारा प्रतिसाद पाहता प्रदर्शनपूर्व हा चित्रपट ८ कोटींची कमाई करेल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा...

17:27 (IST) 13 Feb 2023
मुंबई : पहिल्या विद्युत दुमजली वातानुकूलित बसमुळे बेस्टचा तोटा घटणार? एका किमीमागे १९ रुपये नफा

लंडनच्या धर्तीवर देशातील पहिली विद्युत (इलेक्ट्रिक) दुमजली वातानुकूलित बस बेस्ट उपक्रमाद्वारे सुरू करण्यात आली असून, सोमवारी ही बस बेस्टच्या ताफ्यात दाखल झाली. येत्या दोन ते तीन दिवसांत मुंबईच्या रस्त्यांवर ही बस धावेल.

सविस्तर वाचा...

17:25 (IST) 13 Feb 2023
बुलढाणा : शिंदे-फडणवीस सरकारची दादागिरी सहन करणार नाही - नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांवरील लाठीमार...

शेतमालाला दरवाढ मिळावी व पीकविम्यापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर बुलढाणा पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज केला. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांना तात्काळ निलंबित करावे व विधिमंडळाच्या संयुक्त समितीमार्फत संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी, सविस्तर वाचा…

17:21 (IST) 13 Feb 2023
यवतमाळ : घरात सनई-चौघड्याचे सूर, मुलगी बोहल्यावर चढली आणि आईने...

घरात लग्नकार्याची धावपळ सुरू होती. सर्वांची लाडाची लेक बोहल्यावर चढणार म्हणून कुटुंबीय आनंदात होते. सनई-चौघड्याचे सूर सर्वत्र निनादत होते. सर्वांना प्रतीक्षा असलेली लग्नघटिका जवळ आली, नववधू-वर बोहल्यावर चढले आणि त्याच दिवशी वधूच्या पाठवणी प्रसंगी आईने अखेरचा श्वास घेतला. सविस्तर वाचा…

16:29 (IST) 13 Feb 2023
नवी मुंबई : हापुसची आवक वाढली; दरात घसरण; सोमवारी देवगडच्या ३०० पेट्या दाखल

वाशीतील एपीएमसी बाजारात सध्या हापूसच्या आंब्याची आवक वाढली असून दरात घसरण पहावयास मिळत आहे. सध्या बाजारात देवगडच्या ३०० ते ३२५  पेट्या दाखल झाल्या आहेत. मागील आठवड्याच्या तुलनेत प्रतिपेटी दरात २ ते ३ हजार रुपयांची घसरण झाली आहे. मागील आठवड्यात ३७ ते १३० पेट्या दाखल झाल्या होत्या ,त्यामुळे हापूसचे दर चढेच होते . प्रतिपेटी ५ ते १० हजार रुपयांनी विक्री होत होती.  सविस्तर वाचा…

16:07 (IST) 13 Feb 2023
कळव्यातील आमदार निधीच्या कामांचे एलईडी फलक काढले; सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आमदार आव्हाड यांचा आरोप

राष्ट्रवादीचे नेते आणि कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आमदार निधीतून केलेल्या कामांचे कळवा पुर्व भागात लावलेले एलईडी फलक पालिका अधिकाऱ्यांनी काढले असून याच मुद्द्यावरून सुडाचे राजकारण सुरु असल्याचा आरोप करत आव्हाड यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.

सविस्तर वाचा…

16:04 (IST) 13 Feb 2023
धुळे : मंजूर कामांवरील स्थगिती उठविण्यासाठी मंत्र्यांना विनंती करण्याचे काम; आमदार फारुक शहा यांची नाराजी

सरकार बदलताच मंजूर असलेल्या अनेक विकास कामांना स्थगिती देण्यात आल्याने ती उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाच्या मंत्र्यांना विनंती करावी लागत आहे. आमदार कुणाल पाटील आणि माजी आमदार गोटे यांच्याही कामांना स्थगिती देण्यात आली होती, अशी माहिती एमआयएमचे आमदार फारुक शहा यांनी दिली.

सविस्तर वाचा...

15:39 (IST) 13 Feb 2023
ठाणे : कळव्यात मोटारीने घेतला पेट; सुदैवाने जीवितहानी नाही

कळवा येथील खारेगाव टोलनाका भागात सोमवारी पहाटे एका मोटारीने अचानक पेट घेतला. सुदैवाने प्रवासी आणि वाहन चालकांनी मोटारीबाहेर धाव घेतल्याने मोठी दुर्घटना टळली. मुंबई नाशिक महामार्गावरून अकलक शेख हे सोमवारी पहाटे कुर्ला येथून नाशिकच्या दिशेने मोटारीने जात होते. त्यावेळी मोटारीत त्यांच्यासोबत तीन प्रवासी होते. सविस्तर वाचा…

15:17 (IST) 13 Feb 2023
शिवसेनेच्या पूर्वीच्या प्रभावक्षेत्रात आदित्य ठाकरे यांनी साधला संवाद

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील मंगू जळगाव येथे हे मेळावे झाले. यापूर्वी या तीनही विधानसभा मतदारसंघांवर शिवसेनेचा प्रभाव राहिलेला आहे.

सविस्तर वाचा...

15:01 (IST) 13 Feb 2023
उद्धव ठाकरेंचे नेतृत्व आनंद दिघेंसह प्रकाश परांजपेंनाही होते मान्य; आनंद परांजपे यांनी जुनी छायाचित्र दाखवून केला दावा

उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व पक्षावर लादण्यात आल्याचा आरोप शिंदे गटाकडून होत असतानाच, राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी हा आरोप खोटा असल्याचा दावा केला आहे. पहिल्यांदा खासदार म्हणून निवडुण आल्यानंतर प्रकाश परांजपे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे हे पक्षाचे कार्याध्यक्षही नव्हते, असे सांगत आनंद यांनी या भेटीचे जुने छायाचित्र दाखवून या दोन्ही नेत्यांनाही उद्धव यांचे नेतृत्व मान्य होते, असा दावा केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. सविस्तर वाचा…

14:37 (IST) 13 Feb 2023
नागपूर: बुथपासून मतदान केंद्रापर्यंत सर्व काही, असे आहे भाजपचे वॉर रूम

प्रत्येक निवडणूक जिंकण्यासाठी लढणा-या भारतीय जनता पक्षाने आगामी निवडणुकीसाठी तयार केलेल्या 'वॉर रूम' मध्ये बुथ पासून तर निवडणूक मतदान केंद्रापर्यंत सर्व आकडेवारी उपलब्ध असून त्याचे विश्लेषण करून रणनीती तयार केली जाणार आहे. भाजप कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या अत्याधुनिक 'वॉर रुम’ मध्ये आठ संगणक आहेत. सविस्तर वाचा…

14:35 (IST) 13 Feb 2023
‘व्हॅलेंटाईन डे’चं पत्नी, बहिणीकडून अनोखे गिफ्ट ठरले संजीवनी

खारघर येथील मेडिकव्हर रुग्णालयात तीन वेगवेगळ्या अवयव प्रत्यारोपनाच्या शस्त्रक्रीया यशस्वी पार पडल्याची माहिती येथील डॉक्टरांनी दिली. या तीनही प्रत्यारोपनात पत्नी आणि बहिणींनी अवयवदाते होऊन आपल्या प्रियजनांचे प्राण वाचवले आहेत.

सविस्तर वाचा...

14:20 (IST) 13 Feb 2023
येऊरचे बंगले वाचविण्यासाठीच माजी नगरसेवकांचा पक्ष प्रवेश; राष्ट्रवादीचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांचा आरोप

शहराचा प्राणवायु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येऊरच्या जंगलात मोठ्या प्रमाणात बेकायदा बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी पुढे येत असतानाच, या जंगलात पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्राची परवानगी नसतानाही बंगले उभारणीचा प्रकल्पाचे काम सुरु असल्याची बाब पुढे आली आहे. सविस्तर वाचा…

14:08 (IST) 13 Feb 2023
डोंबिवली : शिळफाटा रस्ते बाधित शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

मागील दोन वर्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार करून, दोन महिन्यांहून अधिक काळ बेमुदत धरणे आंदोलन करूनही शिंदे-फडणवीस सरकार शिळफाटा रस्ते बांधित शेतकाऱ्यांना भरपाई देण्यात टाळाटाळ करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

सविस्तर वाचा...

13:53 (IST) 13 Feb 2023
घाटकोपरमधील माजी नगरसेवकाला अटक

परिसरात पाणी येत नसल्याने वर्षभरापूर्वी घाटकोपरमधील शिवसेनेचे माजी नगरसेवक किरण लांडगे यांनी एका पालिका अधिकाऱ्याला धक्काबुक्की केली होती. याबाबत विनोबा भावे नगर पोलिसानी सोमवारी लांडगे यांना अटक केली असून, अटकेनंतर नागरिकांनी पोलीस ठाण्याबाहेर आंदोलन सुरू केले होते.

सविस्तर वाचा...

13:52 (IST) 13 Feb 2023
आम्ही निवडणुकीसाठी आजही तयार, मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

"ज्यांना चिंता वाटते, तेच सर्वोच्च न्यायालयात त्यांची बाजू मजबूत असल्याचे माध्यमांना सांगत असतात. मी कधीही न्यायालयाच्या निर्णयावर बोललो नाही. हे आपले क्षेत्र नाही, न्यायालय मेरीटप्रमाणे निर्णय देईल, आम्ही तर कधीही निवडणुकीसाठी तयार आहोत", असे भाष्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना दिले.

13:28 (IST) 13 Feb 2023
चांदूर रेल्वे येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे चक्काजाम आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुलढाणा येथे शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर जो लाठीचार्ज झाला. त्याच्या निषेधार्थ चांदूर रेल्वे येथील सोनगाव चौफुली बायपास रोड येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले.

12:56 (IST) 13 Feb 2023
राज ठाकरे ९ मार्चला ठाण्यात; ‘संघर्षाची तयारी, पुन्हा एकदा भरारी’ म्हणत मनसेचा गडकरी रंगायतन येथे वर्धापनदिन

मनसेचा वर्धापन दिन हा ९ मार्चला आयोजित केला जातो. हा वर्धापनदिन ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे होणार असल्याचे मनसेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे, राज ठाकरे हे वर्धापन दिनानिमित्ताने ठाण्यात येणार आहेत.

सविस्तर वाचा...

12:26 (IST) 13 Feb 2023
पंतप्रधान मोदी, अमित शाह यांनी मुंबईतच २ बीएचकेचा फ्लॅट घ्यावा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका महिन्यात दुसऱ्यांदा मुंबईचा दौरा केला होता. या दौऱ्यावर टीका करत असताना सुषमा अंधारे म्हणाल्या, "अमित शहा किंवा मोदीजी असतील. त्यांनी असे सतत दौरे करुन उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावाने कंठशोष करण्यापेक्षा ती एनर्जी वाचवून ठेवावी. मुंबईतच एखादा टू बीएचकेचा फ्लॅट घ्यावा आणि इथेच मुक्काम करावा."

12:25 (IST) 13 Feb 2023
आनंद दवेंना मिळालं कसबा मतदारसंघासाठी 'बासरी' चिन्ह

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत आनंद दवे हे भाजपाच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. यावेळी त्यांना निवडणूक आयोगाकडून बासरी हे चिन्ह मिळाले आहे.

12:22 (IST) 13 Feb 2023
मुंबई : घरांच्या प्रश्नी १२ मार्चला गिरणी कामगार मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील घरावर धडकणार

गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसदारांच्या घरांच्या प्रश्नी राज्य सरकार उदासीन असल्याचा आरोप करत कामगारांनी आता घरांसाठीचा लढा तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार ११ मार्च रोजी गिरणी कामगार आणि त्यांचे वारसदार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील घरावर मोर्चा काढणार आहेत.

सविस्तर वाचा...

12:05 (IST) 13 Feb 2023
राष्ट्रीय लोक अदालतमध्ये १२८ कोटींची ४९ हजार प्रकरणे निकाली

कल्याण – ठाणे जिल्ह्याच्या विविध भागातील न्यायालयांमध्ये शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतमध्ये विविध प्रकारची, अनेक वर्षे रखडलेली ४८ हजार ९८८ प्रकरणे निकाली काढून १२८ कोटी लाभार्थींना देण्यात आले, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिली.

सविस्तर वाचा...

11:54 (IST) 13 Feb 2023
वादग्रस्त मंत्री संजय राठोड यांचे स्थान अधिक पक्के

संकटात आम्हीच संजय राठोड यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिलो, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राठोड यांना अभय दिले. तसेच बंजारा समाजाचे संजय राठोड हेच नेते आहेत हे अधोरेखित केले.

वाचा सविस्तर....

11:37 (IST) 13 Feb 2023
जळगाव : देवगिरी महोत्सवाचा समारोप; ‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट महितीपट

‘भाई का बड्डे’ सर्वोत्कृष्ट लघुपट, तर ‘ये गांव मेरा’ उत्कृष्ट माहितीपट ठरला. ये गांव मेरा माहितीपटाचे दिग्दर्शन हरीश पटेल यांनी केले होते. उमेश घेवारीकर यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार देण्यात आला. उत्कृष्ट कॅम्पस चित्रपट म्हणून सुकल्या, तर उत्कृष्ट मायबोली लघुपट म्हणून द दप्तराचा ठरला. त्याचे दिग्दर्शक पराग चौधरी यांनी केले होते.

सविस्तर वाचा...

11:25 (IST) 13 Feb 2023
डोंबिवली रेल्वे स्थानकात छतावरील पत्रे काढल्याने प्रवासी उन्हात

डोंबिवली रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन आणि चारवरील छतावरील पत्रे दुरुस्तीच्या कामासाठी काढण्यात आल्याने प्रवाशांना गेल्या काही दिवसांपासून उन्हात उभे राहावे लागते. पत्रे काढलेला भाग महिला डब्याच्या जवळ असल्याने महिला प्रवाशांना विशेष करुन उन्हाचा त्रास सहन करावा लागतो.

सविस्तर बातमी

11:14 (IST) 13 Feb 2023
नाशिक : इंजिनच्या धडकेत चार रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मनमाड – लासलगाव रेल्वे स्थानकालगत सोमवारी सकाळी वीज वाहिनी (ओव्हरहेड वायर) दुरुस्त करणाऱ्या इंजिनने (टॉवर) उडवल्याने चार कर्मचाऱ्यांचा (गँगमन) मृत्यू झाला.

सविस्तर वाचा...

10:59 (IST) 13 Feb 2023
पुनर्विकासप्रश्नी दिलाशानंतर मुख्यमंत्री प्रथमच बुधवारी उल्हासनगरात येणार, विविध प्रकल्पांचे होणार लोकार्पण

उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर प्रथमच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी उल्हासनगर शहरात येणार आहेत. बुधवारी पालिकेच्या माध्यमातून उभारण्यात आलेले रुग्णालय, सिंधू भवन, विद्युत वाहने चार्जिंग स्थानक अशा विविध कामांचे लोकार्पण त्यांच्या हस्ते होणार आहे.

सविस्तर वाचा...

10:55 (IST) 13 Feb 2023
गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी हैद्राबादमधील व्यक्तीविरोधात गुन्हा

बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

10:53 (IST) 13 Feb 2023
"ती ऑफर स्वीकारली असती तर मविआ सरकार आधीच पडलं असतं"

मी तुरुंगात असताना मला एक ऑफर मिळाली होती, ती स्वीकारली असती तर महाविकास आघाडीचे सरकार खूप आधी पडले असते, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वर्धा येथील सभेत केला. तसेच शिवसेनेचे अर्ध्याहून अधिक आमदार ईडीच्या भीतीपोटी दुसऱ्या गटात पळून गेले, असाही आरोप त्यांनी केला.

10:47 (IST) 13 Feb 2023
पुण्यातील Google चे कार्यालय उडवून देण्याची धमकी

पुण्यातील कोरेगाव पार्कात बॉम्ब ठेवण्यात आल्याचा बोगस फोन आल्याची घटना समोर आली आहे. पुण्यातील कोरेगाव पार्कमधील Google कार्यालयात बॉम्ब असल्याचा बोगस फोन आला होता. या फोनमुळे सर्वांची एकच तारांबळ उडाली. या फोननंतर पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

10:44 (IST) 13 Feb 2023
पुणे : सासूला अद्दल घडविण्यासाठी चोरीचा बनाव, सुनेसह चौघेजण कर्नाटकातून अटकेत

त्रास देणाऱ्या सासूला अद्दल घडविण्यासाठी चोरीचा बनाव रचणाऱ्या सुनेसह चौघांना कोंढवा पोलिसांनी अटक केली. सासूला मारहाण करण्यास सांगून सुनेने साथीदारांच्या मदतीने घरातील दागिने लुटले होते.

सविस्तर वाचा...

10:37 (IST) 13 Feb 2023
गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवल्याचा दूरध्वनी, हैद्राबादमधील व्यक्तीविरोधात गुन्हा

बीकेसी येथील गुगल इंडियाच्या कार्यालयात रविवारी हैद्राबादमधील एका व्यक्तीने दूरध्वनी करून गुगलच्या पुण्यातील कार्यालयात बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली. प्राथमिक तपासात तो खोडसाळपणा असल्याचे निष्पन्न झाले असून, याप्रकरणी बीकेसी पोलिसांनी हैद्राबाद येथील पणयम बाबू शिवानंद नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा...

10:17 (IST) 13 Feb 2023
नागपूर : त्‍यांनी ‘पांढरे सोने’ विकले, पण पन्‍नास लाख गमावले..

कधी काळी कापूस विकून सोने खरेदी करता येत असल्याने कापसाला ‘पांढरे सोने’ हे बिरुद मिळाले. नगदी पीक म्हणून पाहिले जाणारे हे सोने मात्र धारणी तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांसाठी मोठा आर्थिक फटका देणारे ठरले.

सविस्तर वाचा

10:17 (IST) 13 Feb 2023
गौतमी पाटीलने मागितली अजित पवारांची माफी, म्हणाली, "माझी प्रसिद्धी काही जणांना.."

अश्लिल नृत्याचे कार्यक्रम आयोजित करु नयेत, असे निर्देश अजित पवारांनी दिले होते. त्यावरुन आता गौतमी पाटीलने थेट अजित पवार यांची माफी मागितली आहे. अजितदादा खूप मोठे आहेत. मी त्यांना काही बोलू शकत नाही. माझ्याकडून काही चूका झाल्या होत्या, त्याबद्दल मी माफीही मागितली आहे. माझे जुने व्हिडिओ व्हायरल करुन त्यावरुन टीका केली जाते. माझी प्रसिद्धी काहींना पाहावत नाही, अशी प्रतिक्रिया गौतमी पाटीलने दिली.

10:14 (IST) 13 Feb 2023
तर भाजपाला मिरच्या का झोंबल्या - संजय राऊत यांची टीका

"महाराष्ट्रला नवे राज्यपाल मिळाले. आनंद आहे. राज्यपालांनी घटनेनुसार काम करावे.राजभवनाचे भाजपा कार्यालय करु नये असे मत व्यक्त होताच भाजपास मिरच्या का झोंबाव्यात? राज्याने कटू अनुभव घेतला आहे.राज्यपाल महाराष्ट्रला मिळाले फक्त भाजपाला नाही याचे भान ठेवले तरी पुरे", असे ट्विट ठाकरे गटाचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी केले आहे.

https://twitter.com/rautsanjay61/status/1624983791721914368

10:13 (IST) 13 Feb 2023
पुणे : कोयता गँगच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या : दोघांना शिरुरमध्ये पाठलाग करुन पकडले

हडपसर भागात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील दोघांना पोलिसांनी शिरुर तालुक्यातील पाबळ गावात पकडले. पोलिसांना पाहताच उसाच्या फडातून पसार झालेल्या दोघांना पाठलाग करुन पोलिसांनी ताब्यात घेतले. कोयता गँगमधील आणखी एकाला नगर जिल्ह्यातील पाथर्डी परिसरातून अटक केली.

सविस्तर बातमी

10:12 (IST) 13 Feb 2023
BULDHANA - संत नगरी शेगांव येथे श्रींच्या प्रगट दिनानिमित्त लाखो भाविक दाखल

विदर्भाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या श्री संत गजानन महाराज संस्थान शेगांव येथे श्रींच्या १४५ व्या प्रकट दिना सोहळ्यात सहभागी होण्यासाठी संत नगरीमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. एकंदरीत संपूर्ण संत नगरी आज गण गण गणात बोतेच्या नाम स्मरणात नाहून निघाली आहे.

10:12 (IST) 13 Feb 2023
नागपूर : उपराजधानीत जागोजागी मातीचे ढिगारे

स्वच्छता सर्वेक्षण अंतर्गत गेल्या काही वर्षात शहरावर अस्वच्छतेचा बसलेला डाग पुसून काढण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. मात्र, शहरातील विविध भागात बांधकाम पाडल्यानंतर जागोजागी निर्माण झालेले मातीचे ढिगारे आणि रस्त्यावरील इतर कामांकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्वच्छता व आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहे.

सविस्तर बातमी

10:11 (IST) 13 Feb 2023
नागपूर : राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७ हजार प्रकरणे तडजोडीने निकाली

नागपूर जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये ११ फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतमध्ये २७८९ प्रलंबित व २४ हजार २९६ वादपूर्व अशी एकूण २७ हजार ८५ प्रकरणे तडजोडीने निकाली काढण्यात आली. निकाली निघालेल्या प्रकरणांचे तडजोड मूल्य ४९ कोटी ५९ लाख २१ हजार १९५ आहे.

सविस्तर बातमी

10:10 (IST) 13 Feb 2023
महिलेची विवस्त्र बॉडी डोक्यावर घेऊन गल्लोगल्ली फिरला, पहाटे कॉलनीत..,

उत्तर प्रदेशमधल्या मेरठमध्ये एका महिलेचा नग्नावस्थेत असलेल्या मृतदेह सापडला आहे. एक व्यक्ती बराच वेळ तो मृतदेह डोक्यावर घेऊन फिरत होता. त्यानंतर त्याने एका कॉलनीच्या कोपऱ्यात तो मृतदेह फेकला आणि निघून गेला. सविस्तर वाचा...

10:09 (IST) 13 Feb 2023
नागपूर : शिक्षकांचीच निवड शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी पदावर व्हावी

शिक्षण क्षेत्राचा अनुभव असणाऱ्या शिक्षकांचीच निवड शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी पदावर व्हावी, अशी मागणी समोर येत आहे. भाजपा शिक्षक आघाडीने तसे निवेदन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना पाठवले आहे.

सविस्तर वाचा..

10:09 (IST) 13 Feb 2023
…म्हणून निवडणुकीच्या तोंडावर अनेक राज्यांचे राज्यपाल बदलले

देशातल्या अनेक राज्यांमध्ये रविवारी (१२ फेब्रुवारी) राज्यपाल बदलण्यात आले. वेगवेगळ्या राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता असल्याचे पक्षातल्या सूत्रांनी जनसत्ताला सांगितले होते, नेमकं तसंच घडलं.

सविस्तर वाचा...