Maharashtra Exit Poll Results 2026 Updates : मुंबईसह राज्यातील २९ महानगरपालिकांतील २ हजार ९६९ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. १५ हजार ९३१ उमेदवारांचे आज भवितव्य मतपेटीत बंद झाले. मुंबईमध्ये एक सदस्यीय प्रभाग असल्याने मुंबईकरांनी एकच मत दिले, तर उर्वरित २८ महापालिकांमध्ये बहुदस्यीय प्रभाग पद्धत असल्याने तेथे मतदारांना चार मते द्यावी लागली.

ोल्बृसहन्मुंबईतीपपात्र मतदार आहेत. यामध्ये ५५,१६,७०७ पुरुष, ४८,२६,५०९ आणि १,०७७ तृतीयपंथी मतदार आहेत.

तसंच, राज्यभरात मतदार केंद्र शोधण्यासाठी मतदारांना पायपीट करावी लागली. अनेक मतदारांचे मतदार केंद्र बदलले असल्यामुळे त्यांना आयत्यावेळी शोधाशोध करावी लागली. परिणामी मतदानाची वेळ उलटून गेल्यानंतरही अनेकजण रांगेतच उभे होते.

Live Updates

Maharashtra Mahanagar Palika Voting 2026 Live Updates : राज्यात महापालिकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सर्व घडामोडी जाणून घेऊयात.

19:41 (IST) 15 Jan 2026

Nagpur Corporation Election 2026 : वंचितचे पदाधिकारी एकत्र, घोषणाबाजी; मतदान संपल्यानंतर महिलेला आत सोडले

Nagpur Municipal Corporation Voting Live Updates : नागपूर शहरातील प्रभाग नंबर ३५ मध्ये सक्सेस पॉईंट स्कुल समोर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी एकत्र जमले असून घोषणाबाजी सुरु आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी साडेपाच नंतर सर्व मतदान प्रतिनिधींनी बाहेर काढण्यात आले. मात्र त्यावेळी एक महिला आतमध्ये गेल्याने राजकीय (वंचित)पक्षांकडून आक्षेप घेण्यात आला आहे. ती महिला (भाजप) राजकीय पक्षाशी संबंधित असून तिला आत का सोडलं, बोगस मतदान करायचे होते का असा सवाल वंचितने विचारला आहे. मतदान केंद्राबाहेर मोठ्या संख्येने लोकांची गर्दी आहे. वंचितने घोषणाबाजी करत महिलेवर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे पोलिस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

19:19 (IST) 15 Jan 2026

Bmc Election 2026 live: अ‍ॅक्सिस माय इंडिया - आज तकचा कौल महायुतीला

अ‍ॅक्सिस माय इंडिया – आज तक यांच्या एक्झिट पोलनुसार मुंबई मनपाची सत्ता महायुतीकडे जाताना दिसत आहे.

एकूण वॉर्ड: २२७

भाजप+शिवसेना: १३१–१५१

यूबीटी+राज ठाकरे: ५८–६८

काँग्रेस+वंचित: १२–१६

इतर: ६–१२

19:19 (IST) 15 Jan 2026

Pune Exit Poll 2026 Result Live: Prab Exit Poll नुसार पुण्यात भाजपाची सत्ता येण्याची शक्यता

पुण्यात महायुतीमधील तीनही पक्ष वेगवेगळे लढत असूनही भाजपाला मोठा लाभ होताना दिसत आहे. दोन्ही राष्ट्रवादींची युती होऊनही भाजपाने सत्ता राखल्याचे दिसून येत आहे.

भाजपा – ९१

दोन्ही राष्ट्रवादी – २३

19:19 (IST) 15 Jan 2026

Pimpri-Chanchwad Exit Poll 2026 Result Live: Prab Exit Poll नुसार पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपा गड राखण्याची शक्यता

पुण्याप्रमाणेच पिंपरी-चिंचवडमध्येही अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते. अजित पवारांनी भाजपावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले. महायुतीमधील पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले होते. मात्र एक्झिट पोलच्या अंदाजानुसार भाजपाने बाजी मारल्याचे दिसत आहे.

भाजप – ६४

शिवसेना – ९

राष्ट्रवादी – ५१

शरद पवार गट – २

काँग्रेस – १

मनसे – १

19:19 (IST) 15 Jan 2026

Maharashtra Exit Poll Results 2026

जेव्हीसी, एक्सिस माय इंडिया – आज तक, प्राब आणि जनमत यांचे कल समोर आले आहेत. ज्यामध्ये महायुती सहज सत्ता मिळवताना दिसत आहे. मुंबई मनपाच्या २२७ जागांमध्ये बहुमताचा आकडा ११४ आहे. त्यानुसार पोल्स ऑफ पोल्सची आकडेवारी खालीलप्रमाणे –

भाजपा – शिंदे सेना : १०७ ते १२२
ठाकरे बंधू – राष्ट्रवादी (शप) : ६८ ते ८३
काँग्रेस – वंचित : ११ ते २५
इतर : ८ ते १५

18:39 (IST) 15 Jan 2026

Voting Ink : पुण्यात लिक्विडने शाई पुसण्याचे प्रयत्न.. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून चोप

संबंधित मतदाराला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून आचारसंहिता पथकाकडे तक्रार करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक केंद्र अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. ...सविस्तर बातमी
18:21 (IST) 15 Jan 2026

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ संपली! अनेक भागांमध्ये मतदार अद्यापही रांगेत

महापालिका निवडणुकीच्या मतदानाची वेळ ही सायंकाळी ५.३० पर्यंत होती. मात्र अद्यापही राज्यातील अनेक भागांमध्ये नागरिक मतदानासाठी रांगेत उभे असल्याचे पाहायला मिळत आहे.

17:58 (IST) 15 Jan 2026

Akola Corporation Election 2026 : मतदान केंद्रावर गोंधळ; काँग्रेस उमेदवारावर हस्तक्षेपाचा आरोप

Akola Municipal Corporation Voting Live Updates : अकोला महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये इतर उमेदवारांनी काँग्रेसच्या उमेदवारावर गंभीर आरोप केले आहेत. मतदान केंद्रामध्ये बसून मतदारांना पंजावर मतदान करण्यास सांगत होत्या, असा आरोप इतर पक्षांच्या मतदारांनी केला. या प्रकाराला मतदान केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी हटकले नसल्याचेही ते म्हणाले.

17:37 (IST) 15 Jan 2026

Akola Corporation Election 2026 : उमेदवारांमध्ये बाचाबाची; काही काळ तणाव

Akola Municipal Corporation Voting Live Updates : अकोला महापालिकेच्या निवडणुकीमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे. संवेदनशील म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भांडपुरा येथील मतदान केंद्रावर दोन उमेदवारांमध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार दुपारच्या सुमारास घडला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. बंदोबस्तातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तत्काळ मध्यस्थी करून दोन्ही उमेदवारांची समजूत काढली. त्यामुळे प्रकरण निवळले.

17:36 (IST) 15 Jan 2026

मतदार यादीतील गोंधळाचा बिबवेवाडीत मतदानावर परिणाम; मतदानाचे प्रमाण घटले

PMC Election : बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सकाळी मतदार यादीतील गोंधळाचा फटका मतदानाला बसला. त्यामुळे मतदानाचे प्रमाण कमी झाले. बिबवेवाडीत दुपारी ३.३ वाजेपर्यंत सुमारे ३७ टक्के मतदान झाले आहे. त्यात प्रभाग क्रमांक २० शंकर महाराज मठ -बिबवेवाडी ४० टक्के, प्रभाग क्रमांक २१ मुकुंदनगर - सॅलसबरी पार्क ३५ टक्के आणि प्रभाग क्रमांक २६ घोरपडे पेठ-गुरूवार पेठ-समताभूमी ३५ टक्के मतदान झाले.

17:26 (IST) 15 Jan 2026

Aamir Khan Video : "हिंदीत का बोलू? हा महाराष्ट्र आहे", आमिर खानचा मराठीत उत्तर देण्याचा आग्रह

बॉलिवूड अभिनेता अमिर खान याचा एक व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेतच आला आहे. ...वाचा सविस्तर
17:20 (IST) 15 Jan 2026

Nagpur Corporation Election 2026 : मतदान प्रक्रिया स्पष्ट करताना कर्मचाऱ्यांची दमछाक

Nagpur Municipal Corporation Voting Live Updates : प्रभाग पद्धतीत प्रत्येक मतदाराला चार मते द्यायची आहेत. विधानसभा आणि लोकसभा निवडणूक केवळ एकदा बटन दाबले की मतदान प्रक्रिया पूर्ण होते. मात्र, प्रभाग पद्धतीत मतदानाची पद्धत अधिक किचकट असल्याने याचा त्रास मतदारांसह कर्मचाऱ्यांनाही होत आहे. मतदान केंद्रातील कर्मचारी मतदारांना समजवण्याचा प्रयत्न करतात, मात्र याच बराच वेळ जातो. वारंवार एकच गोष्ट सांगून कर्मचारीही कंटाळले आहेत. याचा फटका मतदान टक्क्यांवर होऊन अल्प मतदान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

17:19 (IST) 15 Jan 2026

Akola Corporation Election 2026 : अकोला महानगरपालिका अपडेट

Akola Municipal Corporation Voting Live Updates : सकाळी 3.30 वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी : 43.35%

17:18 (IST) 15 Jan 2026

नाशिकमध्ये दुपारी साडेतीनपर्यंत ३९.६४ टक्के मतदान

नाशिक महापालिकेच्या ३१ प्रभागात १२२ जागांसाठी सुरू असलेल्या मतदान प्रक्रियेत सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन या आठ तासांच्या कालावधीत ३९.६४ टक्के मतदान झाले. एकूण पाच लाख ३९ हजार ३४२ मतदारांनी मतदान केले. यामध्ये दोन लाख ८९ हजार ५९५ पुरूष तर दोन लाख ४९ हजार ७०९ महिला आणि ३९ तृतीय पंथीय मतदारांचा समावेश आहे.

17:08 (IST) 15 Jan 2026

Nagpur Corporation Election 2026 : नागपूर महानगरपालिका अपडेट

Nagpur Municipal Corporation Voting Live Updates : नागपूर : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४१.०९,% टक्के मतदान झाले.

17:05 (IST) 15 Jan 2026

मालेगावात दुपारी ३.३० वाजेपर्यंत ४६.१८ टक्के मतदान

मालेगाव : मालेगाव महापालिका निवडणुकीसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४६.१८ टक्के मतदान झाले आहे. सकाळी साडेसात वाजता मतदानास सुरुवात झाल्यानंतर पहिल्या दोन तासात म्हणजे साडेनऊ वाजेपर्यंत ८.९४ टक्के एवढे मतदान झाले होते. त्यानंतरच्या दोन तासात मतदानाचा वेग थोडासा वाढला. सकाळी साडेअकरा वाजेपर्यंत २० .९२ टक्के मतदान झाले. त्यानंतर दीड वाजेपर्यंत ३३.०५ व साडेतीन वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४६ वर गेली आहे. सर्वच पक्ष व उमेदवारांकडून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे शेवटच्या दोन तासांत आणखी किती मतदान होईल, याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. प्रभाग क्रमांक ९ एका मतदान केंद्रावर बोगस मतदान करण्याचा प्रयत्न जागृत नागरिकांनी उधळून लावला. हा प्रकार लक्षात येताच बोगस मतदान करण्याच्या प्रयत्नात असलेल्या व्यक्तीने मतदान न करता केंद्राच्या ठिकाणाहून धूम ठोकल्याचे स्थानिकांनी सांगितले. दरम्यान,मतदार याद्यांमधील घोळामुळे काही मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. एकाच कुटुंबातील काही सदस्यांची नावे एका प्रभागात तर काहींची नावे दुसऱ्या प्रभागात असल्याची अनेक कुटुंबांना प्रचिती आली. त्यामुळे मतदान करण्यासाठी त्यांच्यावर धावपळ करण्याची वेळ आली. या घोळामुळे अनेक मतदारांकडून रोष प्रकट करण्यात येत आहे.

16:53 (IST) 15 Jan 2026

Nagpur Corporation Election 2026 : डेमो ईव्हीएम मशीन लपवून ठेवल्या; गरबा मैदान नालंदा चौक येथे गोंधळ

Nagpur Municipal Corporation : प्रभाग क्रमांक २३ गरबा मैदान नालंदा चौक या ठिकाणी राजकीय पक्षांच्या पेंडॉलमध्ये डेमो ईव्हीएम मशीन लपवून ठेवले होते. हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे. नंतर कर्मचाऱ्यांनी डेमो मशीन जप्त केल्या. याासंदर्भात दोषींवर कारवाई झाली पाहिजे. याची रीतसर तक्रार प्रभाग क्रमांक २३ ड चे अपक्ष उमेदवार मुकेश मधुकर मेश्राम यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे.

16:49 (IST) 15 Jan 2026

Devendra Fadnavis : ‘मी तर म्हणतो ऑईल पेंट वापरावा…’ मुख्यमंत्री फडणवीसांचा खोचक टोला कुणाला?

Nagpur Municipal Election 2026 : निवडणूक शाईवरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलेल्या शंकेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "मी तर म्हणतो ऑईल पेंट वापरावा" असा टोला लगावत विरोधकांच्या आरोपांतील हवा काढून घेतली आहे. ...सविस्तर वाचा
16:44 (IST) 15 Jan 2026

BMC Election 2026 Voting : मतदान प्रक्रिया संपायला उरले काही मिनिटे, तरीही मुंबईकरांची मतदान केंद्र शोधण्यासाठी पायपीट

मुंबईतील अनेक मतदार अद्यापही मतदान केंद्र शोधण्याकरता पायपीट करत आहेत. त्यांना मतदान केंद्र सापडत नसल्याने गोंधळ उडाला आहे. मतदान प्रक्रिया साडेपाच वाजता संपणार आहे, त्यामुळे त्याआधी मुंबईत किती मतदान होतंय, हे पाहणं गरजेचं ठरणार आहे.

16:42 (IST) 15 Jan 2026

Jalgaon Corporation Voting 2026 : जळगावमध्ये दुपारी ०३.३० पर्यंत ३४.२७ टक्के मतदान

Jalgaon Corporation Voting Live Updates: जळगाव शहरातील महानगरपालिकेच्या निवडणुकीदरम्यान सकाळी ०७.३० ते दुपारी ०३.३० वाजे दरम्यान सरासरी ३४.२७ टक्के मतदान झाल्याची नोंद घेण्यात आली. एकूण एक लाख ५० हजार २९९ मतदारांनी आठ तासांत मतदानाचा हक्क बजावला, ज्यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ७९ हजार ७२७ आणि स्त्री मतदारांची संख्या ७० हजार ५७२ इतकी आहे.

16:42 (IST) 15 Jan 2026
Dhule corporation Voting 2026: धुळे : दुपारी ३.३० वाजेपर्यंत ३६.४९ टक्के मतदान

धुळे : धुळे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज (दि. १५) सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत आठ तासात एकूण ३६.४९ टक्के मतदानाची नोंद झाली. यावेळी पुरुष मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह तुलनेने अधिक दिसून आला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत एकूण ८० हजार ६७६ पुरुष मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. तर ७६ हजार ३३९ महिला मतदारांनी मतदान केले. याशिवाय इतर प्रवर्गातील २१ मतदारांनी मतदान केले आहे. आतापर्यंत एकूण एक लाख ५७ हजार ३६ मतदारांनी मतदान केलेअसून, सायंकाळपर्यंत मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सायंकाळी मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आल्यानंतर मतदारांचा प्रतिसाद स्पष्ट होणार आहे.

16:32 (IST) 15 Jan 2026

Amravati Corporation Election 2026 : अमरावती महापालिका अपडेट

Amravati Municipal Corporation : दुपारी ३.३० वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ४०.६२ टक्के

16:23 (IST) 15 Jan 2026

Maharashtra Corporation Election 2026 : "ही मतदारांचीच चूक, कारवाई करू", शाई पुसणे, मतदान केंद्रांवरील गोंधळांवरून निवडणूक आयोगाने मतदारांवरच फोडलं खापर!

Maharashtra Corporation Election 2026 : बोटावर लावण्यात आलेली शाई पुसली जात असल्याची तक्रार मतदारांकडून करण्यात येत आहे. यावरून राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. ...वाचा सविस्तर
16:23 (IST) 15 Jan 2026

पिंपरी-चिंचवडमध्ये आतापर्यंत ४०.०५ टक्के मतदान; मतदानासाठी अवघा एक तास

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत सकाळी साडेसात ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ४०.०५ टक्के मतदान झाले आहे. तीन लाख ७६ हजार ९६९ पुरुष, तीन लाख १७ हजार १९९ महिला आणि इतर दहा अशा सहा लाख ९४ हजार १७८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला आहे. आता मतदानासाठी अवघा एक तास बाकी आहे. साडेपाच वाजेपर्यंत मतदानाची वेळ आहे. साडेपाच पर्यंत जे उमेदवार मतदान रांगेत आहेत. त्यांना टोकण देऊन मतदान करण्याची संधी दिली जाणार आहे. रात्री आठ वाजेपर्यंत मतदान सुरू राहील, अशी शक्यता निवडणूक अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

16:22 (IST) 15 Jan 2026

पिंपरी- चिंचवड महानगरपालिका निवडणूक टक्केवारी- 40.05%

वेळ: 07:30 ते 03:30

16:12 (IST) 15 Jan 2026

Nagpur Corporation Election 2026 : तीन तास मतदान यंत्र बंद

Nagpur Municipal Corporation : प्रभाग ३ अंर्तगत येणाऱ्या राजीव गांधी नगर येथील फिरोज गांधी प्राथमिक शाळेतील खोली क्रमांक १ मध्ये सकाळच्या सुमारात १ तास मतदान यंत्र बंद होते.

त्यानंतर पुन्हा दुपारी १२ च्या सुमारास ईव्हीएम मशीन बंद पडले होते, अशी माहिती आतीक यांनी दिली. तर येथील रोशनजाहॉं अन्सारी यांना मतदानच करता आले नाही. मागील निवडणुकीत त्यांनी मतदान केले होते. परंतु यंदा यादीत नाव नसल्याचे सांगत केंद्र अधिकाऱ्यांनी मदतान करू दिले नाही, असे त्यांनी सांगितले.

16:08 (IST) 15 Jan 2026

Malegaon Election: मालेगावच्या पूर्व भागात 'धूम' तर पश्चिम भागात संथ गती; मतदारांच्या उत्साहात विसंगती !

भौगोलिक दृष्ट्या मालेगावची दोन गटात विभागणी झाली आहे. शहराच्या पूर्व भागात मुस्लिमबहुल वस्ती आहे. पश्चिम भागात हिंदूबहुल लोकसंख्येचे वास्तव्य आहे. ...सविस्तर वाचा
16:08 (IST) 15 Jan 2026

Nitin Gadkari : मतदार याद्यातील घोळावर केंद्रीय मंत्री गडकरीही संतापले, त्यांच्या कुटुंबालाही फटका...

Nagpur Election 2026 : नागपूर मतदार यादीतील गोंधळाचा फटका खुद्द केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनाही बसला असून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची नावे वेगवेगळ्या प्रभागात आल्याने त्यांनी निवडणूक आयोगाप्रती तीव्र संताप व्यक्त केला आहे. ...अधिक वाचा

shivshakti alliance opposes pad machines in mumbai civic election mumbai print news

निवडणूक आयोग सरकारला मदत करतेय! ‘पाडू’ यंत्र वापरू नका…; शिवसेना-मनसे-राष्ट्रवादीची निवडणूक आयोगाकडे मागणी (लोकसत्ता टिम)

Maharashtra Mahanagar Palika Voting 2026 Live Updates : राज्यात महापालिकांसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सर्व घडामोडी जाणून घेऊयात.