Maharashtra Weather Update Today, 30 April 2026: महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या विधानपरिषद निवडणुकीची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे बच्चू कडूंच्या उमेदवारीवरून तर्क-वितर्क लावले जात असताना दुसरीकडे अंबादास दानवेंना उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवारी दिल्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजी पसरली आहे. त्यामुळे विधानपरिषद अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यावरून राज्यात राजकीय सुंदोपसुंदी दिसून येत आहे.

Live Updates

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi , 30 April 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा

18:16 (IST) 30 Apr 2026

हृदयद्रावक! प्री-वेडिंग शूट, लग्नाची जय्यत तयारी; मात्र नियतीच्या मनात वेगळंच, वधू सोबत घडलं विपरीत…

३ मे २०२६ रोजी विवाह सोहळा नियोजित होता. या निमित्ताने दोन्ही कुटुंबात आनंद, उत्साहाचे वातावरण होते, तर वर-वधूंकडून नव्या आयुष्याची स्वप्ने फुलवली जात होती. ...वाचा सविस्तर
18:03 (IST) 30 Apr 2026

Loksatta Impact : कृषी विभागातील प्रस्तावित सौर कुंपण खरेदीचे सहपालकमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश…

गुरुवारी गडचिरोली येथे आढावा बैठकीसाठी आले असता, जयस्वाल यांनी जिल्हाधिकाऱ्यांना या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ...सविस्तर वाचा
17:55 (IST) 30 Apr 2026

मध्य रेल्वेचा नवा प्रयोग : इंजिन बिघाडाची पूर्वसूचना देणारे तंत्रज्ञान कार्यान्वित

रेल्वे इंजिन रेल्वे वाहतूक व्यवस्थेचे मुख्य घटक मानले जाते. त्यामुळे त्यांची कार्यक्षमता टिकवणे अत्यावश्यक आहे. यासाठी मध्य रेल्वेने ‘इन-सीटू’ देखभाल पद्धत विकसित केली. ...सविस्तर वाचा
17:50 (IST) 30 Apr 2026

आमदारांच्या जनसंवाद उपक्रमातून भूमापन कामांना गती; विरार आणि वसईत नवी भूमापन कार्यालये सुरू होणार असल्याची घोषणा

वसई-विरारमध्ये दोन नवी भूमापन कार्यालये सुरू होणार असून सलोखा योजनेसाठी विशेष शिबिरे आयोजित केली जातील. ...वाचा सविस्तर
17:37 (IST) 30 Apr 2026

चमत्कार सिद्धीवरून वाद पेटला; मानवांचे तटस्थ ठिकाण, शास्त्रींचा दरबार आग्रह

चमत्कार सिद्ध केल्यास ८० लाख रुपयांचे बक्षीस देण्याच्या श्याम मानव यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देत शास्त्रींनी थेट ‘दिव्य दरबारा’त उपस्थित राहण्याचे खुले आव्हान दिले आहे. ...सविस्तर वाचा
17:30 (IST) 30 Apr 2026

मुंबईला मागे टाकत पुण्यात जमिनींची कोटीच्या कोटी उड्डाणे!

Pune Real Estat: राज्यात गृहप्रकल्पांची सर्वाधिक संख्या पुणे जिल्ह्यात आहे. गृहप्रकल्पांची संख्या वाढत असताना त्यासाठीच्या जमिनीची मागणीही वाढू लागली आहे. त्यातही आता पुण्याने राज्यात अग्रक्रम मिळविला आहे. ...सविस्तर वाचा
17:22 (IST) 30 Apr 2026

भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला जोरदार धडक; भीषण अपघातात दोघांचा मृत्यू, तीन गंभीर

ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रॅक्टरचा मागील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला. ...सविस्तर बातमी
17:10 (IST) 30 Apr 2026

गर्भलिंग तपासणी केंद्रावर पोलिसांचा छापा; डॉक्टर, एजंटसह १० जणांना अटक; शिर्डीजवळील निर्जन भागात उभारले होते केंद्र

सोनोग्राफी मशीनसह २४ लाखांचा मुद्देमाल जप्त; अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांची मोठी कारवाई. ...अधिक वाचा
16:42 (IST) 30 Apr 2026

“कोकण-विदर्भला गाड्या नाहीत?” अयोध्या एक्सप्रेसवरून अविनाश जाधव संतापले

Avinash Jadhav on Railway: उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात येणाऱ्या प्रवाशांसाठी वारंवार नवीन रेल्वे गाड्या सुरू केल्या जात आहेत, मात्र महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यासाठी तितक्याच प्रमाणात गाड्या का सुरू करत नाहीत? असा थेट सवाल अविनाश जाधव यांनी उपस्थित केला आहे. ...वाचा सविस्तर
16:40 (IST) 30 Apr 2026

सरपणामुळे पेटली शाळा? गोंदियाच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील धक्कादायक घटना; ग्रामस्थांच्या तत्परतेने अनर्थ टळला

Gondia School Fire: अर्जुनी मोरगाव तालुक्यातील झरपडा गावातील जिल्हा परिषद शाळेत गुरुवारी दुपारच्या सुमारास भीषण आग लागून परिसरात एकच खळबळ उडाली. ...अधिक वाचा
16:39 (IST) 30 Apr 2026

शिक्षण आयुक्तांचे मोठे पाऊल… खासगी शाळांसाठी आता शुल्क परतावा धोरण… काय आहे निर्णय?

'यूजीसी'च्या धर्तीवर शालेय स्तरावरही नियम लागू होणार; प्राथमिक शिक्षण संचालकांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना. ...सविस्तर वाचा
16:29 (IST) 30 Apr 2026

पालघर जिल्हा पोटनिवडणूकीत १० सरपंच आणि २२ सदस्यांचा निकाल जाहीर, ५ सरपंच आणि ५५ सदस्य बिनविरोध

पालघर जिल्हा ग्रामपंचायत पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. १५ सरपंच आणि ७७ सदस्य निवडून आले असून ६५ जागा रिक्त राहिल्या आहेत. ...अधिक वाचा
16:19 (IST) 30 Apr 2026

एल निनो'चा असाही कोल्हापुरातील घरोघरी परिणाम; आजपासून एक दिवस आड पाणीपुरवठा

पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन; शिंगणापूर आणि काळम्मावाडी योजनेतून होणारा उपसा मर्यादित राहणार. ...अधिक वाचा
16:15 (IST) 30 Apr 2026

आधी कागदपत्रे तपासा, मगच बॅज द्या; बेशिस्त रिक्षा चालकांना रोखण्यासाठी संघटना सरसावल्या

रिक्षा प्रवासी वाहतुकीचा परवाना घेण्यापूर्वी रिक्षा चालक बॅज मिळविण्यासाठी (पितळी वाहन क्रमांक) उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन आपली महाराष्ट्रातील १५ वर्षाचा निवास, मालमत्ता कर, महावितरणची वीज देयके, उत्पन्न दाखला दाखल करतो. ...सविस्तर बातमी
16:11 (IST) 30 Apr 2026

"कुणाला शंका असेल तर खुशाल समोर यावे," धीरेंद्र कृष्ण शास्त्रींचे थेट आव्हान

Dhirendra Krishna Shastri vs Shyam Manav: सोशल मीडियावर सध्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा 'अंनिस'ला आव्हान देणारा व्हिडीओ वेगाने व्हायरल होत असून, त्यात त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत टीकाकारांना प्रतिआव्हान दिले आहे. ...सविस्तर वाचा
16:00 (IST) 30 Apr 2026

अस्वच्छता, असुविधांवरून झाडाझडती! प्रताप सरनाईक म्हणाले 'मंत्री'…

"पुढच्या महिन्यात पुन्हा तपासणीला येणार, तोवर आगार चकाचक करा"; प्रताप सरनाईक यांचा अधिकाऱ्यांना अल्टिमेटम. ...अधिक वाचा
15:28 (IST) 30 Apr 2026

"रिक्षा, टॅक्सी, ओला-उबर… १ मेपासून कारवाई होणारच", परिवहन मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले

महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा आलीच पाहिजे, प्रताप सरनाईक यांनी ठणकावून सांगितले. ...सविस्तर वाचा
15:28 (IST) 30 Apr 2026

विधानपरिषद उमेदवारीत डावलल्याने आनंद परांजपे नाराज; एकनाथ शिंदेच्या संपर्कात असल्याने पक्ष प्रवेशाची चर्चा

Anand Paranjpe Unhappy Over Vidhan Parishad election: ठाणे जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) महत्त्वाचे नेते आनंद परांजपे यांना विधान परिषदेसाठी डावलण्यात आल्याने ते नाराज असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ...वाचा सविस्तर
15:17 (IST) 30 Apr 2026

नागपूर जिल्ह्यात भाजपला धक्का! काटोल-नरखेडमध्ये दोन सरपंचपदे राष्ट्रवादीकडे

दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाच्या पोटनिवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) उमेदवारांनी विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले आहे. या निकालांमुळे ग्रामीण भागातील राजकीय समीकरणांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ...वाचा सविस्तर
15:13 (IST) 30 Apr 2026

बँकेला लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या ; व्यावसायिकासह पत व्यवस्थापकाला सक्तमजुरी

न्यायालयाने ठोठावला प्रत्येकी ७५ हजार रुपयांचा दंड; २०१०-११ मधील घोटाळ्याचा सीबीआयने केला पर्दाफाश. ...वाचा सविस्तर
15:13 (IST) 30 Apr 2026

MLC Election Maharashtra: यंदाची विधानपरिषद निवडणूक बिनविरोध

भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना महाविकास आघाडी या सर्वच पक्षांनी विधान परिषद निवडणुकीत आपापल्या पक्षाच्या वतीने उमेदवार दिल्यानंतर त्या उमेदवारांवर आघाड्यांमध्ये सहमती दिसून आली. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर सर्व १० उमेदवारांची निवडणूक बिनविरोध होत असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.

15:11 (IST) 30 Apr 2026

भर उन्हाळ्यात महाराष्ट्राची बत्ती गुल होणार? महानिर्मितीचे संच एकापाठोपाठ एक बंद; वीजपुरवठ्यावर प्रचंड ताण!

Maharashtra electricity crisis : बुधवारी चंद्रपूर प्रकल्पातील २१० मेगावॅटचा संच क्रमांक ४ आणि ५०० मेगावॅटचा संच क्रमांक ६ हे सुद्धा बॉयलर ट्यूब गळती वा अन्य तांत्रिक बिघाडामुळे बंद पडले आहेत. ...वाचा सविस्तर
15:10 (IST) 30 Apr 2026

MLC Election Maharashtra: काँग्रेसची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश

उद्धव ठाकरेंनी विधानपरिषद जागेसाठी परस्प अंबादास दानवेंचं नाव जाहीर केल्यामुळे काँग्रेसकडून वेगळा उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. अखेर अर्ज भरण्याची मुदत संपण्याच्या एक तास आधी काँग्रेसची नाराजी दूर करण्यात उद्धव ठाकरेंना यश आलं आहे. त्यामुळे अंबादास दानवेंच्या उमेदवारीला अखेर काँग्रेसनं पाठिंबा जाहीर केला आहे.

15:08 (IST) 30 Apr 2026

आयसीएसईचा दहावी, बारावीचा निकाल जाहीर, मुलींनी मारली बाजी

कौन्सिल फॉर दी इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन या शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी (आयसीएसई), बारावीच्या (आयएससी) परीक्षेचा निकाल गुरुवारी जाहीर करण्यात आला. ...सविस्तर वाचा
15:08 (IST) 30 Apr 2026

मिसिंग लिंक म्हणजे काय ? कुसगाव - खोपोली मार्गिकेला मिसिंग लिंक नाव कसे पडले ?

मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील बहुप्रतीक्षित मिसिंग लिंक प्रकल्प पूर्ण झाला असून या प्रकल्पाचे लोकार्पण १ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. ...अधिक वाचा
15:07 (IST) 30 Apr 2026

बारवी धरणातील पाणीसाठी ४० टक्क्यांवर, नागरिकांना आणि उद्योगांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच पाणी टंचाईची झळ बसत असून आता शहरी भागातही विविध ठिकाणी पाणी टंचाई सुरू झाल्याचे दिसून येत आहे. ...सविस्तर बातमी
15:07 (IST) 30 Apr 2026

देशांतर्गत हवाई प्रवासाला मागणी, प्रवासी वाहतुकीत १.४ टक्क्यांनी वाढ

प्रादेशिक हवाई वाहतुकीच्या विस्तारित जाळ्यामुळे देशांतर्गत हवाई प्रवासाला मागणी वाढली आहे. ...सविस्तर बातमी
14:22 (IST) 30 Apr 2026

कॅन्सरशी संबंधितांच्या मदतीला ‘कॅन्सर हिलर सेंटर’, नाशिकमधील केंद्राचा लाभ कोणाला?

नाशिकमध्ये २७ वे कॅन्सर हिलर सेंटर सुरू झाले असून इम्युनोथेरपीद्वारे कर्करोग रुग्णांना आता स्थानिक पातळीवर उपचार मिळणार आहेत. ...सविस्तर बातमी
13:59 (IST) 30 Apr 2026

समूह विद्यापीठांचा भारही राज्यांवर; केंद्राकडून निधी देण्यास नकार, कुलगुरू, प्र-कुलगुरूंच्या वेतनासाठी तरतूद

राज्यात सध्या डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ (एचबीएसयू), हैदराबाद, सिंध नॅशनल कॉलेजिएट युनिव्हर्सिटी (एचएसएनसी), कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ आणि वारणा विद्यापीठ ही चार समूह विद्यापीठे कार्यरत आहेत. ...सविस्तर बातमी
13:52 (IST) 30 Apr 2026

शुभवार्ता! उपराजधानीत लवकरच ‘एनसीसी’ची प्रशिक्षण अकादमी; राज्यातील दुसरे केंद्र

विदर्भ दौऱ्यावर आलेल्या मेजर जनरल त्यागी यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात 'एनसीसी'च्या वाटचालीवर प्रकाश टाकला. ...सविस्तर वाचा

Neelam Gorhe MLC nomination Shiv Sena Shinde | Bachchu Kadu MLC election candidate Maharashtra | Eknath Shinde Shiv Sena candidates list | Maharashtra Legislative Council Election 2026 update

शिवसेना शिंदे पक्षाकडून उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा संधी तर बच्चू कडू यांना विधानपरिषेदेची लॉटरी ? ( image source - Dr. Neelam Gorhe, Bacchu Kadu FB pages )

Maharashtra Breaking News Live Updates in Marathi , 30 April 2026: महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर