Mumbai Maharashtra Breaking News Live: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा १० जून रोजी स्थापना दिन असतो. या दिनाच्या निमित्ताने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा कार्यकर्ता मेळावा पुण्यात संपन्न झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने राज्यातील राजकारणाची चर्चा होत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक आणि माजी आमदार बच्चू कडू यांनी अमरावतीच्या मोझरी येथे दिव्यांग, निराधार, शेतकरी, शेतकरी, शेतकऱ्यांच्या कर्ज माफी अशा विविध मागण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनावर आज राजकीय प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
Maharashtra Breaking News Highlights | महाराष्ट्र न्यूज लाईव्ह अपडेट्स
राजकीय हेतू साध्य करण्यासाठी फक्त स्टंटबाजी - भाजप सरचिटणीस विक्रांत पाटील
अकरावीचे वर्ग १ जुलै रोजी सुरू होणे अशक्य, शिक्षण संचालनालयाच्या गोंधळाचा विद्यार्थ्यांना फटका
अधर पुस प्रकल्पात ५० पेक्षा अधिक जनावरांना जलसमाधी, मृत्यूचे कारण अस्पष्ट
शहरी नक्षलवादाच्या नावाखाली सरकारचा संघटना संपवायचा प्रयत्न - रविकांत तुपकर
'शोले स्टाईल' आंदोलनाने खळबळ; बच्चू कडू यांच्या समर्थनार्थ कार्यकर्ते चढले ‘टावर’वर…
Maharashtra News Live Updates: 'नारायण राणे असताना नितेश राणेंचे बाप फडणवीस कसे?', अंबादास दानवेंची टीका
विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी नितेश राणे यांच्या विधानाचा समाचार घेत नारायण राणे असताना देवेंद्र फडणवीस हे त्यांचे बाप कसे काय झाले? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
सरकारच्या निर्णयाविरोधात पोस्ट केल्यास महागात, शासकीय अधिकारी - कर्मचाऱ्यांवर निर्बंध
देवेंद्र गंगाधर फडणवीस माझे वडील नाहीत, ठाकरे गटाने ठाण्यात लावला वादग्रस्त बॅनर
Maharashtra News Live Updates: ‘आमदार-खासदारांनी पाच वर्ष पगार घेऊ नये’, दारूवरील करवाढ आणि लाडकी बहीण योजनेवरून तुपकरांची टीका
शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात, यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. मात्र त्याचवेळी सरकारी तिजोरीत खडखडाट असल्यामुळे मद्यावरील करवाढ करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर ताण येत आहे. यावरून शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी सरकारवर टीका केली आहे. कुणीही मागणी केलेली नसताना निवडणुकीच्या तोंडावर लाडकी बहीण योजना आणली गेली. तिजोरी रिकामी असेल तर आमदार-खासदारांनी पाच वर्ष पगार घेऊ नये, जिल्हाधिकाऱ्यांपासून इतर मोठ्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारतही कपात करण्यात यावी, असेही ते म्हणाले.
आगामी निवडणुकांनंतर वेगळे चित्र, शरद पवार यांचे भाकीत; पक्षफुटीची चिंता नसल्याचीही भूमिका ( संग्रहित छायाचित्र)/ लोकसत्ता