मुंबईमध्ये सोमवारी दुपारी आलेल्या जोरदार वादळामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने अवघ्या मुंबईकरांची दाणादाण उडाली आहे. दुपारी तीन वाजल्यापासून मुंबईमध्ये धुळीचे वादळ आणि मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाला. याच दरम्यान घाटकोपरमध्ये दुर्घटना घडली. घाटकोपरमध्ये एक भलेमोठे होर्डिंग कोसळले. या दुर्घटनेमध्ये ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच ५९ जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळांची पाहणी करत चौकशीचे निर्देश दिले आहेत. घाटकोपरमध्ये पडलेल्या या होर्डिंगखाली जवळपास ८० हून अधिक गाड्या आणि १०० पेक्षा अधिकजण अडकल्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, घटना घडल्यानंतर स्थानिक नागरिकांनी मदत करत अनेक जणांना वाचवले. तसेच जखमींना रुग्णालयात दाखल केले. ही घटना घडली त्यावेळी नेमकं काय घडलं? याबाबत एका प्रत्यक्षदर्शीने या घटनेचा थरारक अनुभव सांगितला आहे.

more sections impose on mihir shah under motor vehicle act
वरळी अपघातातील मोटर वाहन कायद्याअंतर्गत कलमांमध्ये वाढ
21 year old man drowned in a virar lake
विरारमध्ये  २१ वर्षीय तरुण  तलावात बुडाला
Gang, robbers, Kharghar,
खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय
Rahul Gandhi Comments On Udaipur Tailor Killing Incident
“ती लहान मुलं..”, म्हणत राहुल गांधींचे कन्हैय्या लालची भरदिवसा हत्या करणाऱ्यांना समर्थन? खऱ्या Video तील वाक्य ऐका
case has been registered in the death of two children due to suffocation in a motor vehicle
मुंबई : मोटरगाडीमध्ये गुदमरून दोन बालकांच्या मृत्यूप्रकरणी गुन्हा दाखल
Gujarat police
गुजरातमध्ये पोलीस ठाण्यात केक कापून भाजपा नेत्याचा वाढदिवस साजरा? काँग्रेसने शेअर केलेल्या VIDEO मध्ये नेमकं काय दिसतंय?
mumbai, Leakage in New MHADA Homes in Vikhroli, Leakage in new mhada houses in vikhroli, New MHADA Homes in Vikhroli, Winners Demand Immediate Repairs and Accountability, vikhroli news, mumbai news,
म्हाडाच्या विक्रोळीतील नव्या कोऱ्या घरांमध्ये गळती, बांधकामावर प्रश्नचिन्ह
Woman, murder, Virar,
विवाहबाह्य संबंधांतून विरारमध्ये महिलेची हत्या, प्रियकरावर गुन्हा दाखल

हेही वाचा : घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळल्याची घटना : ८ जणांचा मृत्यू, ५९ जण जखमी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून चौकशीचे निर्देश

प्रत्यक्षदर्शी व्यक्ती काय म्हणाला?

“घाटकोपरमध्ये होर्डिंग पडल्याची घटना घडली, तेव्हा मी त्या ठिकाणी होतो. पाऊस येत असल्यामुळे आम्ही त्या ठिकाणी बाजूला थांबलो होतो. याचवेळी मोठे वादळ आले आणि साईटला एका बिल्डराचे मोठे होर्डिंग होते ते खाली पडले. त्या होर्डिंगला जे काही सर्व लावलेले होते ते खाली पडले. होर्डिंगच्या खाली काही लोकं, कार, बाईकस्वार होते. ते त्या होर्डिंगखाली अडकले. आम्ही लोकांना बाहेर काढण्यात मदत केली आणि कसेतरी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या घटनेत जे नुकसान झाले त्याची मदत मिळायला हवी”, असे प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले.

दरम्यान, मुंबई, नवी मुंबई, कल्याण, ठाणे, डोंबिवली या भागांत मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे मुंबईकरांची तारांबळ उडाली. अचानक आलेल्या या पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे ऑफिसमधून घरी जाणाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. तसेच घाटकोपर या स्टेशनवर लोकांनी मोठी गर्दी केली होती.

मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मदत

घाटकोपरमध्ये होर्डिंग पडून मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना राज्य सरकारच्यावतीने पाच लाखांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना दिली. या घटनेसंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनीही माहिती देत या घटनेची उच्चस्तरिय चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगितले. तसेच याप्रकरणी दोषी असणाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असून मुंबई पोलिस,महापालिका, आपत्ती व्यवस्थापन असे विभाग समन्वय साधून असून, अडकलेल्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न युद्धस्तरावर सुरु असल्याची माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.