Maharashtra Politics News Updates Today: मरीन ड्राईव्ह आणि बारामती पोलिसांनी देखील एफआयआर दाखल करण्यास नकार दिल्यानंतर रोहित पवार आज मुंबईत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. रोहित पवार राज ठाकरे यांच्याशी अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी चर्चा केली. “अजित पवारांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या”, अशी विनंती रोहित पवारांनी राज ठाकरेंना केली. दुसरीकडे मराठी गौरव दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने विधिमंडळातील आयोजित कार्यक्रमाला आमदारांनी दांडी मारल्याचे दिसून आहे. याशिवाय राज्यातील राजकारण, मनोरंजन, कला – क्रीडा – संस्कृती, मनोरंजन, गुन्हे यासह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

Live Updates

Today’s News Updates, 27 February 2026: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

20:58 (IST) 27 Feb 2026

पेसा क्षेत्रातील भरती प्रक्रियेला आरंभ; कंत्राटी शिक्षकांच्या भवितव्यावर टांगती तलवार

पालघर जिल्ह्यात पेसा क्षेत्रातील रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेला वेग आला असून ८१९ शिक्षण सेवकांना नियुक्ती आदेश देण्यात आले आहेत. मात्र, यामुळे अनेक महिने मानधनावर काम करणाऱ्या कंत्राटी शिक्षकांच्या भवितव्यावर टांगती तलवार निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
20:58 (IST) 27 Feb 2026

सिडकोच्या माझे पसंतीच्या घर योजनेला मुदतवाढ

सिडकोच्या १६,८७६ घरांच्या ‘माझे पसंतीचे सिडकोचे घर’ योजनेसाठी पर्याय निवडीला १९ मार्च २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहून सिडको महामंडळाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ...अधिक वाचा
20:20 (IST) 27 Feb 2026

पिंपरीत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव;  ४३ देशांतील ११६ चित्रपटांचा सहभाग

भिवंडी शहराचे सौंदर्य खराब करणाऱ्या अनधिकृत बॅनर आणि पोस्टर्सवर पालिकेने कडक कारवाई सुरू केली आहे. यापुढे अनधिकृत बॅनर लावणाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल करण्याचे आदेश आयुक्त अनमोल सागर यांनी दिले आहेत. ...सविस्तर वाचा
19:38 (IST) 27 Feb 2026

अकोला पोलिसांच्या ‘त्रिनेत्र’ची राष्ट्रीय स्तरावर झेप, ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित…

अकोला पोलिसांनी विकसित केलेल्या 'त्रिनेत्र' या एआय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पाने गुन्ह्यांच्या पुनरावृत्तीत ४८ टक्के घट नोंदवत थेट राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. ...अधिक वाचा
19:33 (IST) 27 Feb 2026

नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांची गाडी अडविण्याची योजना…? पुढे काय घडले?

नाशिक येथील विश्व मराठी संमेलनाच्या उद्घाटनासाठी आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केला. ...सविस्तर वाचा
19:26 (IST) 27 Feb 2026

MSRTC Hirakani Bus : दोन वर्षांत दादर-पुणे हिरकणी बसच्या ७८ टक्के फेऱ्यांमध्ये घट

एसटी महामंडळाने महिला सन्मान योजनेमुळे प्रवासी शिवनेरीकडे वळल्याचे कारण देत दादर-पुणे मार्गावरील हिरकणी बसच्या ४४४ फेऱ्यांवरून थेट ९७ फेऱ्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. ...सविस्तर वाचा
18:58 (IST) 27 Feb 2026

जळगावमधील केळी उत्पादकांना दिलासा; ११ कोटींपेक्षा अधिक पीकविमा भरपाई मंजूर !

जळगावच्या सावदा महसूल मंडळातील १६२२ केळी उत्पादक शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ७ लाख रुपयांची पीकविमा भरपाई मंजूर झाली आहे. आमदार एकनाथ खडसे यांनी विचारलेल्या प्रश्नावर कृषी मंत्र्यांनी ही माहिती दिली. ...वाचा सविस्तर
18:55 (IST) 27 Feb 2026

Unreserved Special Trains : पनवेल - रत्नागिरीदरम्यान ६ अतिरिक्त अनारक्षित होळी विशेष सेवा…

होळी सणानिमित्त कोकणात जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने विशेष गाड्यांची घोषणा केली आहे. या गाड्या पूर्णतः अनारक्षित असून प्रवाशांना तात्काळ प्रवासाची सुविधा मिळणार आहे. ...सविस्तर बातमी
18:52 (IST) 27 Feb 2026

हिंद-दी-चादर’ समागम सोहळ्यासाठी महापालिका प्रशासनाची सर्व यंत्रणा सज्ज

खारघर येथे २८ फेब्रुवारी व १ मार्च रोजी होणाऱ्या 'हिंद-दी-चादर' श्री गुरु तेग बहादूर ३५० व्या शहिदी समागमासाठी प्रशासन सज्ज झाले असून २० लाख भाविकांच्या सुविधेसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. ...सविस्तर बातमी
18:47 (IST) 27 Feb 2026

वसई विरारच्या हवेच्या गुणवत्तेत चढ-उतार; १८ फेब्रुवारीला नोंदवली गेली सर्वात स्वच्छ हवा

वसई-विरारमध्ये फेब्रुवारी महिन्यात हवेच्या गुणवत्तेत मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. १८ फेब्रुवारीला ३६ निर्देशांकासह सर्वात स्वच्छ हवेची नोंद झाली, तर ९ फेब्रुवारीला हवा सर्वाधिक प्रदूषित होती. ...अधिक वाचा
18:35 (IST) 27 Feb 2026

बायकोच्या व्हॉट्सअप स्टेटसवर केली अश्लील कमेंट; जाब विचारायला गेलेल्या पतीची हत्या

पत्नीच्या व्हॉट्सअप स्टेटसवर अश्लील कमेंट करणाऱ्या तरुणाला जाब विचारण्यासाठी गेलेल्या २४ वर्षीय पतीची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. नालासोपारा पोलिसांनी सराईत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. ...वाचा सविस्तर
17:24 (IST) 27 Feb 2026

‘एमपीएससी’ व ‘यूपीएससी’च्या पूर्वप्रशिक्षणासाठी ‘सारथी’मधील जागांत वाढ

‘सारथी’ संस्थेमार्फत पूर्व प्रशिक्षणासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) १०० जागांवरून ४०० तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) ४०० जागा वरून १ हजार जागा निर्माण करण्यास राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीने मान्यता दिल्याची माहिती मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी दिली. याबरोबरच ‘सारथी’ने उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सुरू करावेत, यासाठी नामांकित प्रशिक्षण संस्थांचे मार्गदर्शन घ्यावे, अशीही सूचना केली आहे.

15:52 (IST) 27 Feb 2026
"आता मात्र सर्वांसमोर सर्व बोलणार", वाल्मीक कराडला जामीन नाकारल्यानंतर मुलाची फेसबुक पोस्ट चर्चेत

वाल्मीक कराडला जामीन नाकारल्यानंतर मुलाची फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. "आता मात्र सर्वांसमोर सर्व बोलणार", अशी पोस्ट कराडचा मुलगा सुशील कराडने केली आहे.

15:38 (IST) 27 Feb 2026

Anna Hazaje: केजरीवाल दोषी नसतील म्हणून निर्दोष मुक्तता; अण्णा हजारे

"केजरीवाल दोषी नसतील म्हणून निर्दोष मुक्तता केली. न्यायव्यवस्था सर्वोच्च आहे, न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर करायला हवा", असे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले.

15:15 (IST) 27 Feb 2026

Pimpri Chinchwad Crime : ओढणीने गळा आवळून पत्नीचा खून

पिंपरी-चिंचवड शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून निगडीत घरगुती वादातून पतीने पत्नीचा ओढणीने गळा आवळून खून केला आहे. ...सविस्तर वाचा
14:40 (IST) 27 Feb 2026

‘विरामचिन्हां’च्या पूर्वी मराठीमध्ये होता दंड! थाॅमस कँडी या इंग्रजी अधिकाऱ्याचे मराठीला योगदान

थॉमस कँडी यांनी विरामचिन्हे बहाल करण्यापूर्वी मराठीमध्येही हिंदीप्रमाणे वाक्य पूर्ण झाल्याची खूण म्हणून दंड (उभी रेष) वापरला जात होता. महानुभाव साहित्यामध्ये ती खूण म्हणून विसर्ग वापरला जात असे. ...सविस्तर वाचा
14:13 (IST) 27 Feb 2026

आमदार रोहित पवार उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार

मनसे अध्यक्ष राज ठाकरे, मुख्यमंत्री दवेंद्र फडणवीस यांची आज भेट घेतल्यानंतर रोहित पवार उद्या (शनिवारी) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. पवार शिंदे यांच्याशी अजित पवार यांच्या अपघाताबाबत चर्चा करतील.

13:11 (IST) 27 Feb 2026

Devendra Fadnavis Marathi speech: "मी शब्दाशब्दाला 'का बे', 'साल्या' असं मराठी बोलायचो, पण…", देवेंद्र फडणवीसांच्या कोट्यांनी विधानभवनात पिकला हशा!

मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषेतील प्रवासावर मजेशीर टिप्पणी केली. मुंबईत आल्यानंतर त्यांच्या 'सांस्कृतिक' मराठीमुळे आलेल्या अडचणी आणि राजकीय आयुष्यातील विनोदाचे महत्त्व यावर त्यांनी मिश्किल शैलीत भाष्य केले. ...वाचा सविस्तर
13:03 (IST) 27 Feb 2026

Rohit Pawar CM Fadanvis Meet: राज ठाकरे यांच्यानंतर रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला

राज ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर रोहित पवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

12:50 (IST) 27 Feb 2026

ओव्हरलोडिंग : हळूहळू वाढणारा आणि अदृश्य विद्युत धोका

ओव्हरलोडिंग ही हळूहळू वाढणारी, पण अत्यंत धोकादायक प्रक्रिया आहे. ती सहसा आवाज किंवा ठिणग्या न करता विद्युत प्रणाली कमकुवत करते. चुकीचे लोड नियोजन आणि अयोग्य संरक्षण यामुळे हा धोका वाढतो. ओव्हरलोडिंगकडे गंभीरपणे पाहणे आवश्यक आहे. ...सविस्तर बातमी
12:37 (IST) 27 Feb 2026

Ajinkya Rahane: क्रिकेटर अजिंक्य राहणेने दिल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या खास शुभेच्छा

संतांची वाणी, शिवरायांचा इतिहास आणि साहित्याचा अमूल्य ठेवा लाभलेली आपली मराठी भाषा सदैव समृद्ध राहो. मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा!

https://twitter.com/ajinkyarahane88/status/2027245123856433653?s=20

12:35 (IST) 27 Feb 2026

Pune Crime : एकाचवेळी शहरातील नऊ गुंड तडीपार; पोलीस उपायुक्त मिलिंद माेहिते यांचे आदेश

पुण्यातील बिबवेवाडी, आंबेगाव आणि मार्केटयार्ड परिसरात दहशत माजविणाऱ्या ९ गुंडांना दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
12:29 (IST) 27 Feb 2026

होलिका दहन सोमवारीच; ग्रहण असले तरी धार्मिक कार्य करता येतील; पंचांगकर्ते मोहन दाते यांची माहिती

मंगळवारी चंद्रग्रहण असले तरी वेधकाळात धुळवड, पूजा-अर्चा आणि कुळधर्म करता येतील. जाणून घ्या ग्रहणाचा काळ आणि राशीभविष्य. ...वाचा सविस्तर
12:27 (IST) 27 Feb 2026

"अजित पवारांना न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या"; रोहित पवारांची राज ठाकरेंना विनंती

रोहित पवार यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. 'अजित पवारांनी न्याय देण्यासाठी पाठिंबा द्या', अशी विनंती पवारांनी त्यांना केली. FIR घेतली जात नाही ही दुर्दैवी बाब असल्याचेही त्यांनी नमूद केल्याचे पवार म्हणाले.

12:25 (IST) 27 Feb 2026

चार अल्पवयीन मुली बोहल्यावर चढता चढता…

यवतमाळ शहरानजीक वाघाडी, नेर तालुक्यातील रत्नापूर बेडा, बाभूळगाव येथील गणोरी आणि महागाव तालुक्यातील पिंपळगाव इजारा या चार गावांमध्ये अल्पवयीन मुलींचे विवाह लावून दिले जाणार असल्याची गोपनीय माहिती चाईल्ड हेल्पलाईनला मिळाली होती. ...सविस्तर बातमी
12:23 (IST) 27 Feb 2026

Video : अखेर लादेननगर उध्वस्त, बांगलादेशींची पळापळ, करायचे जगावेगळी नशा. मात्र शेवटी…

वर्धा जिल्ह्यातील सिंदी रेल्वे येथील मौजा परसोडी शिवारात वन विभागाच्या जागेवर वसलेले 'लादेननगर' अखेर उद्ध्वस्त करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
12:04 (IST) 27 Feb 2026

Yerwada Katraj Tunnel: वाहतूक कोंडी होणाऱ्या मार्गांचे सर्वेक्षण

Pune Yerwada-Katraj Tunnel Project: हिंजवडी ते सिंहगड, हिंजवडी ते येरवडा, येरवडा ते कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडी मशीन चौक अशा तीन चार ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे, असे निरीक्षण सल्लागार कंपनीने बैठकीत नोंदविले आहे. ...सविस्तर बातमी
12:01 (IST) 27 Feb 2026

वनखात्याचा टांगा पलटी झालाय.. कोण म्हणालं असं? आणि का?

नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान आमदार निलेश राणे यांनी वनमंत्री गणेश नाईक आणि वनविभागाच्या कामकाजावर बोचरी टीका केली. ...सविस्तर वाचा
11:54 (IST) 27 Feb 2026

राज्यातील साखर कारखाने अडचणीत! ऊस शेतकऱ्यांचे ‘एफआरपी’चे पैसे शेतकऱ्यांना मिळणार का…

‘इस्मा’कडून देशातील साखरेच्या उत्पादनाचा अंदाज जाहीर करण्यात आला. या वेळी बोलताना बल्लानी यांनी साखर उद्योगासमोरील अडचणी मांडल्या. ...सविस्तर बातमी
11:42 (IST) 27 Feb 2026

गोकुळच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले

गोकुळची निवडणूक महायुतीच्या झेंड्याखाली लढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी एकाकी लढतीची तयारी सुरू ठेवली आहे. ...सविस्तर वाचा

Marathi Bhasha Gaurav Din

मराठी भाषा गौरव दिन (फोटो - X/@RajThackeray)

राज ठाकरेंकडून मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.