Today News Updates, 31 March 2026: राज्यातील महत्त्वाकांक्षी ‘लाडकी बहीण योजने’साठी ई-केवायसी (eKYC) दुरुस्तीची मुदत आज, ३१ मार्च रोजी संपत असून या प्रक्रियेत लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे समोर आले आहे. योजनेच्या सुरुवातीला २ कोटी ४७ लाख महिलांची नोंदणी झाली होती, मात्र तांत्रिक पडताळणी आणि ई-केवायसीनंतर ही संख्या आता १ कोटी ७६ लाखांवर आली आहे. यामुळे पात्रतेच्या निकषात न बसणाऱ्या सुमारे ७१ लाख महिला या योजनेतून बाद होण्याची शक्यता असून, आज दुरुस्तीचा शेवटचा दिवस असल्याने प्रशासकीय यंत्रणेवर मोठा ताण दिसून येत आहे.
दुसरीकडे, संपूर्ण राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या ‘अशोक खरात’ प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाद्वारे (SIT) अत्यंत वेगाने सुरू आहे. नाशिक पोलीस या प्रकरणातील गुंतागुंतीच्या धाग्यादोऱ्यांचा कसून शोध घेत असून तपासादरम्यान दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच दरम्यान, सोमवारी राज्याच्या विविध भागांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांकडून तातडीने सरकारी मदतीची आणि नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.
महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शेती, गुन्हेगारी, अर्थव्यवस्था आणि इतर सर्व घडामोडींचे ताजे व विश्वासार्ह अपडेट्स; सर्व काही एकाच ठिकाणी!
Mumbai Pune Thane News Live Updates, 31 March 2026: महाराष्ट्रातील राजकारण, समाजकारण, शेती, गुन्हेगारी, अर्थव्यवस्था, शिक्षण, आरोग्य, उद्योग-व्यवसाय, रोजगार, तंत्रज्ञान, पर्यावरण, हवामान बदल, न्यायव्यवस्था, पायाभूत सुविधा, वाहतूक, तसेच कला, संस्कृती, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडींचे ताजे, अचूक आणि विश्वासार्ह अपडेट्स; सखोल विश्लेषणासह, सर्व काही एकाच ठिकाणी!
देश नक्षलमुक्तीच्या शेवटच्या टप्प्यात? तीन राज्यात ४३ नक्षल्यांची रोकड आणि सोन्यासह शरणागती...
"खरात प्रकरणात त्यांचे नाव अजून कसे आले नाही…?", एकनाथ खडसेंचा रोख कुणाकडे?
निसर्गाचा कहर! बागलाण, मालेगाव व देवळ्यात गारांचा सडा; कांदा अन् डाळिंब बागा उद्ध्वस्त...
वसई-विरार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी सेवानिवृत्त
नवीन आर्थिक वर्षात रेडी रेकनर दर स्थिर, बांधकाम क्षेत्राला दिलासा; महसूलमंत्री बावनकुळे यांची माहिती
Shalarth ID Scam : शालार्थ घोटाळ्यात अशोक खरातच्या भावाचा संबंध?
पोलिसांनाच दमदाटी केल्याबद्दल नांदेडच्या तलवारबाबाविरुद्ध गुन्हा दाखल!
"विधिमंडळात प्रश्न उपस्थित करुन सरकारवर टीका केल्यामुळेच ॲट्रासिटीच्या गुन्ह्यात अडकवले…", एकनाथ खडसेंचा आरोप...
अवकाळीच्या तडाख्याने ६५३ हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त, ४४ गावांमध्ये नुकसान; पुढील काही दिवस…
बड्या मंत्र्यांची नावे अन् अलिशान रिसॉर्ट; भोंदूबाबा खरातच्या मुलीच्या लग्नाची 'इनसाईड स्टोरी'...
TJSB Bank : टीजेएसबी सहकारी बँकेच्या २५,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचा टप्पा पार...
सासू आणि आजी-सासूच्या जाचाला कंटाळून तरुणाने केली आत्महत्या...
पोलीस ठाण्यात तक्रार दिली म्हणून दीड वर्षाच्या मुलावर प्राणघातक हल्ला; ठाण्यातील धक्कादायक प्रकार…
पालिकेच्या कल्याणमधील प्रशासकीय मुख्यालयाला वाहनतळाचे स्वरूप; पांढरे पट्टे मारले नसल्याने वाहने आवारात अस्ता-व्यस्त उभी…
अंधश्रद्धा विरोधी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक; पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे अंनिसची मागणी
तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली; राज्य प्रशासनात मोठे फेरबदल
शिर्डीत येणाऱ्या विमानाचे सुरतमध्ये आपत्कालीन ‘लँडिंग’... कारण…?
कल्याणमध्ये भोईरवाडीत भटक्या श्वानाला क्रूरपणे ठार मारले; श्वानांना विष घालून मारण्याची धमकी देणार्या व्यक्ती विरूद्ध गुन्हा…
दिवे घाटात भीषण अपघात; देवदर्शनाहून परतणाऱ्या वडिलांसह मुलीचा मृत्यू
Badlapur Plastic Ban : बदलापुरात बुधवारपासून प्लास्टिक पिशव्यांवर बंदी; कारवाईसाठी नगर परिषद सज्ज, व्यापार्यांचाही सकारात्मक प्रतिसाद…
ठाकरे गटातून शिंदे गटात प्रवेश… जळगावच्या माजी खासदाराला लागलीच ‘ही’ मोठी जबाबदारी..!
भाईंदर रेल्वे स्थानकावर भीषण दुर्घटना; लोकलच्या धडकेत २७ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्यात कोठे मुक्काम होणार? सोहळाप्रमुख म्हणाले…
शनिमांडळ परिसरावर निसर्गाची वक्रदृष्टी, गारपिटीने पिकांचे नुकसान
ठाण्याची अर्थसंकल्प चर्चा पहाटे सहा वाजेपर्यंत रंगली; सर्वपक्षीय टीकेचा भडिमार अन् उपाययोजनाच्या सुचना
उन्हाळ्यात विमान प्रवास महागणार! डीजीसीएची उन्हाळी उड्डांणांमध्ये १२ टक्के कपात
ठाकुर्लीतील रील स्टार सुरेंद्र पाटीलच्या घरात चप्पल ठेवण्याच्या कप्प्यात सापडला शस्त्रसाठा; जामिनावर नुकताच होता बाहेर; पुन्हा पोलिसांच्या जाळ्यात
Baramati Bypoll Election : उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या विरोधात बारामतीतील कोणीच धजावेना; उमेदवारी अर्ज भरलेले तिघेही पुणे जिल्ह्याबाहेरील
नाशिक पुन्हा हादरले ! हल्लेखोराचा गोळीबार, पोलिसांना आव्हान
आखाती संघर्षामुळे केळी निर्यातीला ब्रेक; इराणमध्ये ८००-१००० कंटेनर अडकले

राज्यातील काही जिल्ह्यात मंगळवारी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे (फोटो- इंडियन एक्सप्रेस)
