Maharashtra News Today: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर महाराष्ट्रात मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. एकीकडे उपमुख्यमंत्रीपदी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी झाल्यामुळे तो मुद्दा निकाली निघाला असला तरी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार की नाही? याबाबत सध्या मोठा संभ्रम दिसत आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार विलिनीकरणासाठी आग्रही असल्याचे दावे केले जात असताना दुसरीकडे अजित पवार गटाकडून मात्र कोणतीही भूमिका घेतली जात नाहीये. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांकडे सध्या मतदार वर्गाचं लक्ष लागलं आहे.

Live Updates

Maharashtra Live News Today in Marathi: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण होणार का? झालं तर कुणाचं कुणामध्ये?

19:56 (IST) 2 Feb 2026

सांगली : महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी मैनुद्दीन बागवान यांची निवड

पक्षाच्या नवनिर्वाचित १६सदस्य व गटनेतेपदाची नोंदणी सोमवारी पुणे विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली. ...अधिक वाचा
19:34 (IST) 2 Feb 2026

तांड्यांना मिळणार स्वतंत्र गावाचा दर्जा! महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

राज्यातील उपेक्षित असलेल्या सर्व तांड्यांना आता स्वतंत्र गावाचा दर्जा देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. ...अधिक वाचा
19:05 (IST) 2 Feb 2026

Malegaon Mayor Election: सेक्युलर फ्रंटचे ठरलंय!महापौरपदासाठी नसरीन बानो, तर उपमहापौरपदासाठी शान-ए-हिंद मैदानात!

मालेगाव महानगरपालिकेच्या राजकारणाने आता वेग घेतला आहे. येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 'सेक्युलर फ्रंट' या आघाडीने आपले पत्ते उघड केले असून, सोमवारी मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. ...सविस्तर वाचा
18:59 (IST) 2 Feb 2026

Jalgaon Crime News : रावेर पोलिसांकडून बुलेट चोरणारी टोळी गजाआड; १३ लाखांचा मुद्देमाल जप्त !

रावेर पोलीस ठाण्यात २० डिसेंबर २०२५ रोजी रॉयल एनफिल्ड बुलेट चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. तक्रारदार हे जळगावहून रावेर येथे नातेवाईकांकडे आले असता, चौराहा भागात त्यांनी नवीन पांढऱ्या रंगाची बुलेट घरासमोर लावली होती. ...सविस्तर वाचा
18:54 (IST) 2 Feb 2026

Mumbai police attacked : हल्लेखोर आल्याचे समजून मुंबई पोलिसांवर हल्ला... गुन्हा दाखल अद्याप संशयित अटक नाही…

अमली पदार्थ खरेदी विक्री प्रकरणी संशयित आरोपींना पकडण्यासाठी आलेल्या मुंबई पोलिसांवर आठ जणांनी जोरदार हल्ला चढवला होता. ...सविस्तर वाचा
18:41 (IST) 2 Feb 2026

Nagpur Mayor : मुख्यमंत्र्यांच्या शहरातील महापालिकेत ठाकरे महापौर

नागपूरच्या ५५ व्या महापौर म्हणून दक्षिण नागपुरातील नीता ठाकरे यांची निवड निश्चित झाली असून, त्यांनी आज भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ...सविस्तर बातमी
18:31 (IST) 2 Feb 2026

Loksatta IMPACT : ताडोबातील खाणीमुळे वाघांचे अधिवास धोक्यात; उच्च न्यायालयाकडून गंभीर दखल…

ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या व्याघ्र मार्गिकेत प्रस्तावित असलेल्या लोहखाणीमुळे ६० हून अधिक वाघांचा अधिवास धोक्यात आल्याच्या 'लोकसत्ता'च्या वृत्ताची उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेऊन स्वत:हून जनहित याचिका दाखल केली आहे. ...सविस्तर वाचा
18:15 (IST) 2 Feb 2026

अर्थसंकल्पात वस्त्रोद्योगासाठी भरीव तरतूद; नव्या योजनांसह उद्योजक, कामगार, निर्यातदारांना प्रोत्साहन

गत वर्षी वस्त्रोद्योग कार्यक्रमांना पाठिंबा देण्यासाठी सुमारे साडे पाच हजार कोटींची तरतूद केली होती. ती यंदा १० हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. यातून निर्यात आणि रोजगार निर्मितीला चालना मिळण्यास मदत होईल. ...सविस्तर वाचा
18:15 (IST) 2 Feb 2026

मुंबई महानगरपालिकेत नगरसेवकांच्या झालेल्या बैठकीत नगरसेवक गणेश खंकर यांची गटनेते पदी निवड

https://twitter.com/BJP4Mumbai/status/2018235942776312132

17:58 (IST) 2 Feb 2026

अज्ञात वाहनाने घेतला मादी बिबटचा बळी

वाढत्या नागरीकरणामुळे वन्यजीव महामार्गांकडे वळत असून, वेगवान वाहनांच्या धडकेत बिबट्यांचे बळी जाण्याचे प्रमाण वाढल्याने अकोला वनविभागाच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...सविस्तर बातमी
17:47 (IST) 2 Feb 2026

Pune Police : पोलीस आयुक्तांकडून मद्यपींना ‘दम’, शिवाजीनगर मुख्यालयात एक हजार मद्यपी वाहन चालकांचे समुपदेशन...

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी १,००० मद्यपी वाहनचालकांना शिवाजीनगर मुख्यालयात बोलावून 'पुन्हा मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास भर चौकात सत्कार करू' असा कडक इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
17:44 (IST) 2 Feb 2026

महापौर निवडीच्या घोषणेआधीच उमेदवाराकडून बैठकसत्र, पालिकेच्या माध्यमातून कोपरी परिसरात राबविली सर्वंकष स्वच्छता मोहीम

महापौर पदाच्या उमेदवार शर्मिला पिंपळोलकर यांनी पालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोपरी परिसरात सर्वंकष स्वच्छता मोहीम राबविल्याचे चित्र दिसून आले. यामुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची चिन्हे आहेत. ...अधिक वाचा
17:36 (IST) 2 Feb 2026

Nagpur Growth Hub : ‘ग्रोथ हब’साठी मिळणाऱ्या निधीचा नागपूरलाही फायदा - मुख्यमंत्री

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात नागपूरला 'ग्रोथहब' म्हणून घोषित केले असून, यासाठी पाच वर्षांत ५ हजार कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. ...अधिक वाचा
17:34 (IST) 2 Feb 2026

Mira Bhayandar Mayor Election: महापौराची निवड उद्यावर पण महापौर दालनातील खुर्च्या मात्र धुळीतच!

सध्या महापौर कार्यालयाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून महापौराच्या खुर्चीसह इतर ठिकाणी साफसफाई न झाल्यामुळे धूळ पसरलेली आहे. ...सविस्तर वाचा
17:24 (IST) 2 Feb 2026

बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे लढवली निवडणूक? देसाईगंजमधील निर्वासित 'ओबीसी' नगरसेवकांविरोधात तक्रार…

गडचिरोलीतील देसाईगंज नगर परिषदेत राहुल सतवानी यांनी बनावट 'क्षत्रिय' जात प्रमाणपत्राद्वारे ओबीसी आरक्षण मिळवून निवडणूक जिंकल्याचा आरोप केला जात आहे. ...सविस्तर बातमी
17:10 (IST) 2 Feb 2026

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कर्मचारी भरती परीक्षेत गैरप्रकार; पोलिसांकडून एकाला अटक

पुण्यातील औंध भागात सीबीएसई परीक्षेत तोतयागिरी करणाऱ्या राजस्थानच्या तरुणाला पोलिसांनी अटक केली असून, केंद्र पर्यवेक्षकांच्या सतर्कतेमुळे हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ...सविस्तर वाचा
17:03 (IST) 2 Feb 2026

‘शिवणी नव्हे संत गजानन महाराज विमानतळ’, नामांतरावरून खासदार अनुप धोत्रेंचा केंद्रीय मंत्र्यांना…

पश्चिम विदर्भातील पहिल्या ब्रिटिशकालीन शिवणी विमानतळावरून लवकरच हवाई सेवा सुरू करण्यासाठी धावपट्टी विस्तारीकरणासोबतच नामांतराचा मुद्दा आता केंद्र आणि राज्य सरकारच्या दरबारी पोहोचला आहे. ...वाचा सविस्तर
17:02 (IST) 2 Feb 2026

Chhagan Bhubal : "राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपाला विचारावं लागेल", छगन भुजबळांची प्रतिक्रिया

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत चर्चा सुरू असती तर अजित पवारांनी मला सांगितलं असतं असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. त्यामुळे भाजपाला विचारल्याशिवाय असा निर्णय घेता येणार नाही, असं मंत्री छगन भुजबळ म्हणालेत. ...अधिक वाचा
17:00 (IST) 2 Feb 2026

न्यायालयाच्या फटकाऱ्यानंतर अतिक्रमणांना दणका, ४० हून अधिक अतिक्रमणे जमिनदोस्त, संपूर्ण बदलापूर पालिका रस्त्यावर

अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली. आज कारवाई होणारच याची चाहूल लागताच सर्व दुकानदार, हॉटेलधारक, कंपन्यांचे लोक बांधकामातील साहित्य, माल काढू लागले. त्या कर्मचाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. ...वाचा सविस्तर
16:55 (IST) 2 Feb 2026

शहरात दुकानांचे कुलूप तोडून रोकड चोरीच्या घटना वाढल्या; नेहरू चौकातील दुकानातून ४१ हजारांची रोकड चोरी

पुणे शहरात गेल्या काही महिन्यांपासून दुकाने फोडून रोकड चोरण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, बाणेर ते येरवड्यापर्यंत चोरट्यांनी पोलिसांच्या गस्तीला एकप्रकारे आव्हान दिले आहे. ...वाचा सविस्तर
16:46 (IST) 2 Feb 2026

PCMC Mayor : महापौर, उपमहापौरपदासाठी भाजपकडून 'यांना' उमेदवारी! निवड निश्चित, शुक्रवारी होणार…

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपने रवी लांडगे यांना महापौर तर शीतल शिंदे यांना उपमहापौरपदाची उमेदवारी जाहीर केली असून, शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत त्यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे. ...सविस्तर वाचा
16:43 (IST) 2 Feb 2026

" इतक्या लवकर मी काय जात नसतो .. " अजितदादांचे शब्द कानावर पडले अन् कोल्हापुरात ....

कोल्हापूर : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अस्थींचे सोमवारी येथे त्यांच्या चाहत्यांनी भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले. अस्थिकलशाच्या दर्शनासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील मंडपात सर्वपक्षीयांनी उपस्थिती लावली.मध्येच दिवंगत अजितदादांचे एआय निर्मित भाषण लावले जात होते. त्यांच्या आवाजातील "इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात......", हे शब्द कानावर पडताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. अनेकजण दाटलेल्या हुंदक्यांना वाट मोकळी करून देत रडत- रडत तर अनेकजण डबडबल्या साश्रुनयनांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत होते.

आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थींचे दर्शन घेताना अनेकजण भावूक झाले. काहीना तर अश्रूंचा बांध आवरता नाही. हुंदके सावरत सावरत अनेकांनी साश्रुनयनांनी या लोकनेत्याच्या अस्थींचे दर्शन घेतले.महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी अस्थीकलश घेवून कोल्हापुरात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थीकलश स्वीकारून अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत फुले वाहून अस्थिकलसह अजितदादांच्या प्रतिमेचे पूजन केले. 

16:38 (IST) 2 Feb 2026

SSC HSC Board Exam 2026 : नका घेऊ परीक्षांचे टेन्शन! एका कॉलवर तज्ज्ञ करतील मार्गदर्शन; दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाची…

Maharashtra State Board : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सकारात्मक मानसिकतेने सामोरे जावे, यासाठी शिक्षण विभागाने विशेष समुपदेशन केंद्र आणि मार्गदर्शनाची सोय उपलब्ध करून दिली आहे. ...सविस्तर वाचा
16:36 (IST) 2 Feb 2026

ठाण्यात अजित पवारांचे अस्थिकलश दर्शन; कट्टर विरोधक आव्हाड, मुल्ला, परांजपेंचे मनोमिलन

आमदार जितेंद्र आव्हाड आणि नगरसेवक नजीब मुल्ला ही गुरू शिष्याची जोडी म्हणून ठाणे जिल्ह्यात ओळखी जायची. काही वर्षांपुर्वी दोघांमध्ये बिनसले. ...अधिक वाचा
16:19 (IST) 2 Feb 2026

Advantage Vidarbha 2026 : विदर्भात रोजगाराची मोठी संधी… २३ देशातील राजदूत व व्यापार प्रतिनिधी नागपूरात… ॲडव्हांटेज विदर्भमध्ये…

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या पुढाकाराने आयोजित या आंतरराष्ट्रीय परिषदेमुळे रशिया आणि चीनसह अनेक देशांशी विदर्भातील उद्योजकांचा थेट संवाद होऊन जागतिक बाजारपेठेची दारे उघडली जाणार आहेत. ...अधिक वाचा
16:01 (IST) 2 Feb 2026

Chandrapur Meyor Election: चंद्रपुरात ठाकरे गट आणि भाजपाची युती?

भाजपाच्या स्थानिक आमदारांशी आमची चर्चा चालू आहे. काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांच्याशीही आमची चर्चा चालू आहे. आमची इच्छा काँग्रेसबरोबर जायची आहे. पण काँग्रेसला आम्हाला सोबत घ्यायचं नाहीये. निवडणुकीच्या आधीही त्यांनी आमची युती नाकारली. त्यामुळे आम्ही निवडणुका वेगळ्या लढलो. त्यामुळे आम्हाला अधिकार आहे की आता कुणासोबत युती करायची - संदीप गिऱ्हे, ठाकरे गट जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा

16:01 (IST) 2 Feb 2026

Chandrapur Meyor Election: चंद्रपुरात ठाकरे गट आणि भाजपाची युती?

शिवसेना, वंचित बहुजन आघाडी व उद्धव ठाकरे गट असा ८ चा गट आणि दोन अपक्ष असे आम्ही १० जण आहोत. मी पहिल्यापासून सांगतोय की जो शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा महापौर करेल त्याचा पाठिंबा घेऊन आम्ही महापौर बसवू - संदीप गिऱ्हे, ठाकरे गट जिल्हाध्यक्ष, चंद्रपूर</p>

15:54 (IST) 2 Feb 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात

बारामती विमान अपघातात निधन झालेल्या अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तरडगाव येथे भेट घेत सांत्वन करत आधार दिला. ...वाचा सविस्तर
15:54 (IST) 2 Feb 2026

उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांचा स्वर्गीय विदीप जाधव यांच्या पत्नी व मुलांच्या डोक्यावर मायेने हात

बारामती विमान अपघातात निधन झालेल्या अंगरक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबीयांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी तरडगाव येथे भेट घेत सांत्वन करत आधार दिला. ...वाचा सविस्तर

ajit-pawar-sharad-pawar-2

दोन्ही पक्ष एकत्र य़ेणार?

Maharashtra Live News Today in Marathi: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा...