Maharashtra Politics Updates, 13 April 2026: जवळपास पाच दशकं संगीतविश्वावर आपल्या विलोभनीय गायकीने अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांचं रविवारी १२ एप्रिल रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सकाळी ११ वाजेपासून परळ येथील त्यांच्या राहत्या घरी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. संध्याकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांना अग्नी दिलेल्या ठिकाणीच आशा भोसले यांच्यावरदेखील अंत्यसंस्कार करण्यात आले. दुसरीकडे महाराष्ट्रात अशोक खरात प्रकरणावरून मोठा वाद निर्माण झाला असून त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. त्याची तिसऱ्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर अशोक खरातबाबत महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून परखड प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.
Maharashtra Breaking News Updates, 13 April 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा...
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने ठाण्यात ६४ मिरवणूका, ठाणे पोलिसांकडून महत्त्वाच्या मार्गांवर वाहतुक बदल
आयआयटी मंडीच्या तांत्रिक मार्गदर्शनासोबत कोल्हापूर महापालिका होणार स्मार्स्ट सिटी! नेमके काय होणार ते पहा
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारकस्मारकासाठी ३३२ कोटींची तरतूद लवकरच स्मारकाच्या कामाला होणार सुरुवात
वाडा तालुक्यातील कोहोज किल्ल्यावर ट्रेकिंग दरम्यान तरुणाचा अपघात; किल्ल्यावरून पडून १५ वर्षीय विद्यार्थी गंभीर जखमी
Heavy Vehicles Accidents: अवजड वाहनांचा हैदोस! विकास कामांसाठी धावणारे मिक्सर, हायवा, डम्पर वाहने प्रवाशांच्या मृत्युला काळ
“आई, दोन-चार दिवसांत येतो…” सांगून निघाले, अन् काळाने घाला घातला; रायते पुलाजवळील अपघातात एकाच कुटुंबातील ३ भावंडांचा मृत्यू
Thane Water Cut Update: ठाण्यात पाण्याचा ठणठणाट!
Pune Water Cut: मोठी बातमी: संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा गुरुवारी राहणार बंद! काय आहे कारण?
वृद्धेची ऑनलाईन माध्यमातून ९१ लाख रुपयांना फसवणूक
पुणेकरांनो, आता मेट्रो स्थानकापर्यंत चालण्याची तयारी ठेवा; वाहनतळाची सुविधा देणे शक्य नसल्याचे ‘महामेट्रो’चे स्पष्टीकरण
Navneet Rana News: ‘समझदारों को इशारा काफी है! नाराज नवनीत राणा असे का म्हणाल्या?, सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत
रात्रपाळीत झोपण्यावरून वाद; सुरक्षारक्षकाचा गळा आवळून खून- खराडी पोलिसांकडून एक जण अटकेत
महाराष्ट्रात मराठी सक्तीला बिष्णोई गँगचा विरोध; आरटीओ अधिकाऱ्याला धमकी
रायते अपघातानंतर ठाणे जिल्ह्यातील अवैध प्रवासी वाहतूकीचा मुद्दा ऐरणीवर
Asha Bhosle Last Rites Live Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या संकल्पनेतील संगीत संस्था स्थापन करण्यासाठी सकारात्मक पावले उचलण्यात येतील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. स्व. आशाताईंनी यांनी संगीत क्षेत्राशी निगडीत संस्था स्थापन करण्याचा प्रस्ताव दिला होता. हा प्रस्ताव शासन पुढे घेऊन जाईल. आशाताईंच्या संकल्पनेतील संस्था साकार व्हावी यासाठी सकारात्मक पावले उचलली जातील, असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले.
मुलगीही गेली आणि पैसेही ; नाशिक जिल्ह्यात लग्नाळु मुलांना फसविणारी टोळी
मराठी भाषेच्या समृद्धीसाठी बोली भाषेच्या शब्दांची जोड महत्त्वाची, गझलकार डॉ. दिलीप पांढरपट्टे यांचे प्रतिपादन
Supriya Sule on Ashok Kharat: "अशोक खरातकडे जाणाऱ्या महिलांना...", सुप्रिया सुळेंची भूमिका
यात महाराष्ट्रातल्या माणसांचं नुकसान होतंय. अशोक खरातकडे जाणाऱ्या, शोषण होणाऱ्या कोणत्याही महिलेला असं का वाटलं नाही की आपण कुणाकडेतरी जाऊन न्याय मागावा. आपण व्यवस्था म्हणून अपयशी ठरलो आहोत का? इतकं शोषण चालू होतं तर कुणाला का वाटलं नाही की आपण पोलीस स्थानकात किंवा लोकप्रतिनिधींकडे जाऊन न्याय मागावा. मला कुणीतरी म्हटलं की राजकीय नेतेही त्यांच्याकडे जात होते, जबाबदार व्यक्ती जात होत्या त्यामुळे लोकांना राजकीय नेत्यांवर विश्वास नव्हता. हे फार घातक आहे - सुप्रिया सुळे</p>
Yavatmal HTBT Cotton Seed Racket: यवतमाळमध्ये प्रतिबंधित 'एचटीबीटी' कापूस बियाण्यांचे मोठे रॅकेट उद्ध्वस्त; २० लाखांचा मुद्देमाल जप्त
Asha Bhosle Final Rites: सचिन तेंडुलकरला आशा भोसलेंच्या आठवणींत अश्रू अनावर!
सचिन तेंडुलकर आशा भोसलेंच्या अंत्यदर्शनासाठी दाखल, अश्रू अनावर
शरद मोहोळ खून प्रकरण : आरोपी वकिलाचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला, वाचा नेमकं कारण
नाशिक हादरले: वैतरणा व दुगारवाडीत बुलढाणा, जळगावसह नाशिकचे ४ तरुण बुडाले
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; रायते गावाजवळ व्हॅन आणि सिमेंट मिक्सरच्या धडकेत ५ जणांचा मृत्यू
जळगावच्या सुवर्ण बाजारपेठेत आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोने, चांदीचे दर वाढले की घटले..? जाणून घ्या ताजी स्थिती
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2026: डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विशेष: यंदा ‘नाचून नाही, वाचून साजरी करणार जयंती’; बाजार ‘भीममय’!
टकमक गडाच्या जंगलात हरवलेल्या मुंबईतील तीन पर्यटकांची सुखरूप सुटका
Asha Bhosle Last Rights Live Updates: उद्धव ठाकरे आशा भोसलेंच्या पार्थिवाच्या अंत्यदर्शनासाठी दाखल; रश्मी ठाकरेंना अश्रू अनावर!
उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांनी आशा भोसले यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं तेव्हा रश्मी ठाकरे यांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
भवानी पेठेत वैमनस्यातून तरुणाचा खून…चौघांना अटक
मराठी एकीकरण समिती आणि मंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वाद शमला

फोटो - एक्सप्रेस आर्काइव्ह
Maharashtra Breaking News Updates, 13 April 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर
