Maharashtra MLC Election : विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक जाहीर

दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला ; जाणून घ्या काय आहे निवडणूक कार्यक्रम आणि कोणत्या आहेत जागा

(प्रातिनिधिक छायाचित्र)

निवडणूक आयोगाकडून राज्यातील विधानपरिषदेच्या आठ पैकी सहा जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. या सहा जागांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून, १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. याबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. १ जानेवारी २०२२ रोजी विधानपरिषदेच्या आठ आमदारांचा कार्यकाळ संपत जरी असला, तरी सहा जागांसाठीच निवडणूक होत आहे.

ज्या सहा जागांसाठी निवडणूक होणार आहे त्यामध्ये शिवसेनेची रामदास कदम यांची मुंबईतील जागा, काँग्रेसची भाई जगताप यांची मुंबईतील जागा आणि सतेज पाटील यांची कोल्हापूरमधील जागा. तसेच, भाजपाची धुळे-नंदुरबार येथील अमरीश पटेल यांची जागा व नागपूर मधील गिरीश व्यास यांची जागा याचबरोबर शिवसेनेची अकोला-बुढाणा-वाशीम येथील गोपीकिशन बाजोरिया यांच्या जागेचा समावेश आहे. तर, सोलापूर व अहमदनगर येथील जागेसाठी निवडणूक होणार नाही.

असा आहे निवडणूक कार्यक्रम –

अधिसूचना जाहीर – १६ नोव्हेंबर, अर्ज दाखल करण्याची तारीख – २३ नोव्हेंबर, अर्जाची छाननी – २४ नोव्हेंबर, अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख – २६ नोव्हेंबर, मतदान – १० डिसेंबर, मतमोजणी १४ डिसेंबर

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Maharashtra mlc election election announced for six of the eight seats in the legislative council msr

Next Story
‘कोरा कागद निळी शाई, आम्ही कोणाला भीत नाही’!
ताज्या बातम्या