Maharashtra MLC Election Result 2026 Updates : नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचा पराभव झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका करणारे ‘Big Fat Zero’ हे ट्विट केले, मात्र नंतर ते डिलीट केले. यावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी फडणवीस यांना लक्ष्य केले. नागपूर हा भाजपाचा आणि संघाचा बालेकिल्ला असतानाही पराभव झाल्याचे सांगत त्यांनी सत्तेचा अहंकार नको, असा टोला लगावला. तसेच विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील राजकारण, निवडणूक, आंदोलन, दुष्काळ आणि पाणीटंचाईसह विविध जिल्ह्यांतील महत्त्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून पाहुयात.
मोदी-फडणवीसांच्या ट्विटवर संजय राऊतांची टीका; म्हणाले, ‘देशाच्या प्रमुख विरोधी पक्षाची खिल्ली उडवणं हा थिल्लरपणा’
नागपूर पदवीधर मतदारसंघातील निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधानांनी समाजमाध्यमांवर येऊन देशाच्या प्रमुख विरोधी पक्षाची खिल्ली उडवणं हा थिल्लरपणा असल्याची टीका राऊत यांनी केली. नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपले ट्विट डिलीट केले. तसेच, पदवीधर मतदारांनी भाजपाला चांगलंच अडचणीत आणल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
काँग्रेसने कराळे मास्तरांचा दुधाने अभिषेक घालावा – नितेश राणे
नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार अभिजित वंजारी यांच्या विजयावरून भाजपा नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसला टोला लगावला आहे. “काँग्रेसने कराळे मास्तरांचा दुधाने अभिषेक घालावा,” असे विधान करत त्यांनी या विजयाचे श्रेय कराळे मास्तरांना दिले. “संघाच्या भूमीत जिंकलो, असे अभिजित वंजारी मोठ्याने सांगत आहेत. पण कराळे मास्तरांमुळे ते जिंकून आलेत, हे विसरू नये. कराळे मास्तर निवडणुकीला उभे राहिले नसते, तर काँग्रेसला आज तोंड लपवून बसण्याची वेळ आली असती. त्यांनी कराळे मास्तरांचा दुधाने अभिषेक घालायला हवा. राहुल गांधींच्या जागी कराळेंचा फोटो लावावा,” असे नितेश राणे म्हणाले.
१८ वर्षांनी पराभूत झालेल्या सतीश चव्हाण यांची पहिली पोस्ट
“निवडणूक म्हणजे लोकमताचा निर्णय. गेली अठरा वर्षे मी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्राच्या विधिमंडळात प्रतिनिधित्व केले. या काळात माझ्याकडून जे जे करता येईल ते मी केले. मात्र, लोकांचा निर्णय हा लोकशाहीत अंतिम असतो आणि तो मान्य करीत आपले लोककार्य पुढे चालू ठेवायचेच हा माझा निश्चय आहे,” अशी पोस्ट सतीश चव्हाण यांनी केली आहे. “पराजयाने खचायचं नाही आणि विजयाने मातायचं नाही, पुन्हा नव्या दमाने उभं राहायचं,” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले.
‘मुख्यमंत्री बनवलं तरी भाजपात जाणार नाही’; नितेश कराळेंचं वक्तव्य
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी कायम ठेवणारे नितेश कराळे यांनी आपल्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट वक्तव्य केले आहे. उमेदवारीच्या संदर्भात कराळे यांनी शरद पवार आणि रोहित पवार यांची भेट घेतल्याची चर्चा होती. मात्र, पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. “शरद पवारांबद्दल मला आदर आहे. राजकारणात जे काही शिकलो, ते त्यांच्याकडूनच शिकलो. त्यांची भेट नक्की घेणार,” असेही नितेश कराळे यांनी स्पष्ट केले. भाजपाकडून भविष्यात ऑफर आल्यास ती स्वीकारणार का, या प्रश्नावर स्पष्ट बोलताना कराळे मास्तर यांनी, “मुख्यमंत्री बनवलं तरी भाजपामध्ये जाणार नाही आणि भविष्यात कधीही भाजपाची ऑफर स्वीकारणार नाही,” असे म्हटले. तसेच, आपण यापुढे कधीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार नाही, अशी ठाम भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
‘सतीश चव्हाण यांचं १८ वर्षांचं साम्राज्य संपवलं’; अब्दुल सत्तारांचा टोला
“प्रतापसिंह पाटील यांच्या विजयात माझा खारीचा वाटा आहे. सतीश चव्हाण किती घातक आहेत, हे आम्ही सांगितलं होतं. गेली १८ वर्षे आम्ही चव्हाण यांच्यासाठी मते मागितली. मात्र, या काळात त्यांचं रूप बदललं. त्यांच्या विरोधात मतदारांमध्ये नाराजी होती. आम्ही त्यांच्या विरोधात थेट उतरलो, लपूनछपून प्रचार केला नाही. त्यांचं १८ वर्षांचं साम्राज्य संपवलं,” असे विधान अब्दुल सत्तार यांनी माध्यमांशी बोलताना केले. “मतदानाच्या दिवशी अनेक मतदान केंद्रांना भेटी दिल्या, तेव्हा पत्रकारांनी माझी भूमिका बदलली का, असा प्रश्न विचारला होता. सतीश चव्हाण यांनी काहीच काम केलं नव्हतं. त्याचंच बक्षीस त्यांना मिळालं,” असा टोलाही सत्तार यांनी लगावला.
विधान परिषद पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे; आनंद परांजपे यांची भाजपावर टीका
विधान परिषद निवडणुकीत भाजपाने पुणे पदवीधर मतदारसंघात बाहेरचा उमेदवार दिल्याने पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आणि त्यांनीच उमेदवाराला नाकारले, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केला. भाजपाने पराभवाचे खापर शिवसेनेवर फोडणे चुकीचे असून, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावतीतील नेत्यांच्या भूमिकेमुळेही महायुतीला फटका बसल्याचे ते म्हणाले. तिन्ही पक्षांनी निकालाचे आत्मपरीक्षण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
Today’s Live News Updates, 29 October 2026
दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना अटक करा; अन्यथा मुंबईत मोर्चा काढू! खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! ‘पीएम किसान’चा २४ वा हप्ता दिवाळीपूर्वी जमा होणार; अनिवार्य असलेली e-KYC घरबसल्या कशी करायची? वाचा सविस्तर
दिवसा साठवलेली वीज संध्याकाळी धावली मदतीला; महावितरणचा देशात पहिलाच विक्रम!
शिंदे गटाच्या आंदोलनामुळे स्थानक परिसर, कोर्टनाका भागात प्रचंड वाहतूक कोंडी
पूर्णेकर हत्याप्रकरणी ठाकरे गटाच्या बंड्या साळवींचा नरेश म्हस्केंना इशारा, तर भाजपची समज
‘महायुतीतील अनेक नेते आमच्या बाजूने; लपूनछपून राष्ट्रवादीला मदत’, रोहिणी खडसे यांचा दावा
८६ कोटींची देयके थकली! कंत्राटदारांचे मुख्यमंत्र्यांना फोन करो आंदोलन
डोंबिवली माणकोली पुलावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या दोन जणांवर गुन्हा
मध्य रेल्वे मार्गावरील रिकामी धावणारी ‘वर्कमन स्पेशल’ लोकल प्रवाशांसाठी खुली करा; खासदार नरेश म्हस्के यांची मागणी
दुष्काळाचा महिलांना दुहेरी फटका! पाण्यासाठीची धावपळ आरोग्यासाठी घातक
मोठी बातमी: मीनाक्षी शिंदे यांचा पक्षपदाचा राजीनामा, सरनाईकांच्या सूचनेनंतर २४ तासांच्या आत जिल्हाप्रमुखपदावरुन पायउतार
ऐकू कमी येतेय? जाणून घ्या ‘कॉक्लिअर इम्प्लांट’बद्दल; विनामूल्य शस्त्रक्रियेची सुविधा…
दिवाळीमध्ये खाद्यतेलात भेसळीचा संशय! तब्बल ३,६०० किलो तेल साठा जप्त, तुकाराम मुंढेंनी…
कराळे रिंगणात का उतरले?
मुंबई पालिका स्थायी समितीत बहुमताअभावी अध्यक्षांची कसरत; रुग्णालयांना आहार पुरवण्याबाबतचे दोन प्रस्ताव मंजूर करताना अध्यक्षांचे मतदान
सवलतींसाठी एसटी प्रवाशांना एनसीएमसी कार्ड बंधनकारक; नोव्हेंबरअखेर नोंदणीचे आवाहन
बाल लैंगिक अत्याचार प्रकरणात कठोर निकाल! आरोपीला मरेपर्यंत जन्मठेप
चार आमदार, एकच मामा’; सोलापूर ते मराठवाडा राजन पाटलांच्या राजकीय साम्राज्याची चर्चा
मुंबईत अमली पदार्थविरोधी कारवाईत चार जणांना अटक; २.५२ कोटींचे अमली पदार्थ जप्त
शरद पवारांचा एक कॉल…फिरला निकाल !
मतदार ओळखपत्र दुरुस्तीच्या नावाखाली ज्येष्ठ दाम्पत्याला ६.४८ लाखांचा गंडा; निवडणूक अधिकारी असल्याचे सांगून फसवणूक
ज्या मतांकडे कोहळेंनी दुर्लक्ष केले, त्याच मतांनी वंजारींना तारले !
संघाला गृहीत धरणे भाजपला भोवले!
सातारचं माहेर, पुण्याचं सासर अन ब्रिटनची डिग्री ! हर्षदा देशमुख जाधव ठरल्या पहिल्या महिला पदवीधर आमदार
विरार मध्ये खळबळबंद; फ्लॅटमध्ये तीन भावंडांचे मृतदेह आढळले, विषप्राशनातून आत्महत्येचा संशय
चार महिन्यांचे काम दीड वर्षानंतर ही पूर्ण होईना ! विरोधी पक्ष नेत्यांनी केली ही मागणी..
महिलेवर बलात्कार करून तिच्या तीन वर्षाच्या चिमुरड्याची हत्या करणाऱ्या संजू सरकारची फाशी रद्द, 'दुर्मिळातील दुर्मिळ’ प्रकरण नसल्याचा न्यायालयाचा निर्वाळा
मिरा भाईंदरच्या 'सूर्या' पाणीपुरवठ्यातील आणखी एक अडथळा दूर, स्थानिकांच्या विरोधानंतरही वीज मनोरे उभारण्यास सुरुवात
खारघर-तळोजासाठी सिडकोचे पाणी नियोजन, टँकरद्वारे पाणीपुरवठ्यावर डॅशबोर्डमधून नियंत्रण; १४ टँकरच्या दिवसाला १४० फेऱ्या

