Maharashtra Breaking News Today, 25 March 2026: लैंगिक शोषण प्रकरणात अटकेत असणाऱ्या भोंदूबाबा अशोक खरातला २९ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनाविण्यात आली आहे. खरातने नरबळी दिल्याचा संशय देखील सरकारी वकिलांनी कोर्टात व्यक्त केला. याबाबत पुरावे देखील सापडल्याचा दावा वकिलांनी केला आहे. यामुळे खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे. तसेच, अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज अखेरचा दिवस असून, सभागृहात घडणाऱ्या विविध घडामोडी महत्वाच्या ठरणार आहेत. शेवटच्या दिवशी काय घडणार याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. याशिवाय राज्यातील राजकारण, कला – क्रीडा – संस्कृती, गुन्हे, पर्यटन यासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

Live Updates

Pune Mumbai Nashik News Live Today, 25 March 2026: महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात घडणाऱ्या ताज्या घडामोडींच्या लाईव्ह अपडेट्स.

19:58 (IST) 25 Mar 2026

भोंदूबाबा खरातवर भाजपचीही 'माया'; १ कोटींच्या निधीचा मोठा खुलासा!

मार्च २०१८ मध्ये आर्थिक वर्ष संपुष्टात येण्याच्या अखेरच्या दिवशी प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत खरातच्या श्री ईशानेश्वर देवस्थानच्या एक कोटी पाच लाख रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आली होती. ...अधिक वाचा
19:54 (IST) 25 Mar 2026

खरात प्रकरण भोवले; रुपाली चाकणकरांच्या पक्षपदावरही टांगती तलवार

महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी कॉग्रेस अजित पवार गट महिला प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा चाकणकर यांनी द्यावा, यासाठी राज्यात महिला आघाडी सक्रिय झाली आहे. ...वाचा सविस्तर
19:41 (IST) 25 Mar 2026

नरेंद्र मेहता यांना भूमाफिया म्हणणे चुकीचे – मुख्यमंत्री

आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर पुराव्याशिवाय भूमाफिया म्हणून आरोप करणे चुकीचे असून पुरावे असल्यास मी स्वतः कारवाई करेन, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. ...वाचा सविस्तर
19:27 (IST) 25 Mar 2026

तक्रारीच्या फोनवरून काही मिनिटांत चोरटे जेरबंद...

कळंबोलीत भंगार व्यावसायिकाला चाकूचा धाक दाखवून मोबाईल पळवणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना नवी मुंबई पोलिसांच्या '११२' हेल्पलाईनच्या तत्परतेमुळे अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. ...सविस्तर वाचा
19:07 (IST) 25 Mar 2026

महाराष्ट्रात निकृष्ट बियाणे, बनावट खतांचा सुळसुळाट; संसदेत धनंजय महाडिक का झाले आक्रमक?

महाराष्ट्रातील बनावट बियाणे आणि निकृष्ट खतांमुळे होणाऱ्या शेतकर्‍यांच्या नुकसानीकडे खासदार धनंजय महाडिक यांनी संसदेत आक्रमक होत केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे. ...सविस्तर वाचा
19:01 (IST) 25 Mar 2026

परभणी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपुष्टात; निवडणुकीसाठी मागवले सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव…

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची मुदत संपल्याने नव्या निवडणुकीसाठी सभासद संस्थांकडून प्रतिनिधींचे ठराव मागवण्याची प्रक्रिया जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे सुरू केली आहे. ...अधिक वाचा
19:01 (IST) 25 Mar 2026

उल्हासनगर महापालिकेचा ९९७ कोटींचा अर्थसंकल्प सादर; मालमत्ता करात वाढ नाही, पण पाणीपट्टीसाठी नवी नियमावली

उल्हासनगर महापालिकेचा २०२६-२७ साठी ९९७.२३ कोटींचा अर्थसंकल्प महापालिका आयुक्त मनीषा आव्हाळ यांनी बुधवारी महासभेसमोर सादर केला. ...सविस्तर बातमी
18:56 (IST) 25 Mar 2026

मंदिरावरील कारवाईच्या निषेधार्थ परभणीत महापालिका प्रशासनाविरुद्ध आंदोलन, तोडफोड; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल…

परभणीतील अपनानगर भागातील मारुती मंदिराचा ओटा तोडल्याच्या निषेधार्थ संतप्त शिवसैनिकांनी महापालिका कार्यालयाची तोडफोड करत प्रशासकीय कामकाजात मोठा अडथळा निर्माण केला आहे. ...वाचा सविस्तर
18:50 (IST) 25 Mar 2026

लाखोंची ‘सरासरी’ बिले ग्राहकांच्या माथी; रीडिंगअभावी ग्राहकांची ‘स्मार्ट’ डोकेदुखी, महावितरणची रीडिंग यंत्रणा कोलमडली?

अकोला परिमंडळात महावितरणची मीटर रीडिंग यंत्रणा पूर्णपणे कोलमडली असून ग्राहकांना लाखो रुपयांची 'सरासरी' बिले धाडली जात आहेत. स्मार्ट मीटर आणि ॲपद्वारे रीडिंग नोंदवण्याच्या सुविधेतही तांत्रिक बिघाड झाल्याने ग्राहकांमध्ये प्रचंड संताप आहे. ...अधिक वाचा
18:44 (IST) 25 Mar 2026

CM Devendra Fadnavis on Karnataka FIR: अजित पवारांच्या अपघात प्रकरणावरून मुख्यमंत्री फडणवीस आक्रमक; 'कर्नाटकचा 'तो' FIR बेकायदेशीर, महाराष्ट्राची बदनामी करण्याचा डाव'

CM Devendra Fadnavis on Ajit Pawar plane crash investigation: कर्नाटक सरकारने अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणावरून दाखल केलेल्या 'झिरो एफआयआर'वर तीव्र आक्षेप घेतला. ...सविस्तर बातमी
18:37 (IST) 25 Mar 2026

पेट्रोल-डिझेल कोंडीचे खरे कारण आले पुढे…! पेट्रोलियम कंपन्यांच्या 'या' निकष बदलाचा फटका…

बँकांच्या सुट्ट्यांमुळे हप्ते भरण्यास विलंब आणि कंपन्यांची इंधन साठा मर्यादित ठेवण्याची भूमिका यामुळे नागपूरसह विदर्भात पेट्रोलसाठी वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. ...वाचा सविस्तर
18:25 (IST) 25 Mar 2026

सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांनाही खुल्या प्रवर्गात संधी; सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय…

पात्रता परीक्षेत सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातील उमेदवारांना अंतिम निवड प्रक्रियेत अधिक गुण मिळाल्यास त्यांना खुल्या प्रवर्गात संधी नाकारणे अन्यायकारक ठरेल, असा महत्त्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...सविस्तर बातमी
18:19 (IST) 25 Mar 2026

“…तर लिंबू-मिरच्यांनी युद्ध जिंकता आलं असतं”, फडणवीसांचं वक्तव्य; अशोक खरात प्रकरणी केलं महत्वाचं आवाहन

Devendra Fadnavis On Ashok Kharat : राज्यात सध्या अशोक खरात प्रकरण चर्चेत आहे. या भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी केली जात आहे. पण याच अशोक खरातबरोबर अनेक नेत्यांचे फोटो समोर आल्यामुळे राजकारण तापलं आहे. या प्रकरणात रुपाली चाकणकर यांनाही राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाचे विधानसभेतही पडसाद उमटले आहेत.

सविस्तर वाचा

18:18 (IST) 25 Mar 2026

कुख्यात 'वसीम चिऱ्या'च्या मुसक्या आवळल्या; कुत्रा चावला, मालकिणीविरोधात गुन्हा, नागपुरात आज काय घडलं?

नागपूर गुन्हेगारीच्या विळख्यात! कुख्यात वसीम चिऱ्याला अटक, उच्चभ्रू वस्तीतील ब्रँडेड शोरूम फोडणारे चोरटे जेरबंद आणि वर्धा रोडवरील विचित्र अपघातात ११ जण जखमी झाले आहेत. शहरात घरफोड्यांचे सत्रही सुरूच आहे. ...अधिक वाचा
18:11 (IST) 25 Mar 2026

नागपूरचा लखोबा लोखंडे! पहिली पत्नी असताना दुसरीशी प्रेमसंबंध, गुपचूप विवाहदेखील उरकला; शेवटी…

नागपूरच्या इमामवाडा भागात 'लखोबा लोखंडे' प्रवृत्तीच्या एका पतीने पहिल्या पत्नीची माहिती लपवून दुसरे लग्न केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी अजित जैन याने फसवणूक केल्याचे लक्षात येताच दुसऱ्या पत्नीने पोलिसांत धाव घेतली आहे. ...सविस्तर वाचा
17:56 (IST) 25 Mar 2026

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेवर बक्षीस

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे १५ महिन्यांपासून फरार असून, गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) त्याच्यावर १ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. माहिती देणाऱ्याची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. ...वाचा सविस्तर
17:48 (IST) 25 Mar 2026

बेस्टच्या १० मालमत्ता व्यावसायिक भाडेतत्त्वावर, बाजारभावाप्रमाणे जागा देण्याची बेस्ट समिती सदस्यांची मागणी

बेस्टने शहरातील दहा मालमत्ता व्यावसायिक वापरासाठी भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. व्यावसासिक वापरातून बेस्टला अतिरिक्त महसूल मिळणार असला तरी बाजारभावाप्रमाणे जागा भाडेतत्वावर देण्याची मागणी बेस्ट समिती सदस्यांनी केली. ...अधिक वाचा
17:42 (IST) 25 Mar 2026

मध्य रेल्वेत भरती प्रक्रिया सुरू; वर्ग‑३ अधिकारी पदावर थेट नियुक्तीसाठी जीडीसीई भरती

मध्य रेल्वेतील कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! आरआरसीने जीडीसीई अंतर्गत वर्ग-३ पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. ट्रॅकमन आणि खलाशांना थेट अधिकारी पदावर पोहोचण्याची ही सुवर्णसंधी १५ एप्रिलपर्यंत उपलब्ध आहे. ...सविस्तर बातमी
17:30 (IST) 25 Mar 2026

विद्यापीठामध्येही एपस्टिन फाईल! नोकरी, पदोन्नतीच्या नावावर गेस्ट हाऊसमध्ये महिला कर्मचारी लक्ष्य; व्हीडीओमध्ये…

नागपूर विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसमध्ये नोकरी आणि पदोन्नतीच्या नावाखाली महिला कर्मचाऱ्यांचे शोषण होत असल्याचा खळबळजनक आरोप एनएसयूआयने केला आहे. 'एपस्टिन फाईल'सारखा हा प्रकार असून याच्या निष्पक्ष चौकशीची मागणी आंदोलकांनी केली आहे. ...वाचा सविस्तर
17:23 (IST) 25 Mar 2026

भोंदूबाबा खरातशी लांगेबाधे अधिकाऱ्याला भोवले, उपजिल्हाधिकारी अभिजीत भांडे-पाटील यांची उचलबांगडी

भोंदूबाब अशोक खरातशी संबंध असलेले राजकीय नेते अडचणीत आल्यानंतर आता पहिला सरकारी अधिकारीही खरातशी लांगेबांधे असल्याने अडचणीत आला आहे. ...अधिक वाचा
17:10 (IST) 25 Mar 2026

TET Maharashtra : ८२ गुण मिळवणारे परीक्षार्थी नंतर ८१ गुण होताच नापास झाले? नेमकी स्थिती काय?

महाराष्ट्र टीईटी परीक्षेत ८२ गुण मिळवूनही काही परीक्षार्थी अपात्र ठरल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे. प्रश्न रद्द झाल्यामुळे गुण कमी झाल्याचे स्पष्टीकरण शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले असून हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट आहे. ...सविस्तर बातमी
16:52 (IST) 25 Mar 2026

Kharat Case: "भोंदूबाबा खरातबाबत कोणाकडे माहिती असल्यास सरकारला द्या"; मुख्यमंत्री फडणवीस

"भोंदूबाबा खरातबाबत कोणाकडे माहिती असल्यास सरकारला द्या", असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केले. "महाराष्ट्रात भोंदूगिरीला स्थान मिळता कामा नये. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात खूप छोटी रेष आहे", असेही मुख्यमंत्री म्हणाले.

16:49 (IST) 25 Mar 2026

गॅस सिलेंडर टंचाईचा बळी, जंगलात लाकडे आणण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

चंद्रपूर जिल्ह्यात गॅस सिलेंडरच्या टंचाईमुळे जळावू लाकडे आणण्यासाठी जंगलात गेलेल्या महिलेचा वाघाच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला. नागभीड तालुक्यातील या घटनेमुळे ग्रामीण भागात गॅस टंचाई आणि वन्यजीव संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ...सविस्तर बातमी
16:49 (IST) 25 Mar 2026

लहान बॅनर हटवले, मोठे होर्डिंग कायम; निवडक कारवाईमुळे अंबरनाथमध्ये राजकारण तापले

अंबरनाथमध्ये अनधिकृत होर्डिंगवरून शिवसेना-भाजपमध्ये राजकीय कलगीतुरा रंगला आहे. पालिकेने केवळ लहान बॅनरवर कारवाई केल्याचा आरोप करत शिवसेनेने मोठ्या होर्डिंगकडे प्रशासनाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा दावा केला आहे. ...सविस्तर बातमी
16:40 (IST) 25 Mar 2026

पुणे क्राईम डायरी : विजेच्या धक्क्याने कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्याचा मृत्यू

कृषी महाविद्यालयातील ‘मेस’मध्ये असलल्या जलशुद्धीकरण यंत्रातून विजेच्या धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नुकतीच घडली. ...वाचा सविस्तर
16:38 (IST) 25 Mar 2026

'घरी जायला पेट्रोल नाही, आता रात्रभर पंपावरच झोपतो', अमेरिका-इराणमुळे विदर्भात संघर्ष पेटला!

भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील पेट्रोल पंपांवर इंधनाचा साठा संपल्याने वाहनधारकांनी रात्रभर ठिय्या मांडला. प्रशासनाने पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला असला तरी प्रत्यक्ष जमिनीवर मात्र लांबच लांब रांगा आणि गोंधळाचे वातावरण दिसत आहे. ...सविस्तर वाचा
15:59 (IST) 25 Mar 2026

MPSC ला नव्याने जाहीर करावी लागली निकालाची यादी, न्यायालयाचा विद्यार्थ्यांना दिलासा; महेश शेजल पहिला!

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने न्यायालयाच्या आदेशानंतर पशुसंवर्धन विभागाच्या गट-अ पदाचा सुधारित निकाल जाहीर केला आहे. या प्रक्रियेत महेश शेजल याने राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला असून शेकडो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...सविस्तर बातमी
15:56 (IST) 25 Mar 2026

Pimpri Chinchwad Crime : फोन करण्यासाठी मोबाइल घेतला अन् एक लाख ट्रान्सफर

यासह अमेरिकेत नोकरीचे आमिष दाखवून ५ लाखांची फसवणूक, वाकडमध्ये ३२ ग्रॅम एमडी ड्रग्जसह एकाला अटक आणि काळेवाडीत बनावट ब्रँडेड बूट विकणाऱ्या दुकानावर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. ...अधिक वाचा
15:56 (IST) 25 Mar 2026

सोलार कामामुळे कळंबोलीचे हवेची गुणवत्ता बिघडली

पनवेल महानगरपालिकेच्या उद्यानात सुरू असलेल्या सोलार प्रकल्पाचे बांधकाम आणि उडणाऱ्या धुलीकणांमुळे ही परिस्थिती ओढवल्याचा प्राथमिक निष्कर्ष पर्यावरण विभागाने काढला आहे. ...सविस्तर वाचा
15:47 (IST) 25 Mar 2026

डोंबिवलीत भटक्यांसोबतच पाळीव श्वानांचाही प्रश्न ऐरणीवर; राजपार्क सोसायटीत नेमकं काय घडलं?

डोंबिवलीच्या राजपार्क सोसायटीत मालकाच्या निष्काळजीपणामुळे पाळीव श्वानाने एका महिलेवर हल्ला करून तिला जखमी केले. याप्रकरणी श्वान मालकाविरुद्ध रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून शहरात पाळीव प्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ...सविस्तर वाचा

NCP Weekly Meeting

NCP Weekly Meeting (फोटो - X/ Sunetra Pawar)