Maharashtra Nagarpalika Nagar Panchayat Election 2025 Voting Updates: अनेक वर्षं प्रलंबित, न्यायालयीन लढा, राजकीय टाळाटाळ, मतदारांची प्रतीक्षा आणि सरतेशेवटी सर्वोच्च न्यायालयाचा दणका या सर्व टप्प्यांमधून मार्ग काढत अखेर महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सुरुवात झाली आहे. जवळपास ९ वर्षांनंतर नगरपरिषद व नगरपंचायतीसाठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडत असून त्यातही आरक्षण व न्यायालयीन पेचामुळे काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलून २० डिसेंबरला घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाला घ्यावा लागला. उर्वरीत ठिकाणी आज मतदान होत आहे. या निवडणुकीत सर्वच पक्ष स्वतंत्र लढत असल्यामुळे या निवडणुकीत रंगत निर्माण झाली आहे. दुसरीकडे काही निवडणुका पुढे ढकलण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आलं असून त्यावर आज सुनावणी होणार आहे.
Maharashtra Municipal Councils Election Voting Live Updates, 02 December 2025: महाराष्ट्र नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक मतदान लाईव्ह अपडेट्स
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पूर्ण, आता २१ डिसेंबरला निकाल, कुठे किती टक्के मतदान झालं?
आज राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल आता थेट २१ डिसेंबरला रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये कोणता पक्षा बाजी मारतो? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे. तसेच राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये किती टक्के मतदान झालं? याची थोडक्यात माहिती जाणून घेऊयात.
४ वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, सातारा जिल्ह्यात ४९.१४ टक्के, छत्रपती संभाजीनगरमध्ये ५५.३७ टक्के, गडचिरोली जिल्ह्यात ५४.८१ टक्के, त्र्यंबकेश्वरमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान झालं, तर पुणे जिल्ह्यात ५१.०६ टक्के मतदान झालं. पुण्यातील जुन्नर ४७ टक्के, तळेगाव दाभाडे ३६ टक्के राजगुरूनगर ५३.४४ टक्के लोणावळा ५५ टक्के, चाकण ५७.६४, आळंदी ५९.३३ टक्के मतदान झालं आहे.
तसेच वर्धा जिल्ह्यात दुपारी ४४ टक्के मतदान झालं. यामध्ये हिंगणघाट ४५.६७ टक्के, वर्धा ४३.६३ टक्के, सिंदी रेल्वे ५१ टक्के, आर्वी ४५ टक्के, पुलगाव 38.19 टक्के मतदान झालं आहे. तसेच नंदुरबार जिल्ह्यामधील चार नगरपालिकेत ४६ टक्के मतदान झालं आहे.
एकल महिला, विधवा यांच्यासाठी जिल्हा परिषदेचा असाही पुढाकार…
विधवा पुनर्विवाहाचा कायदा अस्तित्वात आल्यानंतर आजही विधवांच्या पुनर्विवाहात अनेक अडथळे निर्माण होत असल्याची परिस्थिती लक्षात घेता विधवा पुनर्वसनाला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्हा परिषद, साऊ एकल महिला समिती आणि जगदंब फाउंडेशन यांच्या सहकार्याने एकल महिलांच्या पुनर्विवाहासाठी सर्वजातीय, मोफत वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पूर्ण, आता २१ डिसेंबरला निवडणुकीचा निकाल
आज राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी मतदान पार पडलं आहे. या निवडणुकीचा निकाल आता थेट २१ डिसेंबरला रोजी जाहीर होणार आहे. त्यामुळे आता नगरपरिषद आणि नगरपंचायतीमध्ये कोणता पक्षा बाजी मारतो? हे निवडणुकीच्या निकालानंतर स्पष्ट होणार आहे.
मतमोजणी लांबणीवर जाण्यामागे भाजपचा हात आहे का? चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्टच सांगितले, ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित…
निवडणूक आयोगाच्या घोळामुळे नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल आता लांबणीवर गेले आहेत. ज्या ठिकाणी निकाल प्रलंबित होते, फक्त त्या ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलायला पाहिजे होत्या. मात्र चुकीच्या पद्धतीने निवडणुका पुढे ढकलल्यामुळे आता सर्वच निकाल लांबले आहेत. यामुळे उमेदवारांचा भ्रमनिरास झाला असून सर्वच पक्षांच्या नेत्यांचा विरोध असल्याची टीका महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूरात माध्यमांशी बोलताना केली.
MNS : पनवेलमध्ये मतदार यादीत मोठा घोळ? एकाच व्यक्तीला २६५ मुलं दाखवले, मनसेच्या आरोपाने खळबळ
राजापूर नगर पालिकेसाठी ७४.५५ टक्के मतदान; आता लक्ष निकालाकडे
'उपमुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील बॅगा कपड्यांच्या होत्या, पैशांच्या नाहीत' - शिवसेना मुख्य प्रवक्ते आमदार दीपक केसरकर
बड्या नेत्यांनाच मतदान करता आले नाही ! भोकरशी नाते सांगणार्या चव्हाणांचे नाव नांदेडच्या यादीत
Raosaheb Danve : ‘नाशिकचा खरा पालकमंत्री मीच’ अजित पवारांच्या वक्तव्याला दानवेंचं प्रत्युत्तर; म्हणाले, “राज्याचे पालकमंत्री फक्त…”
Gadchiroli vote buying : एका मताला पाच हजाराचा दर? सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली चिंता, म्हणाले…
गेवराई मध्ये पंडित व पवार समर्थकांमध्ये दगडफेक, घटनास्थळी पोलीस अधीक्षकांनी दिली भेट
Pusad Municipal Election : युद्धात सर्वच माफ असतं… माजी आमदार नीलय नाईक असे का म्हणाले?
बुलढाणा : मतदानाच्या मध्यावर पाच पालिकांत उत्साही मतदान
महाड नगरपालिका निवडणूकीला गालबोट; मध्ये शिवसेना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यामध्ये हाणामारी….
खासदार प्रफुल पटेल म्हणतात,‘निवडणुका पुढे ढकलणे हे चुकीचं’ - गोंदियात पत्नीसह मतदान…
मुक्ताईनगरमधील मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ; शिंदे सेना अन् रक्षा खडसेंचे समर्थक आमने-सामने
मुक्ताईनगरमधील मतदान केंद्राबाहेर मोठा गोंधळ निर्माण झाल्याची माहिती समोर आली आहे. शिंदे सेना आणि भाजपाच्या रक्षा खडसे यांचे समर्थक आमने-सामने आले आहेत. बोगस मतदान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र, गोंधळ निर्माण होताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.
अहिल्यानगरमध्ये दुपारी साडेतीन पर्यंत ५०.२९ टक्के
अहिल्यानगर:जिल्ह्यातील ८ पालिकांसाठी दुपारी ३.३० पर्यंत ५०.२९ टक्के मतदान झाले. सकाळी मतदानाचा वेग कमी होता, दुपारनंतर तो वाढला. तीननंतर मतदान केंद्रांवर रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी दुपारी दीड वाजेपर्यंत ३५.५८ टक्के मतदान झाले होते.
श्रीरामपूर मध्ये ४३.७६, संगमनेर ५२.१६, राहुरी ५१.२८, राहाता ५७.४८, श्रीगोंदे ४८.४१, शेवगाव ५२.०१, जामखेड ५८.७९ व शिर्डी ४९.०७ असे एकूण आठ पालिकांसाठी दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ५०.२९ टक्के मतदान झाले. किरकोळ बाचाबाचीचे प्रसंग वगळता मतदान प्रक्रिया शांततेत सुरू होती
Vasai Court Land Dispute: न्यायालयाने घेतला उपविभागीय कार्यालयाचा ताबा
सावंतवाडी नगरपरिषद निवडणुकीत 'पैसे वाटप'वरून भाजप आणि शिंदे गटात राडा!
राजु-यात भाजप उमेदवाराच्या नातेवाईकांकडून पैसे वाटपाचे व्हीडीओ सार्वत्रिक
"बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडलं, पण...", रोहित पवारांनी शेअर केला व्हिडीओ; म्हणाले, "दिवसाढवळ्या..."
"आम्ही सातत्याने आयोगाला दुबार मतदारांबाबत कठोर उपाययोजना करण्याची विनंती करत होतो पण आयोगाकडून याची कसलीही दखल घेतली गेली नाही. आता तर सत्ताधारी आमदारच दुबार मतदारांच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेत घोळ घालण्याचे काम करत आहेत. बुलढाण्यात बोगस मतदाराला स्थानिकांनी पकडले असते, मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या मुलाने व पुतण्याने पोलिसांशी हुज्जत घालून बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक मतदान प्रक्रियेत दिवसाढवळ्या किती घोळ घालत आहेत हेच दिसून येतं. सत्ताधारी लोक सातत्याने बोगस मतदारांच्या माध्यमातून निवडणुक प्रक्रिया प्रभावित करत असून आयोग मात्र झोपा काढत आहे. मालकांविरोधात काहीच करायचं नाही हे आयोगाने ठरवलंय का?", असा आरोप रोहित पवारांनी केला आहे.
गडहिंग्लज मध्ये तोतया मतदारावर कारवाई
Devendra Fadnavis : भाजपा २०२९ ची विधानसभा स्वबळावर लढणार का? मुख्यमंत्र्यांनी सांगितलं राजकीय समीकरण; म्हणाले, "मित्रपक्षांना…"
“ शतकाला केवळ १० वर्षे कमी, पण उत्साह….” नाशिक जिल्ह्यात नगरपरिषदांसाठी मतदारांमध्ये कुठे जोश, कुठे निरुत्साह
निवडणुकीतील पेच प्रसंग टाळण्यासह एक्झिट पोलबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिले 'हे' निर्देश
हिंगोलीत मतदानादरम्यान आमदार संतोष बांगर पुन्हा वादात; महिला मतदारावर प्रभाव टाकल्याचा आरोप
Municipal Election 2025 Result : निकालाची तारीख पुढे गेल्यामुळे प्रशासनावर ताण, काय परिणाम होणार?
मुख्यमंत्र्यांच्या शेजारच्या मतदारसंघात १०० हून मृत मतदार
“ आमच्याकडे लक्ष राहू द्या…” त्र्यंबकेश्वरमध्ये गोंधळ…. दुपारपर्यंत नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक मतदानाची नोंद

२०१७ च्या नगरपरिषद निवडणुकीत अखंडीत राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ठिकाणी विजय मिळवला. यंदा कोणत्या गटाला किती जागा मिळतील?
Maharashtra Municipal Councils Election Voting Live Updates, 02 December 2025: नगरपरिषद व नगरपंचायत मतदानाचे सर्व महत्त्वाचे अपडेट्स
