Marathi News, 16 June 2025 महाराष्ट्रासह राज्यभरात जोरदार पाऊस पडतो आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाल्याची माहिती ANI दिली आहे. तर दुसरीकडे मुंबईतली लोकल वाहतूक १० ते १५ मिनिटांनी उशिराने सुरु आहे. वसई-विरार भागात रविवारी संध्याकाळपासूनच जोरदार पाऊस चालू असून शहरातील अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. परिणामी वाहतूक व्यवस्था व जनजीवन विस्कळीत झालं आहे. राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांनी जी भेट घेतली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे. तर कुंडमळा येथील पूल कोसळला आहे. त्यामुळे चार जणांचा मृत्यू झाला आहे. पावसाच्या बातम्या आणि राजकीय बातम्यांसह महत्त्वाच्या घडामोडींवर नजर असणार आहे ती म्हणजे लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Today मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी, यासह महत्त्वाच्या बातम्या

20:13 (IST) 16 Jun 2025

शालेय प्रवेश स्वागतात उत्साह, विद्यार्थ्यांपेक्षा शिक्षकांवर अधिक ताण

नवीन शैक्षणिक वर्षातील पहिल्या दिवसाचा उत्साह शहरासह जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये दिसून आला. प्रत्येक शाळेने वेगवेगळ्या पध्दतीने विद्यार्थ्यांचे स्वागत केले. ...सविस्तर वाचा
19:36 (IST) 16 Jun 2025

इगतपुरीत आदिवासी क्रीडा प्रबोधिनीसाठी जागा निश्चित करावी - मंत्री डाॅ. अशोक उईके यांची सूचना

इगतपुरी तालुक्यात आदिवासी क्रीडा प्रबोधिनी उभारणीसाठी जागा निश्चित करण्याची सूचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
19:26 (IST) 16 Jun 2025

बिऱ्हाड मोर्चाची नाशिकच्या वेशीजवळ धडक - मंत्र्यांचा मध्यस्थीचा प्रयत्न

महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार कर्मचारी संघटनेच्या वतीने काढण्यात आलेला बिऱ्हाड मोर्चा सोमवारी नाशिकच्या वेशीवर धडकला. मोर्चेकऱ्यांची आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. ...सविस्तर वाचा
18:43 (IST) 16 Jun 2025

मान्सून उद्या राज्य व्यापणार, पण पेरणीची घाई नको…

मोसमी पावसाचे वारे मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्य व्यापणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. राज्यातील काही जिल्ह्यांसाठी खात्याने ‘रेड अलर्ट’ देखील दिला आहे. मात्र, विदर्भात तसेच मराठवाड्यात या आठवड्यात पावसाचा जोर तितका अपेक्षीत नाही. तर पूर्व विदर्भात पाऊस एकंदरीत चांगला झालेला नाही. त्यामुळे कोरडवाहू शेतकऱ्यांनी ज्यांच्या भागात अद्यापही चांगला पाऊस पडलेला नाही, त्यांनी पेरणीसाठी घाई करु नये, असा सल्ला युकेतील नॅशनल सेंटर फॉर ॲटमॉस्फेरिक सायन्स येथील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. अक्षय देवरस यांनी दिला आहे.

सविस्तर वाचा

17:58 (IST) 16 Jun 2025
समृद्धी महामार्गावर वाहनांवर दगडफेक करून लूट.. बिहार, उत्तर प्रदेशनंतर आता महाराष्ट्रात…

राज्य शासनातील सगळेच मंत्री समृद्धी महामार्गाबाबत स्वत:ची पाठ थोपटून घेत आहे. परंतु या महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर दगडफेक करून लुटणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्याची धक्कादायक माहिती खूद्द नागरिकांकडून समाज माध्यमांवर शेअर केली जात आहे. त्यात बिहार, उत्तर प्रदेशांतर आता महाराष्ट्रातही या घटनेबाबत गंभीर टीका करण्यात आली आहे.

सविस्तर वाचा

17:16 (IST) 16 Jun 2025

बिऱ्हाड मोर्चाची वाहतूक कोंडीत भर, दहाव्या मैलावरील समस्या

सोमवारी महाराष्ट्र राज्य रोजंदारी वर्ग तीन आणि वर्ग चार संघटनेचे राज्यातील ७०० हून अधिक कर्मचारी प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर उतरले. ...सविस्तर बातमी
17:03 (IST) 16 Jun 2025

मंत्री गुलाबराव पाटील यांचा असाही उत्साह, विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून शाळेपर्यंत सोडले

गुलाबराव पाटील यांनी पाळधी (ता. धरणगाव) येथे विद्यार्थ्यांना सजविलेल्या बैलगाडीत बसवून चक्क शाळेपर्यंत नेऊन सोडले, जिल्हाभरात शाळेच्या पहिल्या दिवशी उत्साह आणि जल्लोष दिसून आला. ...सविस्तर वाचा
15:48 (IST) 16 Jun 2025

"…हा तर माझा गेम करण्याचा भाजपचा डाव", बच्चू कडूंचा पलटवार; म्हणाले "कारवाई सूडबुद्धीतून"

बच्चू कडू म्हणाले, भाजपने ही कारवाई करण्यास भाग पाडले आहे. ही संविधानाची पायमल्ली आहे. ...सविस्तर वाचा
15:45 (IST) 16 Jun 2025

सटाणा बाह्यवळण रस्त्यासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल - ‘राष्ट्रीय महामार्ग’कडून शिष्टमंडळास आश्वासन

सटाणा शहरातील वाहतूक कोंडीतून शहराला कायमस्वरूपी मुक्त करण्यासाठी महत्वाच्या ठरणाऱ्या शहर बाह्यवळण रस्त्याचा प्रश्न सुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...सविस्तर वाचा
15:33 (IST) 16 Jun 2025

एक कोटींहून अधिकचे सोने चोरणारे जेरबंद, कारागृहातून सुटलेल्या गुन्हेगारांवर आता ग्रामीण पोलिसांचे लक्ष

मनमाडमध्ये घडलेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखा व पोलिसांनी तीन सराईत गुन्हेगारांना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून एक कोटीहून अधिक किमतीचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. ...सविस्तर बातमी
13:29 (IST) 16 Jun 2025

सलग दुसऱ्या दिवशीही वसईत पावसाचा जोर कायम, सखल भाग पाण्याखाली; जनजीवन विस्कळीत

रस्त्यावर पाणी साचल्याने या साचलेल्या पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना अडचणी निर्माण झाल्या तर काही गाड्या मध्येच बंद पडण्याचे प्रकार घडले. ...सविस्तर वाचा
13:22 (IST) 16 Jun 2025

विजय देवरकोंडाचं नाव ऐकताच लाजली रश्मिका मंदाना, अभिनेत्याबद्दल म्हणाली, "त्याच्याकडून…"

Rashmika Mandhana : रश्मिकाला विजय देवरकोंडाकडून शिकायच्या आहेत 'या' गोष्टी, म्हणाली... ...अधिक वाचा
13:20 (IST) 16 Jun 2025

दौंड पुणे डेमूच्या डब्यात आग; आरपीएफच्या सतर्कतेमुळे दुर्घटना टळली

पुणे रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, दौंडहून येणारी ही गाडी सकाळी ७.५२ वाजता येवत स्थानकावर थांबली होती. ...अधिक वाचा
12:54 (IST) 16 Jun 2025

‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात भाजप नेत्यांच्या सहभागाने खळबळ; एकाला अटक तर अन्य…

रविवारी विठ्ठल रुक्मिणी शिक्षण संस्थेचे संस्थाचालक दिलीप धोटे यांना विशेष तपास पथकाने अटक केली. ते भाजपचे नेते असून पंचायत समितीचे माजी सदस्य आहेत. ...सविस्तर बातमी
11:28 (IST) 16 Jun 2025

मुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीय आमदाराने काढले नागपूरच्या स्वच्छतेचे वाभाडे

नागपुरातून स्वच्छतेसंदर्भातल्या प्रचंड तक्रारी येत आहेत. ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य आहे. गटारी तुंबल्या आहे. प्रशासनाचे अधिकारी मात्र गायब आहेत. ...सविस्तर बातमी
10:27 (IST) 16 Jun 2025

मुंबईत बेस्ट बसचा अपघात, बस गेली खड्ड्यात

मुंबईतल्या गिरगावात बेस्ट बसचा अपघात झाला आहे. गिरगाव मेट्रो स्थानकाजवळ हा अपघात झाला असून बेस्ट बस पाच फूट खोल खड्ड्यात अडकली आहे. हा खड्डा पावसामुळे झाला आहे. बसचा मागचा टायर या रस्ता खचून झालेल्या खड्ड्यात अडकला आहे. सुदैवाने या घटनेत जीवित हानी झालेली नाही. बस रिकामी करण्यात आली आहे.

10:04 (IST) 16 Jun 2025

Video : लोणावळा पर्यटकांसाठी आनंदाची बातमी; भुशी धरण ओव्हरफ्लो

लोणावळ्यातील भुशी धरण ओव्हरफ्लो झाले आहे. धरण्याच्या पायऱ्यावरून पाणी ओसंडून वाहत आहे.

सविस्तर वाचा...

09:56 (IST) 16 Jun 2025

कोकण व उत्तर महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा इशारा

हवामान विभागाने मुंबई शहर व उपनगरांमध्ये रिमझिम सरी बरसण्याचा अंदाज वर्तवला आहे. मुंबईला यलो अर्ट दिला असून कोकण किनारपट्टीतील जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. रत्नागिरीला रेड अलर्ट, पालघर, ठाणे, रायगड व सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. किनारपट्टीच्या भागात अतिवृष्टी देखील होऊ शकते असं हवामान विभागने म्हटलं आहे. उत्तर महाराष्ट्रात नाशिक, आहिल्यानगर व जळगाव या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट जाहीर झाला आहे. तर धुळे व नंदूरबारमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस बरसेल असं हवामान विभागाने म्हटलं आहे. या दोन जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

09:28 (IST) 16 Jun 2025

दक्षिण मुंबईतही पावसाचा जोर

दक्षिण मुंबईत पावसाचा जोर अधिक पाहायला मिळत आहे. नरिमन पॉईंटवर ४० ते ५० किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत आहेत. पावसाची संततधार आणि वाऱ्यामुळे दृश्यमानता मोठ्या प्रमाणात खालावली आहे. तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याने अनेक वाहने पाण्यातून मार्ग काढताना बंद पडत आहे. ज्यामुळे वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Mumbai thane raigad rain news

मुंबईसह ठाणे आणि रायगड जिल्ह्यात पाऊस (file photo)

मुंबईसह राज्यभरात पावसाची जोरदार हजेरी आहे. तसंच लोकल सेवाही काही प्रमाणात उशिराने सुरु आहे. मुंबईतल्या सखल भागांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.