Top Marathi News Updates: राज्यात सर्वदूर मोठा पाऊस कोसळत आहे. ठिकठिकाणी जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे. भारतीय हवामान विभागानं आजही राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे. आजही काही जिल्ह्यांमध्ये शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली. पुण्यातील भिडे पूल पाण्याखाली गेला आहे. मध्य रेल्वेचा सलग चौथ्या दिवशी खोळंबा झाला. आज सकाळी कर्जत-बदलापूरच्या दरम्यान लोकल वाहतूक विस्कळीत झाली होती.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर आणि परिचारिकांना झालेल्या मारहाण प्रकरणामुळे सध्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
तर दुसरीकडे शरद पवारांचा पक्ष भाजपसोबत किंवा महायुतीत जाणार का? अशा चर्चा रंगल्या असतानाच, देवेंद्र फडणवीस यांनी काल दिल्लीतून या चर्चांवर अत्यंत महत्त्वाचे विधान केले आहे. “शरद पवारांच्या पक्षाचे आमदार किंवा खासदार फोडण्याचा आमचा कोणताही प्रयत्न नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी या संभाव्य पक्षफुटीच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. आज सकाळी सचिन अहीर यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. आज शरद पवार हे विधिमंडळ परिसरात उपस्थित राहणार आहेत.
एकीकडं नैसर्गिक आपत्तीने राज्याला घेरलं असताना, दुसरीकडे मुंबईत सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात याचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. राज्यातील विविध भागांत झालेल्या दुर्घटना, मुंबई-पुण्यातील वाहतूक कोंडी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यांवरून विरोधक आज सत्ताधाऱ्यांना धारेवर धरण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे आज विधिमंडळात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळू शकते.
राज्यातील पावसाचे आणि राजकीय घडामोडींचे प्रत्येक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी वाचत राहा आमचा हा ‘महाराष्ट्र लाईव्ह ब्लॉग’…
Mumbai Pune Thane Live News Updates, 8 July 2026 | वाचा लाईव्ह अपडेट्स
उल्हास नदीच्या पाणी पातळीने धाकधूक वाढवली, दिवसभर पाणी इशारा पातळीवर, सखल भागात पाणी
महावितरणच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा मोर्चा ; अघोषित भारनियमन व वाढीव देयके रद्द करा- खासदार लंके
सोलापूरमधील ४० वर्षीय रुग्णाच्या खुब्याच्या सांधा बदलीची जी. टी. रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया
मुलुंडमध्ये ११ व १२ जुलै रोजी गिरिमित्र संमेलन ; सियाचीनच्या वीरांसोबत अनुभवता येणार युद्धभूमीवरील गिर्यारोहणाचा रोमांच
नायगाव बीडीडी पुनर्विकास : पाणीटंचाईने त्रस्त रहिवासी अखेर रस्त्यावर ; मुबलक पाणीपुरवठा करा, अन्यथा काम बंद पाडू; रहिवाशांचा इशारा
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजेवर गदा, जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागणार; जाणून घ्या कारण काय?
कल्याण अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात शहापूरचा समावेश करा; खासदार सुरेश म्हात्रेंची मागणी
अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या रजेवर गदा, जिल्हाधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी लागणार; जाणून घ्या कारण काय?
नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या संरक्षणातील पोलिसाला बडतर्फ करण्याची जोरदार मागणी, कडोंमपाच्या सुरक्षा रक्षकांना म्हात्रेंच्या अंगरक्षकांची दादागिरी
चव्हाणांपासून दूर राहिलेले माधवराव आता ‘जवळ’ आले! किशोर स्वामी यांच्या ‘शेत निवासा’त चर्चा
एसटीची ४१० कोटींची मागणी; अर्थ खात्याकडून अवघे ४५ कोटी
पूर परिस्थितीत सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रात झाल्या दोन अवघड प्रसूती, माता बालक सुखरूप
"पोलिसांनो, नगरसेवक रमेश म्हात्रे यांची कपडे काढून धिंड काढा", आमदार रोहित पवार यांची पोलिसांना सूचना
पूरमय स्थिती असूनही इचलकरंजी तहानलेलीच; पाणीपुरवठ्यावर विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील यांचा संताप
भांडुपमध्ये बेस्टचा विचित्र अपघात
वसई विरारकरांची ट्रॅक्टरवारी सुरूच , सलग पाचव्या दिवशी ट्रॅक्टरने प्रवास
PCMC Moshi Building Collapse : मोशी कचरा डेपोत मोठी दुर्घटना! कचऱ्याचा डोंगर इमारतीवर कोसळला; १५ जण अडकल्याची भीती
पावसाच्या तडाख्यामुळे वसई लोहमार्ग पोलीस ठाणे बंद
दि. बा. पाटील नामकरणासाठी नेत्यांना ताब्यात घेतल्यावर प्रकल्पग्रस्त सानपाडा येथील शिवमंदीरात जमले
ठाण्यातील सॅटीस पुलावरील पादचारी मार्गाचे छत गायब; भर पावसात प्रवाशांचे हाल
पाण्याचा निचरा करण्यासाठी पालिका आयुक्तांचा नाल्यात हात
मुंबई, ठाणे आणि रायगडला आज ‘ऑरेंज अलर्ट’, तर पालघरला पुन्हा ‘रेड अलर्ट’; पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज
पुराच्या पाण्यामुळे नागरिकांची अन्नान दशा; बहुतांश भागात ऑनलाईन सेवाही ठप्प
शिक्षण विभागाकडून वेतन कपातीचा इशारा! नेमके प्रकरण काय?
बेदम मारहाणीनंतर रमेश म्हात्रेंचा जाहीर माफीनामा, "ती डाॅक्टर तरूणी माझ्या मुलीसारखी"...
बीबीए,बीबीएम, बीसीए आणि बीएफए प्रवेशाला सुरुवात; ई-पडताळणी आणि प्रत्यक्ष पडताळणीची सुविधा
मध्य रेल्वेकडून ८० हजार प्रवाशांना सुमारे ६ कोटींचा परतावा; कर्जत - लोणावळा दरड दुर्घटनेनंतर प्रवाशांना परतावा दिला
VIDEO: "...म्हणूनच आम्ही 'दादां'ना फोन केला"; डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालय राडा प्रकरणात रुग्णाच्या आईनं काय सांगितलं?
मैदानात साचलेल्या पाण्यात पोहणे जीवावर बेतले , १३ वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू

महाराष्ट्र न्यूज लाइव्ह अपडेट्स| महाराष्ट्र मान्सून अपडेट्स
