Maharashtra News Today: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला आहे. यानंतर आता दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही? याबाबत सध्या मोठा संभ्रम दिसत आहे. तसेच दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल राजकीय वर्तुळातून वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या झात आहेत. याबरोबरच महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांचा प्रचार देखील जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
Maharashtra Live News Today in Marathi: राज्यातील सर्व महत्त्वाच्या घडमोडी वाचा एका क्लिकवर..
भाजपला सत्तेत आणण्यासाठीच गटनोंदणी नगरविकास खात्याकडे पाठवण्याचा डाव : विजय वडेट्टीवार
Girish Mahajan U-Turn: ‘कुबड्या’ नको म्हणणाऱ्या गिरीश महाजनांची अवघ्या ४८ तासांत पलटी; नाशिकमध्ये भाजप नमली?
Ajit Pawar: 'दादां'च्या अस्थिंचे वैनगंगा नदीत विसर्जन; हजारो नागरिकांनी दिला जड अंतःकरणाने निरोप
Nashik malnutrition scheme: नाशिकच्या अधिकाऱ्यांनी दत्तक घेतली कुपोषित मुले, अवघ्या काही महिन्यांत झाला असा चमत्कार की...
पालघरमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण; १२ महिन्यांत डोंगराच्या मध्ये ४५४ मीटरचा बोगदा
‘प्रथम प्राधान्य’मधील घरे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर; ताडदेवमधील घर आठ कोटींचे, तर वडाळ्यातील घर ४२ लाखांचे
Sahar Sheikh: ‘कैसे हराया…’म्हणाऱ्या सहर शेख ठाणे महापालिकेत…काय म्हणाल्या सहर शेख?
Video: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावर गॅस टँकर उलटला; मुंबईकडील वाहतूक पूर्णतः ठप्प
दहावी, बारावी परीक्षांंच्या काळात कल्याण डोंबिवलीतील मेट्रोची कामे बंद ठेवा - रिक्षा संघटनेचे ‘एमएमआरडीए’ महानगर आयुक्तांंना पत्र
सांगली : भाजपसोबत राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) सत्तेत एकत्र; महापौर पदी भाजपचे धीरज सुर्यवंशी?
सोमटा येथे कासा पोलिसांचा मोठा छापा ; २९ लाखांच्या अंमली पदार्थांसह तिघांना अटक
गणेश मूर्तिकारांना गणेशोत्सवाचे वेध; माघी गणेशोत्सवानंतर पीओपी बंदी शिथिल केल्याची मुदत संपली
‘जनता’च्या खंडात चुका… डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदवींचा उल्लेख टाळला
Malegaon Mayor Poll : मालेगावात ‘हाय-व्होल्टेज’ ड्रामा; एमआयएम महापौर पदाच्या शर्यतीतून बाहेर; शिंदे गटाची अनपेक्षित 'एन्ट्री'
Vasai Virar News: तलावात बुडून ४ वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू
गुप्त मतदान झालं असतं तर ऑपरेशन शिट्टी काय असतं ते दाखवलं असते - माजी आमदार हितेंद्र ठाकूर
तुर्भे स्कायवॉकला अचानक आग, पादचारी पुल तात्पुरते बंद
तुर्भेमधील स्कायवॉकला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. हुंडाई शोरूम समोरील पादचारी पुलावर अचानक आग लागल्यामुळे पादचारी पुलावरून जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पुलाखाली काही ज्वलनशील वस्तूंमुळे आग लागली. परिणामी, पादचारी पुलावरून प्रवास करणे तात्पुरते बंद करण्यात आले.
अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विझवण्यात यशस्वी झाल्या. मात्र, आग नक्की कशी लागली याबाबत अद्याप माहिती नाही.
बदलापुरला अतिक्रमणांचा विळखा, सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, प्रशासकीय राजवटीतही अतिक्रमणांची परंपरा कायम
World Cancer Day : केवळ लठ्ठपणामुळे १३ प्रकारच्या कर्करोगांचा धोका? डॉक्टर काय सांगतात…
Swachh Survekshan 2025–26: मुंबई महानगरपालिकेची नागरिकांना साद… प्रशासनाला नागरिकांची गरज का भासली वाचा…
अजित पवार यांच्या अपघाती निधनाबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत. यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस( अजित पवार) पक्षाचे नेते अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा अपघात झाला त्या दिवशीचे व्हिडीओ फुटेज प्रसिद्ध करण्याची मागणी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) कडे केली आहे. "DGCA नी ब्लॅक बॉक्सचा सत्यपडताळणी अहवाल येण्याअगोदर आदरणीय अजित दादांचे दिनांक २८ जानेवारी २०२६ चे मुंबई विमानतळ मुख्य प्रवेशद्वारापासून ते विमानात बसेपर्यंतची सर्व व्हिडीओ शुटिंग व CCTV फुटेज अधिकृतरित्या तात्काळ प्रसिद्ध करावे," अशी पोस्ट त्यांनी एक्सवर केली आहे.
Cancer patient: महत्वाची बातमी… आता कॅन्सरच्या रुग्णांनी घाबरू नये
Job Opportunity: धुळे... तब्बल एक हजार ११८ पदांची भरती, नोकरीची संधी कुठे, कशी जाणून घ्या…
तरुणीचा विवाह मोडणाऱ्या प्रियकराला अटक; नियोजित पतीला छायाचित्रे पाठवून कुटुंबीयांना जिवे मारण्याची धमकी
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महापौरपदी शिवसेनेच्या हर्षाली थविल याची तर उपमहापौरपदी राहुल दामले यांची नियुक्ती झाली आहे.
वसई विरार महापालिकेच्या महापौरपदी बहुजन विकास आघाडीचे नेते अजीव पाटील तर उपमहापौर पदावर मार्शल लोपीस यांची वर्णी लागली आहे. पक्षाचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनी दोघांना शुभेच्छा दिल्या आहेत

