Maharashtra News Updates Today, 21 May : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्राह्मण महासंघाला दिलेलं बैठकीचं निमंत्रण आणि त्याला महासंघानं केलेला विरोध या पार्श्वभूमीवर राज्यात राजकारण तापलं आहे. तर दुसरीकडे अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची रविवारी पुण्यात सभा होणार असून त्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याची उत्सुकता ताणली गेली आहे. महाराष्ट्रात घडणाऱ्या अशा सर्वच महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा…
Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!
ईडीने राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेत विशेष न्यायालयाने पुराव्यांवरून मलिकांचे दाऊदसोबत संबंध असल्याचं प्रथमदर्शनी दिसत असल्याचं मत नोंदवलं. यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार प्रतिक्रिया उमटल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालयाच्या याच मताचा आधार घेत मलिक आणि राष्ट्रवादीवर हल्लाबोल केला. आता यावर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आलीय.
“नवाब मलिकांचे दाऊदसोबत संबंध”, न्यायालयाच्या निरिक्षणावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…https://t.co/Z8HAjPfYO3#SharadPawar #NawabMalik #DawoodIbrahim
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष म्हणून ब्राह्मण विरोधी वक्तव्याला पाठिंबा नाही. जाती-धर्माबाबत कोणीही काहीही विधाने करू नयेत, अशी समज पक्षातील नेत्यांना दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी शनिवारी (२१ मे) ब्राह्मण संघटनांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केले.
“ब्राह्मणविरोधी वक्तव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा नाही”, शरद पवार यांचे स्पष्टीकरणhttps://t.co/pqGe5hjh4J#SharadPawar #NCP #Pune
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रविवारी (२२ मे) होणाऱ्या सभेला पोलिसांनी अटी, शर्थींवर परवानगी दिली आहे. धार्मिक भावना दुखावणारी तसेच चिथावणीखोर वक्तव्ये सभेत करू नयेत, आदी विविध अटी पोलिसांनी घातल्या आहेत.
पुणे : राज ठाकरेंच्या सभेला ‘या’ अटींवर पोलिसांची परवानगीhttps://t.co/f1xcQGcKeg#RajThackeray #MNS #Pune
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात ब्राह्मण संघटनांसोबत बैठक केल्यानंतर पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. दवे नावाच्या व्यक्तीने मला फोन करून भेटीसाठी वेळ मागितली होती. यानंतर आपण या बैठकीचं आयोजन केल्याची माहिती शरद पवार यांनी दिली.
ब्राह्मण संघटनांसोबतच्या बैठकीनंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “दवे नावाच्या व्यक्तीने…”https://t.co/lLnrsYQQLX#SharadPawar #Pune #NCP @PawarSpeaks @NCPspeaks
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
राज्य सरकारने ओबीसी आरक्षणाची हत्या केल्याची टीका भाजपाने केली आहे. यासंदर्भात जालन्यातील मंठा शहरात नागरिकांशी बोलताना भाजपा आमदार बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली. त्यांनी आक्षेपार्ह भाषेत राज्य सरकारवर टीका केली. त्यांच्या विधानावर आता प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचं रुपांतर पुढे हाणामारीत आणि शेवटी गंभीर दुखापत करण्यापर्यंत गेल्याची अनेक प्रकरणं आपण पाहात असतो. असाच एक धक्कादायक प्रकार सांगलीत घडला असून त्यामध्ये मारहाण झालेल्या २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू ओढवला आहे. या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात तणावपूर्ण शांतता दिसून येत आहे. पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत असून तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही निशाणा साधला. “भारतामध्ये पूर्ण शांतता आहे. गेली अनेक वर्षे जी लांगुनचालणाची निती काँग्रेस पक्षाने आणली. त्यामुळे भारतात दुफळी निर्माण झाली आहे. ती दुफळी दूर करुन आपण सगळे एका भारत मातेचे पुत्र आहोत अशा प्रकारची भावना तयार करण्याचा प्रयत्न आहे,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. वाचा सविस्तर…
पुण्यातील ऐतिहासिक लाल महालात वैष्णवी पाटील या डान्सरने चित्रपटातील एका लावणीवर आधारीत रिल्सचं शुटिंग केलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर शिवप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर आता स्वतः डान्सर वैष्णवी पाटीलने सोशल मीडियावर एक व्हिडीओ जारी करत जाहीर माफी मागितली आहे.
VIDEO: लाल महालात लावणीच्या रिल्सवरून शिवप्रेमींचा संताप, अखेर वैष्णवी पाटीलचा जाहीर माफीनामा; म्हणाली, "माझ्याकडून…"https://t.co/qVOwx9yT09#VaishnaviPatil #LalMahal #Pune #ViralVideo
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
राज्यात शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये राजकीय कलगीतुरा रंगून राजकीय वातावरणाचा पारा चांगलाच चढला. असं असताना शिवसेना खासदार संजय राऊत आणि खासदार नवनीत राणा व आमदार रवी राणा यांचे लडाखमधील एकमेकांसोबत चर्चा करतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. त्यावर महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापवणारे स्वतऋ लडाखमध्ये सैर करत असल्याची टीका होतेय. याविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केलीय. त्या शनिवारी (२१ मे) मुंबईत बोलत होत्या.
“महाराष्ट्रात वातावरण तापवणारे लडाखमध्ये सैर करताय”, राऊत-राणांवरील टीकेवर किशोरी पेडणेकर म्हणाल्या…https://t.co/4U27I8Qf8F#KishoriPednekar #SanjayRaut #NaneetRana #Mumbai
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
लाल महालामध्ये लावणी नृत्य सादर करून त्याची ध्वनीचित्रफीत समाज माध्यमावर प्रसारित करून भावना दुखावल्याप्रकरणी मराठी कलाकार वैष्णवी पाटील हिच्यासह चौघांवर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथे क्लिक करुन जाणून घ्या सविस्तर वृत्त
आंदोलनाच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी लाकडे, मडके, फुले, कुंकू- अबीर, चटई अशी अंत्यसंस्काराच्या साहित्याची मांडणी केली होती. हे सर्व साहित्य एका गोणीमध्ये बांधून ते कुरियरद्वारे पंतप्रधान कार्यालयात पाठविण्यात आले.
चेन्नई सुपर किंग्स आणि राजस्थान रॉयल्स सामन्यादरम्यान कॉमेन्ट्री करताना गावस्करांनी केलेल्या वक्तव्यावरुन अनेकांनी टीका केलीय. येथे क्लिक करुन जाणून घ्या गावस्कर नेमकं काय म्हणाले.
लाल महालात लावणीचं चित्रीकरण झाल्याप्रकरणी आपला निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघानं जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. तसेच, ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे.
राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. निवडणूक अधिसूचना जाहीर झाल्यावरही अतिवृष्टी झाल्यास निवडणूक कार्यक्रमात बदल केला जाईल, अशी ग्वाही राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दिली आहे. यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी न्यायालयाच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. अमरावती येथे पत्रकार परिषदेत बोलताना याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…
आपला निषेध म्हणून अखिल भारतीय मराठा महासंघानं जिजाऊंच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पुष्पहार अर्पण केला. तसेच, ज्या ठिकाणी हे चित्रीकरण झालं, त्या भागात गोमूत्र शिंपडून त्याचं शुद्धीकरण केलं आहे.
तबला वादन शिकणाऱ्या एका १३ वर्षाच्या विद्यार्थ्याची सोन्याची साखळी लुबाडून रिक्षा चालकाने पळ काढल्याचा प्रकार डोंबिवली पश्चिमेतील बावन चाळ परिसरात घडली. विद्यार्थ्याने घरी आल्यावर घडला प्रकार वडिलांना सांगितला. वडिलांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून रिक्षा चालकाचा शोध सुरू केला आहे. येथे वाचा नेमकं घडलं काय.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर खाद्यतेल (गोड तेल) घेऊन जाणारा टँकरचा तवा व सोमटा या पालघर तालुक्यातील गावाजवळ अपघात झाला आहे. अपघातानंतर टँकरमधून तेल गळती सुरू झाल्यानंतर तेल गोळा करुन घेऊन जाण्यासाठी गावकऱ्यांच्या झुंबड उडाली आहे. येथे वाचा विस्तर वृत्त
राज्यातील वाढता जातीय तेढ आणि ब्राह्मणविरोध असा आरोप होत असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत आज म्हणजेच शनिवारी, २१ मे रोजी ब्राह्मण संघटनांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. दरम्यान, या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार देण्यासंदर्भात भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी काही कारणं असल्याचं म्हटलंय. येथे क्लिक करुन जाणून घ्या या बैठकीला न जाण्याची कोणती कारण भारतीय ब्राह्मण महासंघाने सांगितलीयत.
देशातील सर्वात जुना पक्ष असणाऱ्या काँग्रेसला पुन्हा एकदा गळती लागल्याचं चित्र दिसत आहे गुजरातमधील हार्दिक पटेल आणि पंजाबमधील सुनील जाखड ही दोन नावं काँग्रेस सोडून जाणाऱ्या प्रमुख नेत्यांच्या यादीत नव्याने शामील झालीय. असं असतानाच आता शिवसेनेनं काँग्रेसला लागलेल्या या गळतीसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे. शिवसेनेनं काँग्रेसला लागलेल्या गळतीबद्दल हे भोक कसं शिवणार हा काँग्रेस नेतृत्वाला पडलेला प्रश्न असल्याचं म्हटलंय. येथे वाचा सविस्तर वृत्त
भीषण उष्णतेच्या समस्येला तोंड देणाऱ्या बिहारमध्ये शुक्रवारी अचानक मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. वादळी वारे, मेघगर्जनेसहीत बिहारमधील अनेक भागांमध्ये पाऊस पडला. काही तासांच्या या पावसामुळे मोठं नुकसान झालं असून वीज पडल्याने तसेच वादळी पावसाच्या तडाख्याने १६ जिल्ह्यांमध्ये ३३ जणांचा मृत्यू झालाय. यासंदर्भात पंतप्रधान मोदींनीही खेद व्यक्त केलाय. येथे क्लिक करुन वाचा मोदी नेमकं काय म्हणालेत…
विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होतंय, निरिक्षण नोंदवलं आहे.
पुण्यातील लाल महाल हा सध्या उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे काही काळ पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे असंख्य पर्यटक आणि शिवप्रेमी लाल महालात जाऊ शकत नसताना दुसरीकडे याच लाल महालामध्ये एका चित्रपटातील तमाशाच्या गाण्यावर रील्सचं शूटिंग झाल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी उजेडात आला आहे. यासंदर्भात जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.
लाल महालातील तमाशाच्या शूटिंगवर आव्हाडांचं संतप्त ट्वीट!https://t.co/5lGK7n2z3Y@NCPspeaks #jitendraawhad
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
“उद्धव ठाकरेंपासून सगळं मंत्रिमंडळ नवाब मलिकांसाठी मैदानात आलं होतं. आता न्यायालय सांगतंय की नवाब मलिक म्हणजे दाऊद. आता उद्धव ठाकरे साहेब, या रस्त्यावर शरद पवारांसोबत आणि न्यायालयाविरुद्ध परत काढा मोर्चा. नाहीतरी तुमचे प्रवक्ते रोज न्यायालयाविरोधात बोलतात. उद्धव ठाकरेंनी जर सुरुवात केली की न्यायालय देखील पाकिस्तानचे आहेत, न्यायाधीशही मोदींचे आहेत तर आश्चर्य नाही वाटणार” , असं म्हणत किरीट सोमय्यांनी निशाणा साधला आहे.
किरीट सोमय्या म्हणतात, "उद्धव ठाकरे, तुमचे दाऊदशी काय संबंध आहेत?" https://t.co/jeSPPQGiQH@OfficeofUT @KiritSomaiya @PawarSpeaks
— LoksattaLive (@LoksattaLive) May 21, 2022
महाराष्ट्रातील सर्व प्रमुख घडामोडी एका क्लिकवर!
महाराष्ट्रात सातत्याने घडणाऱ्या राजकीय घडामोडी आणि त्यातून बदलणारी राजकीय समीकरणं यांचे सर्व अपडेट्स!