Maharashtra News Updates : मुंबई महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदासाठी आज निवडणूक होत आहे. ही निवडणूक फक्त एक औपचारिकता असणार आहे. त्यामुळे भाजपाच्या नेत्या रितू तावडे यांची मुंबईच्या महापौर म्हणून नावाची अधिकृत घोषणा आज केली जाणार आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. यातच अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर त्यांची पत्नी सुनेत्रा पवार यांनी काल उपमुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला आहे. त्यानंतर त्या आज दिल्लीत पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच इतर काही महत्त्वाच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. या आणि इतर सर्व राजकीय घडामोडींकडे आपले लक्ष असणार आहे.
Today’s Live News Updates in Marathi : महाराष्ट्रातील सर्व महात्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...
भारतातील पहिला ‘म्युझिकल रोड’ मुंबईत! कोस्टल रोडवर धावताना ऐकू येणार ‘जय हो’ची धून; पाहा खास वैशिष्ट्ये
NA Permission Maharashtra : 'बांधकामासाठी जमिनीच्या ‘एन.ए.’ परवानगीची गरज नाही, बांधकाम आराखडा हीच परवानगी…!' जमीन महसूल कायद्यात महत्त्वाची सुधारणा...
Kolhapur Mumbai Flight : कोल्हापूरात हवाहवाई! कोल्हापूर-मुंबई मार्गावर २ मार्चपासून सकाळ, संध्याकाळी विमानसेवा सुरू होणार...
एकनाथ शिंदे ठाणे पालिकेत दाखल झाले अन् आठ दिवसांनंतर महापौरांनी पदभार स्विकारला...
Kolhapur International Cricket Stadium : कोल्हापुरातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमला अजित पवार यांचे नाव देणार...
Satara Politics: "अति तिथे माती होते, माणसं योग्य वेळेची वाट बघत असतात"; पंचायत समिती, 'झेपी' निकालावरुन मंत्री शंभूराज देसाईंचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला
परभणीच्या महापौर, उपमहापौर पदाची निवड अवघ्या काही तासांवर…सहलीवर गेलेले नगरसेवक नाट्यमयरित्या प्रकटणार
परीक्षेला उशीर झाला तर घाबरू नका; ठाणे पोलिसांच्या 'रायडर्स'नी २ दिवसांत २६ विद्यार्थ्यांना पोहोचवले केंद्रावर
मुंबईत म्हाडाचं विना सोडत घर हवंय? आता ‘इतके’ दिवस पहावी लागणार वाट!
Mira Bhayandar Illegal Construction : खाडी परिसरातील बेकायदा बांधकामांवर महापालिकेची कारवाई
केळीची अचानक मोठी झेप… बऱ्हाणपूर बाजार समितीत आता ‘इतका’ भाव!
Video : “भारत-अमेरिका व्यापार करार शेतकऱ्यांच्या मुळावर,” रविकांत तुपकर यांची टीका; म्हणाले…
महिला डॉक्टरला श्रमजीवी संघटनेकडून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ; संतापातून दिला तडकाफडकी राजीनामा, रुग्णसेवा ठप्प होण्याची शक्यता
Global Agri AI Summit Mumbai : शेतकऱ्यांच्या कष्टाला कृत्रिम बुद्धिमत्तेची जोड देणार; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची महत्त्वाची घोषणा
शेगावीच्या राणाची ख्याती सातासमुद्रापार! अमेरिकेत गजानन महाराज प्रगटदिन साजरा
Mumbai Climate Week : पुढील आठवड्यात ‘मुंबई क्लायमेट वीक’… जाणून घ्या, सहभागी कोण होणार? कोणत्या विषयांवर मंथन होणार?…
"आज अजितदादांच्या दुर्दैवी अपघाती निधनाच्या चौकशीचा विषय हा आमच्यासाठी महत्त्वाचा असून तो योग्य दिशेने जाण्यासाठी माझ्या काही बैठका सुरु आहेत. त्यामुळं १२ फेब्रुवारी रोजी राजकीय विषयावर घेण्यात येणारी पत्रकार परिषद पुढे ढकलावी लागतेय... अजितदादांच्या चौकशीचा विषय मार्गी लागताच लवकरच राजकीय विषयावरील पत्रकार परिषदही घेण्यात येईल आणि याबाबत दोन दिवस आधी कळवण्यात येईल," अशी पोस्ट रोहित पवार यांनी एक्सवर केली आहे.

