Premium

Maharashtra News: “संजय राऊत लिहिताना चिलीम आणि बोलताना…”, आशिष शेलारांची टीका

Mumbai Breaking News, 02 October 2023 : राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी आणि पावसाचे अपडेट्स जाणून घ्या!

Maharashtra Political News Live Updates
महाराष्ट्र न्यूज लाइव्ह गांधी जयंती 2023 (फोटो – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Marathi News Today : देशभर महात्मा गांधी जयंतीचा उत्साह आहे. ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम आणि अनेकविध कार्यक्रम राबवले जात आहेत. तसंच, राज्यातही अनेक नेत्यांकडून गांधी विचारांना उजळणी दिली जात आहे. तर, दुसरीकडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून दडी मारून बसलेल्या पावसाने गणेश चतुर्थीपासून जोर धरला. तो जोर अद्यापही कायम आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय घडामोडी, पावसाचे अपडेट्स आणि इतर महत्त्वाच्या बातम्या या ब्लाॉगमधून पाहुयात.

Live Updates

Maharashtra News Live in Marathi :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या एका क्लिकवर

19:22 (IST) 2 Oct 2023
वसई : टॅकरची वाहनाला धडक दिल्याने वाद, चौघांनी केलेल्या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू

वसई : वाहनाला धडक दिल्याने झालेल्या वादातून वाहनातील चौघांनी टॅंकरचालकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत टॅंकरचालकाचा मृत्यू झाला मुंबई अहमदाबाद महामार्गावरील मालजीपाडा येथे रविवारी सकाळी ही घटना घडली.

वाचा सविस्तर…

19:07 (IST) 2 Oct 2023
अतिवृष्टी, पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात द्वितीय स्थानी; राज्यात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद

पुणे : राज्यात मोसमी पावसापूर्वी आणि मोसमी पावसाच्या काळात वीज पडण्याच्या ४७ घटनांची नोंद झाली. तर अतिवृष्टी आणि पुराच्या घटनांमध्ये महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी असून, अतिवृष्टी आणि पुराच्या राज्यात ६९ घटना नोंदवल्या गेल्या.

वाचा सविस्तर…

18:51 (IST) 2 Oct 2023
नागपूर : पाचगावातील सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर रंगारंग पार्टी, तरुणींचा बेफाम अश्लील डान्स…

नागपूर : कुही तालुक्यातील पाचगावमध्ये असलेल्या सिल्वर लेक फार्म रिसॉर्टवर एका रंगारंग पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. तब्बल १३ तरुणी तोकड्या कपड्यात अश्लील नृत्य करीत होत्या. स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी रिसॉर्टवर छापा घातला.

वाचा सविस्तर…

18:20 (IST) 2 Oct 2023
यात्रा काढून भाजपने ओबीसी जनगणनेपासून पळ काढू नये, विरोधी पक्ष नेते वडेट्टीवार आक्रमक

नागपूर : महात्मा गांधी यांच्या जयंतीचे निमित्त साधून भाजपने आज सेवाग्राम येथून ओबीसी जागरण यात्रेला प्रारंभ केला. त्यावर विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी प्रहार केला.

वाचा सविस्तर…

17:53 (IST) 2 Oct 2023
प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी यांचे निधन

पुणे : ‘नादातूनी या नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम’ या नाम गजरातून घराघरात पोहोचलेले प्रसिद्ध संगीतकार-गायक किशोर कुलकर्णी (वय ६०) यांचे अल्प आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.

सविस्तर वाचा…

17:51 (IST) 2 Oct 2023
“संजय राऊत लिहिताना चिलीम आणि बोलताना…”, आशिष शेलारांची टीका

17:47 (IST) 2 Oct 2023
विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ

मुंबई: मध्य रेल्वेवरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी विशेष गाड्यांच्या कालावधीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

17:45 (IST) 2 Oct 2023
“गोडसे समर्थकांना…”, पदयात्रेतील वादानंतर वर्षा गायकवाड संतापल्या

जेव्हा जेव्हा भाजपा सरकार घाबरतं तेव्हा तेव्हा ते पोलिसांना पुढे करतात. सत्यता, अहिंसा, एकतेसंदर्भात बोलणं शासनाच्या दृष्टीने गुन्हा आहे का? आम्ही गेल्या वर्षी गांधीजी आणि शास्त्रीजींच्या सन्मानात रॅली काढली होती. तर, आज आम्हाला या प्रकारे रोखलं जात आहे. गोडसेसमर्थकांना रोखलं जात नाही, गांधीजींबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात कोणतेच पाऊल उचललं जात नाही आणि देशाच्या महापुरुषांना वंदन करण्यासाठी 'इंडिया आघाडी' पुढे आली तर पोलिसांकडून रोखलं जातं. ही कोणती लोकशाही आहे? असा सवाल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी विचारला आहे.

16:53 (IST) 2 Oct 2023
नागपुरात ‘सीएनजी’चे दर सर्वाधिक; मुंबईत मात्र दर कपात… आजचे दर पहा…

नागपूर: गणेशोत्सवानंतर मुंबईत ‘सीएनजी’चे दर तब्बल ३ रुपये प्रति किलोने घटल्याने मुंबईकर सुखावले आहे. परंतु नागपुरात हे दर कमी झाले नाही.

सविस्तर वाचा…

16:33 (IST) 2 Oct 2023
महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरचे दर वाढले, नागपूरमध्ये कितीला मिळणार?

नागपूर: केंद्र सरकारने महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक सिलिंडरच्या दरात मोठी वाढ केल्याने हॉटेलचे जेवण व अल्पोपहार महागणार आहे.

सविस्तर वाचा…

15:56 (IST) 2 Oct 2023
डोंबिवलीत बिगारी कामगाराला खुर्चीला बांधून बेदम मारहाण

डोंबिवली: येथील पूर्व भागातील आयरेगाव हद्दीतील बालाजी गार्डन संकुलाच्या पाठीमागील भागात एका कार्यालयात बिगारी कामगाराला पाचजणांनी शुक्रवारी रात्री खुर्चीला बांधून ठेवले.

सविस्तर वाचा…

15:52 (IST) 2 Oct 2023
पनवेल : स्वच्छता मोहिमेनंतर दैनंदिन कचरा रस्त्यावर

पनवेल : पनवेल महापालिका क्षेत्रात रविवारी १४८ ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. नागरिकांसह राजकीय संघटना आणि सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी तसेच सरकारी लोकसेवकांनी या राष्ट्रीय मोहिमेमध्ये सक्रिय सहभाग नोंदवून अनेक परिसर उजळून टाकले.

सविस्तर वाचा…

15:11 (IST) 2 Oct 2023
अशैक्षणिक कामांबाबत शिक्षक आक्रमक, जळगावात प्राथमिक शिक्षक संघाचा मोर्चा

जळगाव – प्राथमिक शिक्षकांना देण्यात येणारी अशैक्षणिक कामे, वेगवेगळ्या प्रकारची ऑनलाइन माहिती, नोकर्‍यांचे खासगीकरण, वेगवेगळी अ‍ॅप बंद करून शिक्षकांना फक्त शिकविण्याचे काम द्यावे यांसह प्रलंबित १३ मागण्यांसाठी प्राथमिक शिक्षक आक्रमक होत सोमवारी आक्रोश मोर्चाद्वारे आंदोलन करण्यात आले.

सविस्तर वाचा…

14:41 (IST) 2 Oct 2023
“नरेंद्र मोदींच्या संकल्पपूर्तीसाठी महात्मा गांधींनी आशीर्वाद द्यावा,” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मागणे…

वर्धा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मानणारे तसेच त्यांचे अनुयायी गांधी विचारांची कितीही थट्टा उडवीत असले तरी फडणवीस यांना मात्र गांधी वंदनीय असल्याचे ते सांगतात. म्हणून त्यांचे गुरुवर्य असलेले देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संकल्प तडीस जावे यासाठी त्यांनी आज बापू कुटीत बापूंना अभिवादन करीत आशीर्वाद घेतले.

वाचा सविस्तर…

14:28 (IST) 2 Oct 2023
पिंपरी : महापालिकेच्या ४१ हजार मालमत्ताकर थकबाकीदारांना नोटिसा, होणार ‘ही’ कारवाई

पिंपरी : मालमत्ताकर थकबाकीदार महापालिकेच्या रडारवर आले आहेत. अनेक वर्षांपासून थकबाकी असलेल्या ४१ हजार ३०७ जणांना जप्ती नोटीसा तर ३६ हजार ७१९ मालमत्ता धारकांना जप्ती पत्रे धाडली आहेत. या मालमत्ता धारकांकडे ६७१ कोटी रुपयांचा कर थकीत आहे.

सविस्तर वाचा..

14:09 (IST) 2 Oct 2023
शिंदे गटासाठी यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघ अडचणीचा ठरणार! भाजपसंबंधित खासगी संस्थेच्या सर्वेक्षणातील निष्कर्ष

वाशीम : लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघासाठी शिवसेना ठाकरे गट, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. या निवडणुकीत नवीन चेहरे उतरू शकतात. राज्यात भाजपकडून ‘मिशन ४५’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामध्ये यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे.

वाचा सविस्तर…

14:08 (IST) 2 Oct 2023
नाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत होण्याची चिन्हे, विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात लिलावाला प्रारंभ

नाशिक – व्यापाऱ्यांच्या संपामुळे निर्माण झालेली कांदा कोंडी दूर होण्याच्या दिशेने पावले पडत असून लासलगाव बाजार समितीच्या विंचूरपाठोपाठ निफाड उपबाजारात सोमवारी लिलावाला सुरुवात झाली.

सविस्तर वाचा…

13:49 (IST) 2 Oct 2023
“शाळेची जमीन परत करा,” उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचा आदेश; भूमाफियांना सणसणीत चपराक

यवतमाळ : शहरातील विवेकानंद विद्यालय व राणी लक्ष्मीबाई विद्यालयाची मोक्याची जागा तत्कालीन महसूल राज्यमंत्र्यांच्या आदेशाने बळकावण्याचा प्रयत्न भू-माफियांनी केला होता. त्यात त्यांना भूमिअभिलेख विभागाकडूनही मदत मिळाली होती. मात्र ही जागा हडपण्याच्या प्रयत्नात असलेल्या भू-माफियांना उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने चांगलीच चपराक दिली आहे.

वाचा सविस्तर…

13:46 (IST) 2 Oct 2023
चंद्रपूर : युरियाचा प्रचंड तुटवडा, शेतकरी अडचणीत; रेल्वेच्या तांत्रिक अडचणीमुळे…

चंद्रपूर : रेल्वेने तांत्रिक कारण समोर करून जिल्ह्यात युरियाची रॅकच पाठविली नाही. गेल्या काही महिन्यांपासून अत्यल्प युरियाचा साठा शिल्लक आहे. त्यातच आता पाऊस थांबला. धान, सोयाबीनला युरिआची मात्रा देण्याची वेळ आली आहे. युरियाची मागणी वाढली असतानाच दुसरीकडे पुरेसा साठाच उपलब्ध नसल्याने सध्या शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे.

सविस्तर वाचा…

13:36 (IST) 2 Oct 2023
राज्यात पुढील ४८ तासात पावसाचा जोर वाढणार; महाराष्ट्रातून मान्सून ४ ऑक्टोबरपासून परतण्याची शक्यता

नागपूर: देशभरात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असली तरीही महाराष्ट्रात मात्र येत्या ४८ तासात पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

सविस्तर वाचा…

13:19 (IST) 2 Oct 2023
पनवेल येथे पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लॉक

मुंबई : पनवेल रिमॉडलिंग आणि मालवाहतुकीसाठी समर्पित असणाऱ्या ‘डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉर’च्या कामासाठी हार्बर मार्गावर ३८ तासांचा ब्लाॅक घेतला. हा ब्लाॅक सोमवारी दुपारच्या सुमारास संपला. त्यानंतर, पनवेल येथे सोमवारी रात्रीपासून ते शुक्रवारपर्यंत पाच दिवसांसाठी मध्यरात्रीचा वाहतूक ब्लाॅक घेतला. त्यामुळे ब्लॉक कालावधीत सोमवारी ते शनिवारपर्यंत रात्री १२.३० वाजल्यापासून ते पहाटे ५.३० वाजेपर्यंत लोकल सेवा रद्द असेल.

सविस्तर वाचा…

13:04 (IST) 2 Oct 2023
बुलढाण्यात भीषण दुर्घटना, मेळघाटातील मजुरांना ट्रकने चिरडले; तीन जण ठार

अमरावती : मेळघाटातून बुलढाणा जिल्‍ह्यात रस्‍त्‍याच्‍या कामावर गेलेल्‍या मजुरांना अनियंत्रित ट्रकने चिरडल्‍याने तीन जण ठार तर चार जण जखमी झाले. हा भीषण अपघात बुलढाणा जिल्‍ह्यातील नांदूरा ते मलकापूर दरम्‍यान राष्‍ट्रीय महामार्गावर सोमवारी सकाळी घडला.

वाचा सविस्तर…

12:54 (IST) 2 Oct 2023
१२ वर्षीय मुलीने प्रियकराला मॅसेज पाठवला अन् ..

नागपूर : गणेशोत्सवानिमित्त नातेवाईकांच्या गावी गेलेल्या १२ वर्षीय मुलीने मावशीच्या मोबाईलवरून प्रियकराला मॅसेज केला. प्रियकराचा तासाभराने ‘आय लव यू’ असा रिप्लाय आला. त्यामुळे मावशीला धक्का बसला. त्यामुळे मावशीने मुलीची आस्थेने चौकशी केल्यानंतर प्रियकराने केलेले धक्कादायक कृत्य उघडकीस आले.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 2 Oct 2023
चंद्रपूर जिल्ह्यात सुगंधी तंबाखू तस्करी जोरात

चंद्रपूर: जिल्ह्यात सुगंधी तंबाखू व दारूची मोठ्या प्रमाणात तस्करी सुरू आहे. अवैध सुगंधी तंबाखु तस्करी करतांना ९ लाखाचा माल जप्त करण्यात आला आहे. तर पांढऱ्या गोणीत ३० दारूच्या बॉटल जप्त करण्यात आल्या.

वाचा सविस्तर…

12:53 (IST) 2 Oct 2023
तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, पहा एका क्लिकवर…

नागपूर : भूमी अभिलेख विभागाकडून राज्यभरात १७ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर २०२३ या कालावधीत घेण्यात आलेल्या तलाठी भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर करण्यात आली आहे. २८ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२३ या कालावधीत उत्तरपत्रिका पाहता येणार आहे.

वाचा सविस्तर…

12:47 (IST) 2 Oct 2023
डोंबिवली लोकलमध्ये डोंबिवलीकरांना जागा मिळेना

डोंबिवली: मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातील बहुतांशी प्रवासी डोंबिवली लोकलमध्ये उलट मार्गाने प्रवास करुन नियमित डोंबिवली रेल्वे स्थानकात येतात. अगोदरच मुंब्रा, दिवा रेल्वे स्थानकातून बसून आलेल्या प्रवाशांमुळे डोंबिवली लोकल प्रवाशांनी भरलेली असते.

सविस्तर वाचा…

12:39 (IST) 2 Oct 2023
कोल्हापूर : उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे साखर कारखान्यावर आंदोलन

कोल्हापूर – गेल्या वर्षी तुटलेल्या उसाचा दुसरा हप्ता प्रतिटन ४०० रुपये तातडीने द्या, अन्यथा गाठ स्वाभिमानीशी आहे, असे सांगून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आज जिल्ह्यातील चार साखर कारखान्यावर ढोल बजावो आंदोलन करून जागर करण्यात आले.

सविस्तर वाचा…

12:38 (IST) 2 Oct 2023
ठाणे जिल्ह्यात निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांचा वरचष्मा; केंद्रीय मंत्री कपील पाटील यांची टीका

कल्याण: रस्ते, कचरा, खड्डे किंवा विकासाचे कोणतेही प्रकल्प असोत. ठाणे जिल्ह्यात हे प्रकल्प राबविणारे ठेकेदार अतिशय निकृष्ट पध्दतीने काम करतात.

सविस्तर वाचा…

12:37 (IST) 2 Oct 2023
कंत्राटी भरती विरोधात आंदोलन आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भूमिका

नागपूर: शासनाने काढलेल्या कंत्राटी भरती विरोधात राज्यातील युवा वर्गात प्रचंड आक्रोश आहे. महायुती सरकारच्या या निर्णयाला राज्यात ठिकठिकाणी विरोध केला जात आहे.

सविस्तर वाचा…

12:33 (IST) 2 Oct 2023
आदिती तटकरेंच्या मतदारसंघात निधीचा ओघ, शिंदे गटाच्या आमदारांमध्ये अस्वस्थता

अलिबाग- राज्यसरकारमध्ये सहभागी होताच, आदिती तटकरे यांच्या मतदारसंघात निधीचा ओघ सुरू झाला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर केलेली कामे मार्गी लावण्याचा धडाकाही सुरु झाला आहे. यामुळे शिवसेना आणि भाजप आमदारांच्या गोटात मात्र अस्वस्थता पसरण्यास सुरुवात झाली आहे.

वाचा सविस्तर…

12:28 (IST) 2 Oct 2023
“सर्व भावी मुख्यमंत्र्यांना माझ्या शुभेच्छा”, देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी

राज ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत असं मनसे कार्यकर्त्यांना वाटत आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, “ज्या ज्या पक्षातील ज्या ज्या लोकांना त्यांचे नेते भावी मुख्यमंत्री वाटतात, त्या सर्वांना माझ्या शुभेच्छा.”

12:23 (IST) 2 Oct 2023
वसई : ८० कोटींच्या कंत्राटाचे आमिष, व्यापार्‍याची दीड कोटींची फसवणूक

वसई – तमिळनाडू राज्यात पथदिवे लावण्याचे ८० कोटींचे कंत्राट मिळवून देतो असे सांगून एका व्यापार्‍याला तब्बल दीड कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. या प्रकरणी दोन्ही ठकसेनाचा पोलीस शोध घेत आहेत.

सविस्तर वाचा…

12:13 (IST) 2 Oct 2023
पिंपरी : चार वर्षांपासून महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच

पिंपरी : महापालिकेच्या वतीने शहरामध्ये आदित्य बिर्ला ग्रुपच्या माध्यमातून महात्मा गांधी यांचे भव्य स्मारक उभारण्याच्या कामाला १९ जून २०१९ रोजीच्या सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मात्र, गेल्या चार वर्षांत गांधी स्मारकाची एकही वीट रचली गेली नाही. त्यामुळे शहरवासीयांना राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारकाची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

सविस्तर वाचा…

12:12 (IST) 2 Oct 2023
नाशिक : बोधी वृक्षारोपण महोत्सवात दलाई लामांसह आंतरराष्ट्रीय नेत्यांचा सहभाग, सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश

नाशिक – शहरात त्रिरश्मी बुद्ध लेणी येथील बुद्ध स्मारकाच्या परिसरात २४ ऑक्टोबर रोजी श्रीलंकेतील अनुराधापूर येथील बोधी वृक्षाच्या फांदीचे रोपण करण्यात येणार आहे. या बोधी वृक्षारोपणाच्या महोत्सवासाठी देश, विदेशातून उपासक येणार आहेत. यात धर्मगुरू दलाई लामा, श्रीलंकेचे पंतप्रधान, कंबोडियाचे राष्ट्राध्यक्ष आदींचा समावेश आहे.

सविस्तर वाचा…

12:11 (IST) 2 Oct 2023
पुणे रेल्वे स्थानक परिसरात प्रवाशाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले

पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात परराज्यातून आलेल्या प्रवासी तरुणाला लुटणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाठलाग करून पकडले. अक्षय विजय सूर्यवंशी (वय २५, रा. काळेओढा, वाघोली), अब्दुल रेहमान अबुकर तामटगार (वय २९, रा. अप्पर इंदिरानगर, कात्रज) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

सविस्तर वाचा…

12:10 (IST) 2 Oct 2023
नाशिक जिल्हा परिषद भरती प्रक्रियेत आठ संवर्गांसाठी परीक्षा

नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने विविध संवर्गांसाठी पदभरती प्रक्रिया सुरू आहे. त्या अंतर्गत सात ते ११ ऑक्टोबर या कालावधीत आठ संवर्गांची परीक्षा होणार आहे.

सविस्तर वाचा…

12:09 (IST) 2 Oct 2023
पुणे : पीएमपीची आता कॅशलेस तिकीट सुविधा; सुट्ट्या पैशांवरून होणारी वादावादी थांबणार

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील प्रवाशांसाठी पीएमपीने कॅशलेस तिकीट सेवा सुरू केली असून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते या सेवेला रविवारपासून प्रारंभ झाला. युपीआय क्यू-आर कोड स्कॅन करून प्रवाशांना तिकीट घेता येणार आहे.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 2 Oct 2023
मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणाची हत्या

मुंबई : दादर पूर्व येथे २७ वर्षीय तरुणावर झालेल्या चाकू हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वाचा…

12:08 (IST) 2 Oct 2023
पुण्यातील धरणांमध्ये ९७.४१ टक्के पाणीसाठा; खडकवासला धरणातील विसर्ग कायम

पुणे : खडकवासला धरण साखळी प्रकल्पातील चारही प्रमुख धरणांतील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग कायम आहे. खडकवासला, पानशेत, वरसगांव आणि टेमघर या चारही धरणांत मिळून एकूण ९७.४१ टक्के म्हणजे २८.३९ अब्ज घनफूट एवढा पाणीसाठा जमा झाला आहे.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 2 Oct 2023
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून प्रियकाराची ‘अजब’ मागणी, अल्पवयीन मुलीला साडेतीन लाखांना लुबाडले

वसई – अनेकदा मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्यानंतर मुलींची शारिरीक आणि आर्थिक फसवणूक केली जाते. मीरा रोडमध्ये असाच एक प्रकार समोर आला आहे.

सविस्तर वाचा…

10:11 (IST) 2 Oct 2023
“महात्मा गांधी राम म्हणत होते, पण मनुवाद्यांचा…”, विजय वडेट्टीवारांची टीका

“आपल्याच चुका आहेत. आपणच वाहून गेलो. आपणच धर्म, जात-पात करून राम मंदिराच्या भानगडीत पडलो. राम मंदिर देवाचं आहे. देव आमच्या हृदयात आहे. पण ते म्हणतील तसं म्हणत गेलो. महात्मा गांधी राम म्हणत होते. आम्ही ऐकलं नाही. मनुवाद्यांचा राम ऐकला, महात्मा गांधींचा राम ऐकला नाही, भोगावं तर लागणारच. चुका दुरुस्त करता येतील, पुढे जाता येतील – विजय वडेट्टीवार

महाराष्ट् न्यूज लाइव्ह

Maharashtra News Live in Marathi :  राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी क्लिक करा.

Web Title: Maharashtra news live 02 october gandhi jayanti 2023 marathi batmya rain updates weather report today sgk

First published on: 02-10-2023 at 10:07 IST
Next Story
छत्रपती शिवरायांच्या वाघनखांसाठी लंडनला जातोय हा अभिमानाचा क्षण – सुधीर मुनगंटीवार