Top Marathi News Updates: राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईसह संपूर्ण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. सततच्या पावसामुळे नदी, नाले आणि धरणे ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याने प्रशासनाने नागरिकांना अतिमहत्त्वाच्या कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळण्याचे आवाहन केले आहे.
मंत्रालयाच्या उपहारगृहाची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश उच्च न्यायालयानं FDA ला दिले आहेत. या कारवाईत मंत्रालयाच्या उपहारगृहात माश्या आढळल्या असून त्यानंतर परवाना रद्द करण्याचे FDA ला उच्च न्यायालयाचे आदेश आहेत. वाचा राज्यातील ताज्या घडामोडी
दरम्यान, या मुसळधार पावसात भिवंडीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून तेथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ५ ते ६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे; सध्या तेथे वेगाने बचावकार्य सुरू आहे.
दुसरीकडे, नागपुरातून एक सुन्न करणारी बातमी समोर आली आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या निवड प्रक्रियेतून वगळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून प्रचंड मानसिक तणावाखाली असलेल्या एका १७ वर्षीय महिला क्रिकेटपटूने आपले आयुष्य संपवले आहे.
राजकीय घडामोडींबद्दल बोलायचे तर, खासदार संजय राऊत यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर बोचरी टीका करत त्यांना “विज्ञान आणि संशोधनाचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा” असा टोला लगावला आहे. तसेच, केंद्रीय पातळीवर राज्यसभेत ‘सार्वजनिक परीक्षा (अधिनियम) दुरुस्ती विधेयक’ मंजूर करण्यात आले आहे. या सर्व बातम्यांसह राज्यातील पाऊस आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Maharashtra Mumbai Breaking News Live, 31 July 2026 | महाराष्ट्र बातम्या लाईव्ह | मुंबई महाराष्ट्र रेन अपडेट्स
दारू पाजली अन् दोरीने… प्रियकरासोबत मिळून पत्नीने काढला पतीचा काटा; चौकशीत धक्कादायक कारण समोर
अकोला, वाशीममध्ये अतिवृष्टी! नदी-नाल्यांना पूर, रस्ते-पूल वाहून गेल्याने वाहतूक ठप्प
मध्यरात्री थरार! यवतमाळमध्ये कार वाहून गेल्याने आई आणि दोन मुलींचा मृत्यू; पावसाने जिल्ह्यात हाहाकार
जिल्ह्यातील १६ पैकी १५ तालुक्यांमध्ये अतिवृष्टी! माहूर मध्ये १८८ मिमी विष्णुपुरी प्रकल्पाच्या साठ्यात ८.३३ टक्क्यांची भर
पोलीस आधुनिकीकरणासाठी केंद्राचा निधी अर्ध्यावरच; तीन वर्षांत १,३२४ कोटींची तरतूद, प्रत्यक्ष मिळाले फक्त ७८० कोटी!
कोयना धरणाचे सहाही दरवाजे आता दोन फुटांपर्यंत उचलणार ; विसर्ग थेट ११,६८० क्युसेकवर; आणखी विसर्ग वाढण्याच्या दाट शक्यतेने नदीकाठच्या गावांना अतिसतर्कतेचा इशारा
मनोरी निःक्षारीकरण प्रकल्पातील पिण्याचे पाणी मुख्य पाणीपुरवठा व्यवस्थेत; खाऱ्या पाण्यापासून मिळवलेले गोडे पाणी आरोग्यासाठी चांगले आहे का?
पाटण तालुक्याच्या डोंगरी व दुर्गम भागात लागणीपूर्वीच गव्यांनी फस्त केले भात- नाचणीचे तरू
भिवंडीत इमारत कोसळून नऊ जण ठार, मृतांतील एकाची ओळख पटली
कराड तालुक्यात समाधानकारक पावसाने खरिपाच्या ९२ टक्क्यांवर; पेरण्या पूर्ण भुईमुगाचे क्षेत्र उद्दिष्टाच्या ११०.६ टक्के
भिवंडीतील कोहिनूर इमारतीला सहा वर्षांत तीन नोटिसा; दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर
Buldhana Heavy Rain : आभाळ कोसळले! बुलढाणा जिल्ह्यात अतिवृष्टीचे थैमान; नदी-नाल्यांना पूर, भिंत कोसळून महिला ठार
मुंबई पालिकेतील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्या
विरार-अलिबाग मार्गिका भूसंपादनाला वेग; ऑगस्ट अखेरपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन
विस्तारित एमआयडीसीच्या क्षेत्रात लवकरच वाढ; तीन गावांतील भूसंपादन प्रक्रियेला प्रारंभ
देशी गोवंश संवर्धनाचा 'इंदोली पॅटर्न'; बेंदरानिमित्त पशुपालकांचा सत्कार
अजित दादांच्या पावलावर सुनेत्रा पवारांचे पाऊल रात्रीपर्यंत बैठका, सकाळी रुग्णालयात
भारत बनतोय बालस्थूलतेचे केंद्र! ४.१ कोटी मुले जादा वजनाच्या विळख्यात; महाराष्ट्रातील चित्रही गंभीर
म्हाडाच्या मुंबईतील दोन मोठ्या पुनर्विकास प्रकल्पांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका; १३ ऑगस्टपर्यंत कार्यादेश जारी न करण्याचे निर्देश
भिवंडीत दुर्दैवी घटना, चार मजली इमारत कोसळली
भिवंडीत एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून तेथे एक चार मजली इमारत कोसळली आहे. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला असून अजूनही ५ ते ६ जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे; सध्या तेथे वेगाने बचावकार्य सुरू आहे.
राज्यात मुसळधार पावसाचा हाहाकार
राज्यात सध्या मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. मुंबईसह संपूर्ण परिसरात गेल्या दोन दिवसांपासून पावसाचे धुमशान सुरू असून भारतीय हवामान विभागाने (IMD) अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे.
संजय राऊतांची चंद्रकांत पाटलांवर टीका
"चंद्रकांत पाटलांना विज्ञान-संशोधनाचा नोबेल पुरस्कार मिळायला हवा", संजय राऊतांची टीका

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
