Maharashtra Politics : राज्यात आज सर्वत्र शिवजयंतीचा उत्साह पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राहुल गांधी तसेच देशातील आणि महाराष्ट्रातील विविध नेते, अभिनेते आणि दिग्गजांनी शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, शिवनेरी किल्ल्यावर चेंगराचेंगरी झाल्याचा दावा खोटा असल्याचे पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी सांगितले आहे. शिवजयंतीनिमित्त बुधवारपासूनच शिवनेरीवर शिवभक्त गर्दी करत आहेत. दरम्यान, रात्रीच्या सुमारास काहीजण गड उतरत असताना एकाचा पाय घसरला आणि त्यामुळे मागून येणारे काहीजण देखील कोसळले. यात तिघेजण किरकोळ जखमी झाले आहेत. पण, किल्ल्यावर दावा केला जात असल्याप्रमाणे कोणत्याही प्रकारची चेंगराचेंगरीची घटना घडली नसल्याचे गिल यांनी स्पष्ट केले आहे.

याशिवाय राज्यात राजकारण, गुन्हे, कला – क्रीडा – संस्कृती, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून घेणार आहोत.

Live Updates

 महाराष्ट्रात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

19:38 (IST) 19 Feb 2026

आता बिनधास्त लावा आईचे नाव, आडनाव आणि जात…!

मुलाची सार्वजनिक ओळख केवळ वडिलांच्या नावापुरती मर्यादित असू शकत नाही, असा ऐतिहासिक निर्वाळा देत मुंबई उच्च न्यायालयाने एकल मातेला आपल्या पाल्याच्या नावापुढे स्वतःचे नाव, आडनाव आणि जात लावण्याचा कायदेशीर अधिकार बहाल केला आहे. ...सविस्तर बातमी
18:35 (IST) 19 Feb 2026

संगीत कला अकादमीला राज्यपालांकडून ५१ हजारांचे बक्षीस...

दादर येथील क्रीडा भवनमध्ये शिवजयंतीनिमित्त सादर केलेल्या पोवाडे आणि शिवगीतांच्या बहारदार सादरीकरणाने खुश होऊन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी महानगरपालिकेच्या संगीत कला अकादमीला ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले. ...सविस्तर बातमी
18:25 (IST) 19 Feb 2026

'आम्हीदेखील आमचं दैवत गमावलं, मात्र शरदचंद्र पवार गटाकडून दुर्दैवी राजकारण!' अजित पवार गटाचे आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप…

अजितदादा पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत शरदचंद्र पवार गटाकडून विलीनीकरणाच्या अफवा पसरवून दुर्दैवी राजकारण केले जात असल्याचा गंभीर आरोप आनंद परांजपे यांनी केला आहे. ...सविस्तर वाचा
18:18 (IST) 19 Feb 2026

शेतीसाठी उन्हाळी आवर्तनाला सुरुवात; दोन टप्प्यांत ९ टीएमसी एवढे शेतीसाठी पाणी...

खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून उन्हाळी हंगामासाठी नऊ टीएमसी पाणी दोन टप्प्यांत सोडण्याचा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे हवेली, दौंड आणि बारामतीसह पाच तालुक्यातील अडीच लाख हेक्टर शेतीला मोठा फायदा होणार आहे. ...अधिक वाचा
17:48 (IST) 19 Feb 2026

'स्थायी'साठी इच्छुकांची मोर्चेबांधणी, भाजपची नावे…

PCMC: पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या स्थायी समितीच्या सदस्यांची उद्या (शुक्रवार, २० फेब्रुवारी) सर्वसाधारण सभेत निवड केली जाणार आहे. ...अधिक वाचा
17:46 (IST) 19 Feb 2026

एसटी काँग्रेस संघटनेचा मुख्यमंत्र्यांना इशारा! कर्मचाऱ्यांच्या आर्थिक मागण्या अद्याप प्रलंबित; निधीसाठी महामंडळाचा राज्य सरकारला १६ वेळा…

एसटी महामंडळाने निधीसाठी राज्य सरकारकडे तब्बल १६ वेळा पत्रव्यवहार करूनही अर्थ खात्याने दुर्लक्ष केल्यामुळे येत्या २४ फेब्रुवारी रोजी आझाद मैदानात 'बोंब मारो' आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेने दिला आहे. ...सविस्तर वाचा
17:38 (IST) 19 Feb 2026

प्रेयसी आणि तिच्या पतीकडून एकाची हत्या

मुंब्रा येथील खर्डी रोड परिसरात ३९ वर्षीय राजू यादव याची त्याच्याच प्रेयसीने आणि तिच्या पतीने मिळून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...सविस्तर वाचा
17:35 (IST) 19 Feb 2026

मुंबईच्या चारही प्रवेशमार्गांवर भव्य प्रवेशद्वार आणि क्लॉक टॉवर उभारावे; महापौर रितू तावडे यांची मागणी

मुंबई शहराच्या जागतिक ओळखीसाठी दहिसर, मुलुंड आणि वाशी या चारही प्रवेशमार्गांवर भव्य प्रवेशद्वारे आणि क्लॉक टॉवर उभारण्याची महत्त्वपूर्ण मागणी नवनियुक्त महापौर रितू तावडे यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. ...वाचा सविस्तर
17:21 (IST) 19 Feb 2026

नालासोपाऱ्यात टवाळखोरांचा धुमाकूळ! दंगामस्ती रोखणाऱ्या इसमाला जमावाकडून अमानुष मारहाण

पोलिसांना संपर्क साधला असता त्यांनीही कोणतीच मदत न केल्याचा आरोप पीडित इसमाने केला आहे. यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ...अधिक वाचा
17:21 (IST) 19 Feb 2026

शिवजयंतीनंतर पहिल्याच आठवड्यात रायगडावरील ‘रोप-वे’ बंद…

शिवजयंतीनंतरच्या पहिल्याच आठवड्यात सोमवारपासून (२३ फेब्रुवारी) शनिवारपर्यंंत (२८ फेब्रुवारी) सलग सहा दिवस ही सेवा बंद राहणार आहे. ...वाचा सविस्तर
17:14 (IST) 19 Feb 2026

शिवरायांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येस नांदेडमध्ये टोळक्याचा उच्छाद!; नरहर कुरुंदकर मार्गावरील प्रकारावर तीव्र प्रतिक्रिया

‘दुचाकी वाहनांचा कर्कश आवाज काढत फिरणार्‍या या तरुणांना खरे शिवाजी महाराज ज्या दिवशी कळतील, तो या राज्यातील सुदिन’, अशी उपरोधिक प्रतिक्रिया ज्येष्ठ साहित्यिक प्रा.जगदीश कदम यांनी मध्यरात्रीच्या उच्छादावर व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
17:09 (IST) 19 Feb 2026

मुंबई महानगरपालिकेच्या सफाई कामगारांना जडतोय असाध्य आजार… आरोग्याच्या काळजीसाठी महापालिकेने काय केले वाचा…

मुंबईची स्वच्छता करणाऱ्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी पालिकेच्या एफ-दक्षिण विभागाने टाटा स्मारक रुग्णालयाच्या सहकार्याने विशेष कर्करोग तपासणी आणि व्यसनमुक्ती जनजागृती शिबिरांचे यशस्वी आयोजन केले आहे. ...सविस्तर वाचा
17:02 (IST) 19 Feb 2026

गजानन महाराज मंदिराच्या दागिन्याचा हव्यास नडला, व्यापारी संचालकाची अखेर हकालपट्टी...

वर्ध्यातील सुप्रसिद्ध संत गजानन महाराज देवस्थानच्या मूर्तीसाठी दिलेली सुमारे दोन किलो चांदी परस्पर हडप केल्याचा ठपका ठेवत व्यापारी नेते आणि विश्वस्त शालिग्राम टीबडीवाल यांची विश्वस्त मंडळातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ...अधिक वाचा
17:02 (IST) 19 Feb 2026

धुळे: भाजप प्रवक्त्याचा कॉल अन् काळ्या फॉर्च्युनर एसयूव्हीचा थरारक पाठलाग; पोलिसांना सापडले काय…

या घटनेमुळे नागरिकांनी केवळ प्रेक्षक न राहता सजग नागरिक म्हणून पुढे येण्याची गरज अधोरेखित झाली आहे. पोलिस यंत्रणा आपले कर्तव्य पार पाडत असली तरी वेळेवर मिळालेली माहिती अनेकदा निर्णायक ठरते. ...सविस्तर बातमी
16:59 (IST) 19 Feb 2026

डोंबिवलीजवळील दावडीतील बेकायदा चाळी जमीनदोस्त...

डोंबिवली जवळील दावडी गाव हद्दीत भूमाफियांनी उभारलेल्या बेकायदा चाळींवर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने (KDMC) धडक कारवाई केली आहे. ...वाचा सविस्तर
16:55 (IST) 19 Feb 2026

नवी मुंबईत ‘हम करेसो कायदा’ असा प्रकार सुरू आहे… नरेश म्हस्के यांची टीका

नरेश म्हस्के यांनी नवी मुंबई महानगरपालिकेत स्थायी आणि परिवहन समिती निवड प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत प्रशासनावर तीव्र टीका केली आहे. ...सविस्तर बातमी
16:39 (IST) 19 Feb 2026

राज्य सरकारने आमदार रोहित पवार यांना सुरक्षा द्यावी; खासदार सुप्रिया सुळे यांची मागणी

Rohit Pawar: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबाबत आमदार रोहित पवार हे मुद्दे उपस्थित करत आहेत. ...अधिक वाचा
16:33 (IST) 19 Feb 2026

"मराठी लोकांनी गुजरात मध्ये जाऊन व्यवसाय करावा!" पालकमंत्री गणेश नाईक यांचे खळबळजनक विधान

गणेश नाईक यांनी पालघरमधील कार्यक्रमात मराठी लोकांनी गुजरातमध्ये जाऊन व्यवसाय करावा असे वक्तव्य केल्याने राजकीय व सामाजिक वर्तुळात तीव्र चर्चा सुरू झाली आहे. ...अधिक वाचा
16:26 (IST) 19 Feb 2026

पवना, इंद्रायणी आणि मुळा नदीच्या निळ्या, लाल पुररेषांचे…

पिंपरी-चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना, इंद्रायणी आणि मुळा नद्यांच्या निळ्या, लाल पुररेषांचे नव्याने सर्वेक्षण करण्यात येणार आहे. ...वाचा सविस्तर
16:26 (IST) 19 Feb 2026

ठाणे शहरात ढोल-ताशांच्या गजरात शिवजयंती साजरी

ठाणे शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती पारंपरिक वेशभूषा आणि ढोल-ताशांच्या गजरात अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली असून यानिमित्त ठिकठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पालखी सोहळे आणि भव्य मिरवणुकांचे आयोजन करण्यात आले होते. ...सविस्तर वाचा
16:23 (IST) 19 Feb 2026

शरद पवारांची राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा; खासदार संजय राऊत

"शरद पवार यांनी राज्यसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे", असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले आहे. याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा होईल, असेही राऊत म्हणाले आहेत.

16:23 (IST) 19 Feb 2026

'शिव शंभू गाथा'च्या गजराने दुमदुमले ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय

ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या उपस्थितीत 'शिव शंभू गाथा' या सांस्कृतिक कार्यक्रमाने जिल्हाधिकारी कार्यालय दुमदुमले असून शिवकालीन शस्त्रास्त्र प्रदर्शनाने नागरिकांना इतिहासाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. ...अधिक वाचा
16:08 (IST) 19 Feb 2026

मुंबई-नाशिक महामार्गावर टोईंग व्हॅनच्या धडकेत एकाचा मृत्यू

मुंबई नाशिक महामार्गावरील मुंबई ढाबा परिसरात एका भरधाव टोईंग व्हॅनने दुचाकीला जोराची धडक दिल्यामुळे ठाण्यातील कोपरी येथील प्रताप यादव या ३२ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ...सविस्तर वाचा
16:03 (IST) 19 Feb 2026

मुलाखत : समाजाला नक्षलवादाची गरज पडू नये, याचे भान व्यवस्थेने ठेवावे, माजी नक्षल नेता सोनू उर्फ भूपती म्हणतो…

नक्षल चळवळ अपयशी ठरली असून शस्त्रांची साथ सोडून उर्वरित सदस्यांनीही लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे कळकळीचे आवाहन भूपती यांनी 'लोकसत्ता'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत गडचिरोलीतून केले आहे. ...अधिक वाचा
15:50 (IST) 19 Feb 2026

Tiger Sucide : तरुण वाघाची आत्महत्येची चिठ्ठी ‘सोशल मिडिया’वर व्हायरल, तो वाघ ‘बीपीएल’ यादीत...

नागपूर शहराजवळील रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या एका दीड वर्षाच्या वाघाची काल्पनिक 'आत्महत्येची चिठ्ठी' सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून विकासाच्या रेट्यात वन्यजीवांच्या होत असलेल्या घुसमटीवर या पत्राने मार्मिक भाष्य केले आहे. ...सविस्तर वाचा
15:32 (IST) 19 Feb 2026

सचिन तेंडुलकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिेंदे यांची भेट

सचिन तेंडुलकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुलगा अर्जुन यांच्या लग्नाची पत्रिका सचिन यांनी एकनाथ शिंदे यांना दिली.

https://twitter.com/ANI/status/2024416339142857148?s=20

15:30 (IST) 19 Feb 2026

दहा दिवसाच्या बाळाला घेऊन सावित्रीची लेक देतेय परीक्षा! शिक्षणाची धडपड पाहून पीपल्स कॉलेजमध्ये मातृस्नेही कक्षाची स्थापना

पाठीवर बाळाला बांधून झाशीच्या राणीने स्वातंत्र्याची लढाई लढली होती, तद्वतच दहा दिवसांचे बाळ सोबत घेऊन एक माता शिक्षणाची लढाई लढत आहे. ...सविस्तर बातमी
15:08 (IST) 19 Feb 2026

दोन वर्षांचा चिमुकला खेळात दंग; अचानक घराची भिंत कोसळली, आणि….

महापालिका प्रशासन अशा धोकादायक घरांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने बुधवारी सायंकाळी नाशिकच्या सातपूर भागात दोन वर्षांच्या चिमुकल्याला जीव गमवावा लागला आहे. ...सविस्तर वाचा
15:00 (IST) 19 Feb 2026

SSC Exam 2026 : उद्या पासून दहावीची परिक्षा…ठाणे जिल्ह्यातून इतके विद्यार्थी देणार परिक्षा..

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेला उद्यापासून (शुक्रवार) सुरुवात होत आहे. ठाणे जिल्ह्यातून १ लाख १९ हजार ७४२ विद्यार्थी ही परीक्षा देणार असून, कॉपीमुक्त वातावरणासाठी प्रशासनाने ३२६ केंद्रांवर कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. ...अधिक वाचा
15:00 (IST) 19 Feb 2026

बदलापुरात उभारणार बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा; भाजपकडून निवडणूक घोषणेची पूर्तता, पहिल्याच सभेत ठराव

कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या नवनिर्वाचित मंडळाने पहिल्याच सभेत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. निवडणुकीत आमदार किसन कथोरे यांनी दिलेल्या आश्वासनानुसार, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा उभारण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे. ...वाचा सविस्तर

Shivaji Maharaj

राज्यात शिवजयंतीचा उत्साह (फोटो - X/ Supriyasule)

राज्यात आज सर्वत्र शिवजयंती उत्साहात साजरी केली जात आहे.