Maharashtra Politics Crisis Updates, 11 January 2023 : मागील काही दिवसांपासून राज्यातील आमदारांच्या अपघाताची मालिकाच सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार जयकुमार गोरे, आमदार धनंजय मुंडे, आमदार योगेश कदम यांच्या कारचा अपघात झाला होता. त्यातच आता प्रहार संघटनेचे नेते, माजी मंत्री बच्चू कडू यांचा अपघात झाला आहे. रस्ता ओलांडताना दुचाकीने बच्चू कडू यांना धडक दिली आहे. या अपघातात बच्चू कडू गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, अंमलबजावणी संचालनालयाने आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या पुणे आणि कागल येथील घरांवर छापे टाकले आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेससह शिवसेनेही संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. हा विषय आज दिवसभर चर्चेत राहण्याची शक्यता आहे.

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
manipur loksabha election campaign
ना राजकीय सभा, ना पदयात्रा; संघर्षग्रस्त मणिपूरमध्ये कसा होतो आहे प्रचार?
Bene Israel Alibaug
विश्लेषण: अलिबागमधील ‘अली’ कोण होता? मुस्लीम की बेने इस्रायली?
Ganesh Naik-Subhash Bhoirs meeting is the beginning of new political equation
Maharashtra News : गणेश नाईक-सुभाष भोईर यांच्या भेटीच्या चर्चेने नव्या राजकीय समीकरणाची नांदी?
Live Updates

Mumbai Maharashtra News Updates : मराठा आरक्षण प्रकरणी सर्वपक्षीय नेत्यांची सुटका, सबळ पुराव्याअभावी केली निर्दोष मुक्तता

18:07 (IST) 11 Jan 2023
शिक्षक मतदारसंघ निवडणूक : भाजपा-शिंदे गटाला रोखण्यासाठी महाविकास आघाडीचा प्लॅन काय?

राज्यातील विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचे वेध सर्वांनाच लागले आहे. या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यासाठी आज (११ जानेवारी) महाविकास आघाडीच्या सर्व घटकपक्षांची बैठक झाली. या बैठकीत शिक्षक मतदारसंघाची निवडणूकी शिवसेना, (ठाकरे गट) राष्ट्रवादी तसेच काँग्रेस यांनी एकत्रितपणे लढण्याचा संकल्प केला आहे. वाचा सविस्तर

17:45 (IST) 11 Jan 2023
दहावी-बारावी परीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी लोकसहभागातून कृती कार्यक्रम, राज्य मंडळातर्फे पहिल्यांदाच उपक्रम

पुणे : राज्य मंडळातर्फे दहावी आणि बारावीच्या परीक्षेत होणाऱ्या गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी शिक्षक, पालक, विद्यार्थी यांच्याकडून २० जानेवारीपर्यंत ऑनलाइन पद्धतीने कृती कार्यक्रम मागवण्यात आला असून, लोकसहभागातून पहिल्यांदाच कृती कार्यक्रम तयार करण्यात येत आहे.

सविस्तर वाचा...

17:27 (IST) 11 Jan 2023
पुणे : नऊ दिवसांत निवडणूक खर्चाचा हिशेब द्या, अन्यथा पद रद्द; नवनिर्वाचित सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पुणे : ग्रामपंचायत निवडणुकीत केलेला निवडणूक खर्च पुढील नऊ दिवसांत सादर न केल्यास निवडून आलेले ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्यालयाने मंगळवारी दिला. त्यामुळे सदस्य आणि सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या ४२९३ जणांची निवडणूक खर्चाच्या हिशोबाचे आकडे जुळवताना दमछाक होत आहे.

सविस्तर वाचा...

16:55 (IST) 11 Jan 2023
पुणे : ‘महाराष्ट्र केसरी’साठी सर्वांना समान संधी, बघायला मिळतील चटकदार लढती

पुणे : राज्य अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेचे आकर्षण असलेल्या महाराष्ट्र केसरी कुस्ती गटात अव्वल कुस्तीगिरांना समान संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. या वजनी गटाच्या लढती आज संध्याकाळी सुरू होतील.

सविस्तर वाचा...

16:53 (IST) 11 Jan 2023
ठाणे जिल्ह्याचा बारवी धरणातून होणारा पाणीपुरवठा गुरुवार, शुक्रवार बंद

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून बारवी धरणातून ठाणे जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका, औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा केला जातो. या आस्थापनांचा पाणी पुरवठा गुरुवारी (ता.१२ ) रात्री १२ ते शुक्रवारी (ता.१३) रात्री १२ या कालावधीत दुरुस्तीच्या कामासाठी २४ तास बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता रमेश पाटील यांनी दिली.

सविस्तर बातमी

16:49 (IST) 11 Jan 2023
“आदित्यच्या बापाचेच पद…”, नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

पहिल्या दिवसापासून शिंदे फडणवीस सरकार घटनाबाह्य म्हणणाऱ्या आदित्यच्या बापाचेच पद घटनाबाह्य ठरत आहे, असे टीकास्त्र आमदार नितेश राणे यांनी आज सोडले. आर्वी येथे भाजपच्या मेळाव्यास आले असताना ते बोलत होते.

सविस्तर वाचा

16:28 (IST) 11 Jan 2023
पुणे : स्वस्त धान्य दुकानांसाठी दुकानदारच मिळेनात, २१८ परवाने मंजूर

पुणे : स्वस्त धान्य वितरणासाठी प्रशासनाला दुकानदार मिळत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दौंड तालुका वगळता उर्वरित १२ तालुक्यांमध्ये तब्बल २१८ ठिकाणी रास्तभाव दुकान परवाना मंजूर करण्याबाबत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. परवाना मिळविण्यासाठी ३१ जानेवारीपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सविस्तर वाचा...

16:21 (IST) 11 Jan 2023
राष्ट्रवादीत पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई?

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आणि बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यात सारे काही अलबेल असल्याचे दिसत असले, तरी पक्षांतर्गत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आहे. गेल्या आठवड्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षप्रमुख माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यापुढे तक्रारी मांडल्याने दादा आणि ताईंमधील वर्चस्ववादाला तोंड फुटले आहे.

सविस्तर वाचा

16:07 (IST) 11 Jan 2023
नागपूर : कवाडेशी युती करताना विश्वासात का घेतले नाही?; आठवले गटाचे नेते भाजपला भेटणार

पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांना बाळासाहेबांची शिवसेना पक्षामार्फत महायुतीमध्ये प्रवेश देण्यात आल्यानंतर महायुतीमध्ये सहभागी  आठवले गट नाराज झाला आहे. आठवले गटाच्या नेत्यांना विश्वासात घेतले नाही. त्यामुळे रिपाईच्या आठवले गटाचे नेते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी याबाबत चर्चा करणार आहे.

सविस्तर वाचा

16:02 (IST) 11 Jan 2023
पुणे : कोथरूडमध्ये मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू

पुणे : भरधाव मोटारीच्या धडकेने दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना कोथरूडमधील गुजरात कॉलनीत घडली. अनिकेत अशोक गायकवाड (वय २५, रा. संकुराज सोसायटी, संगम चौक, कोथरूड) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. या प्रकरणी मोटारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:44 (IST) 11 Jan 2023
नवी मुंबईच्या सुशोभिकरणाला नवी झळाळी; भित्तीचित्रे, शिल्पाकृतींची होतेय डागडुजी

नवी मुंबई : ‘स्वच्छ सर्वेक्षण २०२३’ ला सामोरे जात असताना ‘निश्चय केला – नंबर पहिला’ हे उद्दिष्ट नजरेसमोर ठेवून शहर स्वच्छतेप्रमाणेच सुशोभिकरणाच्या अधिक वेगळ्या संकल्पना राबविण्यावर भर दिला जात आहे.

सविस्तर वाचा..

15:17 (IST) 11 Jan 2023
विद्यार्थ्यांना दिलासा, केंद्रीय संस्थांतील प्रवेशासाठी ७५ टक्के गुण अनिवार्यतेबाबत एनटीएकडून अंशतः बदल

पुणे : केंद्रीय संस्थांतील अभियांत्रिकी-तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशांसाठी यंदा लागू करण्यात आलेली बारावीला ७५ टक्के अनिवार्यतेच्या अटीमध्ये अंशतः बदल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा...

15:07 (IST) 11 Jan 2023
दर तीन महिन्यांनी प्रकल्पाची माहिती अद्ययावत न करणाऱ्या विकासकावर कारवाईचा बडगा

रेरा कायद्यानुसार महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांची माहिती अद्यावत करणे विकासकांना (प्रवर्तक) बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र विकासक या नियमाचे सरार्स उल्लंघन करीत असल्याचे उघडकीस आले आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे.

सविस्तर वाचा

14:56 (IST) 11 Jan 2023
पुणे : मैत्रिणीवर चाकू हल्ला करणाऱ्या तरुणाला जन्मठेप, सात वर्षांपूर्वीची घटना

पुणे : मैत्रिणीवर वादातून चाकूने वार करून तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. बी. हेडाऊ यांनी तरुणाला जन्मठेप आणि एक लाख रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

सविस्तर वाचा...

14:48 (IST) 11 Jan 2023
नागपूर : जिल्हा न्यायालयात पोलिसाने वकिलाचे तोंड फोडले

नागपूर जिल्हा न्यायालयाच्या परिसरात अनेक विषयांवरून वाद होणे नवीन नाही. मात्र, बुधवारी अचानक एक पोलीस अधिकारी आणि वकिलामध्ये चांगलीच बाचाबाची झाली असून पोलीस अधिकाऱ्याकडून वकिलाला मारहाण करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हा न्यायालय परिसरात वकिलांची मोठी गर्दी असते.

सविस्तर वाचा

14:37 (IST) 11 Jan 2023
नवी मुंबईत डान्सबार नव्हे ऑर्केस्ट्रा बार चालवा – पोलीस आयुक्तांचे आदेश

पनवेल : नवी मुंबईत ऑर्केस्ट्रा बारच्या नावाखाली अवैधपणे डान्सबार चालवले जातात. अवैध बारसंस्कृतीवर आळा बसविण्यासाठी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांनी कंबर कसली आहे. वेळोवेळी कारवाई करूनही बिभस्त आणि अश्लील चाळे बारमध्ये थांबणार नसल्यास आयुक्तांकडून अशा बारचे परवाने रद्द करण्याच्या हालचाली सूरू झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

14:09 (IST) 11 Jan 2023
सशस्त्र दलात मराठी मुलींचा टक्का वाढणार, नाशिकमध्ये मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था

नाशिक – सशस्त्र दलात राज्यातील मुलींचे प्रतिनिधित्व वाढविण्यासाठी राज्य सरकारने नाशिक येथे मुलींसाठी सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था स्थापण्यास मान्यता दिली आहे. औरंगाबाद येथील मुलांच्या सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्थेच्या अंतर्गत ही संस्था कार्यरत असेल.

सविस्तर वाचा...

14:04 (IST) 11 Jan 2023
बुलढाणा: विहिरीत पडलेल्या मुलीला वाचवण्यासाठी आईने थेट विहिरीत मारली उडी, परंतु...

मुलगी पाण्यात खोलवर बुडत असल्याचे पाहून कुठलाही विचार न त्यांनी थेट विहिरीत उडी घेतली. मात्र, पाणी खोल असल्यामुळे त्या पाण्याच्या तळाशी गेल्या. यात त्यांचा बुडून मृत्यू झाला. मुलगी आकांशाने विहिरीतील पाली पकडून ठेवल्याने ती सुदैवाने वाचली.

सविस्तर वाचा

13:53 (IST) 11 Jan 2023
नागपूर : निर्दयी बापाने फरशीवर फेकलेल्या चिमुकल्याचा अखेर मृत्यू

निष्ठूर पित्याने ३१ डिसेंबर २०२२ रोजी चिमुकल्याचा खून करण्याचा प्रयत्नात मेडिकलच्या वार्डात फरशीवर फेकले होते. त्यानंतर हा आरोपी तेथून पसार झाला होता. परंतु पोलिसांनी त्याला नंतर शिताफीने अटक केली. दरम्यान वार्डातील डॉक्टर-परिचारिकांनी चिमुकल्याला नवजात शिशूंच्या अतिदक्षता विभागात हलवले.

सविस्तर वाचा

13:51 (IST) 11 Jan 2023
पुणे : मनसे नेते वसंत मोरेंच्या पुढाकाराने ‘फुलराणी’ पुन्हा धावणार

पुणे : राजकीय अनास्थेमुळे गेल्या पाच वर्षांपासून बंद असलेली कात्रज उद्यानातील फुलराणी लवकरच सुरू होणार आहे. फुलराणी सुरू करण्यासाठी मनसे नेते वसंत मोरे यांनी पुढाकार घेतला असून फुलराणीची कामे सुरू झाली आहेत. येत्या २६ जानेवारीपासून फुलराणी सुरू करण्याचा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला आहे.

सविस्तर वाचा...

13:43 (IST) 11 Jan 2023
मुलगा रिसोडचा तर मुलगी बिहारची; सिल्वासा येथे जुळले प्रेमाचे तार, पण लग्नबेडीत अडकण्याऐवजी पोलीसांच्या बेडीत अडकले

१० जानेवारी रोजी पोलीस दोघांनाही घेऊन सिल्वासाला गेले. रिसोड शहरातील बसस्थानक परिसरातील एक तरुण दमणच्या सिल्वासा येथे मजुरीच्या कामासाठी गेला होता. तिथे एका कंपनीत काम करताना उत्तर प्रदेशातील मुलीच्या प्रेमात पडला. दोघांचे प्रेम प्रकरण वर्षभर चांगलेच बहरले.

सविस्तर वाचा

13:21 (IST) 11 Jan 2023
पुण्याच्या मावळमध्ये यात्रेत गावगुंडाचा हवेत गोळीबार; पोलिसांनी ठोकल्या बेड्या, दारूच्या नशेत कृत्य

पुणे : मावळमधील चांदखेड येथे भर दिवसा हवेत गोळीबार केल्याने एकच गोंधळ उडाला. गावात दहशत निर्माण करण्याच्या हेतूने दारूच्या नशेत असलेल्या अविनाश गोठे याने हा गोळीबार केला.

सविस्तर वाचा...

13:07 (IST) 11 Jan 2023
डोंबिवलीत कौटुंबिक वादातून कामगाराचे लिंग छाटले

डोंबिवली जवळील गोळवली गावात एमआयडीसीतील एका कंपनीत काम करणाऱ्या काम करणाऱ्या कामगाराचे लिंग त्याच्याच साथीदारांनी मंगळवारी रात्री कापून कामगाराला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. रात्रीच्या वेळेत मद्यपान केल्यानंतर हा प्रकार घडला, असे मानपाडा पोलिसांनी सांगितले.

सविस्तर वाचा

12:50 (IST) 11 Jan 2023
नागपूरमध्ये ‘शिक्षक’ मतदारसंघात भाजपचा उमेदवार नाहीच, परिषदेच्या गाणार यांना पाठिंबा

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडून जाहीर झाल्यापासून भाजप यावेळी या मतदारसंघातून उमेदवार देणार का याबाबत असलेली उत्सुकता खेर बुधवारी संपली. भाजपने या जागेवर उमेदवार न देता शिक्षक परिषदेचे उमेदवार व विद्यमान आमदार नागो गाणार यांना पाठिंबा दिला.

सविस्तर वाचा

12:45 (IST) 11 Jan 2023
नागपूर : अशोक चव्हाणांच्या अनुपस्थितीची चर्चा

काँग्रेसचे वरिष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीला अनुपस्थित राहल्याची चर्चा राजकीय वर्तुळात अधिक होती. प्रथमच मुंबई बाहेर प्रदेश काँग्रेस कार्यकारिची बैठक आयोजित करण्यात आली.

सविस्तर वाचा

12:27 (IST) 11 Jan 2023
चंद्रपूर : जमिनीच्या वादामुळे वैतागलेल्या शेतकऱ्याचा पोलीस ठाण्यात आत्महत्येचा प्रयत्न

शिवाजीच्या वडिलांनी त्यांचे नातेवाईक सोपान करेवाड यांच्या नावावर जमीन भाडेपट्ट्याने घेतली होती, कालांतराने त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई व पाच भाऊ त्या जमिनीचे वारसदारआहेत. त्यांच्या शेतीलगत विश्वनाथ आमनेर ह्यांची शेती आहे. आमनेर हे करेवाड ह्यांच्या शेतावर कब्जा करण्याच्या प्रयत्नात असून त्यासाठी ते नेहमीच त्रास देतात व भांडण उकरून काढत असतात.

सविस्तर वाचा

12:24 (IST) 11 Jan 2023
अकोला : वंचित बहुजन आघाडी पदवीधरच्या मैदानात; अमरावती विभागात प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना उमेदवारी

विधान परिषदेच्या अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या मैदानात वंचित बहुजन आघाडी उतरली आहे. वंचितने खामगाव येथील प्रा. डॉ. अनिल अमलकार यांना उमेदवारी जाहीर केली. वंचित आघाडीने उमेदवार दिल्याने निवडणुकीतील रंगत वाढण्याची चिन्हे आहेत.

सविस्तर वाचा

12:23 (IST) 11 Jan 2023
भंडारा : उपाध्यक्ष निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी!, काकूचा पराभव करून पुतण्या विजयी

मोहाडी नगरपंचायत उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना रंगल्याने राष्ट्रवादीमधील बंडखोरी पुन्हा चर्चेत आली आहे.  दरम्यान, पुतण्याने काकुचा पराभव करून विजयश्री खेचून आणली आहे.

सविस्तर वाचा

12:18 (IST) 11 Jan 2023
‘१०८’ रुग्णवाहिकेने नऊ वर्षांत वाचवले ८१ लाखांहून अधिक रुग्णांचे प्राण, राज्यातील ३८,४६४ बाळांचा जन्म रुग्णवाहिकेत

पुणे : राज्यातील रुग्णांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ वैद्यकीय उपचार देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘१०८ रुग्णवाहिके’मुळे गेल्या नऊ वर्षांमध्ये राज्यातील लाखो रुग्णांना जीवदान मिळाले आहे. २०१४ ते २०२२ या कालावधीत राज्यातील ८१ लाख ५२ हजार १८१ नागरिकांना १०८ रुग्णवाहिका सेवेचा उपयोग झाला आहे. हृदयविकाराचे रुग्ण, अपघातग्रस्त व्यक्ती ते गर्भवती महिला अशा अनेकांचा यामध्ये समावेश आहे.

सविस्तर वाचा...

12:12 (IST) 11 Jan 2023
शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या निर्णयाआधीच ठाकरे गटाच्या उमेदवाराचा अर्ज

विधान परिषदेच्या नागपूर विभाग शिक्षक मतदार संघात उमेदवार द्यायचा किंवा अपक्षला पाठिंबा द्यायचा याबाबत कॉंग्रेसने अद्याप निर्णय घेतला नाही. मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्ष शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवाराने अर्ज दाखल करून कॉंग्रेसवर एकप्रकारे मात केली आहे.

सविस्तर वाचा

12:05 (IST) 11 Jan 2023
नागपूर : प्रदेश कार्यकारिणीला गैरहजर राहणाऱ्यांना कॉंग्रेस बजावणार नोटीस

काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षशिस्त निर्माण करण्यासाठी आणि पक्ष संघटना बळकट करण्यासाठी कठोर निर्णय घेण्याचे सुतोवाच केले आहे. त्याच धोरणानुसार प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रदेश कार्यकारिणीतील बेशिस्त पदाधिकाऱ्यांवर कारवाईचा इशारा दिला आहे.

सविस्तर वाचा

12:01 (IST) 11 Jan 2023
“पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर सावधान…”, काँग्रेसमध्ये लवकरच मोठ्या बदलांचे नाना पटोलेंचे संकेत

पक्ष चालवताना सर्वांना सोबत घेऊन काम करावेच लागते. आमचीही तशीच तयारी आहे. पण, पक्षहिताला कुणी बाधा पोहचवत असेल तर नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन यांच्या निर्देशानुसार कठोर पावले उचलली जातील. त्यातंर्गत प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल लवकरच दिसून येतील, अशी माहिती काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.

सविस्तर वाचा

11:57 (IST) 11 Jan 2023
भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी?, वादामुळे वरिष्ठही नाराज

अभिनेत्री उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून आक्षेप घेत भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी सुरू केलेला वाद वरिष्ठ नेत्यांना फारसा रुचलेला नसल्याने त्यांनी वाघ यांचे समर्थन केलेले नाही. पोलिस उर्फीला अटक का करीत नाहीत, असा जाहीर आक्षेप वाघ यांनी घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गृहखात्याला लक्ष्य केल्याने वाघ या पक्षात एकाकी पडल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

सविस्तर वाचा

11:56 (IST) 11 Jan 2023
Hasan Mushrif ED Raid : मोठी बातमी! राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्या कागल आणि पुण्यातील घरावर ईडीची छापेमारी

NCP Hasan Mushrif ED Raid : महाविकास आघाडी सरकार सत्तेतून पायउतार झाल्यानंतर मोठी घडामोड घडत आहे. सत्तांतर झाल्यावर अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकली आहे. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आल्याची माहिती मिळत आहे. याची माहिती मिळत कागल येथील घराबाहेर मुश्रीफ यांच्या समर्थकांनी एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. सविस्तर वाचा

11:56 (IST) 11 Jan 2023
हसन मुश्रीफ यांच्या कारवाईवरुन सुप्रिया सुळेंची सरकारवर टीका

अंमलबजावणी संचालनालयाने (ED) राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर धाड टाकल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी या कारवाईवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. ही अशी कटकारस्थाने कारण्यापेक्षा तुम्ही महाराष्ट्राचा विकास, बेरोजगारी आणि महागाई यावर लक्षं दिलं तर मायबाप महाराष्ट्राच्या जनतेचं भलं होईल, अशी टीका त्यांनी केली. वाचा सविस्तर वृत्त

11:55 (IST) 11 Jan 2023
Hasan Mushrif ED Raid : कागल आणि पुण्यातील घरांवर ईडीची छापेमारी; हसन मुश्रीफांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

NCP Hasan Mushrif ED Raid : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज सकाळी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर छापे टाकले आहेत. कागल आणि पुण्यातील घरांवर ही करावाई करण्यात आली. दरम्यान, यासंदर्भात हसन मुश्रीफ यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. तसेच त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहनही केलं आहे. सविस्तर वाचा

11:54 (IST) 11 Jan 2023
“सत्तेविरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे छापे पडतात”; हसन मुश्रीफांवरील कारवाईवरून संजय राऊतांचं टीकास्र; म्हणाले, “भाजपा नेते…”

अंमलबजावणी संचालनालयाने ( ईडी ) राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरांवर आज सकाळी छापे टाकले. कागल आणि पुण्यातील घरांवर हे छापे टाकण्यात आले. दरम्यान, यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भाजपावर टीकास्र सोडले. जो व्यक्ती सत्ताधाऱ्यांविरोधात बोलतो, त्यांच्यावर तपास यंत्रणांचे छापे पडतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. सविस्तर वाचा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी २०१६ मध्ये मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. त्यात सहभागी झाल्याप्रकरणी नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यातून सहा पक्षातील नेत्यांची गिरगाव दंडाधिकाऱ्यांनी मंगळवारी पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली.