Today Mumbai Pune Nashik News Updates, 30 March 2026 : अशोक खरात प्रकरणामुळे राज्यातील अनेक नेत्यांवर चौकशीची टांगती तलवार आहे. अशोक खरातच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक नेत्याची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तर, दुसरीकडे आदित्य ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांनी भाजपा नेता मोहित कंबोज यांच्या मुलीच्या वाढदिवसाला हजेरी लावली होती. या वाढदिवसाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरेही उपस्थित होते. पण आदित्य ठाकरे यांची उपस्थिती सर्वाधिक चर्चेची ठरली. यावर सुषमा अंधारे आणि संजय राऊत यांनी स्पष्टीकरणही दिलंय. यासह राज्यातील इतर घडामोडी आपण पाहुयात.

Live Updates

Mumbai Pune Thane News Live Updates, 30 March 2026 : राज्यातील ताज्या बातम्या वाचा

19:36 (IST) 30 Mar 2026

रेल्वे प्रशासनाचे सुरक्षा कवच फेल? डब्यांवर दगडफेकीच्या घटनांनी रेल्वे प्रवासी महिलांचा जीव टांगणीला!

परळ-दादर दरम्यान लोकलमधील महिला डब्यावर झालेल्या दगडफेकीत एक प्रवासी महिला गंभीर जखमी झाल्याने रेल्वेतील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा अत्यंत ऐरणीवर आला आहे. ...अधिक वाचा
19:18 (IST) 30 Mar 2026

वसई विरार महानगरपालिका नगर पथविक्रेता समिती सदस्य निवडणूकीचा निकाल जाहीर

वसई-विरार महापालिकेच्या नगर पथविक्रेता समिती निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून ८ पैकी ५ जागांचे निकाल स्पष्ट झाले आहेत. उर्वरित ३ जागांसाठी उमेदवार न मिळाल्याने त्या रिक्त राहिल्या आहेत. ...सविस्तर वाचा
19:15 (IST) 30 Mar 2026

VIDEO : विशाखा सुभेदार यांच्या नाटकात मध्यंतरानंतर अचानक काय घडलं? अंबरनाथ नाट्यगृहातील प्रेक्षक अवाक!

अंबरनाथमधील आनंद दिघे नाट्यगृहाचे लोकार्पण होऊन पाच महिने होत नाही तोच तांत्रिक बिघाडामुळे कलाकारांना स्वतः हाताने पडदा ओढण्याची नामुष्की ओढवल्याने रसिक प्रेक्षकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. ...सविस्तर बातमी
19:12 (IST) 30 Mar 2026

विवळवेढे उड्डाणपुलावर डागडुजीचे काम सुरू ; प्रशासनाला उशिरा सुचले शहाणपण

मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील विवळवेढे उड्डाणपुलावर वारंवार होणाऱ्या अपघातांची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) अखेर दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. डहाणू येथील महालक्ष्मी मातेची यात्रा अवघ्या दोन दिवसांवर आली असताना, प्रशासनाने खड्डे आणि ओबडधोबड रस्ता दुरुस्त करण्यासाठी वेगाने पावले उचलली आहेत. ...सविस्तर बातमी
18:55 (IST) 30 Mar 2026

पूर्ववैमनस्यातून वाळव्यात तरुणाचा खून; महिलेसह तिघांना अटक…

सांगलीतील वाळवा येथे पूर्ववैमनस्यातून एका तरुणाचा दगडाने ठेचून खून करण्यात आला असून याप्रकरणी आष्टा पोलिसांनी एका महिलेसह तिघांना सोमवारी बेड्या ठोकल्या आहेत. ...सविस्तर वाचा
18:37 (IST) 30 Mar 2026

ई-चलान थकवलेल्यांना एआय बोलावणार; परिवहन विभागात स्वयंचलित कॉलिंग प्रणाली

ई-चलन थकवणाऱ्या वाहनधारकांना आता थेट 'एआय'द्वारे फोन येणार असून मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रातील आरटीओ कार्यालयांमध्ये ही अकरा कोटींची स्वयंचलित कॉलिंग प्रणाली राबवण्यात येणार आहे. ...अधिक वाचा
18:23 (IST) 30 Mar 2026

नवी मुंबई विमानतळावरून इंडिगोच्या ३० नवीन मार्गावर विमान सेवा; आग्रा, अयोध्या, श्रीनगरचा समावेश…

उन्हाळी वेळापत्रकानुसार नवी मुंबईतून आता ४६ शहरांसाठी उड्डाणे उपलब्ध होणार असून गुजरातसह उत्तर भारतातील कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी इंडिगोने साप्ताहिक ४०० पेक्षा अधिक फेऱ्यांचे नियोजन केले आहे. ...सविस्तर बातमी
18:05 (IST) 30 Mar 2026

BMC Cleanliness Contest 2026 : परिसर स्वच्छ ठेवल्यास १४.२० कोटी रुपयांची पारितोषिके; महानगरपालिकेतर्फे 'मुंबई क्लीन लीग’ स्पर्धेचे आयोजन!

BMC Prize Money 14 Crore : मुंबई महानगरपालिकेतर्फे आयोजित 'मुंबई क्लीन लीग' स्पर्धेत सहभागी होऊन आपला परिसर स्वच्छ ठेवणाऱ्या गृहनिर्माण संस्था आणि नागरिकांना तब्बल १४.२० कोटी रुपयांची भरघोस पारितोषिके जिंकता येणार आहेत. ...सविस्तर बातमी
18:05 (IST) 30 Mar 2026
"माझ्या निरोपाच्या भाषणामुळे काही जण दुखावलेत", नीलम गोऱ्हेंनी अशोक खरातला भेटल्याच्या आरोपांवर दिलं उत्तर!

विधान परिषदेत मी जे काम करतेय, उपसभापति म्हणून काम करत असातना काही लोकांना दुखावणं क्रमप्राप्त असतं. सोशल मिडियावर काही नियंत्रण हवं. माझ्या निरोपाच्या भाषणामुळे काही जण दुखावलेत. माझ्यावरील आरोप निराधार आहेत - नीलम गोऱ्हे

राजकीय पदे किंवा मंत्रीपद मिळवण्यासाठी मी कधीही कोणत्याही तांत्रिक गुरूची किंवा बुवाबाबाची गरज भासली नाही. अशोक खऱात या व्यक्तीला मी सहा सात वर्षांपूर्वी भेटल्याच्या वृत्ताचा मी इन्कार करते. या बातम्या कल्पोकल्पित आहेत - नीलम गोऱ्हे

17:43 (IST) 30 Mar 2026

गोव्यातील मद्य तस्करी प्रकरणात इंदापूर, सोलापूर, साताऱ्यात छापे; उत्पादन शुल्क विभागाकडून मद्य तस्करांना अटक

ड्रममधील मद्य बाटल्यांमध्ये भरुन त्याची चढ्या दराने विक्री केली जात असल्याची माहिती तपासात मिळाली आहे. ...अधिक वाचा
17:09 (IST) 30 Mar 2026

नांदेड जिल्हा बँक निवडणूक: खतगावकरांसह दिग्गज संचालकांना 'सक्तीची विश्रांती', वारसदारांच्या एन्ट्रीची तयारी सुरू

विद्यमान संचालकांपैकी आठ संचालकांवर सक्तीची विश्रांती घेण्याची वेळ आल्यानंतर काही बड्या राजकीय नेत्यांनी आपल्या जागी कुुटुंबातील प्रतिनिधी बँकेच्या संचालक मंडळावर आणण्याची व्यवस्था केली आहे. ...सविस्तर बातमी
16:35 (IST) 30 Mar 2026

अहिल्यानगरमधील पोखर्डी शिवारात कोंबड्यांच्या झुंजीवर पोलिसांचा छापा; २१ जणांना अटक

अहिल्यानगर शहराजवळील पोखर्डी शिवारातील पिंपळगाव उजनी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर मंडप टाकून या कोंबड्यांच्या झुंजी आयोजित करण्यात आल्या होत्या. ...सविस्तर वाचा
16:27 (IST) 30 Mar 2026

Maharashtra Live News : "१६ जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलिंडर द्या", मंगलप्रभात लोढांची मागणी, मनसे आक्रमक

राज्याचे मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जैन बांधवांच्या उत्सवासाठी मलबार हिलमधील १६ जैन मंदिरांना प्रत्येकी पाच सिलेंडर उपलब्ध करून देण्याची विनंती करणार पत्र अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना दिलं. यावरून मनसेच्या मलबार हिल शाखेच्या कार्यक्रर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला. मनसेने खळखट्याकचा इशारा देताच मंगलप्रभात लोढा यांनी व्हिडिओमार्फत त्यांची भूमिकाही स्पष्ट केली.

https://twitter.com/MPLodha/status/2038565354826510417

16:23 (IST) 30 Mar 2026

RTE Admission 2026 : आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस...

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शाळांच्या अंतराची जाचक अट रद्द झाल्यानंतर आता अर्ज भरण्यासाठी उद्याचा शेवटचा दिवस उरला असून पालकांनी मुदत संपण्यापूर्वी ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. ...सविस्तर बातमी
16:15 (IST) 30 Mar 2026

२ किलो मटणात ग्रंथपालाचा महिना; निधीअभावी ११ हजार ग्रंथालये बंद पडण्याच्या वाटेवर

रखडलेले अनुदान, कर्मचाऱ्यांचे मानधन आणि मंदावलेल्या पुस्तक खरेदीमुळे राज्यातील ११ हजार सार्वजनिक ग्रंथालयांना मरणकळा आल्याचे चित्र आहे. ...वाचा सविस्तर
16:08 (IST) 30 Mar 2026

परदेशातील नोकरीच्या आमीषाने मानवी तस्करी! सीबीआय कारवाईमुळे पुन्हा प्रकाशझोत

थायलंडमध्ये नोकरी सांगून म्यानमार, कंबोडियातील 'सायबर क्राईम' केंद्रात तरुणांना कोंडले ...अधिक वाचा
16:03 (IST) 30 Mar 2026

१ मे पर्यंत पालघर व मनोर शासकीय रुग्णालय सुरू करण्याचे आरोग्य मंत्री यांचे संकेत

पालघर जिल्ह्यातील आरोग्य व्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नंडोरे येथील जिल्हा सामान्य रुग्णालय आणि मनोर येथील ट्रॉमा केअर सेंटर येत्या १ मे पर्यंत कार्यान्वित करण्याचे संकेत आरोग्य मंत्र्यांनी दिले आहेत. ...सविस्तर वाचा
15:55 (IST) 30 Mar 2026

Video: सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, पुण्यात 'जोरधार'! बाणेर आणि परिसरात गारांचा पाऊस

रविवारपासून उकाडा प्रचंड वाढलेला असताना पावसाच्या सरींनी तापमानात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला. ...सविस्तर वाचा
15:55 (IST) 30 Mar 2026

Video: सोसाट्याचा वारा, ढगांचा गडगडाट, पुण्यात 'जोरधार'! बाणेर आणि परिसरात गारांचा पाऊस

रविवारपासून उकाडा प्रचंड वाढलेला असताना पावसाच्या सरींनी तापमानात काही प्रमाणात घट होऊन दिलासा मिळाला. ...सविस्तर वाचा
15:40 (IST) 30 Mar 2026

Palghar Mangrove Park : डहाणू, वसई, पालघर येथे खारफुटी उद्यान उभारणार - वनमंत्री गणेश नाईक

पालघर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला जाणार असून, डहाणू, वसई आणि पालघर येथे भव्य 'खारफुटी उद्यान' (Mangrove Park) उभारण्याचा निर्णय वनमंत्री गणेश नाईक यांनी जाहीर केला आहे. पर्यटन विकासासोबतच वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही यावेळी घेण्यात आला ...सविस्तर बातमी
15:20 (IST) 30 Mar 2026

खबर पीक पाण्याची : प्रक्रियायुक्त खाद्य पदार्थांची निर्यात वाढली ; पण, आव्हाने कायम, युद्धाचेही सावट

खाद्य प्रक्रिया उद्योगाचा पाया मजबूत करण्याचे काम पीएम-एफएमई म्हणजेच पंतप्रधान सुक्ष्म अन्न प्रक्रिया योजनेच्या माध्यमातून केले जाते. ...सविस्तर बातमी
15:13 (IST) 30 Mar 2026

Video : तुंगारफाटा पेट्रोल पंपावर नऊ तास रिक्षाचालकांच्या रांगा

वसईतील तुंगारफाटा परिसरात सीएनजी गॅससाठी रिक्षाचालकांच्या रांगा लागल्या होत्या. गॅस पुरवठा करणारे वाहन विलंबाने पेट्रोल पंपात दाखल झाल्यामुळे तब्बल ९ तास रिक्षाचालकांना रांगेत उभे राहावे लागले. ...वाचा सविस्तर
15:05 (IST) 30 Mar 2026

Video: "जस्ट टेल मी.." म्हणत मराठी गृहिणीने इंग्रजीत आमदारांना सुनावले खडेबोल

"इट्स युवर एरिया, हाऊ मेनी इयर्स यू आर कमिंग हिअर? जस्ट टेल मी…"असे इंग्रजीत संतप्तपणे बोलत मिरा रोड येथे एका मराठी गृहिणीने भाजप आमदारांना खडेबोल सुनावल्याची घटना घडली आहे. ...सविस्तर वाचा
14:35 (IST) 30 Mar 2026

ठाणे जिल्ह्याचा वनवास संपणार कधी? भातसानगरच्या नवोदय विद्यालयासाठी डिसेंबर २०२७ पर्यंत प्रतीक्षा; ८०० गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान

ठाणे जिल्ह्याचे नवोदय विद्यालय पालघर जिल्ह्याच्या हद्दीत गेले. त्यानंतर मागील १२ वर्षाच्या कालावधीत ठाणे जिल्ह्यात नवोदय विद्यालय सुरू न झाल्याने ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना पालघर जिल्ह्यातील नवोदय विद्यालयात प्रवेश घ्यावे लागले. ...वाचा सविस्तर
14:24 (IST) 30 Mar 2026

सिडकोच्या २६ हजार घरांवर सरसकट स्थगिती नाही; फक्त एलआयजी गटावरच अंतरिम आदेश, सिडकोचे स्पष्टीकरण

सिडकोच्या २६ हजार घरांच्या सोडतीवर सरसकट स्थगिती नसून, मुंबई उच्च न्यायालयाचा अंतरिम आदेश केवळ अल्प उत्पन्न गटातील (LIG) घरांसाठीच लागू आहे. अत्यल्प उत्पन्न गटातील (EWS) घरांची वाटप प्रक्रिया आणि हप्ते भरण्याची मुदत पूर्ववत सुरू राहणार असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. ...सविस्तर वाचा
14:19 (IST) 30 Mar 2026

एका गावात मुबलक गॅस! ना सिलिंडरची चिंता ना पूर्व नोंदणीची…घडले कसे हे ?

गावातील सुमारे १२०० घरांपैकी जवळपास ९०० घरांना सध्या पाइपलाइनद्वारे २४ तास गॅस पुरवठा सुरू आहे. ...वाचा सविस्तर
14:03 (IST) 30 Mar 2026

बनावट कंपनीच्या आधारे १०५ कोटींची उलाढाल; वसमतच्या व्यापाऱ्यास २३ कोटींच्या वस्तू सेवा कराची नोटीस

वसमत शहरातील इलेक्ट्रिक व्यवसाय करणारे राजेश माधवसा दुमाने यांना अचानक २३ कोटी रुपयांची वस्तू व सेवा कर भरण्याची नोटीस प्राप्त झाल्यानंतर हा बनावट कंपनी स्थापन केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. ...सविस्तर बातमी
13:51 (IST) 30 Mar 2026

​कणकवलीत चालती सीएनजी कार जळून खाक; प्रवासी बालंबाल बचावले

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित झेन इस्टिलो कार कणकवलीहून कनेडीच्या दिशेने जात होती. नरडवे मार्गावरील बांधकरवाडी बस थांब्याजवळ पोहचली असता, कारमधून अचानक धूर निघू लागला आणि काही क्षणातच गाडीने पेट घेतला. ...अधिक वाचा
13:31 (IST) 30 Mar 2026

कल्याण डोंबिवलीत इमारत बांधकाम प्रकल्प तेजीत, मात्र नगररचनेच्या उत्पन्नात २८३ कोटीची घट; सर्व पक्षीय नगरसेवकांची नगररचना विभागावर टीका

पालिकेच्या सन २०२५-२०२६ या कालावधीत नगररचना विभागाने विशेष अधिनियमाखाली विविध पाच शुल्कांच्या माध्यमातून एकूण ६१२ कोटी ९६ लाख रूपयांची महसुली वसुली करणे आवश्यक होते. ...सविस्तर वाचा
13:17 (IST) 30 Mar 2026

तुमचं मौन का? अंजली दमानियांचा आदिती तटकरेंना प्रश्न

महिला व बालकल्याण मंत्री यांना एक साधा प्रश्न…… अशोक खरतांच्या प्रकरणावर तुमचं मौन का? एक महिला व बालकल्याण मंत्री म्हणून त्या इतक्या गंभीर प्रकरणावर काहीच कस बोलत नाहीत? - अंजली दमानिया

https://twitter.com/anjali_damania/status/2038513706502611335

Sanjay Raut Live: आदित्य ठाकरेंबरोबर मतभेद? चर्चांवर संजय राऊतांची प्रतिक्रिया

Mumbai Pune Thane News Live Updates, 30 March 2026 : राज्यातील ताज्या बातम्या वाचा