Maharashtra Nagar Parishad Results 2025 Winner List Party Wise Results: गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अखेर आता घेतल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली. सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण गेल्यानंतर न्यायालयाने ३१ जानेवारीपर्यंत नगरपरिषदा, नगरपंचायती, जिल्हापरिषदा, ग्रामपंचायती, महानगरपालिकांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, अनुक्रमे २ डिसेंबर व २० डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली. २१ डिसेंबर अर्थात रविवारी मतमोजणी निश्चित करण्यात आली.

या निवडणुकांमध्ये वेगळ्या प्रकारची राजकीय समीकरणं पाहायला मिळाली. राज्यात एकीकडे महायुती महाविकास आघाडी अशा दोन परस्परविरोधी आघाड्या असताना स्थानिक पातळीवर मात्र वेगळेच चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी चक्क सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातच युती दिसून आली. तर काही ठिकाणी थेट सत्तेतील मित्रपक्षांमध्येच चुरशीचा सामना झाल्याचं पाहायला मिळालं.

महाराष्ट्रात २८८ नगरपरिषद-नगरपंचायतींमध्ये कुठल्या पक्षाचे किती नगराध्यक्ष?

भाजपा – १२४
शिवसेना – ६१
राष्ट्रवादी – ३६
काँग्रेस – २७
राष्ट्रवादी शरद पवार – १२
शिवसेना उद्धव ठाकरे – ८
इतर – २०

पुढच्या महिन्यात महाराष्ट्रात २९ महानगर पालिकांच्या निवडणुकादेखील जाहीर झाल्या आहेत. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून मतमोजणी १६ जानेवारी रोजी होणार आहे. मात्र, आरक्षणाचा मुद्दा कायदेशीर कचाट्यात अडकल्यामुळे जिल्हा परिषदा व ग्राम पंचायत निवडणुका प्रलंबित झाल्या आहेत. त्यामुळे ३१ जानेवारीपर्यंतच्या मुदतीमध्ये जिल्हा परिषद व ग्राम पंचायतींच्या निवडणुका होण्याची शक्यता कमी झाली आहे.

(निकाल लागतील तसे आकडे अपडेट होत आहेत…)

जिल्हानावएकूण प्रभाग संख्याभाजपाशिंदे गटठाकरे गटअ.प. राष्ट्रवादीश.प. राष्ट्रवादीकाँग्रेसइतर
अकोलाअकोट३३१११०
अकोलाबाळापूर२५११
अकोलाहिवरखेड २०११
अकोलामुर्तिजापूर२५१११०
अकोलापातूर नगर परिषद३८
अकोलातेल्हारा नगर परिषद२०१३
अमरावतीअचलपूर नगर परिषद४११७१३
अमरावतीअंजनगाव सुर्जी नगरपरिषद२८
अमरावतीचांदूरबाजार नगरपरिषद२०१४
अमरावतीचांदूर रेल्वे नगरपरिषद२०११
अमरावतीचिखलदरा नगर परिषद२०१२
अमरावतीदर्यापूर नगर परिषद२५१७
अमरावतीधामणगाव रेल्वे नगर परिषद२०२०
अमरावतीमोर्शी नगर परिषद२४
अमरावतीशेंदुरजना घाट नगरपरिषद२०११
अमरावतीवरुड नगर परिषद२६१८
अहिल्यानगरदेवळाली प्रवरा नगरपरिषद२०१४
अहिल्यानगरजामखेड नगर परिषद१५
अहिल्यानगरकोपरगाव नगर परिषद३०१९११
अहिल्यानगरपाथर्डी नगरपरिषद२०१४
अहिल्यानगरराहाता नगर परिषद२०१९
अहिल्यानगरराहुरी नगर परिषद२४१७
अहिल्यानगरसंगमनेर नगर परिषद३०२९
अहिल्यानगरशेवगाव नगर परिषद२४१०
अहिल्यानगरशिर्डी नगरपरिषद२३१५
अहिल्यानगरश्रीगोंदा नगर परिषद२२१३
अहिल्यानगरश्रीरामपूर नगर परिषद३४१०२०
कोल्हापूरगडहिंग्लज नगर परिषद१७
कोल्हापूरहुपरी नगर परिषद
कोल्हापूरजयसिंगपूर नगर परिषद२४
कोल्हापूरकागल नगर परिषद२०
कोल्हापूरकुरुंदवाड नगर परिषद१७
कोल्हापूरमलकापूर नगर परिषद२२१८
कोल्हापूरमुरगुड नगर परिषद२०१६
कोल्हापूरपन्हाळा नगर परिषद१७
कोल्हापूरशिरोळ नगर परिषद
कोल्हापूरवडगाव-कसबा नगरपरिषद१८
गडचिरोलीआरमोरी नगर परिषद२०१५
गडचिरोलीदेसाईगंज नगर परिषद२११२
गडचिरोलीगडचिरोली नगरपरिषद२७१५
गोंदियाआमगाव नगर परिषद
गोंदियागोंदिया नगरपरिषद४४१७१५
गोंदियातिरोडा नगर परिषद२११२
चंद्रपूरबल्लारपूर नगर परिषद३२
चंद्रपूरभद्रावती नगर परिषद
चंद्रपूरब्रह्मपुरी नगर परिषद
चंद्रपूरचिमूर नगर परिषद
चंद्रपूरगडचांदूर नगर परिषद
चंद्रपूरघुग्घस नगर परिषद
चंद्रपूरमुल नगर परिषद२०१८
चंद्रपूरनागभीड नगर परिषद
चंद्रपूरराजुरा नगर परिषद१८
चंद्रपूरवरोरा नगर परिषद२४
छत्रपती संभाजीनगरगंगापूर नगर परिषद१७
छत्रपती संभाजीनगरकन्नड नगर परिषद२५१२
छत्रपती संभाजीनगरखुलताबाद नगर परिषद१७
छत्रपती संभाजीनगरपैठण नगर परिषद२३
छत्रपती संभाजीनगरसिल्लोड नगर परिषद
छत्रपती संभाजीनगरवैजापूर नगर परिषद
जळगावअमळनेर नगर परिषद३६१०२५
जळगावभडगाव नगर परिषद२४१९
जळगावभुसावळ नगर परिषद५०२७१२
जळगावचाळीसगाव नगर परिषद३६२४१२
जळगावचोपडा नगर परिषद३११६
जळगावधरणगाव नगर परिषद२३२३
जळगावएरंडोल नगर परिषद२३११
जळगावफैजपूर नगर परिषद२१
जळगावजामनेर नगर परिषद२६२२
जळगावनशिराबाद नगर परिषद१९१०
जळगावपाचोरा नगर परिषद२८२२
जळगावपारोळा नगर परिषद२४१२
जळगावरावेर नगर परिषद२४१०
जळगावसावदा नगर परिषद२०
जळगाववरणगाव नगर परिषद२११४
जळगावयावल नगर परिषद२३
जालनाअंबड नगर परिषद१९
जालनाभोकरदन नगर परिषद१७
जालनापरतूर नगर परिषद२०
ठाणेअंबरनाथ नगर परिषद५९१४२७१२
ठाणेकुळगाव बदलापूर नगरपरिषद४९२२२४
धाराशिवभूम नगर परिषद१७
धाराशिवधाराशिव नगर परिषद३९
धाराशिवकळंब नगर परिषद१७
धाराशिवमुरुम नगर परिषद१७
धाराशिवनळदुर्ग नगर परिषद१७
धाराशिवपरांडा नगर परिषद१७
धाराशिवतुळजापूर नगरपरिषद२०१०
धाराशिवउमरगा नगर परिषद२२
धुळेदोंडाईचा वरवडे नगरपरिषद२६२६
धुळेपिंपळनेर नगर परिषद१०
धुळेशिरपूर वरवडे नगरपरिषद३२३१
नंदुरबारनंदुरबार नगर परिषद४१२९
नंदुरबारनवापूर नगरपरिषद२३२०
नंदुरबारशहादा नगर परिषद२९२०
नंदुरबारतळोदा नगर परिषद२१११
नागपूरबुटीबोरी नगर परिषद
नागपूरदिग्डोह (देवी) नगर परिषद
नागपूरकळमेश्वर नगर परिषद१७
नागपूरकामठी नगर परिषद३२
नागपूरकन्हान पिंपरी नगर परिषद
नागपूरकाटोल नगर परिषद२३
नागपूरखापा नगर परिषद१७
नागपूरमोहपा नगर परिषद१७
नागपूरमोवाड नगर परिषद१७
नागपूरनरखेड नगरपरिषद१७
नागपूररामटेक नगर परिषद१७
नागपूरसावनेर नगर परिषद२३२१
नागपूरउमरेड नगर परिषद२५
नागपूरवाडी नगर परिषद
नागपूरवानाडोंगरी नगर परिषद
नांदेडभोकर नगर परिषद
नांदेडबिलोली नगर परिषद१७
नांदेडदेगलूर नगर परिषद२५
नांदेडधर्माबाद नगर परिषद१९
नांदेडहदगाव नगर परिषद१७
नांदेडकंधार नगर परिषद१७
नांदेडकिनवट नगर परिषद
नांदेडकुंडलवाडी नगरपरिषद१७
नांदेडलोहा नगर परिषद
नांदेडमुदखेड नगरपरिषद१७
नांदेडमुखेड नगरपरिषद१७
नांदेडउमरी नगर परिषद१७
नाशिकभगूर नगर परिषद२०
नाशिकचांदवड नगर परिषद२१११
नाशिकइगतपुरी नगर परिषद२११३
नाशिकमनमाड नगर परिषद३१२१
नाशिकनांदगाव नगर परिषद२०१९
नाशिकओझर नगर परिषद२७१६
नाशिकपिंपळगाव बसवंत२५१०
नाशिकसटाणा नगर परिषद२४१५
नाशिकसिन्नर नगर परिषद३०१४१३
नाशिकत्र्यंबक नगर परिषद२०
नाशिकयेवला नगर परिषद३६१०१०११
परभणीगंगाखेड नगर परिषद२४
परभणीजिंतूर नगर परिषद२३
परभणीमनवत नगर परिषद१९
परभणीपाथरी नगर परिषद२०
परभणीपूर्णा नगर परिषद२०
परभणीसेलू नगर परिषद२४
परभणीसोनपेठ नगर परिषद१७
पालघरडहाणू नगर परिषद२७१७
पालघरजव्हार नगर परिषद२०१४
पालघरपालघर नगर परिषद३०१९
पुणेआळंदी नगर परिषद२११५
पुणेबारामती नगर परिषद४१३५
पुणेभोर नगर परिषद
पुणेचाकण नगर परिषद२५१३१०
पुणेदौंड नगर परिषद२६१७
पुणेफुरसुंगी उरुळी देवाची नगरपरिषद
पुणेइंदापूर नगर परिषद२०१४
पुणेजेजुरी नगर परिषद२०१७
पुणेजुन्नर नगर परिषद१७
पुणेलोणावळा नगर परिषद२७१६
पुणेराजगुरुनगर नगरपरिषद२११०
पुणेसासवड नगर परिषद२२१३
पुणेशिरूर नगर परिषद२४११
पुणेतळेगाव दाभाडे नगरपरिषद२८१०१७१७
बीडअंबाजोगाई नगरपरिषद२८
बीडबीड नगर परिषद५०
बीडगेओराई नगर परिषद१९
बीडकिल्ले धारूर नगरपरिषद१७
बीडमाजलगाव नगर परिषद२६
बीडपरळी वैजनाथ नगरपरिषद३३
बुलढाणाबुलढाणा नगरपरिषद३०२२
बुलढाणाचिखली नगर परिषद२८१३१२
बुलढाणादेऊळगाव राजा नगर परिषद२१
बुलढाणाजळगाव जामोद नगरपरिषद२१
बुलढाणाखामगाव नगर परिषद३५२९
बुलढाणालोणार नगर परिषद२०
बुलढाणामलकापूर-ब नगर परिषद३०१४
बुलढाणामेहकर नगर परिषद२६११
बुलढाणानांदुरा नगर परिषद२५१११०
बुलढाणाशेगाव नगर परिषद३०१७
बुलढाणासिंदखेड राजा नगर परिषद२०
भंडाराभंडारा नगर परिषद३३२३
भंडारापवनी नगर परिषद२०१३
भंडारासाकोली नगर परिषद२०
भंडारातुमसर नगर परिषद२५१२
यवतमाळआर्णी नगर परिषद१९
यवतमाळदारवा नगर परिषद२०
यवतमाळदिग्रस नगर परिषद२३
यवतमाळघाटंजी नगर परिषद१७
यवतमाळनेर नबाबपूर नगर परिषद
यवतमाळपांडरकवडा नगर परिषद
यवतमाळपुसद नगर परिषद२९
यवतमाळउमरखेड नगर परिषद२४
यवतमाळवणी नगर परिषद२६
यवतमाळयवतमाळ नगर परिषद५६२८१५
रत्नागिरीचिपळूण नगर परिषद२८
रत्नागिरीखेड नगर परिषद२०१७
रत्नागिरीराजापूर नगर परिषद२०
रत्नागिरीरत्नागिरी नगरपरिषद३२२३
रायगडअलिबाग नगर परिषद२०१६
रायगडकर्जत नगर परिषद२१
रायगडखोपोली नगर परिषद३११४
रायगडमहाड नगर परिषद२०१०
रायगडमाथेरान नगर परिषद१९१२
रायगडमुरुड-जंजिरा नगरपरिषद२०११
रायगडपेण नगर परिषद२११२
रायगडरोहा नगर परिषद२०१८
रायगडश्रीवर्धन नगर परिषद२०१५
रायगडउरण नगर परिषद२११२
लातूरअहमदपूर नगर परिषद२५१६
लातूरऔसा नगर परिषद२३१७
लातूरनिलंगा नगर परिषद२३१५
लातूरउदगीर नगर परिषद४०१४२०
वर्धाआरवी नगर परिषद२३
वर्धादेवळी नगर परिषद१७
वर्धाहिंगणघाट नगर परिषद३८
वर्धापुलगाव नगर परिषद१८
वर्धासिंदी नगर परिषद१७
वर्धावर्धा नगर परिषद३८
वाशिमकारंजा नगर परिषद२८
वाशिममंगरुळपीर नगर परिषद१८
वाशिमरिसोड नगर परिषद
वाशिमवाशिम नगर परिषद३०
सांगलीआष्टा नगर परिषद२१
सांगलीइस्लामपूर नगर परिषद२८
सांगलीजत नगर परिषद
सांगलीपलूस नगर परिषद१७
सांगलीतासगाव नगर परिषद२१
सांगलीविटा नगर परिषद२४
साताराकराड नगर परिषद३११११३
सातारामहाबळेश्वर नगरपरिषद२०१३
सातारामलकापूर नगर परिषद२७
साताराम्हसवड नगरपरिषद२०२०
सातारापाचगणी नगर परिषद२०१२
साताराफलटण नगर परिषद२७१४
सातारारहिमतपूर नगर परिषद२०
सातारासातारा नगर परिषद५०४०
सातारावाई नगर परिषद२२१२
सिंधुदुर्गमालवण नगर परिषद२०१०
सिंधुदुर्गसावंतवाडी नगरपरिषद१७
सिंधुदुर्गवेंगुर्ला नगर परिषद२०१६
सोलापूरअक्कलकोट नगर परिषद२५२२
सोलापूरअकलूज नगर परिषद२६२२
सोलापूरबार्शी नगर परिषद४२२३१९
सोलापूरदुधणी नगर परिषद२०२०
सोलापूरकरमाळा नगर परिषद१७
सोलापूरकुर्डुवाडी नगरपरिषद२०१३
सोलापूरमैंदर्गी नगर परिषद२०१८
सोलापूरमंगळवेढा नगर परिषद१७
सोलापूरमोहोळ नगर परिषद२०११
सोलापूरपंढरपूर नगर परिषद३५
सोलापूरसांगोला नगर परिषद२३१५
हिंगोलीबसमतनगर नगर परिषद२८
हिंगोलीहिंगोली नगर परिषद३२
हिंगोलीकळमनुरी नगर परिषद१७

दरम्यान, नगरपरिषदा व नगरपंचायतींच्या निवडणुकांमधील निकालांकडे सत्ताधारी व विरोधी पक्ष अशा दोन्ही बाजूच्या सर्वच पक्षांचं लक्ष लागलं आहे. सर्वच पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांसाठी या निवडणुका महत्त्वाच्या असून त्यातील निकालांनुसार प्रत्येक पक्षाची स्थानिक ताकद प्रभावित होणार आहे.