Maharashtra Politics Live News Updates Today: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत अनेक शंका उपस्थित केल्या जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते सखोल तपासासाठी आक्रमक झाले आहेत. बारामतीमध्ये रोहित पवार DGCA विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस स्थानकात दाखल झाले असता तिथेही कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी केल्याचं पाहायला मिळालं.
दुसरीकडे राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातदेखील विरोधक महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारला घेरताना पाहायला मिळत आहेत.
Today’s Live News Updates, 26 February 2026: राज्य विधिमंडळातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा...
राज्यातील रस्ते प्रवास सुरक्षेच्या वाटेवर... अपघाती मृत्यू ८ टक्यांनी घटले! परिवहन विभागाच्या सुरक्षा उपायांना यश...
वर्षाच्या अखेरीस मुंबईतील रस्ते खड्डे मुक्त; पालिका प्रशासनाचा दावा
हैदराबादेतील शंभरावर शेप ‘हरीस’साठी दाखलरमजानमध्ये हरीसला सर्वाधिक पसंती
मुंबई महापालिका सभागृहात राष्ट्रगीतानंतर 'जय जय महाराष्ट्र माझा'ची धून; शिक्षण समिती अध्यक्षांची ठरावाची सूचना मंजूर…
अजित पवार यांच्या अपघाताबाबत विधान परिषदेत झाला मोठा निर्णय; सभापतींनी सरकारला दिला "हा" आदेश…
बेस्टचे १३ मोटार अपघात दावे निकालात; ९९ लाखांचे तडजोड शुल्क…
विश्व मराठी संमेलन: "मराठीचा केवळ राजकिय कारणांसाठी वापर नको"; मधु मंगेश कर्णिक यांनी सरकारला सुनावले
विधान परिषदेत मंत्री झिरवाळ विरोधकांचे लक्ष्य
चेंबूरमधील प्रार्थनास्थळावरून धावणार मेट्रो, एमएमआरडीएचा नियोजनशून्य कारभार उघड; खांबाखालील प्रार्थना स्थळाचे स्थलांतर न करता काम - अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी
मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकालगतच्या पुलाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण; पुलाला अहिल्यादेवी होळकरांचे नाव देणार - देवेंद्र फडणवीस
म्हाडाच्या तीन पुनर्विकास प्रकल्पांचा मार्ग मोकळा; पुनर्विकासासाठी लवकरच निविदा… प्रकल्पांना उच्चस्तरीय समितीचा हिरवा कंदील…
ऑनलाईन फसवणुकीसाठी बनावट बँकखाती उघडणाऱ्या दोघांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई
Sailani Baba Yatra : सैलानी महायात्रेला येताहेत? मग पर्यायी मार्गानेच या; अन्यथा होणार कारवाई…
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन आणखी सहा शहरांमध्ये सेवा
"अजितदादांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत..." , युगेंद्र पवार यांची सोशल मीडियावर पोस्ट
"महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांंच्या विमान अपघाताबद्दल महाराष्ट्रातील जनमानस शंका व्यक्त करीत आहे. राज्यातील एक मोठा नेता आणि जबाबदार लोकप्रतिनिधी ज्या पद्धतीने आपल्यातून निघून गेला याबाबत लोकांमध्ये शोकसंतप्त भावना आहे. यामुळेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल आणि पारदर्शक चौकशी व्हावी ही जनतेची मागणी आहे. यासाठी ज्या घटनेत दादांना प्राण गमावावे लागले त्या घटनेतील व्हिएसआर ही विमान कंपनी आणि डीजीसीए यांच्यावर गुन्हे दाखल होणे अतिशय गरजेचे आहे. याबाबत आमदार रोहितदादा पवार हे गेली काही दिवसांपासून सातत्याने एफआयआर दाखल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु पोलीस दबावाखाली असून ते एफआयआर दाखल करुन घेत नाहीत. पोलीसांनी एफआयआर दाखल करुन घ्यावा आणि लोकनेते स्व अजितदादा यांच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या घटकांवर कारवाई व्हावी यासाठी आज आमदार रोहितदादा पवार, राजेंद्रकाका पवार यांच्यासह मोठ्या संख्येने बारामतीकर उपस्थित होते."
"याप्रसंगी तेथील उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. यासोबतच डीजीसीएच्या स्पेशल ऑडिट रिपोर्टनुसार बारामती पोलीसांनी योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी केली. डीजीसीएच्या रिपोर्टनुसार क्रिमिनल नेगलिजेंसमुळे ( दुर्लक्षामुळे) म्हणजेच विमानाचा मेंटेनन्स न केल्यामुळे या सगळ्या गोष्टी घडल्या आहेत. त्यामुळे त्यानुसार गुन्हा दाखल झाला पाहिजे, हीच आमची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे. या प्रकरणातील सत्य लवकरात लवकर समोर आले पाहिजे. अजितदादांना जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही, याची शासन तथा प्रशासनाने नोंद घ्यावी," अशी पोस्ट युगेंद्र पवार यांनी एक्सवर केली आहे.
Rohit Pawar : "ए…ए…काय वेडा आहे का तू? चल निघ…", रोहित पवार कार्यकर्त्यावर भडकले; व्हिडीओ व्हायरल, काय घडलं?
Nalasopara Viral Video: खळबळजनक, भर रस्त्यातच रिक्षा चालकांचा राडा! नालासोपाऱ्यात नेमकं काय घडलं? व्हिडीओ झाला व्हायरल
मेट्रो ४ मार्गिकेसाठी नवीन सल्लागार आयेशा आणि कन्सल्टिंग इंजिनीअर्स ग्रुप (सीईजी)
सावधान! किरकोळ कारणांसाठी रेल्वेत ‘चेन पुलिंग’ कराल तर…
म्हाडा प्रथम प्राधान्य योजना : सोडतीशिवाय वितरीत करण्यात येणारी घरे पाच वर्षे विकता येणार नाहीत; मुंबई मंडळाकडून पाच वर्षांची अट कायम
Holi Special Trains…मध्य रेल्वे होळीनिमित्त विशेष गाड्या चालवणार
मेधा सोमय्या यांनी दाखल केलेले बदनामीचे प्रकरण : संजय राऊत यांची निर्दोष सुटका
चक्क राष्ट्रपतींच्या नावाने सोशल मिडीयावर चुकीची माहिती, संविधान, धर्म आणि महिलांच्या हक्कांवरील संदेशाने…
उद्योगांकडे थकित वीज देयकात मूळ रकमेपेक्षा व्याज अधिक… पावरलूम संवर्गातील ग्राहकांकडेही…
राष्ट्रपतींच्या हेलिकॉप्टरसाठी तब्बल ४.१० कोटींचे हेलिपॅड? -कोट्यवधींच्या उधळपट्टीचा…
“आमच्या नादाला कोणी लागायचे नाही, इथे आमचेच चालणार ”… नाशिकमध्ये कायद्याचा बालेकिल्ला ढासळला; गुंडांचे थेट पोलिसांना आव्हान !
Electric vehicle : ईव्हीचा शॉक लागून मुलगी पडली काळी ठिक्कर, दुर्दैवी अंत, धाय मोकलून रडताहेत विद्यार्थी, संस्थाध्यक्ष म्हणतात …
ऊस तोडणीसाठी मराठवाड्यात गेलेल्या मेळघाटातील मजुरांच्या मदतीसाठी बच्चू कडूंची धावाधाव..
Devendra Fadnavis on Recruitment in Maharashtra: मुख्यमंत्र्यांनी सरकारी नोकरभरतीबाबत मांडली आकडेवारी...
महायुतीचं सरकार आल्यापासून १ लाख २० हजार ४४९ लोकांना नियुक्त्या दिल्या आहेत. आणखीही काही नियुक्तीपत्रे शिल्लक आहेत, ती पुढच्या दोन महिन्यांत आम्ही देऊ. हा आकडा दीड लाखापर्यंत जाईल - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
Suicide : बिबट्याची पहाटे आत्महत्या, जाता जाता केले दोघांना जायबंदी, एकाचे शवविच्छेदन तर दोघांवर उपचार.
Today’s Live News Updates, 26 February 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर!

