अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं या अर्थसंकल्पात काही नाही – जयंत पाटील

IDBIचे खासगीकरण करण्याची सरकारची मानसिकता आहे. तुमच्या इकॉनॉमीमध्ये पैसे नाही.

भारतात सगळ्यात मोठा फटका शेतकऱ्यांना बसतो मात्र या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना काहीच मिळालेले नाही. अर्थव्यवस्थेला गती देण्यासारखं या अर्थसंकल्पात काही सांगितलं नाही अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी अर्थ संकल्पावर बोलताना केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था आधीच गोंधळलेली त्यात गोंधळलेल्या अर्थमंत्र्यांनी आज अर्थसंकल्प मांडला. देशात मंदीचे वातावरण आहे, त्यासाठी अर्थसंकल्पात काहीच नाही. रस्त्याच्या कामांसाठी सरकारकडे पैसे नाही मात्र आज मोठ्या घोषणा केल्या गेल्या असेही जयंत पाटील म्हणाले.

जीएसटीबाबत सरकार पाठ थोपटून घेत आहे. मात्र अनेक राज्यांना अजून पैसे दिले गेले नाही. जीएसटीमुळे अनेक राज्याचे झालेले नुकसान कधी देणार… महाराष्ट्राचेही पैसे अजून मिळाले नाहीत ते कधी मिळणार असा सवालही जयंत पाटील यांनी अर्थमंत्र्यांना केला आहे.

मंदीतून देश बाहेर काढण्यात अर्थमंत्र्यांना अपयश आले आहे. आपल्या देशातील एअर इंडियासारखी कंपनी विकायला लागले आहेत तर दुसरीकडे डाओसमध्ये पियुष गोएल मी मंत्री नसतो तर मीच कंपनी खरेदी केली असती अशी वक्तव्य करत आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

IDBIचे खासगीकरण करण्याची सरकारची मानसिकता आहे. तुमच्या इकॉनॉमीमध्ये पैसे नाही. कंपन्या विकून पैसे आणत आहे देशात स्वातंत्र्यानंतर जे तयार केलं ते मोडून काढायचे काम केलं जात आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे.

या अर्थसंकल्पात मुंबई आणि महाराष्ट्रासाठी काहीच नाही. महाराष्ट्र आता मोदींचं नावडतं राज्य झालं आहे अशी जोरदार कोपरखळी लगावतानाच मोदींचं लक्ष गुजरात आणि अहमदाबाद आहे म्हणून मुंबई महाराष्ट्रासाठी काही ठोस दिले गेले नाही. मुंबईकडे दुर्लक्ष करून त्याचं महत्व कमी करणे हेच उद्दिष्ट आहे असाही थेट आरोप जयंत पाटील यांनी बोलताना केला आहे.

या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना दिलासा नाही… शेतकरी कर्जमाफी आम्ही केली. केंद्रसरकार शेतकऱ्यांना दिलासा तर देत नाहीच पण दिलासा देण्यातही सहभागी होत नाही. पुरामुळे,अतिवृष्टीमुळे जी संकटं आपल्या राज्यावर आली. केंद्रसरकार त्यासाठीही पैसे देत नाही त्याकडे दुर्लक्ष करत आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केंद्र सरकारवर बोलताना केला.

आजचा अर्थसंकल्प म्हणजे निव्वळ जुमलेबाजी असून लोकांच्या डोळ्यात धुळफेक करणारा आहे असा थेट आरोपही जयंत पाटील यांनी केला आहे. अर्थसंकल्पात जलसिंचन काही दिसलं नाही. बुलेट ट्रेनसाठी किती पैसे दिले… खर्च केले… त्यावर बोला असा सवालही जयंत पाटील यांनी केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra minister jayant patil slam modi govt over budget 2020 dmp

Next Story
‘बुद्धिस्ट सर्किट’ विकासातून पर्यटनास चालना
ताज्या बातम्या