Mumbai Pune Nashik News Today, 27 March 2026: नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात दररोज नवीन खुलासे होते आहेत. यावरून राजकीय वर्तुळात देखील वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. यादरम्यान अशोक खरात प्रकरणात आज सुषमा अंधारे, रुपाली ठोंबरे या महिला नेत्यांनी नाशिकच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली.
तसेच दुसरीकडे, राज्याचे अन्न व औेषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या अश्लील चित्रफीतवरून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे, स्वतः झिरवाळ यांनी मात्र या प्रकरणात अद्याप काहीही खुलासा केलेला नाही.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पेट्रोल-डिझेलच्या दराबाबत मोठे विधान केले आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली, भारत सरकारने पश्चिम आशियातील सुरू असलेल्या संकटामुळे जागतिक स्तरावर इंधनाचे दर वाढत असतानाही, आपल्या जनतेच्या हिताची अटळ बांधिलकी पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे, असे ते म्हणाले.
इतर बातम्यांची माहिती खाली मिळेल.
