Maharashtra Local Body Election 2025 Results Highlights Today, 21 December 2025 : राज्यातील नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. भाजपाने निकालात बाजी मारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पार्टी हाच पहिल्या क्रमांकाचा पक्ष आहे हे अधोरेखित झालं आहे. जवळपास १२९ नगराध्यक्ष हे भाजपाचे निवडून आले आहेत. एकूण नगराध्यक्षांपैकी ७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे आहेत. भाजपाचे ३३२५ नगरसेवक निवडून आले आहेत. एकूण नगरसेवकांपैकी ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे निवडून आले आहेत. प्रचंड मोठं जनसमर्थन आम्हाला मिळालं आहे. गेल्या २०-२५ वर्षांच्या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये इतका मोठा विजय कोणालाच मिळाला नाही, जो आज भाजपा आणि महायुतीला मिळाला आहे. सगळ्यात महत्वाचं काही असेल तर या निवडणुकीमध्ये मी पूर्ण सकारात्मक प्रचार केला. एकाही व्यक्तीच्या विरोधात, एकाही पक्षाच्या विरोधात, एकाही नेत्याच्या विरोधात बोललो नाही. केवळ विकासावर मतं मागितली.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष जिंकून आले. पुणे जिल्ह्यातील मतदारांचे मी आभार मानतो. राज्यात निवडून आलेल्या २८८ नगराध्यक्षांचं मी अभिनंदन करतो. आगामी महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची युती होईल का ? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले. स्थानिक पातळीवर युती करायची असेल तर जिल्हाध्यक्षांनी ठरवावं, जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर थेट युती करण्याबाबत कोणतेही विधान केले नाही. अजित पवार पुढे म्हणाले, मित्रपक्षांनी एकमेकांच्या पक्षातील सहकारी, तसेच माजी सहकारी घेऊ नये असं ठरलं होतं. पण, तसं झालं नाही. त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. सुरूवात एकाने केली की दुसरा गप्प बसत नाही, असं म्हटलं जातं.

Live Updates

Maharashtra Nagar Panchayat Election Results 2025 Updates : नगरपंचायतीच्या निकालाच्या अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.

21:51 (IST) 21 Dec 2025

जेजुरीत दोन विजयी उमेदवारांसह १६ जण जखमी; उमेदवारांचे औक्षण करताना भंडारा दिव्यावर पडल्याने भडका

उधळलेला भंडारा पेटलेल्या दिव्यावर पडल्यामुळे स्फोटासारखा आवाज झाला आणि आगीचा भडका उडाला. ...सविस्तर वाचा
21:38 (IST) 21 Dec 2025

दोन आमचे दोन तुमचे; मराठवाड्यात विरोधकांचे केवळ चार नगराध्यक्ष

सत्ताधाऱ्यांच्या विरोधात लढत देणाऱ्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षास केवळ फुलंब्री नगरपंचायत, तर किनवट नगरपालिकेत यश मिळाले. ...सविस्तर बातमी
21:11 (IST) 21 Dec 2025

बारामतीवर अजित पवार यांची सत्ता, नगराध्यक्षपदी सचिन सातव; अपक्ष निवडून आल्याने आत्मपरीक्षणाची वेळ

Baramati Nagar Parishad Election Results : नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सचिन सातव हे विजयी झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाला अवघी एक जागा मिळाली. ...अधिक वाचा
21:10 (IST) 21 Dec 2025

बार्शीटाकळी नगरपंचायत निवडणूक निकाल

नगराध्यक्ष - अख्तर खातून अलीमोद्दीन, वंचित आघाडी

एकूण प्रभाग - १७

भाजप - ३

काँग्रेस - ३

अजित पवार गट - २

वंचित आघाडी - ३

एआयएमआयएम - १

अपक्ष - ५

20:59 (IST) 21 Dec 2025

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची युती होईल का ? अजित पवार काय म्हणाले ?

आगामी महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांची युती होईल का ? याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केले आहे. स्थानिक पातळीवर युती करायची असेल तर जिल्हाध्यक्षांनी ठरवावं, जिल्हाध्यक्षांशी संपर्क साधावा, असं अजित पवार म्हणाले. दरम्यान, त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाबरोबर थेट युती करण्याबाबत कोणतेही विधान केले नाही.

20:53 (IST) 21 Dec 2025

Amit Shah : "हा मोदींच्या धोरणांसाठी जनतेचा आशीर्वाद"; महायुतीच्या विजयानंतर अमित शाहांची पहिली प्रतिक्रिया

महाराष्ट्र नगरपालिका निवडणूकीत महायुतीच्या विजयानंतर अमित शाहांनी मुख्यमंत्री तसेच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे. ...वाचा सविस्तर
20:52 (IST) 21 Dec 2025

मित्रपक्षांनी एकमेकांच्या पक्षातील सहकारी घेऊ नये असं ठरलं होतं, पण तसं झालं नाही - अजित पवार

Ajit Pawar on Nagar Panchayat Results Live Updates: मित्रपक्षांनी एकमेकांच्या पक्षातील सहकारी, तसेच माजी सहकारी घेऊ नये असं ठरलं होतं. पण, तसं झालं नाही. त्यावर आम्ही चर्चा करणार आहोत. सुरूवात एकाने केली की दुसरा गप्प बसत नाही, असं म्हटलं जातं.

20:45 (IST) 21 Dec 2025
Ajit Pawar on Nagar Panchayat Results Live Updates: राष्ट्रवादीला चांगल्या जागा मिळाल्या - उपमुख्यमंत्री अजित पवार

Ajit Pawar on Nagar Panchayat Results Live Updates: उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, जनतेने आम्हाला चांगला कौल दिला आहे. आमची जबाबदारी आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या जागा मिळाल्या, चांगले नगराध्यक्ष जिंकून आले. पुणे जिल्ह्यातील मतदारांचे मी आभार मानतो. राज्यात निवडून आलेल्या २८८ नगराध्यक्षांचं मी अभिनंदन करतो.

20:37 (IST) 21 Dec 2025

सत्ताधारी पक्षांचा विजय निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

निवडणुकीतील सत्ताधारी पक्षांचा विजय हा निवडणूक आयोगाच्या आशीर्वादानेच झाला असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...वाचा सविस्तर
20:31 (IST) 21 Dec 2025

Pune Municipal Election Results : पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच ‘दादा’

बारामती, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, लोणावळा, भोर, इंदापूर, जेजुरीसह शिरूर या नगर परिषदांमध्ये, तर माळेगाव बुद्रुक आणि वडगाव या नगरपंचायतींमध्ये अजित पवार यांचे नगराध्यक्ष झाले. ...वाचा सविस्तर
20:28 (IST) 21 Dec 2025

बार्शीटाकळी नगरपंचायत निकाल

नगराध्यक्ष - अख्तर खातून अलीमोद्दीन, वंचित आघाडी

एकूण प्रभाग - १७

भाजप - ३

काँग्रेस - ३

अजित पवार गट - २

वंचित आघाडी - ३

एआयएमआयएम - १

अपक्ष -

20:24 (IST) 21 Dec 2025

अहिल्यानगरमध्ये १२ पैकी ७ नगराध्यक्षपदे भाजपकडे; नगरसेवक पदाच्या १३७ जागांवर विजय

जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयाची जोरदार मुसंडी मारत प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे.

सविस्तर वाचा...

20:24 (IST) 21 Dec 2025

महापालिका निवडणुकीतही भाजपा-शिंदेसेनेत संघर्ष? काय म्हणाल्या शिंदेंच्या आमदार?

BJP - Shivsena Rift भाजपाचे एकूण १२९ नगराध्यक्ष निवडून आले असून भाजपा नंबर एकचा पक्ष ठरला आहे. तसेच शिंदेची शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे या विजयावर, विरोधकांच्या आरोपांवर आणि आगामी महापालिका निवडणुकीतील भाजपा-शिवसेनेच्या संघर्षावर बोलल्या आहेत.

सविस्तर वाचा...

20:23 (IST) 21 Dec 2025

Ashok Chavan : “मी भाजपात प्रवेश केल्यानंतर…” नगरपरिषद निकालानंतर अशोक चव्हाण यांची सूचक प्रतिक्रिया; नेमके काय म्हणाले?

Ashok Chavan on Nanded Election Results : नांदेडमधील भोकर आणि मुखेड नगर परिषद निवडणुकीत भाजपाला विजय मिळवल्यानंतर अशोक चव्हाण यांनी सूचक प्रतिक्रिया दिली.

सविस्तर वाचा...

20:22 (IST) 21 Dec 2025

Ajit Pawar : नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीतील यशानंतर अजित पवारांची पोस्ट; म्हणाले, “ही निवडणूक केवळ विजयाची नाही, तर…”

गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील नगरपरिषद/नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

20:21 (IST) 21 Dec 2025

Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: मुक्ताईनगर नगरपंचायत निवडणूक निकाल...

एकूण प्रभाग १७

भाजपा ०४

शिंदे गट १०

अजित पवार गट ०

काँग्रेस ०

शरद पवार गट ०

ठाकरे गट ०

इतर ०३

20:14 (IST) 21 Dec 2025
Bachchu Kadu on Nagar Panchayat Result Live: भाजपासाठी मुंबई महाराष्ट्रापेक्षा महत्वाची - बच्चू कडू

Bachchu Kadu on Nagar Panchayat Result Live: मुंबई महानगरपालिका ही एका लहान राज्याच्या निवडणुकीसारखी निवडणूक आहे. तिथे सत्ता भाजपची ठेवायची कि शिंदेंची हे भाजप ठरवेल. भाजपासाठी मुंबई महाराष्ट्रापेक्षा महत्वाची आहे, ही भाजपाची मानसिकता आहे. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जिंकण्यासाठी भाजपा प्रयत्न करेल, असे बच्चू कडू म्हणाले.

20:11 (IST) 21 Dec 2025
Bachchu Kadu on Nagar Panchayat Result Live: या निवडणुकीवरून दुसऱ्या निवडणुकीची गणितं बांधणं ही मुर्खता - बच्चू कडू

Bachchu Kadu on Nagar Panchayat Result Live: बच्चू कडू म्हणाले, या निवडणुकीवरून दुसऱ्या निवडणुकीची गणितं बांधणं ही मुर्खता आहे. प्रत्येक निवडणूक ही पूर्णपणे वेगळी असते. प्रहार जनशक्ती पक्षाने महाराष्ट्रात १०० ठिकाणी निवडणूक लढवली. पण, खरी लढत आम्ही अचलपूर आणि चांदूरबाजारमध्ये लढलो.

20:09 (IST) 21 Dec 2025
Nagar Panchayat Election Live News Updates Bachchu Kadu: निवडणूक होती म्हणून कदाचित ईव्हीएमचा घोळ झाला नाही - बच्चू कडू

Bachchu Kadu on Nagar Panchayat Result Live: अमरावती अचलपूर मतदारसंघातील अचलपूर आणि चांदूरबाजार नगरपरिषदेचा निकाल जाहीर झाला आहे. चांदूरबाजारमध्ये बच्चू कडू यांची एकहाती सत्ता आली आहे, तर अचलपूरमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. बच्चू कडू म्हणाले, "निवडणूक आयोगाची मेहेरबानी आहे, लहान निवडणूक होती म्हणून कदाचित ईव्हीएमचा घोळ झाला नाही. महानगरपालिका, जिल्हा परिषद या मोठ्या निवडणुकांत काय होईल सांगता येत नाही. पण, इथे लागलेला निकाल हा नैसर्गिक आहे, कृत्रिम नाही."

20:08 (IST) 21 Dec 2025

अहिल्यानगरमध्ये १२ पैकी ७ नगराध्यक्षपदे भाजपकडे; नगरसेवक पदाच्या १३७ जागांवर विजय

जिल्ह्यातील १२ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपने विजयाची जोरदार मुसंडी मारत प्रथम क्रमांकाचा पक्ष म्हणून स्थान मिळवले आहे. ...अधिक वाचा
20:04 (IST) 21 Dec 2025
भाजपाने लोकशाहीचा गळा घोटला - यशोमती ठाकूर

काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या, "अंजनगाव मध्ये मतांची फेरमोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती. ती मान्य केली नाही. १२४ मतांचा फरक तिथे आहे. त्यांनी बदमाशी करून लोकशाहीचा गळा घोटला आहे. त्यांच्याकडे दमदाटी, प्रशासन आणि पैसा या सगळ्या गोष्टी आहेत. पण, जेवढा ते आव आणतात तेवढी वास्तविकता याठिकाणी नाही. अमरावतीत आज सहा जागा भाजपाच्या आल्या आहेत. चिखलदऱ्यात त्यांनी अरेरावी केली."

19:57 (IST) 21 Dec 2025

"भाजपने लोकशाहीचा गळा घोटला", अंजनगावातील मतमोजणीवर माजी मंत्री यशोमती ठाकूर यांचा आक्षेप

अमरावती : अंजनगाव सुर्जी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत मतमोजणीच्या अंतिम टप्प्यात काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी फेरमतमोजणीची मागणी केली होती, ती मागणी मान्य करण्यात आली नाही. यात पक्षपातीपणा करण्यात आला. भाजपने लोकशाहीचा गळा घोटून मिळवलेला हा विजय आहे, अशी टीका काँग्रेसच्या नेत्या माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी केली आहे.

19:46 (IST) 21 Dec 2025

पुणे जिल्ह्यात अजित पवारच ‘दादा’!; भाजपचे प्रयत्न अपयशी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे प्राबल्य असलेल्या पुणे जिल्ह्यात अजित पवार हेच ‘दादा’ असल्याचे नगर परिषद आणि नगर पंचायतींच्या निवडणुकांमधून स्पष्ट झाले. ...अधिक वाचा
19:43 (IST) 21 Dec 2025

Nagpur Thane Pune Nagar Parishad Results: देवेंद्र फडणवीसांच्या नागपूरमध्ये भाजपाचे किती नगराध्यक्ष? दोन उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यांत काय स्थिती?

Nagpur Thane Pune Nagar Parishad Nagar Panchayat Election Results 2025 : नागपूर जिल्ह्यातील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत २७ नगर परिषदांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी २२ ठिकाणी भाजपाने निवडणूक जिंकली आहे.

सविस्तर वाचा...

19:37 (IST) 21 Dec 2025

Wada Nagar Panchayat Election Result 2025: वाडा नगरपंचायत निवडणूक निकाल...

एकूण प्रभाग : १७ प्रभाग, १७ जागा

भाजपा : ११

शिवसेना (शिंदे) : ०३

राष्ट्रवादी शरद पवार गट: ०१

शिवसेना (ठाकरे) : ०१

राष्ट्रवादी अजित पवार गट : ००

काँग्रेस : ००

इतर : ००

19:23 (IST) 21 Dec 2025

‘भाजपाच नंबर वन पक्ष’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, रवींद्र चव्हाण यांच्यानंतर पुन्हा ‘नंबर एक’ विधान चर्चेत

CM Devendra Fadnavis on Nagar Parishad Election Result: २०१७ च्या तुलनेत भाजपाचे दुपटीने नगरसेवक निवडून आले आहेत. राज्याच्या २० ते २५ वर्षांच्या इतिहासात असा विजय कोणत्याही पक्षाचा झाला नव्हता, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सविस्तर वाचा...

19:22 (IST) 21 Dec 2025

शिंदेच्या दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग; अंबरनाथ, बदलापूरमध्ये भाजपाचे नगराध्यक्ष

Badlapur and Ambernath Nagarparishad Election Result एकनाथ शिंदे यांच्या यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदांमध्ये भाजपाने विजय मिळवला असून हा एकनाथ शिंदे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

सविस्तर वाचा...

19:20 (IST) 21 Dec 2025

Maharashtra Local Body Nagar Panchayat Election Results 2025 Live : भाजप ठरला पहिल्या क्रमांकाचा पक्ष, पण मिळालेला धडाही महत्वाचा..महायुतीची गरज अधोरेखित?

Maharashtra Local Body Nagar Panchayat Election Results 2025 Live : अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांमध्ये लढत झाली आहे.

सविस्तर वाचा...

19:20 (IST) 21 Dec 2025

भाजप ठरला पहिल्या क्रमांकाचा पक्ष, पण मिळालेला धडाही महत्वाचा..महायुतीची गरज अधोरेखित?

अनेक नगरपालिकांमध्ये महायुतीतील भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) या तीन पक्षांमध्ये लढत झाली आहे. ...वाचा सविस्तर

Nagar Panchayat Election Vote Counting

नगरपरिषदा व ४२ नगरपालिकांचा आज निकाल, मतमोजणीकडे लक्ष!, (फोटो-संग्रहित छायाचित्र)