Maharashtra News Live Today: महाराष्ट्रात एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद कुणाकडे जाणार? याची चर्चा चालू असताना दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणावरूनही तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे. यासंदर्भात सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूच्या नेतेमंडळींकडून वेगवेगळे दावे केले जात असताना नेमकं याबाबत काय घडणार? याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद निवडणुकीबाबत सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांकडून पुन्हा एकदा कंबर कसून प्रचाराला सुरुवात झाली आहे.

Live Updates

Live News Today in Marathi: महाराष्ट्रातील महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर...

19:32 (IST) 4 Feb 2026

ठाणे पालिका आयुक्त अपेक्षित करवसुली होत नसल्याने नाराज; थकबाकीदारांवर कारवाई करण्याचे आयुक्तांचे प्रशासनाला आदेश

मालमत्ता कर हा ठाणे महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत मानला जातो. या विभागात अर्थसंकल्पात कर वसुलीचे उद्दीष्ट ठरवून देण्यात येते. यंदाच्या आर्थिक वर्षातही असेच उद्दीष्ट देण्यात आले होते. ...सविस्तर बातमी
19:24 (IST) 4 Feb 2026

Nashik loan shark: खासगी सावकार भारत लोखंडे अखेर ताब्यात

भारत लोखंडे (रा. वैदुवाडी) याने श्वेता फुलसुंदर यांना एक लाख रुपये कर्ज म्हणून दिले होते. कर्ज वसुलीसाठी लोखंडेने सतत तगादा लावला होता. पैसे न दिल्यास श्वेता यांना त्यांचे पती संदीप आणि कुटूंबातील अन्य सदस्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. ...सविस्तर बातमी
19:13 (IST) 4 Feb 2026

शालेय विद्यार्थ्यांमध्ये मोबाइल गेम्सचे वाढते आकर्षण; डिजिटल व्यसनाला आळा घालण्याची शिक्षण संघटनेचीची मागणी

राज्यात १८ वर्षांखालील सुमारे चार कोटीहून अधिक बालके असून त्यापैकी जवळपास तीन कोटी बालके १५ वर्षांखालील आहेत. ऑनलाइन वर्ग, अभ्यास, माहिती संकलन आदी कारणांसाठी ही मुले मोबाइलचा सर्रास वापर करीत असतात. ...अधिक वाचा
19:06 (IST) 4 Feb 2026

मार्चपासून बीकेसी - पश्चिम द्रुतगती मार्ग प्रवास अवघ्या काही मिनिटांत; वाकोला - बीकेसी पुलाचे काम अंतिम टप्प्यात

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पाअंतर्गत (एससीएलआर) वाकोला ते वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) दरम्यान उड्डाणपूल बांधत आहे. ...अधिक वाचा
18:52 (IST) 4 Feb 2026

मोर्चेकऱ्यांतर्फे मनुवादी प्रवृत्तींचा निषेध

मंत्री गिरीश महाजन, धार्मिक तेढ निर्माण करणारे मंत्री नितेश राणे यांना तात्काळ मंत्रिमंडळातून काढावे, ही मागणी यावेळी करण्यात आली. ...अधिक वाचा
18:47 (IST) 4 Feb 2026

Bhusawal Railway Division Update: ब्रेकिंग न्यूज… मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागात तीन मोठे अपघात टळले !

भुसावळ विभागात अलीकडे घडलेल्या तीन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठे अपघात आणि जीवित हानी टळली आहे. ...अधिक वाचा
18:45 (IST) 4 Feb 2026

Ajit Pawar: अजित पवार यांना आदरांजली, नागपूर जिल्ह्यातील अंभो-यात अस्थी विसर्जन…

लोकनेते अजित पवार यांच्या अस्थींचे मंगळवारी कुही तालुक्यातील अंभोरा येथील वैनगंगा, कन्हान आणि जाम नद्यांच्या त्रिवेणी संगमावर शास्त्रोक्त पद्धतीने विसर्जन करण्यात आले. ...वाचा सविस्तर
18:38 (IST) 4 Feb 2026

Cancer Patient: राज्यात वर्षभरात सापडले कर्करोगाचे १,६७७ रुग्ण; मुख, गर्भाशयमुख व स्तन कर्करोगाच्या रुग्णांचा सर्वाधिक समावेश

फेब्रुवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत या व्हॅनद्वारे मुख, स्तन व गर्भाशयमुख कर्करोगासाठी २ लाख ४७ हजार नागरिकांची तपासणी करण्यात आली. ...सविस्तर बातमी
18:26 (IST) 4 Feb 2026

अजितदादांचे अपूर्ण काम फडणवीस पूर्ण करणार...

Ajit Pawar: अजित पवारांकडे अर्थ खाते असल्याने ते अर्थसंकल्प सादर करणार होते. ...सविस्तर वाचा
18:24 (IST) 4 Feb 2026

मैत्रिणीला दूरध्वनी केल्याचा वाद, तरुणावर कोयत्याने वार

हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पसार झालेल्या आरोपी चेतनला अटक करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
18:22 (IST) 4 Feb 2026

Nagpur Yantra India Limited: नागपूरच्या यान्ट्रा इंडियाला संरक्षण मंत्रालयाने दिला ‘मिनिरत्न’ दर्जा

माजी आयुध निर्माण मंडळाच्या (ऑर्डनन्स फॅक्टरी बोर्ड – OFB) पुनर्रचनेनंतर ऑक्टोबर २०२१ मध्ये यंत्र इंडिया लिमिटेडची स्थापना करण्यात आली. ...सविस्तर बातमी
18:13 (IST) 4 Feb 2026

महत्वाची बातमी: पालखी मार्ग रुंदीकरण कामासाठी दिवे घाट तीन तास बंद

रस्ता रुंदीकरणाच्या कामासाठी गुरुवारी (५ फेब्रुवारी) दिवे घाट सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार आहे. ...सविस्तर बातमी
18:04 (IST) 4 Feb 2026

Video: येऊर एअरफोर्स स्टेशनजवळ बिबट्याचा वावर…सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल

Leopard in Thane Yeoor Hills: या भागात नागरिक सकाळ आणि सायंकाळच्या वेळेत फेरफटका मारण्यासाठी जात असून व्हायरल व्हिडीओमुळे या नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. ...वाचा सविस्तर
17:58 (IST) 4 Feb 2026

आता 'फुगीर' आराखडा नको! पालघरच्या विकासकामांबाबत पालकमंत्री गणेश नाईक यांनी सुनावले खडे बोल

गैरप्रकार करणाऱ्या विरुद्ध दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यासह गैरमार्गाने वापर केलेल्या जागेचे भाडे वसुली करण्याचे देखील याप्रसंगी निश्चित करण्यात आले. ...सविस्तर बातमी
17:54 (IST) 4 Feb 2026

अमोल मिटकरी यांनी अजित पवारांच्या अपघाताबाबत काय दावा केला?

अमोल मिटकरी अकोल्यात म्हणाले, "सरपंचांनी असं वक्तव्य केलं होतं की कुणीतरी विमानातून उडी मारण्याची धडपड करत होतं. आम्ही त्यांना वाचावयला गेलो तर अचानक स्फोट झाले. नंतर कळलं पाच मृतदेह त्या ठिकाणी सापडले. UGCA कडून सांगितलं जातं आहे की विमानात सहा जण होते. असं असूनही पाच मृतदेहच सापडतात, जी कागदपत्रं आहेत ती कुठेही जळालेली नसतात. आता हा घात आहे की अपघात? ज्या कंपनीचं विमान होतं त्या कंपनीवर एक वर्षापासून बंद होती. मी आधीही म्हटलं तसं की अजित पवारांच्या घड्याळावरुन ओळख पटली असं सांगितलं गेलं. पण आता तोही मुद्दा खोडून काढण्यात आला आहे. घड्याळावरुन ओळख पटली नाही. त्यांच्या अंगावर असलेल्या पांढऱ्या कपड्यांवरुन ओळख पटली असंही सांगितलं गेलं."

17:39 (IST) 4 Feb 2026

न्यायालयीन प्रकरणांबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडून झाडाझडती; अंबरनाथ, बदलापुरात पाहणी, शेतकी सोसायटी, बदलापुरातील सांडपाणी प्रश्नावर भेट

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास शेतकी सोसायटी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या उभारणीसाठी आवश्यक जागेची जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी पाहणी केली. ...अधिक वाचा
17:29 (IST) 4 Feb 2026

केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्राला चालना देणारा

लघु व मध्यम उद्योगाच्या विकास निधीसाठी १० हजार कोटींची तरतूद तसेच स्वावलंबी भारत निधीमध्ये वाढ केल्यामुळे सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना भांडवली आणि जोखीम निधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. ...सविस्तर बातमी
17:20 (IST) 4 Feb 2026

कल्याण डोंबिवली पालिकेची तीन रुग्णालये अंबरनाथच्या वैद्यकीय काॅलेजला संलग्नित, आयुक्त आणि अधिष्ठाता यांच्यात सामंजस्य करार

या संलग्नतेमुळे पालिका रुग्णालयांमध्ये मुबलक मनुष्यबळ उपलब्ध होऊन रुग्णांना तत्पर दर्जेदार वैद्यकीय सुविधा मिळणे शक्य होणार आहे. ...अधिक वाचा
17:03 (IST) 4 Feb 2026

मुंबई पुणे एक्सप्रेस वे अपघाटताचा एसटी प्रवाशांना फटका; एसटीच्या 139 फेऱ्या रद्द

परिवहन विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, या अपघातानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्यातील विविध विभागांमधील एकूण 139 बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या. याम ...सविस्तर वाचा
16:43 (IST) 4 Feb 2026

यवतमाळात बोगस खव्‍याचा कारखाना सील! एफडीएचा  छापा

नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि विनापरवाना चालणाऱ्या या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने  छापा टाकत टाळे ठोकले. ...वाचा सविस्तर
16:17 (IST) 4 Feb 2026

Video : माळेगाव औद्योगिक वसाहतीतील कंपनीला भीषण आग सिन्नर, नाशिकचे अग्निशमन दल घटनास्थळी

आगीचे लोळ आणि धुराचे लोट दुरवरूनही दिसत असून परिसरात एकच खळबळ उडाली. सुदैवाने यात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. ...वाचा सविस्तर
16:17 (IST) 4 Feb 2026

वि. सा. संघ निवडणूक आणि धक्कादायक स्फ़ोट, नामवंत लेखक म्हणतात ४५ वर्षात प्रथमच मी मतदार असल्याचे…

मतदार यादीत माझे नाव ५५ क्रमांकावर आहे, हे समजले. संघाची आजन्म सभासद यादी आजपर्यंत कधीच पाहायला मिळाली नाही. आता प्रथमच मतदान योग येतोय. ...अधिक वाचा
15:54 (IST) 4 Feb 2026

बदलापूरमध्ये भाजपची ताकद वाढली; शिंदेसेनेतून आलेले प्रविण राऊत यांना स्विकृत नगरसेवकपद

कुळगाव बदलापूर नगर परिषदेची दहा वर्षांनंतर झालेली निवडणूक अनेक अर्थांनी धक्कादायक निकाल देणारी ठरली. भाजपने अजित पवारांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सोबतीने शिंदेंच्या शिवसेनेला नगराध्यक्ष पदाच्या निवडीत पराभूत केले. ...सविस्तर बातमी
15:54 (IST) 4 Feb 2026

जगातली कठीण ‘ब्राझील १३५ अल्ट्रा मॅरेथॉन’ पूर्ण करणारी पूजा कृष्णमूर्ती

मुंबईच्या पूजा कृष्णमूर्ती हिने ही शर्यत विहित केलेल्या ६० तासांच्या मर्यादेपूर्वीच, म्हणजेच अवघ्या ४८ तासांत पूर्ण केली. या ऐतिहासिक कामगिरीसह तिनं महिला गटात आठवं स्थान पटकावलं. ...अधिक वाचा
14:51 (IST) 4 Feb 2026

Gold Silver Price: सोने, चांदीचा पुन्हा दणका… जळगावमध्ये आता किती दर?

स्पॉट गोल्डचा दर प्रति औंस ५,०५४.७५ डॉलरवर पोहोचला आहे. मागील काही दिवसांत झालेल्या मोठ्या घसरणीनंतर ही दरवाढ बाजारासाठी दिलासादायक मानली जात आहे. ...सविस्तर वाचा
14:46 (IST) 4 Feb 2026

टिटवाळा, बल्याणी, बनेलीत टेकड्या, झाडे तोडून बेकायदा चाळींची उभारणी; महापौर ॲड. हर्षाली चौधरी यांनी कारवाईचे आदेश देण्याची मागणी

या चाळी सरकारी जमिनी, वन विभागाच्या आणि पालिकेच्या आरक्षित जागांवर उभारल्या जात आहेत. या बेकायदा चाळी उभारणीला काही स्थानिक राजकीय मंडळी आशीर्वाद देत आहेत. ...वाचा सविस्तर
14:37 (IST) 4 Feb 2026

डोंबिवली राजाजी रस्त्यावरील मासळी बाजार हटविण्याची नागरिकांची मागणी

मुख्य वर्दळीच्या रस्त्यावर पदपथ अडवून हा मासळी बाजार भरत असल्याने या मासळी बाजारावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. ...अधिक वाचा
14:28 (IST) 4 Feb 2026

‘मेट्रो ३’वर नव्या वादाची ठिणगी… तीव्र आंदोनलनाचा इशारा… नेमका वाद काय आणि कुणी दिला इशारा वाचा…

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे नाव ‘सीएसएस टर्मिनस मेट्रो’, तर जगन्नाथ शंकरशेट मेट्रो स्थानकाचे नाव ‘जेएसएस मेट्रो’ असे नमूद करण्यात येत असून यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ...सविस्तर बातमी
14:19 (IST) 4 Feb 2026

मुंबई महापालिकेचे उपमहापौर पद शिवसेना (शिंदे) पक्षाकडे, उपमहापौर पदीही महिला राज

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठी पन्नास टक्के आरक्षण असले तरी मुंबई महापालिकेत त्याहीपेक्षा अधिक महिला नगरसेविका निवडून येण्याची परंपरा यंदाही कायम आहे. ...सविस्तर बातमी
14:11 (IST) 4 Feb 2026

धुळे : पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी आता ‘वॉटर मीटर’ची मात्रा; २५ टक्के पाणी बचत?

सध्या शहरात दीड ते दोन तास पाणीपुरवठा होत असल्याने पाणी भरल्यानंतर मोठ्या प्रमाणावर नासाडी होते. वॉटर मीटर बसवल्यानंतर आवश्यक तेवढ्याच पाण्याचा वापर होईल, असा महापालिकेचा दावा आहे. ...वाचा सविस्तर

Jay Pawar emotional post for ajit pawar

जय पवार यांनी सोशल मीडियावर व्यक्त केलेल्या भावनांमधून वडिलांबद्दलचे प्रेम आणि अपार दुःख दिसून येत आहे.

Live News Today in Marathi: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार का? चर्चेला उधाण!