Maharashtra News Updates Today, 22 May : बारामतीच्या मंडळींनी आजवर सगळीकडचे पाणी पळवले. तरीही पुन्हा उजनीच्या पाण्यात ते वाटेकरी होत आहेत. या मंडळींना कितीही पाणी दिले तरी त्यांची तहान भागत नाही. सगळेच आम्हाला आणि आमच्याच ताटात पाहिजे आहे, अशी त्यांची जी वृत्ती आहे. ती उर्वरित महाराष्ट्राने कायम लक्षात ठेवावी आणि त्यांना त्यांची जागा दाखवून द्यावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचे नाव न घेता विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी येथे टीका केली.

तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ब्राह्मण संघटनांमध्ये बैठक होणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पवारांवर निशाणा साधला होता. “पवारांना इतक्या वर्षांनी ब्राह्मणांची आठवण आली याचा आनंद आहे,” असं म्हणत फडणवीसांनी टीका केली होती. यावर शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. “मला अशी कुठलीही आठवण आलेली नाही,” असं मत पवारांनी व्यक्त केलं.

अशा अनेक महत्वाच्या घडामोडी राज्य, देश, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्ही आता एकाच ठिकाणी वाचू शकता.

Live Updates

Maharashtra Latest News Updates : राज्यासह देश आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रत्येक अपडेट!

20:27 (IST) 22 May 2022
“शरद पवारांना औरंगजेब सुफी संत वाटतो”, राज ठाकरेंच्या टीकेवर जितेंद्र आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले “तुमच्या डोक्यात…”

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी (२२ मे) पुण्यातील सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब सुफी संत वाटतो असा आरोप केला. यावर आता राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिलीय.

20:26 (IST) 22 May 2022
बल्लारपूर पेपरमिलच्या कळमना बांबू डेपोला भीषण आग, संपूर्ण डेपो जाळून खाक, कोट्यावधींचे नुकसान

चंद्रपूर: कोठारी मार्गावरील कळमना येथील बल्लारपूर पेपर मिलच्या बांबू डेपोला रविवारी (२२ मे) दुपारी २ वाजताचे सुमारास भीषण आग लागली. या आगीत डेपात ठेवण्यात आलेला कोट्यावधी रुपयांचे बांबू व निलगिरीचे लाकूड जळून खाक झाल्याचा प्रकार घडला.

20:25 (IST) 22 May 2022
सोलापूरमध्ये लग्नावरून परत येताना भीषण अपघात, डॉक्टर दाम्पत्यासह सहा जणांचा जागीच मृत्यू

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर-मोहोळ रस्त्यावर दोन मोटारींची समोरासमोर जोराची धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात डॉक्टर दाम्पत्य व त्यांच्या मुलासह सहाजणांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर सहाजण जखमी झाले आहेत. रविवारी (२२ मे) दुपारी चारच्या सुमारास मोहोळजवळ पेनूर येथे हा अपघात झाला.

18:07 (IST) 22 May 2022
टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

क्रिकेट चाहत्यांना आगामी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची टी-२० मालिका आणि इंग्लंडसोबतच्या कसोटी मालिकेचे वेध लागले आहेत. दरम्यान, आज राष्ट्रीय निवड समितीने या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची निवड केली आहे. या समितीने दक्षिण आफ्रिकेसोबतच्या टी-२० मालिकेसाठी १७ सदस्यीय घोषणा केली आहे. तर इंग्लंडविरोधातील पुनर्निर्धारित कसोटी सामन्यासाठी १७ सदस्यीय संघ घोषित केला आहे. वाचा सविस्तर

17:25 (IST) 22 May 2022
लडाख दौऱ्यावरुन टीका केल्यानंतर राज ठाकरेंना राऊतांचे प्रत्युत्तर

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा पठण करण्याचा इशारा दिल्यानंतर मुंबईत मोठा गदारोळ झाला होता. यामुळे राणा दाम्पत्याला जेलवारी सुद्धा करावी लागली. मात्र, महाराष्ट्रातील राजकीय वातावरण तापवणारे हेच दाम्पत्य शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह लेह-लडाख दौऱ्यावर होते. यावेळी संजय राऊत आणि राणा दाम्पत्य एकमेकांसोबत गप्पा मारतानाही दिसून आलं. वाचा सविस्तर…

15:08 (IST) 22 May 2022
ऋषभ पंतने दुसऱ्यांवर फोडलं अपयशाचं खापर

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना चांगलाच रोमहर्षक ठरला. या सामन्यात कर्णधार ऋषभ पंतच्या एका चुकीच्या निर्णयामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पंतने योग्य वेळी डीआरएस घेतला असता तर मुंबईचा फलंदाज टीम डेव्हिड बाद झाला असता. परिणामी दिल्लीला विजयापर्यंत पोहोचता आले असते, अस दिल्लीचे चाहते म्हणत आहेत. वाचा सविस्तर

13:49 (IST) 22 May 2022
गुजरातमधून बाहेर काढलेल्या परप्रांतीयांबाबत कोण माफी मागणार?; अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर राज ठाकरेंचा सवाल

मुंबई, ठाणे, औरंगाबादनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची तोफ आज पुण्यात धडाडत आहे. पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच सभागृहात आज सकाळी पार पडली. पुण्यात होणाऱ्या या सभेआधी राज ठाकरे यांनी पूर्वनियोजित अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केला होता. या दौऱ्याला भाजप खासदार बृजभूषण सिंह यांनी विरोध केला होता. यानंतर राज ठाकरे यांनी दौरा रद्द केल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. वाचा सविस्तर…

13:44 (IST) 22 May 2022
पुन्हा मृताच्या नावे लाटला मोबदला, कुशिवली धरणाच्या भुसंपादनात पुन्हा एकदा घोटाळा

अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे सुरू असलेल्या लघु पाटबंधारे विभागाच्या धरणप्रकल्पासाठी भुसंपादन प्रक्रिया सुरू असून या भुसंपादन प्रक्रियेत मृत व्यक्तींच्या नावानेही मोबदला लाटण्याचे प्रकार समोर आले आहेत. महिनाभरात दुसऱ्यांना मृत व्यक्तीच्या नावे बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची आणि मुळ मालकांची फसवणूक करत तब्बल १६ लाख ५९ हजारांची नुकसान भरपाईची रक्कम लाटल्याचे समोर आले आहे. यावेळी दोन हयात असलेल्या व्यक्तींच्याही नावे मोबदला लाटलण्यात आला आहे. याप्रकरणी महिनाभरात दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी ४७ लाखांचा मोबदला लाटण्यात आला होता.

सविस्तर बातमी…

13:42 (IST) 22 May 2022
“शिवसेनेला एवढी देखील अक्कल नाहीये की…”; शरद पवारांचा उल्लेख करत राज ठाकरेंची टीका

शिवसेनाप्रमुख हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाऱ्या छायाचित्रांचे प्रदर्शन मुंबई विद्यापीठातील दीक्षान्त सभागृहात भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भेट दिली. यावेळी शरद पवार यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि त्यांच्या जुन्या आठवणी सांगितल्या. यावेळी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांच्यासह अनेक शिवसेना नेते यावेळी उपस्थित होते. याबाबत पुण्यातील सभेत बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. वाचा सविस्तर…

13:18 (IST) 22 May 2022
राज ठाकरेंवर १ जून रोजी होणार शस्त्रक्रिया, पुण्यात सभेत बोलताना दिली माहिती

१ जून रोजी आपल्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती राज ठाकरेंनी स्टेजवरून बोलतानाच जाहीरपणे दिली. “येत्या १ तारखेला माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे इथे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही. म्हटलं आपणच सांगितलेलं बरं”, असं म्हणत राज ठाकरेंनी मिश्किल टिप्पणी करताच सभागृहात हशा पिकला.

13:17 (IST) 22 May 2022
एमआयएमला शिवसेनेनंच वाढवलं – राज ठाकरेंचा गंभीर आरोप

आज गणेश कला क्रीडा मंच येथे सभेत बोलताना राज ठाकरेंनी वेगवेगळ्या मुद्द्यांवर भूमिका मांडली. अयोध्या दौरा स्थगित केल्याबद्दल सुरू असलेल्या चर्चेला राज ठाकरेंनी यावेळी स्पष्टीकरण दिलं. मात्र, त्याचवेळी काही दिवसांपासून सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीच्या मुद्द्यावरून देखील त्यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि विशेषत: शिवसेनेवर निशाणा साधला.

11:25 (IST) 22 May 2022
दाऊद तुमच्यासमोर मच्छर आहे, त्याला पकडून घेऊन या – संजय राऊत

विशेष न्यायालयाने शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्याविरोधात दाखल केलेल्या आरोपपत्राची दखल घेतली. प्रथमदर्शनी मलिक हे प्रत्यक्षात सर्व माहिती असतानाही गोवावाला कंपाउंडसंदर्भातील आर्थिक गैरव्यवहारामध्ये (मनी लॉण्ड्रींग) सहभागी होते असं दिसत असल्याचे पुराव्यांवरुन स्पष्ट होतं, असे निरिक्षण नोंदवलं आहे. याबाबत शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर…

09:39 (IST) 22 May 2022
राणा दाम्पत्याला पुन्हा नोटीस; खारमधील सदनिकेत अनधिकृत बांधकाम

आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांना पालिकेच्या विभाग कार्यालयाने पुन्हा एकदा नोटीस पाठवली आहे. खार येथील निवासस्थानात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी राणा दाम्पत्याने दिलेले स्पष्टीकरण मुंबई पालिकेने अमान्य केले आहे. त्यानुसार राणा यांना सात दिवसांची नोटीस  दिली आहे. वाचा सविस्तर…

अनेक महत्वाच्या घडामोडी राज्यात, देशात, आंतरराष्ट्रीय स्तरावर तसंच इतर क्षेत्रात घडत आहेत. या सर्व घडामोडी तुम्हाला आता एकाच ठिकाणी वाचू शकता.