Nagar Panchayat Election Result 2022 LIVE Updates: इतर मागासवर्गीयांचे आरक्षण (ओबीसी) रद्द झाल्याने खुल्या झालेल्या राज्यातील ३२ जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायती आणि दोन जिल्हा परिषदांमध्ये ४१३ जागांसाठी मतदान पार पडल्यानंतर निकाल हाती आले आहेत. या निवडणुकांच्या निमित्ताने भाजपा आणि महाविकास आघाडीला कोणाची ताकद किती याचा अंदाज येईल असं बोललं जात होतं. १०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.

भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा मिळाल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा तसंच शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा मिळाल्या आहेत. म्हणजे महाविकास आघाडीला एकूण ५७ नगरंपतायची आणि ९७६ जागा तर भाजपाला २४ नगरपंचायती ४१६ जागा मिळाल्या आहेत.

या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, एकनाथ शिंदे, गिरीश महाजन अशा अनेक दिग्गज नेत्यांना फटका बसला आहे. तर दुसरीकडे यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, सुनील शेळके यांच्यासारख्या अनेक दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यांनी पक्षाला यश मिळवून दिलं आहे. नितेश राणेदेखील आपला गड राखण्यात यशस्वी ठरले आहेत. शिवसेनेच्या महेश शिंदे यांनीही साताऱ्यात राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना धक्का दिला आहे. तर रोहित पवार, रोहित पाटील यांच्यासारख्या तरुण नेत्यांनीही चमकदार कामगिरी करत ठसा उमटवला आहे.

राज्यातील भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या १५ पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींसाठी डिसेंबरमध्ये निवडणुका होणार होत्या. परंतु डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ात सर्वोच्च न्यायालयाने इतर मागासवर्गीयांचे राजकीय आरक्षण रद्द करतानाच या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षण रद्द झालेल्या जागांवर खुल्या प्रवर्गातून जागा भरण्याचा आदेश दिला होता. यानुसार भंडारा आणि गोंदिया या दोन जिल्हा परिषदा, त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समित्या, १०६ नगरपंचायतींमधील ओबीसी आरक्षण रद्द झाल्याने खुल्या झालेल्या वर्गासाठी मंगळवारी मतदान पार पडलं.

Live Updates
17:14 (IST) 19 Jan 2022
“वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करणाऱ्यांना हा धडा ”

नगर पंचायत निवडणूकीत भाजपाच 1 नंबर… दोन नंबरी कामं करणारे 2 नंबरवर राहिले… शिवसेनेचे 3 तेरा वाजले..मुख्यमंत्री असूनही सेना तिस-या नंबरवर फेकली गेली…तर लिंबु टिंबू काँग्रेस गाळात गेलीय… वडिलांचं स्वप्न पूर्ण करताना जनतेच्या स्वप्नांचा चुराडा करणा-यांना हा धडा आहे अशी टीका भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

17:10 (IST) 19 Jan 2022
पंचायत समिती तिरोडा (गोंदिया) पूर्ण निकाल

17:09 (IST) 19 Jan 2022
पंचायत समिती आमगाव (गोंदिया) पूर्ण निकाल

16:43 (IST) 19 Jan 2022
भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता आणि राहील – देवेंद्र फडणवीस

मविआ सरकारकडून धनशक्ती, दंडशक्ती, सत्तेचा कितीही गैरवापर झाला तरी भाजपा हा क्रमांक एकचा पक्ष होता-राहील. भाजपाच्या 24 आणि सहयोगी मिळून सर्वाधिक 30 नगरपालिकांमध्ये भाजपाने सत्ता प्राप्त केली.सदस्यसंख्येत सुद्धा सर्वाधिक 415 हून अधिक जागा जिंकत भाजपा हाच क्रमांक एकचा पक्ष बनला आहे असं विधासनभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

जिल्हा परिषदा आणि नगरपालिका निवडणुकीत भाजपाने मिळविलेल्या या दणदणीत यशाचे शिल्पकार आपले सारे कठोर परिश्रमी कार्यकर्ते आहेत. मी त्यांचे मनापासून अभिनंदन करतो! महाविकास आघाडी सरकारचा कारभार नाकारणार्‍या सर्व मतदारांचेही मन:पूर्वक आभार मानतो! कितीही पक्ष एकत्र आले तरी या देशातील जनता ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्त्वावर विश्वास ठेवते, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. मोदीजींचे नेतृत्त्व आणि आपल्या कार्यकर्त्यांचे परिश्रम याचेच हे यश आहे असंही ते म्हणाले आहेत.

https://platform.twitter.com/widgets.js

16:42 (IST) 19 Jan 2022
16:32 (IST) 19 Jan 2022
महाराष्ट्रातील जनता भाजपासोबतच – केशव उपाध्ये

२०१७ चा निवडणूक निकाल व आताचा निवडणूक निकाल. भाजपाचं क्रमांक १. शिवसेना, राष्ट्रवादी, कॅाग्रेस हे तीन्ही पक्ष एकत्र येऊन लढले तरी महाराष्ट्रातील जनता भाजपा सोबतच असं ट्वीट भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलं आहे.

https://platform.twitter.com/widgets.js

16:30 (IST) 19 Jan 2022
आरक्षण रद्द होऊनही सोलापुरात ओबीसी उमेदवारांचा बोलबाला

सोलापूर जिल्ह्यात ओबीसी आरक्षण रद्द होऊनही ३२ ओबीसींनी विजयाचा झेंडा फडकावला. माळशिरस तालुक्यात १७ पैकी १२ जागांवर ओबीसी उमेदवार विजयी झाले आहेत तर नातेपुते येथेही १७ पैकी १२ जागांवर ओबीसींनी विजय मिळवला . माढा नगरपंचायत निवडणुकीत १७ पैकी चार जागांवर ओबीसींनी विजय मिळवला.

श्रीपूर महाळुंग येथे एक आणि वैरागमध्ये ३ ओबीसी उमेदवार विजयी झाले.

16:04 (IST) 19 Jan 2022
कुडाळ नगरपंचायतीत काँग्रेसला सोबत घेऊन सत्ता स्थापन करणार असल्याचा भाजपाचा दावा

राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकमेकांविरधात लढून सत्तेसाठी एकत्र येऊ शकतात तर स्थानिक पातळीवर काँग्रेसला सोबत घेऊन कुडाळ नगरपंचायतीत भाजपा सत्ता स्थापन करू शकते. भाजपाचे वरीष्ठ नेते यासंदर्भात निर्णय घेतील असं भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष आणि गटनेते रणजीत देसाई यांनी सांगितलं आहे.

16:03 (IST) 19 Jan 2022
एक नंबरच पद जो पक्ष देईल त्याच्यासोबत युती करणार – काँग्रेस

सिंधुदुर्गात नवं राजकीय समीकरण पहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसने एक नंबरच पद जो पक्ष देईल त्याच्यासोबत युती करणार असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसने स्वतंत्र निवडणूक लढवली असून महाविकास आघाडीच्या दोन्ही पक्षांनी गळचेपी केली. मात्र त्यातून काँग्रेस बाहेर पडली आहे. त्यामुळे त्यांना गरज असली तरच महाविकास आघाडीसोबत जाणार नाही तर एक दिवस या दोन्ही पक्षाची गळचेपी काँग्रेस पक्ष करणार असल्याचं जिल्हाध्यक्ष बाळा गावडे म्हणाले आहेत.

15:59 (IST) 19 Jan 2022
सांगली – कवठेमहांकाळमध्ये भररस्त्यात कार्यकर्ते भिडले

सांगलीच्या कवठेमहांकाळमध्ये नगरपंचायत निकालादरम्यान भररस्त्यावर कार्यकर्ते भिडले. यावेळी पोलिसांनी मध्यस्थ करत त्यांना बाजूला केले.

15:12 (IST) 19 Jan 2022
गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का

गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीत प्रफुल्ल पटेल यांना धक्का बसला असून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर यांचा पराभव झाला आहे. डवा जिल्हा परिषद मतदारसंघातून राष्ट्रवादीचे गंगाधर परशुरामकर पराभूत झाले आहेत. भाजपाचे बी एम पटले विजयी झाले आहेत.

14:39 (IST) 19 Jan 2022
हिंगोली – औंढा नागनाथ नगरपंचायतीत शिवसेनेला बहुमत

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ व सेनगाव या दोन्ही नगरपंचायतीच्या एकूण ३४ जागांपैकी १४ जागांवर विजय मिळवत शिवसेनेने आघाडी घेतली आहे. काँग्रेस ६ तर भाजपा ७ जागांवर विजयी झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला ५ आणि वंचित बहुजन आघाडीने दोन जागांवर विजय मिळवित आपलं खातं उघडलं.

हिंगोली जिल्ह्यातील दोन्ही नगरपंचायतींमध्ये महाविकास आघाडीने ३४ पैकी २५ जागांवर विजय मिळवत भाजपाला मात दिली. औंढा नागनाथ नगरपंचायतमध्ये शिवसेनेने स्पष्ट बहुमत मिळवले. तर सेनगाव नगरपंचायतीत महाविकास आघाडी सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट झालं

औंढा नागनाथ नगरपंचायत

एकूण जागा – 17

शिवसेना- 9

काँग्रेस-4

भाजप-2

वंचित बहुजन आघाडी-2

सेनगाव नगरपंचायत

एकूण जागा- 17

शिवसेना-5

काँग्रेस-5

भाजप-5

राष्ट्रवादी काँग्रेस-2

14:28 (IST) 19 Jan 2022
काय सांगतोय निकाल –

१०६ पैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. ९ नगरपंचायतींचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत.

– भाजपाला २४ नगरपंचायती आणि ४१६ जागा

– राष्ट्रवादी काँग्रेसला २५ नगरपंचायती आणि ३८७ जागा

– काँग्रेसला १८ नगरपंचायची आणि २९७ जागा

– शिवसेनेला १४ नगरपंचायती आणि ३०० जागा

इतर – १६

14:09 (IST) 19 Jan 2022
भाजपा क्रमांक एकचा पक्ष – चंद्रकांत पाटील

नगरपंचायत निवडणुकीत भाजपा क्रमांक एकचा पक्ष झाल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना केला आहे. २४ नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आली असून सहा ठिकाणी भाजपाप्रणीत आघाडी सत्तेत आल्याचं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं आहे. भंडारा, गोंदिया जिल्हा परिषदेतही भाजपाचं वर्चस्व राहील असं ते म्हणाले आहेत.

14:07 (IST) 19 Jan 2022
दुपारी २ वाजेपर्यंत १०६ पैकी ९३ नगरपंचायतींचे निकाल हाती

राष्ट्रवादी – २४

भाजपा – २२

शिवसेना – १४

काँग्रेस – १८

इतर – १५

13:48 (IST) 19 Jan 2022
नांदेड – माहूर, अर्धापूर, नायगाव नगरपंचायतीचा निकाल जाहीर

नायगाव, माहूर, अर्धापूर येथील नगरपंचायतींचा संपूर्ण निकाल

१) नायगांव- १७ जागांपैकी १७ ही जागेवर काँग्रेस विजयी

२) अर्धापुर- १७ पैकी १० जागा जिंकत काँग्रेसला बहुमत, भाजप-२, एमआयएम ३ , राष्ट्रवादी १, अपक्ष- १

3) माहूर- १७ पैकी काँग्रेसला ६, राष्ट्रवादीला ७, भाजपाला एक आणि शिवसेनेला ३ जागा

माहूर नगरपंचायत यापूर्वी राष्ट्रवादीकडे आणि नायगाव व अर्धापूर काँग्रेसच्याच ताब्यात होती. पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या मतदारसंघातील अर्धापूर नगरपंचायत निकालाकडे सर्वांचं लक्ष्य लागलं होतं. अर्धापुर नागरपंचायतीत एमआयएमने ३ जागांवर विजय मिळवत अनेक दिग्गजांचा पराभव केला. तर अर्धापुर नगरपंचायतीत काँग्रेसच्या नगराध्यक्षांना पराभूत करून राष्ट्रवादीचे उमेदवार शेख जाकेर यांनी विजय मिळवला.

13:25 (IST) 19 Jan 2022
नितेश राणेंच्या हातून निसटली देवगड नगरपंचायत

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड नगरपंचायत निवडणुकीत आमदार नितेश राणे यांच्या हातून सत्ता गेली असून यात त्रिशंकू अवस्था निर्माण झाली आहे. या ठिकाणी शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी आठ जागा मिळाल्या आहेत. तर राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आल्याने या ठिकाणी नक्की सत्ता कोणाची येणार यावर शिक्कामोर्तब होणं बाकी राहिले आहे.

13:16 (IST) 19 Jan 2022
औरंगाबाद – सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा, अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत

सोयगाव नगरपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकला असून महसुल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. 17 पैकी 11 जागांवर शिवसेना विजयी झाली असून भाजपाला केवळ 6 जागांवर विजय मिळाला आहे.

विजयी उमेदवारांची यादी

वॉर्ड क्र. 1 शिवसेना – शाहिस्ताबी रौफ

वॉर्ड क्र. 2 – शिवसेना- अक्षय काळे

वॉर्ड क्र. 3 – शिवसेना- दीपक पगारे

वॉर्ड क्र.4 – शिवसेना- हर्षल काळे

वॉर्ड क्र.5 – भाजपा – वर्षा घनगाव

वॉर्ड क्र.6 – शिवसेना – संध्या मापारी

वॉर्ड क्र.7 – भाजपा – सविता चौधरी

वॉर्ड क्र.8 – शिवसेना – कुसुमबाई राजू दुतोंडे

वॉर्ड क्र.9 – शिवसेना- सुरेखाताई काळे

वॉर्ड क्र.10 – शिवसेना – संतोष बोडखे

वॉर्ड क्र.11 – भाजपा – संदीप सुरडकर

वॉर्ड क्र.12 – शिवसेना – भगवान जोहरे

वॉर्ड क्र.13 – भाजपा- ममताबाई इंगळे

वॉर्ड क्र.14 – भाजपा- आशियाना शाह

वॉर्ड क्र.15 – भाजपा – सुलतानाबी देशमुख

वॉर्ड क्र.16 – शिवसेना – गजानन कुडके

वॉर्ड क्र.17 – शिवसेना आशाबी तडवी

13:14 (IST) 19 Jan 2022
वर्धा – समुद्रपुर नगरपंचायतीमधील १७ जागांचे निकाल घोषित

समुद्रपुर नगरपंचायतीमधील १७ जागांचे निकाल घोषित

राष्ट्रवादी – ४

भाजपा – ४

कॉंग्रेस – २

अपक्ष – २

बहुजन समाज पार्टी – २

शिवसेना – १

शेतकरी संघटना – २

13:11 (IST) 19 Jan 2022
मोताळ्यात काँग्रेसला एकहाती सत्ता, संग्रामपुरात प्रहारला मोठे यश, तर भाजपला दोन्ही ठिकाणी भोपळा

बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा आणि संग्रामपूर नगरपंचायतीच्या प्रत्येकी 17 जागांकरिता निकाल जाहीर झालाय. दोन्ही नगरपंचायतमध्ये भाजपाला खातेही उघडता आलं नाही तर संग्रामपूरमध्ये प्रहारला एकहाती सत्ता तर मोताळ्यात काँग्रेसला एकहाती यश मिळालं आहे.

बुलडाणा जिल्ह्यातील मोताळा नगरपंचायतीच्या 17 जागासाठी 64 उमेदवार निवडणूक रिंगणात होते, तर संग्रामपूर मध्ये 17 जागांसाठी 67 उमेदवार रिंगणात होते.. मोताळा नगरपंचायत मध्ये काँग्रेसचे १२ उमेदवार विजयी झाल्याने सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला एकहाती सत्ता मिळाली आहे. तर भाजपाला खाते ही उघडता आले नसून शिवसेनेला ४ आणि राष्ट्रवादीला एका जागेवर समाधान मानावे लागलं.

संग्रामपूर नगरपंचायतीच्या 17 जागांसाठी 67 उमेदवार निवडणक रिंगणात होते. या ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने 12 जागांवर विजय मिळवत एक हाती सत्ता मिळविली असून महाविकास आघाडीला याठिकाणी पाच जागांवर समाधान मानावे लागले. भाजपाला याठिकाणीही खाते उघडता आले नाहीय.

दोन्ही नगर पंचायत निवडणुकीच्या प्रचारवेळी राज्यमंत्री बच्चू कडू, यशोमती ठाकूर, अब्दुल सत्तार, नाना पटोले सह इतर नेत्यांचया सभा झाल्या होत्या, प्रत्येकाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र आजच्या निकालाचे चित्र काही वेगळेच आहे.

13:06 (IST) 19 Jan 2022
दुपारी १ वाजेपर्यंत १०६ पैकी ७३ जागांचे निकाल हाती

दुपारी १ वाजेपर्यंत १०६ पैकी ७३ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. यामध्ये भाजपाला २०, शिवसेना १३, काँग्रेस १०, राष्ट्रवादी १९, इतर ११ जागा मिळाल्या आहेत.

12:56 (IST) 19 Jan 2022
राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून आम्हाला मध्यवर्ती बँकेतून काढलं – आमदार महेश शिंदे

सातारा जिल्ह्यात चुरशीची आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी कोरेगाव नगरपंचायत निवडणुकीत शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांचं परिवर्तन पॅनल ने विजयी झाले असून राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनलचा पराभवाची धूळ चारली आहे. यावेळी बोलताना आमदार महेश शिंदे यांनी सांगितलं की, “राष्ट्रवादीने आमच्याशी गद्दारी करून जिल्हा मध्यवर्ती बँकेतून काढलं”.

“आमदार शशिकांत शिंदे हे जावलीचे आमदार असून त्यांनी आता कोरेगावमधून बस्तान उठवावे,” असे सांगत आमदार शशिकांत शिंदेंवर विजयी उमेदवारांनी टीका केली आहे.

12:53 (IST) 19 Jan 2022
३५ वर्षानंतर साक्री नगरपंचायतीवर भाजपाची एकहाती सत्ता

धुळ्यातील साक्री नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले असून भाजपाने एकहाती सत्ता मिळवली आहे. तब्बल ३२ वर्षांपासून शिवसेना नेते नाना नांगरे यांची नगरपंयातीत एकहाती सत्ता होती. मात्र यावेळी भाजपाने जोरदार मुसंडी मारत नाना नागरे यांचा जोरदार पराभव केला आहे.

साक्री नगरपंचायतीच्या निकालात भाजपाला एकहाती सत्ता मिळाली असून, या निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेनेचा दारुण पराभव झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या ४० वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांनादेखील या निवडणुकीत अपयशाला सामोरे जावं लागलं असून शिवसेनेला फक्त चार जागांवर यश मिळालं आहे. संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या साक्री नगरपंचायतीवर भाजपाने ११ जागांवर विजय मिळवत झेंडा फडकल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.

12:29 (IST) 19 Jan 2022
देहूत राष्ट्रवादीचा विजय; काँग्रेस, शिवसेना आणि भाजपाला चारली धूळ!

देहूच्या पहिल्याच नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता आली आहे. एकूण 17 जागांपैकी 14 जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी झाले असून दोन जागांवर अपक्षांची लॉटरी लागली आहे. तर, काँग्रेस आणि शिवसेनेला खातं देखील उघडता आलं नाही. भाजपाला एका जागेवर समाधान मानावे लागले आहे. खर तर भाजपाचे माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे आणि राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. त्यात सुनील शेळके विजयी झाले आहेत अस म्हणावं लागेल. 

12:27 (IST) 19 Jan 2022
नंदूरबारमध्ये काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात फडकला शिवसेनेचा भगवा

काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जाणारा व काँग्रेसचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांना जोरदार धक्का देत धडगाव नगर पंचायतीवर शिवसेनेने भगवा फडकवला आहे. नगर पंचायतीच्या 17 जागा पैकी शिवसेना 13, काँग्रेस 3 तर भाजपा 1 जागेवर विजयी झाली आहे.

धडगांव-वडफळ्या-रोषमाळ बू नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी शिवसेना, काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी, अपक्ष असे 48 उमेदवार निवडणूक रिंगणात होते.आज झालेल्या मतमोजणीत कॉग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडत शिवसेनेने भगवा फडकवला नगरपंचायतीच्या 17 जागांमध्ये शिवसेना 13 विजयी झाले. असून नगर पंचायती वर पहिल्यादा शिवसेनेच्या नगराध्यक्ष विराजमान होईल हे आता जवळपास निश्चित झाले आहे . नगर पंचायतीच्या निवडणुकीत काँग्रेसला धक्का देत शिवसेनेने भगवा फडकवला असून राज्याचे आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी साठी हा मोठा धक्का मानला जातो आहे

12:21 (IST) 19 Jan 2022
निकालावर अजित पवारांची प्रतिक्रिया

अजून नगरपालिका निकाल पूर्ण बघितले नाहीत, कर्जतचे निकाल कळले आहेत. स्थानिक राजकीय परिस्थिती बघून लोकं मतदान करत असतात, संपूर्ण माहिती घेतल्यावर अधिक बोलेन, जे जिंकून आले आहेत त्यांचे अभिनंदन. पक्षाच्या चिन्हवर निवडणूक झाली आहे, त्यांच्या शहराचा विकास करत असताना राज्य सरकार म्हणून नक्की मदत करेन असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर स्थानिक पातळीवर निवडणूक एकत्र लढल्या नाहीत, प्रत्येक पक्ष जास्त प्रतिनिधी निवडून यावेत यासाठी प्रयत्न करत आहे. सगळे मिळून निवडणुकीला सामोरं जाऊ. जिल्हानिहाय एकत्र निवडणूक लढवू असं आम्हाला महाविकास आघाडीतील नेते सांगत होते, मात्र करोनामुळे कार्यक्रम घेता आले नाहीत, तेव्हा जिल्हा पातळीवर ठरवा निर्णय घ्या असे प्रत्येक पक्षाने सांगितले होते, तशा निवडणुका झाल्या आहेत असंही त्यांनी सांगितलं.

12:09 (IST) 19 Jan 2022
रायगडमधील नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसची मुसंडी

रायगडमधील सहा नगरपंचायत निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसने मुसंडी मारली आहे. शिवसेना ३५, राष्ट्रवादी काँग्रेस ३९, शेकाप ११, काँग्रेस ८, इतर ३, भाजपा ४ जागांवर विजयी आहे.

पोलादपूर

शिवसेना 10, भाजप 1, काँग्रेस 6

तळा

शिवसेना 4, राष्ट्रवादी काँग्रेस 10, भाजप 3

माणगाव

शिवसेना 7, राष्ट्रवादी काँग्रेस 8, इतर 2

म्हसळा

शिवसेना 2,  राष्ट्रवादी काँग्रेस 13, काँग्रेस 2

खालापूर

शिवसेना 8, राष्ट्रवादी काँग्रेस 2, शेकाप 7

पाली

राष्ट्रवादी काँग्रेस 6, शेकाप 4, शिवसेना 4, भाजप 2, अपक्ष 1

12:07 (IST) 19 Jan 2022
कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना जागा दाखवली – वैभव नाईक

कुडाळच्या मतदारांनी नारायण राणेंना व त्यांच्या मुलांना जागा दाखवली आणि भाजपाला सत्तेपासून दूर ठेवलं. काँग्रेस जरी स्वतंत्र निवडणूक लढली असली तरी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वरीष्ठ नेत्यांशी चर्चा करून कुडाळ नगरपंचायतीत महाविकास आघाडीचा नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष बसवणार असं आमदार वैभव नाईक यांनी सांगितलं आहे.

11:56 (IST) 19 Jan 2022
शहापूर नगरपंचायतीवर पुन्हा शिवसेनेची सत्ता

शहापूर नगरपंचायत निवडणूकीत शिवसेनेने पुन्हा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 17 पैकी 10 जागेंवर विजय संपादीत करत सत्ता कायम ठेवली आहे. 7 जागेवर भाजपाचा विजय झाला आहे, या निवडणुकीत भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील व नगरविकास मंत्री व पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. शिवसेनेचा विजय पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या विकास कामावर झाला आहे असे शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी सांगितले

11:55 (IST) 19 Jan 2022
मुरबाड नगरपंचायत अपडेट

मुरबाड नगरपंचायत अपडेट

मुरबाड नगरपंचायतीत आत्तापर्यंत १७ पैकी ११ जागांचे निकाल जाहीर

६ जागा जिंकत भाजप आघाडीवर, तर शिवसेनेला ४ जागा आणि एका जागी अपक्ष उमेदवाराचा विजय, इतर पक्षांना मात्र अद्याप खातं उघडण्यातही यश नाही

एकूण ६६ उमेदवार आहेत निवडणुकीच्या रिंगणात

पक्षनिहाय विजयी उमेदवार

भाजप

मानसी देसले – प्रभाग २

राम दुधाळे – प्रभाग ३

नम्रता जाधव – प्रभाग ४

उर्मिला ठाकरे – प्रभाग ८

राव रविना विनायक – प्रभाग ९

मुकेश विशे – प्रभाग ११

शिवसेना

विनोद नार्वेकर – प्रभाग ५

नम्रता तेलवणे – प्रभाग ६

अक्षय रोटे – प्रभाग ७

मोनिका शेळके – प्रभाग १०

अपक्ष

दिक्षिता वारे – प्रभाग १

11:53 (IST) 19 Jan 2022
नागपूर निकाल अपडेट

१) कोरपना नगर पंचायत :- काँग्रेस 12

२) पोंभुर्णा नगर पंचायत

भाजपा – 10

शिवसेना – 4

वंचित बहुजन आघाडी – 2

काँग्रेस – 1

३) गोंडपीपरी नगरपंचायत

काँग्रेस – 7

भाजपा – 4

राष्ट्रवादी – 2

शिवसेना – 2

अपक्ष – 2

11:51 (IST) 19 Jan 2022
नागपूर – सावली नगरपंचायतीवर काँग्रेसची एकहाती वर्चस्व

नागपूर – सावली नगरपंचायत निवडणूक निकाल

प्रभाग1 – प्रफुल वाळके(काँग्रेस)

प्रभाग 2- प्रीतम गेडाम(काँग्रेस)

प्रभाग-3 सीमा संतोषवार(काँग्रेस)

प्रभाग-4 -विजय मूत्यालवार (काँग्रेस)

प्रभाग-5- प्रियांका रामटेके(काँग्रेस)

प्रभाग-6 ज्योती शिंदे(काँग्रेस)

प्रभाग-7 ज्योती गेडाम(काँग्रेस)

प्रभाग-8 नितेश रस्से(काँग्रेस)

प्रभाग-9 नीलम सुरमवार (भाजपा)

प्रभाग 10 शारदा गुरुनुले (भाजपा)

प्रभाग 11 साधना वाढई(काँग्रेस)

प्रभाग12 सचिन संगीळवार(काँग्रेस)

प्रभाग 13 संदीप पुण्यपकार (काँग्रेस)

प्रभाग 14 सतीश बोम्मावार (भाजपा)

प्रभाग 15 अंतबोध बोरकर (काँग्रेस)

प्रभाग 16 लता वाळके(काँग्रेस)

प्रभाग 17 अंजली देवगडे (काँग्रेस)

काँग्रेस-14

भाजपा-03

11:49 (IST) 19 Jan 2022
नांदेडमध्ये काँग्रेसचं वर्चस्व, नायगाव नगरपंचायतीत सर्व जागांवर विजयी

पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसची जिल्ह्यातील तीनही नगर पंचायतीत मुसंडी

– नायगाव नगर पंचायतीत १७ पैकी १७ जागांवर काँग्रेस विजयी झाली आहे.

– अर्धापूरमध्ये १७ पैकी १० जागांवर काँग्रेस विजयी

– माहूर नगर पंचायतमध्ये तूर्तास ५ काँग्रेस, ५ राष्ट्रवादी, शिवसेना ३ जागांवर विजयी असून ४ जागांचे निकाल येणे शिल्लक आहे.

11:44 (IST) 19 Jan 2022
शहापूर नगर पंचायत निवडणुकीत पुन्हा शिवसेनेचे वर्चस्व

शहापूर नगर पंचायत निवडणुकीत पुन्हा शिवसेनेने वर्चस्व मिळवलं आहे. १७ पैकी १० जागांवर शिवसेनेने विजय मिळवला असून भाजपा ७ जागांवर विजयी झाली आहे.

11:33 (IST) 19 Jan 2022
बीडमधील नगरपंचायतींवर भाजपाचे वर्चस्व

आष्टी, पाटोदा आणि शिरुर कासार नगरपंचायती भाजपाच्या ताब्यात आल्या आहेत.

11:31 (IST) 19 Jan 2022
बीडमधली लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती – पंकजा मुंडे

बीडमधली लढत मुंडे विरुद्ध मुंडे अशी नव्हती. लोकांचा गेल्या अडीच वर्षातील कामकाजाचा राग आणि आमच्या काळातील कामकाजाची पावती असा तो निकाल आहे. बीड जिल्ह्यात एकल संघ असा भाजपा सोडून कोणताही पक्ष नाही. जे नेते आहेत हे एका भागापूरते आहेत. भाजपा ही विरोधात नाही, सत्तास्थापनेचा जनादेश दिला आहे, जो विजय मिळाला आहे तो कार्यकर्त्यांचा विजय आहे असं पंकजा मुंडे यांनी सांगितलं आहे. पूर्ण निकाल आलेला नाही. भाजपाला ज्या जास्त जागा मिळाल्या आहेत याचा आनंद आहे असंही त्यांनी सांगितलं.

11:28 (IST) 19 Jan 2022
तिवसा नागरपंचयातीवर काँग्रेसचे वर्चस्व कायम, काँग्रेसची एकहाती सत्ता

– पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी राखला गड

एकूण जागा :- १७

भाजपा- ०

काँग्रेस – १२

वंचित – १

अपक्ष – ०

शिवसेना- ४

11:17 (IST) 19 Jan 2022
राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना धक्का; कडेगाव नगरपंचायतील फुललं कमळ

राज्यमंत्री विश्वजीत कदम यांना मोठा धक्का बसला आहे. कडेगाव नगरपंचायत निवडणुकीत भाजपाचा विजय झाला आहे. प्रतिष्ठेच्या लढतीत संग्रामसिंह देशमुख यांनी मिळवला विजय.

भाजपा – ११

काँग्रेस – ५

राष्ट्रवादी – १

11:12 (IST) 19 Jan 2022
संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडूंच्या प्रहारची एकहाती सत्ता

बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर नगरपंचायतीवर बच्चू कडूंच्या प्रहारची एकहाती सत्ता आली असून १२ जागा जिंकल्या आहे. तर काँग्रेसला ४ आणि शिवसेनेला फक्त एक जागा मिळाली आहे.

11:10 (IST) 19 Jan 2022
देवळा नगरपंचायतीमध्ये भाजपाला बहुमत

नाशिकच्या देवळा नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आली आहे. भाजपला बहुमत मिळालं असून १५ जागांवर विजयी झाले आहेत. तर राष्ट्रवादीला मात्र दोनच जागा मिळवता आल्या आहेत.

11:09 (IST) 19 Jan 2022
शिवसेनेच्या शंभूराज देसाईंना धक्का

साताऱ्यातील पाटणमध्ये शिवसेनेच्या शंभूराज देसाईंना धक्का मिळाला आहे. 17 जागांपैकी 10 उमेदवार राष्ट्रवादीचे आले आहेत.

11:08 (IST) 19 Jan 2022
माळशिरस नगरपंचायत निकालातील विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग १ – कैलास वामन (म.वि.आ)

प्रभाग २ – ताई वावरे (अपक्ष) बिनविरोध

प्रभाग ३ -पुनम वळकुंदे (अपक्ष)

प्रभाग ४ – विजय देशमुख (भाजपा)

प्रभाग ५ -शोभा धाईजे (भाजपा)

प्रभाग ६ – आबा धाईंजे (भाजपा)

प्रभाग ७- आप्पासाहेब देशमुख (भाजपा)

प्रभाग ८ – कोमल जानकर (भाजपा)

प्रभाग ९ -राणी शिंदे (भाजपा)

11:07 (IST) 19 Jan 2022
आतापर्यंतची स्थिती काय –

शिवेसना आणि भाजपामध्ये सध्या कडवी झुंज पहायला मिळत आहे. पहिल्या तासातील निकालानुसार, शिवसेना आणि भाजपाला प्रत्येकी १४२ जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादी १३३ तर काँग्रेस ८६ जागांवर आहे. तर १०७ अपक्ष निवडून आले आहेत.

11:05 (IST) 19 Jan 2022
साताऱ्यातील कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता

साताऱ्यात शिवसेना आमदार महेश शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदेना जोरदार धक्का दिला आहे. शिवेसना १३ जागांवर विजयी झाली असून एकहाती सत्ता मिळवली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादीला फक्त ४ जागा मिळाल्या आहेत.

11:03 (IST) 19 Jan 2022
कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात, रोहित पवारांनी करुन दाखवलं

अहमदनगरमधील कर्जत नगरपंचायत राष्ट्रवादीच्या ताब्यात आली आहे. या ठिकाणी आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

10:59 (IST) 19 Jan 2022
माढा पहिल्या पाच प्रभागांत सर्व जागांवर काँग्रेसचा दणदणीत विजय

माढा पहिल्या पाच प्रभागांत सर्व जागांवर काँग्रेसचा दणदणीत विजय.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा पराभव.

माजी नगराध्यक्ष मीनल साठे यांनी केला पुतण्या शंभू साठे यांचा पराभव.

10:56 (IST) 19 Jan 2022
राजेश टोपे यांच्या घनसावंगी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं

आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या घनसावंगी नगर पंचायतीमध्ये राष्ट्रवादीने खातं उघडलं आहे. यशवंत जाधव यांचा १३५ मतांनी विजय झाला आहे.

10:56 (IST) 19 Jan 2022
केज नगरपंचायतमध्ये हर्षदा सोनवणे विजयी

केज नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची कन्या डॉ. हर्षदा सोनवणे यांचा विजय झाला आहे

10:55 (IST) 19 Jan 2022
साताऱ्यात मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाईंना झटका. राष्ट्रवादीचे पाच उमेदवार विजयी

साताऱ्यात मंत्री आणि शिवसेना नेते शंभूराज देसाईंना झटका. राष्ट्रवादीचे पाच उमेदवार विजयी

10:48 (IST) 19 Jan 2022
बुलडाणा – संग्रामपूर नगरपंचायतीचा निकाल

प्रभाग ४ मधून काँग्रेस पक्षाचे भारत बावसकर विजयी,

प्रभाग ५ मधून काँग्रेसच्या शोभाताई वानखेडे विजयी

प्रभाग ७ मधून प्रहारचे संतोष सावतकर ७० मतांनी विजयी

प्रभाग ३ मधून प्रहार जनशक्ती पक्षाचे सय्यद इरफान इस्माईल विजयी