उद्धव ठाकरे यांनी काल रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे जाहीर सभा घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी चौफेर टोलेबाजी करत भाजपा-शिंदे गटावर निशाणा साधला आहे. त्यांच्या या सभेनंतर आता विविध राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रशेखर बावनकुळे यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. याशिवाय आज होळी आहे. यासंदर्भातील बातम्यांवरही आज दिवसभर नजर असणार आहे.

Live Updates

Marathi News Live Updates : “उद्धव ठाकरेंची खेडमधली सभा म्हणजे मला पाहा आणि फुलं…” भाजपाची टीका

18:23 (IST) 6 Mar 2023
‘‘समस्या काय सोडवणार, सरकारच एक…’’; अकोल्यात कांद्याची होळी, शेतकरी संघटना आक्रमक

सरकारी धोरणामुळे कांद्याचे भाव पडल्याचा आरोप करून शेतकरी संघटने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयापुढे कांद्याची होळी पेटवली. ‘सरकार समस्या काय सोडवणार, सरकारच एक समस्या’ अशा घोषणा देऊन शेतकरी संघटनेने निषेध केला.

सविस्तर वाचा

18:00 (IST) 6 Mar 2023
ठाकरे गटाकडून सांगलीत विधानसभा विजयाचे लक्ष्य, मात्र संघटना बांधणीचे काय?

खासदार संजय राऊत यांनी खानापूर आटपाडीसह सांगली, मिरजेतील पुढचे आमदार शिवसेनेचेच म्हणजे ठाकरे गटाचेच असतील असा निर्धार सांगली येथील शिवगर्जना यात्रेत व्यक्त केला. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थामध्येही या गटाची ताकद अद्याप म्हणावी तशी दिसलेली नाही.

सविस्तर वाचा

17:45 (IST) 6 Mar 2023
“खेडमधील सभेचा शिवसेनेला नाही, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला…” चंद्रशेखर बावनकुळेंची उद्धव ठाकरेंवर टीका

चंद्रशेखर बावनकुळे सोमवारी दुपारी नागपुरात प्रसार माध्यमांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याकडे उरलेले जे नगसेवक, लोकप्रतिनिधी, शाखाप्रमुख व कार्यकर्ते आहेत ते शिंदे यांच्याकडे जाऊ नये यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू आहे.

सविस्तर वाचा

17:44 (IST) 6 Mar 2023
समृद्धी महामार्गावरील अपघातसत्र थांबेना; भरधाव फॉर्च्युनर कठड्याला धडकली, दोन जखमी

हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील वनोजा इंटरचेंजपासून ७ किमी अंतरावर संभाजीनगर येथून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव फॉर्च्यूनरची (क्र.जी.जे.२७ के.८२७१) कठड्याला धडक बसली. ही घटना आज ६ मार्च रोजी घडली.

सविस्तर वाचा

17:31 (IST) 6 Mar 2023
''पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा, मात्र...''; २०२४ च्या निवडणुकीबाबत संजय राऊतांचं विधान

राष्ट्रीय राजकारणात ठाकरेंचा सहभाग महत्त्वाचा आहे. संकट आलं की उद्धव ठाकरे लढतात. २०२४ च्या निवडणुकीसाठी विरोधकांना एकत्र करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंकडून सुरू आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली आहे. दरम्यान २०२४ च्या निवडणुकीत उद्धव ठाकरे हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील का? असं विचारलं असता, पंतप्रधान पदासाठी उद्धव ठाकरे उत्तम चेहरा आहेत. मात्र, २०२४ कोण होईल यापेक्षा विरोधकांनी एकत्र येणं गरजेचं आहे, असे ते म्हणाले.

16:36 (IST) 6 Mar 2023
सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांतील भरतीप्रक्रिया: तृतीयपंथीयांसाठीही आता स्वतंत्र पर्याय

सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांतील भरतीप्रक्रियेत यापुढे स्त्री-पुरुषांप्रमाणे तृतीयपंथीयांसाठीही स्वतंत्र पर्याय उपलब्ध केला जाणार आहे. त्याबाबतचा शासननिर्णय आठवड्याभरात काढण्यात येईल, अशी माहिती राज्याचे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी सोमवारी उच्च न्यायालयात दिली.

सविस्तर वाचा

16:36 (IST) 6 Mar 2023
अमरावती‎ : ग्रामगीतेने कनकेश्‍वरी देवीची तुला; गुरूदेवभक्‍तांचा आक्षेप

बडनेरा येथील मैदानावर मॉं कनकेश्‍वरी देवी जनकल्‍याण ट्रस्‍टतर्फे आयोजित रामचरित मानस कथागंगा संमेलनात कनकेश्‍वरी देवी यांची ग्रामगीतेने तुला करण्‍याच्‍या प्रकारानंतर वाद उफाळून आला असून या घटनेबद्दल राष्‍ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्‍या अनुयायांनी निषेध व्‍यक्‍त केला आहे. 

सविस्तर वाचा

16:35 (IST) 6 Mar 2023
शरद पवारांनी २५ वर्षांनी घेतलं संत तुकाराम महाराजांचं दर्शन

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी २५ वर्षांनी जगतगुरु संत तुकोबांचे मुख्य मंदिरात येऊन दर्शन घेतलं. यावेळी देहू संस्थानकडून तुकोबांची मूर्ती, पगडी आणि पुष्पगुच्छ देऊन शरद पवार यांचा सत्कार करण्यात आला.

16:33 (IST) 6 Mar 2023
यवतमाळ : एकाच दिवशी तीन मृतदेह आढळल्याने खळबळ

उमरखेड येथील बाळदी मार्गावर आयटीआय महाविद्यालयाच्या मागे झाडींमध्ये तरूणाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. गोपाल सुधाकर मिरासे (२५, रा. बाळदी) असे मृताचे नाव आहे. १ मार्चपासून तो बेपत्ता होता. त्यामुळे त्याच्या कुटुंबियांनी पोलिसांत तक्रार दिली होती.

सविस्तर वाचा

16:19 (IST) 6 Mar 2023
तपास यंत्रणांचा वापर करणं ही काँग्रेसची संस्कृती, जेव्हा-जेव्हा...''; चंद्रशेखर बावनकुळेंचं अशोक चव्हाणांना प्रत्युत्तर

केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात बोललं की ईडी-सीबीआयच्या चौकश्या लागतात, अशी टीका काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तपास यंत्रणांचा वापर करणं ही काँग्रेसची संस्कृती आहे. जेव्हा-जेव्हा ही देशात काँग्रेसचं सरकार होतं. तेव्हा सीबीआय, ईडीचा वापर जाणीवपूर्वक करण्यात आला, असे ते म्हणाले.

15:48 (IST) 6 Mar 2023
आमदार अश्विनी जगताप अ‍ॅक्शन मोडमध्ये! रुग्णालयाला दिली अचानक भेट; रुग्णांच्या तक्रारी ऐकून अधिकाऱ्यांना धरले धारेवर

भाजपाच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी आज औंध जिल्हा रुग्णालयाला अचानक भेट दिली. जगताप यांनी रुग्णालयाची पाहणी करून रुग्णांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. संबंधित अधिकारी आणि डॉक्टरांना अश्विनी जगताप यांनी तंबी देत धारेवर धरले. अश्विनी या नुकतेच झालेल्या चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झाल्या आहेत.

सविस्तर वाचा...

15:32 (IST) 6 Mar 2023
उद्धव ठाकरे हे स्वत: भाजपाच्या मदतीने निवडून आले, अन्...- राधाकृष्ण विखे पाटलांची टीका

भाजपात पूर्वी साधू होते, आता संधीसाधू आहेत, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी रविवारी खेड येथे झालेल्या सभेत केली होती. त्यांच्या या टीकेला राज्याचे महसूल मंत्री तथा भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरे हे स्वत: भाजपाच्या मदतीने निवडून आले. एवढच नाही तर आदित्य ठाकरे यांनाही त्यांनी आमदार केलं. तेव्हा तुम्हाला शिवसैनिक आठवला नाही का? त्यामुळे संधीसाधू तुम्ही आहात, असं ते म्हणाले.

14:09 (IST) 6 Mar 2023
शरद पवार यांनी कसब्याच्या निकालाचा अभ्यास करावा - चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवार यांनी कसब्याच्या निकालाचा अभ्यास करावा, अशा सल्ला चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच कसब्यातील विजय हा धंगेकरांचा आहे, महाविकास आघाडीचा नाही, अशी टीकाही त्यांनी केली.

14:00 (IST) 6 Mar 2023
कापसाच्या भावात अस्थिरता; उत्पादक शेतकरी संभ्रमात

अकोला : पश्चिम विदर्भात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सध्या कापसाच्या भावात अस्थिरता असून दर कमी-जास्त होत आहेत. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी कापूस विकावा की साठवून ठेवावा, या संम्रमात आहे.

वाचा सविस्तर...

13:57 (IST) 6 Mar 2023
सराफा व्यापारी पोहचले पटोलेंच्या घरी, स्वीय सहाय्यकाची केली तक्रार

नागपूर: प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या नागपुरातील घरी आज सकाळी नितीन साळवे हे सराफा व्यापारी पोहचले. त्याने पटोले यांचे स्वीय सहाय्यक उमेश डांगे यांनी फसवणूक केल्याची तक्रार केली.

वाचा सविस्तर...

13:44 (IST) 6 Mar 2023
पुणे : पीएमपी ठेकेदारांचा संप सुरूच ; होळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांना फटका

थकीत रक्कम मिळावी, या मागणीसाठी पीएमपीने भाडेकरार केलेल्या खासगी ठेकेदारांनी पुकरलेला संप सोमवारी कायम राहिला. पीएमपी प्रशासन आणि ठेकेदार यांच्यातील प्राथमिक चर्चा निष्फळ ठरली. सविस्तर वाचा…

13:43 (IST) 6 Mar 2023
पुणे : खबऱ्याला पोलीस हवालदाराकडून शिवीगाळ; निलंबनाचे आदेश

खबरे म्हणजे पोलिसांचे नाक, कान, डोळे. खबऱ्यांच्या माहितीवर पोलीस गु्न्हेगारांचा शोध घेतात. खबऱ्याने दुसऱ्या पोलिसाला माहिती दिल्याने पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेतील एका पोलीस हवालदाराने त्याला शिवीगाळ करुन धमकावल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

सविस्तर वाचा…

13:41 (IST) 6 Mar 2023
धक्कादायक! ‌अल्पवयीन मुलीने ‘यू-ट्यूब’वर बघून स्वत:चीच केली प्रसूती, त्यानंतर बाळाला…

शालेय वयात असतानाच तिचे वस्तीतील युवकाशी सूत जुळले. त्याने तिला दारू, सिगारेटचे व्यसन लावले. त्याच्या प्रेमात वेड्या झालेल्या मुलीने त्याच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यातून ती गर्भवती राहिली. डॉक्टरकडे जाण्याऐवजी तिने कुटुंबीयांपासून ही बाब लपवून ठेवली. सविस्तर वाचा…

13:39 (IST) 6 Mar 2023
“चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल काय बोलायचे, तुम्ही शहाण्या माणसांबद्दल विचारा…” शरद पवारांचा पत्रकारांना सल्ला

शहाण्या माणसाबद्दल विचारा, असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी पत्रकारांचा प्रश्न उडवून लावतानाच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबाबत बोलणार नसल्याचे स्पष्ट केले. कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोमवारी शरद पवार यांची भेट घेतली. सविस्तर वाचा…

13:32 (IST) 6 Mar 2023
दर्यावरी रं साजरी होळी रं…! मच्छिमार बांधवांनी भर समुद्रात साजरा केला होळी उत्सव

उरण: होळीच्या निमित्ताने सोमवारी रेवस-करंजा खाडीत मच्छिमारांनी आपल्या बोटी(होड्या)सजवून त्यांची विधिवत पूजा करून भर समुद्रात आनंदात होळी साजरी केली. यावेळी मच्छिमारांनी आपल्या बोटी पताका आणि नव्या साड्यांनी सजविल्या होत्या.

सविस्तर वाचा....

13:22 (IST) 6 Mar 2023
१० कोटींच्या कर्जासाठी ३६ लाख ६६ हजार रुपये गमावले; चारजणांविरोधात गुन्हा

नवी मुंबई : आयात निर्यातचा व्यवसाय वाढवण्यासाठी १० कोटींचे कर्ज थेट लंडनमधील बँकेतून काढण्यासाठी ३६ लाख ६६ हजार ५ रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कर्जातील काही रक्कम स्वतःसाठी ठेऊन उर्वरित रक्कम मित्राच्या व्यवसायासाठी, असे एकत्रित कर्ज काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली ही फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

सविस्तर वाचा...

13:08 (IST) 6 Mar 2023
कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले - आशिष शेलार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावून ज्यांनी महाराष्ट्रात मते मिळवली आणि नंतर गद्दारी केली. तेच आज आम्हाला मोदींच्या फोटोवरून आव्हान देतात? कोकणात शिमगा असल्याने जनता फारसे गांभीर्याने घेणार नाही. कालच्या सभेतील सोंगांनी आणि बोंबा मारायच्या कार्यक्रमाने मनोरंजन झाले.आधे इधर गए... आधे उधर गए.. अकेले 'असरानी' बच गये. आता महाराष्ट्रात 'असरानी' जिथे जिथे फिरतील तिथे तुफान मनोरंजन होईल, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी केली आहे.

https://twitter.com/ShelarAshish/status/1632635314618658818?s=20

12:33 (IST) 6 Mar 2023
“हा चिपळूनचा लांडगा…”, 'तात्या विंचू' म्हणणाऱ्या भास्कर जाधवांना रामदास कदमांचा प्रत्युत्तर

रामदास कदम हा 'झपाटलेला' सिनेमातला तात्या विंचू आहे. तो रोज सांगतो की आदित्य ठाकरेंनी माझं खातं पळवलं. पण याला साधं पर्यावरणही म्हणता येत नाही. तो पर्यावरणला पऱ्यावरण म्हणतो, अशी टीका ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी रविवारी खेडच्या सभेत बोलताना केली होती. या टीकेला रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आज खेडमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सविस्तर वाचा

12:32 (IST) 6 Mar 2023
“मोदी, फडणवीस यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी”; ईडी कारवाईवरून पटोलेंची टीका

नागपूर : भाजपा राजकीय विरोधकांविरोधात केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग करीत आहे. भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर तपास थांबवण्यात येतो, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली होती. त्यावर फडणवीस यांनी हे आरोप फेटळून लावले होते. त्यानंतर नाना पटोले यांनी भाजपा नेतृत्वावर ईडी कारवाईवरून टीका केली आहे.

सविस्तर वाचा...

12:19 (IST) 6 Mar 2023
औरंगजेबाची कबर संभाजीनगरमधून हटवा; आमदार संजय शिरसाट यांची मागणी

औरंगजेब आणि या शहराचा काहीही संबंध नव्हता. औरंगजेब येथे येऊन गेला असेल, पण त्याचा मृत्यू इथे झाला नाही. त्यामुळे त्याची कबर हटवलीच पाहिजे, अशी मागणी संजय शिरसाट यांनी केली आहे.

12:00 (IST) 6 Mar 2023
पुणेकरांच्या समस्या विधानसभेत मांडणार - रविंद्र धंगेकर

पुणेकरांच्या समस्या विधानसभेत मांडणार. पुण्यात आज लोक राहायला तयार नाहीत, अशी परिस्थिती आहे, अशी प्रतिक्रिया कसब्याचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर यांनी दिली.

11:29 (IST) 6 Mar 2023
नाशिकमधील शेतकऱ्यांकडून कांद्याची होळी; सरकार शेतकऱ्यांकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोप

नाशिकमध्ये कांद्या उत्पादक शेतकरी आक्रमक झाले आहेत. कांद्याला भाव मिळत नसल्याचं म्हणत संतप्त शेतकऱ्यांनी कांद्याच्या पीकाला आग लावली. सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे दुर्लेक्ष करत असल्याचा आरोपही या शेतकऱ्यांनी केला.

11:09 (IST) 6 Mar 2023
बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही - रामदास कदम

उद्धव ठाकरेंच्या कालच्या सभेला बाहेरून माणसं आली होती. त्यांच्या कालच्या तमाशाला १९ तारखेला उत्तर देईन. माझ्या नादाला लागू नका, शिवसेना आमची आहे. बाळासाहेबांचं नाव घेण्याचा अधिकार तुम्हाला नाही. - रामदास कदम

11:06 (IST) 6 Mar 2023
खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला - रामदास कदम

खेडमध्ये काल राजकीय शिमगा झाला. शिवसेना उद्धव ठाकरे खासगी कंपनी बनवून ठेवली होती. ते शिवसैनिक, आमदार, खासदारांना नौकर समजतात. - रामदास कदम

11:01 (IST) 6 Mar 2023
उद्धव ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत - रामदास कदम

उद्धव ठाकरे १०० वेळा खेडमध्ये आले तरी, योगश कदमांना पाडू शकणार नाहीत. खोके तुम्ही घेतले आम्ही नाही. भ्रष्टाचाऱ्यांच्या हातात धनुष्यबाण देऊ शकत नाही. मुख्यमंत्र्यांना हासडायची भाषा ठाकरेंना शोभत नाही. - रामदास कदम

उद्धव ठाकरेंची खेडमधली सभा म्हणजे मला पाहा आणि फुलं वाहा अशीच होती. त्या सभेत निवडणूक आयोगाला वाईट ठरवलं गेलं कारण त्यांनी योग्य निकाल दिला. आमदारकीसाठी भाजपाने मदत केली भाजपा वाईट. माझं बरोबर आणि मीच चांगला हे उद्धव ठाकरेंचं धोरण आहे असं म्हणत भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका केली आहे.