Latest Marathi News Live Updates: राज्यात सध्या महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या भोंदूबाब कॅप्टन अशोक खरातचे प्रकरण गाजत आहे. याशिवाय सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेला राडा देखील सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. विधानपरिषदेच्या सुरुवातीलाच सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडणुकीत झालेला राड्याचा विषय गाजला. पर्यटनमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात हा विषय मांडल्यानंत पोलिस अधीक्षक तुषार दोषी यांचे निलंबन करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. यासह राज्यातील राजकारण, गुन्हे, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रातील ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

Live Updates

Maharashtra Breaking News Today, 23 March 2026: महाराष्ट्रातील घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

21:02 (IST) 23 Mar 2026

‘भारत इनोव्हेट्स’ला संस्थात्मक रूप देणार केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान...

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी 'भारत इनोव्हेट्स' उपक्रमाला संस्थात्मक स्वरूप देण्याची घोषणा केली असून देशातील डीप-टेक स्टार्टअप्सना जागतिक स्तरावर नेण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. ...सविस्तर बातमी
20:44 (IST) 23 Mar 2026

तुमच्या भागात भोंदू बाबा आहेत?…‘या’ हेल्पलाइनवर संपर्क साधल्यास अंधश्रद्धा निर्मूलन समिती थेट माहिती कळविणार पोलिसांना!

‘अंनिस’च्या राज्य कार्यकारी समितीच्या सदस्या मुक्ता दाभोलकर, राजीव देशपांडे, गणेश चिंचोले यांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांची भेट घेऊन याबाबत निवेदन दिले. ...अधिक वाचा
20:37 (IST) 23 Mar 2026

मुंबईत मिळकतीचे फेरफार आता ऑनलाईन; ३० लाख मुंबईकरांना दिलासा…

खरेदीखत, वारसा आणि बक्षीसपत्रासह ४५ प्रकारच्या फेरफारांसाठी 'महाभूमी' संकेतस्थळावर विशेष प्रणाली विकसित करण्यात आली असून यामुळे मुंबईतील महसूल कारभारात मोठी पारदर्शकता येणार आहे. ...अधिक वाचा
20:27 (IST) 23 Mar 2026

MSRTC Rajmata Jijau Bus : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘राजमाता जिजाऊ’ एसटीचे लोकार्पण; ताफ्यात ३ हजार अत्याधुनिक स्मार्ट बसची भर...

५६ आसन क्षमता आणि सीसीटीव्ही, जीपीएससह पॅनिक बटन अशा हायटेक सुविधांनी सज्ज असलेल्या 'राजमाता जिजाऊ' बसमुळे महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक अधिक सुरक्षित आणि आरामदायी होणार आहे. ...सविस्तर वाचा
20:24 (IST) 23 Mar 2026

प्रवासी वाहतूक करणारे वाहन उलटून ३७ मजूर जखमी; जुन्नरमधील मुथाळणे घाटातील दुर्घटना

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्नर तालुक्यातून मजुरांना घेऊन वाहन हे उंबरेवाडी आणि सातेवाडी येथे चालले होते. मुथाळणे घाटातील ‘एस कॉर्नर’ वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने वाहन उलटले. ...अधिक वाचा
20:13 (IST) 23 Mar 2026

भोंदु अशोक खरातच्या अत्याचाराचा नाशिक मध्ये पाढा वाचला ! गुन्ह्याचे षटक पूर्ण, एकामागून एक सहा पिडीता समोर

खरातविरूध्द तक्रार करणाऱ्यांची संख्या वाढू लागली असून सोमवारी सायंकाळपर्यंत त्याच्याविरुध्द दाखल गुन्ह्यांची संख्या सहापर्यंत पोहचली. ...अधिक वाचा
20:07 (IST) 23 Mar 2026

कर्जत बसस्थानक आवार काँक्रीटीकरणाचे रेंगाळलेले काम अखेर सुरू; हिंदूत्ववादी संघटना व राजकीय पक्षांच्या इशाऱ्याने मार्गी...

आमदार रोहित पवार यांनी दोन वर्षांपूर्वी निधी उपलब्ध करूनही जागेच्या वादावरून बंद पाडलेले बसस्थानकाचे काम शिवसेनेच्या (शिंदे गट) आक्रमक भूमिकेनंतर सोमवारी पुन्हा मार्गी लागले. ...अधिक वाचा
19:54 (IST) 23 Mar 2026

शंभर रुपयांचे चिंचोके एक लाखाला विकले; मंतरलेले पाणी अन् अघोरी पुजा... अशा पध्दतीने महिलांना असा अडकवायचा जाळ्यात

आपल्या अंगात दैवी शक्ती असल्याचे सांगून महिलांचे लैंगिक शोषण करणारा भोंदू अशोक खरात हा अघोरी पूजेसाठी त्याच्या भक्तांना बाजारात किरकोळ भावाने मिळणारे चिंचोके विशेष खडा म्हणून एक लाख रुपयांपेक्षा अधिक दराने विकत होता. ...सविस्तर बातमी
19:48 (IST) 23 Mar 2026

दूध भेसळ करणाऱ्यांवर 'या' कायद्यानुसार होणार कारवाई...

दुधात भेसळ करणाऱ्या समाजकंटकांविरुद्ध आता 'मकोका' अंतर्गत कठोर कारवाई करण्याची ऐतिहासिक घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधान परिषदेत केली आहे. ...वाचा सविस्तर
19:38 (IST) 23 Mar 2026

"अशोक खरातसारख्यांना पाठबळ…" हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांचे मोठे विधान

सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थानचा अध्यक्ष अशोक खरातच्या भोंदूगिरीचे आणि महिलांचे लैंगिक शोषण करण्याचे एकेक प्रकरण बाहेर येत आहे. त्याच्याविरुध्द नाशिक पोलिसांकडे तीन गुन्हे दाखल झाले आहेत. ...सविस्तर बातमी
19:29 (IST) 23 Mar 2026

CET exam : सीईटी मंगळवारपासून सुरु; एमपीएडच्या परीक्षेपासून होणार सुरुवात

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या सीईटी प्रवेश परीक्षेला २४ मार्च २०२६ पासून सुरुवात होत आहे. ...वाचा सविस्तर
19:27 (IST) 23 Mar 2026

व्यावसायिक एलपीजीच्या कोट्यात ५० टक्क्यांपर्यंत वाढ; हॉटेल, ढाबे आणि उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा

राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ठाणे जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिली. ...सविस्तर बातमी
19:18 (IST) 23 Mar 2026

बेस्टचे सेवानिवृत्त कर्मचारी आर्थिक गर्तेत; १३५२ कोटीची देणी थकीत…

बेस्टमधील निवृत्त कर्मचाऱ्यांची तब्बल १३५२ कोटी रुपयांची देणी थकीत असून आर्थिक अडचणीमुळे त्यांना हक्काचे पैसे मिळण्यात विलंब होत आहे. ...अधिक वाचा
19:12 (IST) 23 Mar 2026

गतवर्षीच्या तुलनेत मुंबईतील क्षयराेग रुग्णांच्या संख्येत घट; औषध प्रतिरोधक क्षयरोगाचे रुग्ण बरे होण्याचा दर ८ वर्षात ८१ टक्क्यांपर्यंत...

औषध प्रतिरोधक क्षयरोगाचा (DRTB) यशाचा दर गेल्या आठ वर्षांत दुप्पट झाला असून अत्याधुनिक बीपाल-एम उपचार पद्धतीमुळे गंभीर रुग्णांना मोठा दिलासा मिळत असल्याचे दिसून आले आहे. ...वाचा सविस्तर
19:04 (IST) 23 Mar 2026

दहा वर्षांत केवळ सहा लाख २३ हजार झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण; अजूनही सात लाख ५५ हजार झोपडीधारकांचे सर्वेक्षण शिल्लक… मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतरही…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी डिसेंबर २०२५ पर्यंत शंभर टक्के सर्वेक्षण पूर्ण करण्याचे आदेश देऊनही झोपु प्राधिकरणाची संथ गती कायम असून अर्ध्याहून अधिक मुंबईतील झोपड्यांचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण अद्याप रखडलेलेच आहे. ...सविस्तर वाचा
18:57 (IST) 23 Mar 2026

खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची शक्यता; इंधनवाढ व समुद्रातील मासे घटल्याने मच्छीमार हतबल…

इराण-इस्रायल युद्धामुळे वाढलेले डिझेलचे दर आणि समुद्रातील माशांच्या स्थलांतरामुळे मुंबईतील मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने खवय्यांच्या ताटातून मासे गायब होण्याची चिन्हे आहेत. ...सविस्तर वाचा
18:30 (IST) 23 Mar 2026

Mumbai BEST Bus : बेस्ट बसची घटती संख्या रिक्षा, टॅक्सीच्या पथ्यावर! शहरात शेअर रिक्षा-टॅक्सीच्या संख्येत वाढ…

बेस्ट बसची संख्या घटल्याने मुंबईतील सुमारे १०० बस मार्ग बंद झाले असून नाईलाजास्तव प्रवाशांना जादा पैसे मोजून शेअर रिक्षा आणि टॅक्सीचा आधार घ्यावा लागत आहे. ...सविस्तर वाचा
18:18 (IST) 23 Mar 2026

मेट्रो ३ मार्गिकेतील मोबाईल नेटवर्क पूर्णत: ठप्प; दूरसंचार पायाभूत सुविधा पुरविण्यासंबंधीचे कंत्राट एमएमआरसीकडून रद्द…

एमएमआरसीने नवीन निविदा प्रसिद्ध केल्या असून १० एप्रिलपर्यंत अर्ज मागवले आहेत, मात्र ही प्रक्रिया पूर्ण होऊन नेटवर्क सुरू होण्यासाठी अजून बराच काळ प्रतीक्षा करावी लागेल. ...वाचा सविस्तर
18:09 (IST) 23 Mar 2026

ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा; रखडलेल्या भुयारीकरणाच्या कामाला आता एप्रिलचा मुहूर्त! पहिल्या आठवड्यापासून कामाला सुरुवात…

एमएमआरडीएने १८ हजार कोटींच्या ठाणे बोरीवली प्रकल्पासाठी एप्रिलचा नवा मुहूर्त निश्चित केला असून ठाण्यातील लाँचिंग शाफ्टमधून पहिल्या टनेल बोअरिंग मशीनद्वारे खोदकाम सुरू केले जाईल. ...वाचा सविस्तर
18:08 (IST) 23 Mar 2026

"एपस्टिन फाईल्सबाबत RSS नं पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे स्पष्टीकरण मागावं", काँग्रेस आक्रमक; प्रकाश आंबेडकरांचंही टीकास्र!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कथित ‘एपस्टीन फाईल्स’ मध्ये नाव असण्याबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींकडून स्पष्टीकरण मागावे, अशी मागणी करीत काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने सोमवारी शहरात मोर्चा काढला. ...अधिक वाचा
18:05 (IST) 23 Mar 2026

डिजिटल सेवा देण्यात कडेपूर ग्रामपंचायत राज्यात प्रथम...

डिजिटल रूम, ई-लर्निंग सुविधा आणि ऑनलाइन सेवा यामुळे कडेपूर ग्रामपंचायत राज्यातील आदर्श ठरली आहे. ...सविस्तर वाचा
17:55 (IST) 23 Mar 2026

Nagpur Today Crime Update : लग्नानंतर ३ वर्षांत ५ लाखांसाठी विवाहितेचा छळ ते दिवसाढवळ्या घरफोड्या… नागपुरात आज काय घडलं?

Top 5 Nagpur Crime News Today : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शहरात असताना गुन्हेगारीने पुन्हा तीव्र रूप धारण केल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. पाच लाख आणि कारच्या मागणीसाठी विवाहितेचा छळ करण्यात आला. तर अजनी व हुडकेश्वर परिसरात पुन्हा घरफोड्यांनी उच्छाद मांडला. ...सविस्तर बातमी
17:43 (IST) 23 Mar 2026

JEE Main 2026 : जेईई मुख्य २०२६ सत्र २ परीक्षा २ ते ८ एप्रिलदरम्यान; परीक्षा केंद्राच्या शहरांची विद्यार्थ्यांसाठी माहिती जाहीर…

राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने जेईई मुख्य सत्र २ परीक्षेच्या तारखा जाहीर करत विद्यार्थ्यांना ‘एग्झाम सिटी इंटिमेशन स्लिप’ डाउनलोड करण्याचे आवाहन केले आहे. ...वाचा सविस्तर
17:36 (IST) 23 Mar 2026

CBSE Proctored Exam : सीबीएसईकडून शालेय समुपदेशकांसाठी ऑनलाइन ‘प्रॉक्टर्ड’ परीक्षा; देशभरात १० हजार समुपदेशकांचे मूल्यांकन…

फेब्रुवारी २०२६ पासून सुरू होणाऱ्या या उपक्रमाद्वारे समुपदेशकांचे प्रत्यक्ष कौशल्य आणि नैतिक मूल्यांचे परीक्षण 'डिजी-एक्झाम' या डिजिटल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने केले जाणार आहे. ...वाचा सविस्तर
17:31 (IST) 23 Mar 2026

कुठलीही खासगी सेवा सुरु करा, पण 'बीएसएनएल' नको; गडचिरोलीच्या दुर्गम भागात आदिवासींमध्ये असंतोष का?

गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण भागाच्या विकासासाठी आणि दळणवळण सुलभ करण्यासाठी प्रशासनाने 'बीएसएनएल'चे कोट्यवधी रुपये खर्च करून मोबाईल मनोरे (टॉवर) उभे केले. ...वाचा सविस्तर
17:22 (IST) 23 Mar 2026

Global Warming Crisis : तापमान वाढीचे संकट! यंदा ‘एल निनो’ सक्रिय होण्याची शक्यता; संयुक्त राष्ट्रसंघानी हवामानाबाबत दिला ‘हा’ इशारा…

UN Weather Warning El Nino 2026 : संयुक्त राष्ट्रसंघाच्या हवामान संस्थेने पृथ्वीचे तापमान वाढल्यामुळे यंदा 'एल निनो' सक्रिय होऊन उष्णतेचे नवे विक्रम प्रस्थापित होण्याची भीती व्यक्त करत जगाला धोक्याचा इशारा दिला आहे. ...वाचा सविस्तर
17:11 (IST) 23 Mar 2026

मुख्यमंत्र्यांच्या गृहखात्यात चाललंय काय? अधिकारी नियुक्तीत नियम पायदळी, थेट राष्ट्रपतींपर्यंत गेली तक्रार!

स्थानिक गुन्हे शाखेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांची नियुक्ती करताना नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी सरकारी आदेशाची पायमल्ली करत मनमानी केल्याची तक्रार मानवाधिकार सेवा संघटनने केली आहे. ...वाचा सविस्तर
17:11 (IST) 23 Mar 2026

रायगड जिल्हा परिषदेच्या महायुतीचे सूत जुळले… विषय समिती सभापतींची बिनविरोध…

रायगड जिल्हा परिषदेच्या विषय समिती सभापतींच्या निवडीसाठी सोमवारी अलिबाग येथे झालेल्या विशेष सभेत महायुतीच्या चारही उमेदवारांची बिनविरोध निवड झाल्याचे पीठासीन अधिकारी सुनील थोरवे यांनी जाहीर केले. ...अधिक वाचा
16:49 (IST) 23 Mar 2026

Ashok Kharat Case: "मलाही अशोक खरात सारखं -सारखं बोलवत होता पण...", जितेंद्र आव्हाड काय म्हणाले?

"मलाही अशोक खरात सारखं -सारखं बोलवत होता. शहापूरला गेलो असता मंत्रालयातून फोन आल्यामुळे माघारी आलो”, असे राष्ट्रवादी (शरद पवार) चे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले.

16:46 (IST) 23 Mar 2026

Satara ZP Election: "साताऱ्यात मंत्री मार खातायत, मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारुन बाहेर पडा"; अनिल परब

साताऱ्यात मंत्री मार खातायत, मार खाण्यापेक्षा सत्तेला लाथ मारुन बाहेर पडा, असे आमदार अनिल परब विधान परिषदेत सातारा विधान परिषदेत झालेल्या राड्यावरुन बोलताना म्हणाले.

हर्षवर्धन सदगीर

डबल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (फोटो - X/ @MahaDGIPR)