Maharashtra Politics Updates : आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे. तसेच सायंकाळी ष्णंमुखानंद सभागृह येथे उद्धव ठाकरे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. आज ते कोणावर तोफ डागतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दरम्यान, पुण्यातील पिंपरी चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या दोन जागांसाठी येत्या २७ फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात येईल. भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे अनुक्रमे कसबा पेठ आणि पिंपरी चिंचवड या विधानसभेच्या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. याच जागांवर पोटनिवडणूक घेण्यासाठीचा निवडणूक कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. दरम्यान, संदर्भात आज भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी सकाळी ११ वाजता प्रमुख नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या पोटनिवडणुकीत भाजपाचा विजय होईल अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
Maharashtra Latest News : आज शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती; ठाकरे गटातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन
आदित्य ठाकरे यांच्या अज्ञानपणाच्या, (अनमॅच्युरिटी) वक्तव्यांमुळेच शिवसेनेत फूट पडली. आदित्य ठाकरेंच्या प्रश्नांना सौम्य भाषेत उत्तरे दिली जातील. त्यातून महाराष्ट्राच्या जनतेला खरी गद्दारी, लाचारी कोणी केली.
माजी मुख्यंमत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवेसना आणि प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीच्या युतीमुळे मुंबई महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीत शिवेसना-वंचितचे जागावाटपाचे गणित नीट जमले तर, भाजपपुढे आव्हान उभे करु शकतात.
सातारा नवीन औद्योगीक वसाहत परिसरातील कचरा डेपोला आग लागल्याने या भागात धुराचे लोट पसरले आहेत. यामुळे येथील नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या परिसरातील कचरा डेपोला आग लागल्यामुळे धुराचे लोट सर्वत्र पसरले आहेत.
रामकुंड परिसरात काही हिंदुत्ववादी संत, महंतांनी अंधश्रध्दा निर्मूलन समिती केवळ हिंदू धर्मीयांना लक्ष्य करीत असल्याचा आरोप केला असताना महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्यांचा हा दावा खोडून काढला आहे. जादूटोणा विरोधी कायद्यातंर्गत दाखल पहिल्या शंभर गुन्ह्यात २० गुन्हे मुस्लिम व्यक्तींविरोधात असल्याचे अंनिसने म्हटले आहे.
कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक आहेत. निवडणूक लढविण्यासाठी दहा अर्ज आले आहेत. त्या अर्जांची चाचपणी सुरू असून, तीन फेब्रुवारीपर्यत उमेदवाराचे नाव निश्चित आणि जाहीर केले जाईल, असे काँग्रेसचे प्रांताध्यक्ष नाना पटोले यांनी येथे सांगितले.
पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात येत असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील (पिफ) स्पर्धात्मक विभागामध्ये “धर्मवीर, मुक्काम पोस्ट ठाणे’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.
लोणावळ्यातील सहारा पूल भागात युगुलाला चाकूचा धाक दाखवून लुटण्यात आल्याची घटना घडली. याबाबत एका महाविद्यालयीन युवकाने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
‘तुम्ही बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री महाराज यांच्या विरुद्ध बोलणे थांबवले नाही तर तुमचा आम्ही नरेंद्र दाभोळकर करू’ अशी धमकी अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांना देण्यात आली. त्यामुळे त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आलेली आहे.
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण महाराज ऊर्फ चमत्कारी महाराजांनी दावा केलेल्या दिव्य शक्ती आणि त्या बळावरील चमत्कार यास प्रा. श्याम मानव यांनी आव्हान दिले आहे. तर हे आव्हान स्वीकारतो पण रायपूरला या, असे प्रतिआव्हान धीरेंद्र कृष्ण महाराज यांनी श्याम मानव यांना दिले आहे.
राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडुंचा ठसा उमटावा. त्यांना योग्य दिशा देण्यासाठी वेळीच योग्य मार्गदर्शन व्हावे. यासाठी राज्यातील क्रीडा क्षेत्राची दिशा ठरविण्यासाठी गुरुवारी (ता.२६) महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची बैठक डोंबिवली जीमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.
अकोला नांदेड महामार्गावर डही इरळा शेतशिवारात असलेल्या खाजगी डांबर प्लांटमधून बाहेर पडणाऱ्या दूषित धुरामुळे अनेक दुष्परिणाम समोर येत आहेत. शेतातील पिकांची वाढ खुंटली असून पिकांची राखरांगोळी होत आहे, तसेच जनावरे आणि मानवांना देखील विविध त्वचारोगाचे आजार उद्भवत आहेत. याबाबत शेतकऱ्यांनी वारंवार प्रशासनाकडे तक्रारी, निवेदने करूनही कुठलीच कारवाई करण्यात येत नसल्याने याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
उर्वरित काळ चिंतन, मनन करण्याचा मानस व्यक्त करीत राज्यपालपदाचा राजीनामा देण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे व्यक्त केल्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी जाहीर केले असले तरी भाजपसाठी कोश्यारी हे अडचणीचे ठरले होते.
सोसायटीचे देखभाल शुल्क (मेंन्टनन्स) न भरल्याने रहिवाशाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना मुंढवा भागात घडली. या प्रकरणी बांधकाम व्यावसायिकासह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गावातील अतिक्रमणाबाबत तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने त्रस्त झालेल्या भडगाव तालुक्यातील कजगाव येथील तरुणाने सोमवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. भूषण पाटील असे तरुणाचे नाव आहे.
अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अपक्ष उमेदवार विकेश गोकुलराव गवाले (३१) यांच्यावर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. पाठिंबा देण्याच्या मागणीसाठी वाद घालून त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे.
मुंबई : गर्भधारणा कायम ठेवायची की नाही, हे निवडण्याचा अधिकार स्त्रीला आहे. तसेच हा निर्णय केवळ तिच्या एकटीचा आहे, असे ठाम मत उच्च न्यायालयाने एका विवाहितेला ३२ व्या आठवड्यात गर्भपात करण्याची परवानगी देताना व्यक्त केले. गर्भात गंभीर विकृती आढळून आल्याच्या वैद्यकीय अहवालानंतर न्यायालयाने ही परवानगी दिली.
सविस्तर वाचा…
मानव-वन्यजीव संघर्ष विकोपाला गेल्यामुळे मांसभक्षी प्राण्याने मारलेल्या जनावरावरच वीष टाकून त्या मांसभक्षी प्राण्याला मारण्याचे प्रकार जंगलालगतच्या गावांमध्ये होतात. त्याच धर्तीवर आता शहरातही मानव-श्वान संघर्ष सुरू झाला असून तीच वीषप्रयोगाची पुनरावृत्ती सुरू झाली आहे.
अवघ्या २० महिन्यांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी वरळी पोलिसांनी शेजारी राहणाऱ्या ३५ वर्षीय व्यक्तीला अटक केली. औषधोपचारानंतरही पीडित मुलीचा त्रास कमी न झाल्यामुळे आईने तपासणी केली असता हा प्रकार उघड झाला.
एकाच घरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणाऱ्या आईच्या प्रियकराने १३ वर्षीय मुलीवर बलात्कार केला. त्याने आईला सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. मुलीने मैत्रिणीच्या आईला सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल केला.
डोंबिवलीत ६५ बेकायदा इमारती उभारताना भूमाफियांनी कल्याण डोंबिवली पालिका नगररचना विभागाच्या बनावट परवानग्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या, शिक्क्यांचा वापर करून अकृषिक, बांधकाम परवानग्या तयार केल्या. या आधारे महाराष्ट्र स्थावर संपदा विभागाची फसवणूक करून त्यांच्याकडून रेरा नोंदणीकृत क्रमांक मिळविला. ही सर्व कागदपत्रे भूमाफियांनी डोंबिवलीतील गांधीनगरमधील दस्त नोंदणी कार्यालयात नोंदणीकृत करून त्याआधारे घर खरेदीदारांची फसवणूक केली. ही सर्व नोंदणीकृत कागदपत्र ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या विशेष तपास येथील दस्त नोंदणी कार्यालयातून तपासासाठी ताब्यात घेतली.
शिवसेना (ठाकरे गट) आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील युतीची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केली. मात्र, दोन्ही पक्षांमध्ये युती झाली असली, तरी वंचित बहुजन आघाडी हा महाविकास आघाडीचा भाग असेल का? याबाबत अद्यापही स्पष्टता नाही. दरम्यान, याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काकाच्या भरवशावर सोडून परगावी गेलेल्या दाम्पत्याच्या दोन अल्पवयीन मुलींवर काका आणि त्याच्या मित्राने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत एका सामाजिक कार्यकर्ता असलेल्या महिलेने खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गिरगावातील चंदनवाडी परिसरात रविवारी रात्री एका इमारतीचे प्लास्टर अंगावर पडल्यामुळे आठ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. चोवीस मजली इमारतीचे बांधकाम सुरू असून त्याचा काही भाग या मुलीवर कोसळला. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
निवडणुकांमध्ये सध्या बदला घेण्याचं राजकारण सुरु आहे. एक दिवस मोदींच्या नेतृत्वाचाही अंत होईल. ईडीच्या माध्यमातून राजकीय नेतृत्व संपवण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली.
महाराष्ट्रातील जनता ज्याची निर्णयाची वाट बघत होती, आणि पुढची वाटचला एकत्र करण्यासाठी म्हणून या वास्तूमध्ये आलो आहोत. आंबेडकर आणि ठाकरे या नावाला इतिहास आहे. माझे आजोबा आणि प्रकाश आंबेडकरांचे आजोबा स्नेही होते. दोघांनीही समाजातील वाईट रुढी पंरपरा यांच्या विरोधात आवाज उठवला. याबद्दल आम्ही दोघांनी वेगळं सांगायाची आवश्यकता नाही. सध्या राजकारणा ज्या वाईट रुढी परंपरा सुरू तो त्या मोडून टाकण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली.
महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला देण्याची उदारवृत्ती महाराष्ट्र सरकारने दाखवली आणि दाखवत आहेत. पण आता हेच सरकार महाराष्ट्रातील वन्यप्राणी देखील गुजरातला पाठवण्याची उदारवृत्ती दाखवत आहेत. हत्तींपासून सुरु झालेला हा प्रवास आता वाघ आणि बिबट्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. गोरेवाडा प्रकल्पातील चार वाघ आणि चार बिबट कुणालाही कानोकान खबर लागू न देता शनिवारी रात्री गुजरातला रवाना करण्यात आले.
गेले अनेक दिवस चर्चेत असलेली शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होण्याची शक्यत आहे. या पार्श्वभूमीवर थोड्याच वेळात उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. त्यात नव्या युतीची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. आंबेडकर भवन येथे ही पत्रकार परिषद होणार आहे.
स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचे औचित्य साधत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांवर करोना काळात भ्रष्टाचार केल्याचे आरोप लावले आहेत. आज त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुराव्यासह हे आरोप केले. युवासेनेचे पदाधिकारी आणि मुंबई मनपा वॉर्ड ऑफिसर यांचे चॅटिंगचे स्क्रिनशॉट यावेळी त्यांनी दाखविले. तसेच हे सर्व पुरावे ईडी, ईओडब्लू कडे देणार असून चौकशी करावी, अशी मागणी करणार असल्याचेही ते म्हणाले. वाचा सविस्तर वृत्त
Google हे एक सर्च इंजिन आहे. याचा वापर प्रत्येकजण करत असतो. यावर आपण आपल्याला हवी ती माहिती शोधू शकतो. बातमी वाचा सविस्तर
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील रनर्स क्लॅन फाउंडेशनने सैनिकांना मानवंदना देण्यासाठी २६ जानेवारी रोजी गेटवे ऑफ इंडिया ते डोंबिवली धावण्याच्या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ६५ किलोमीटरची ही दौड २६ जानेवारी रोजी रात्री १२ वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे सुरू होऊन डोंबिवलीत सकाळी पोहचणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज (२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही ट्वीटद्वारे बाळासाहेबांप्रती असलेल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच बाळासाहेबांच्या शेवटच्या दिवसांमध्ये त्यांना भेटू शकलो नाही, याची खंत असल्याचेही ते म्हणाले.
Spotify Planning Layoff: गेल्या वर्षभरामध्ये अनेक आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. यामध्ये Twitter, Meta आणि Apple व् Microsoft आघाडीच्या कंपन्यांचा समावेश आहे. एकापाठोपाठ मोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Spotify कंपनीमध्ये कमर्चाऱ्यांची कपात अजून थांबलेली दिसत नाही. बातमी वाचा सविस्तर
भारत हा देश विकसनशील देश आहे. हा देश बऱ्याच कालावधीपासून स्वतःची ऑपरेटिंग सिस्टीम विकसित करण्याचा पर्यटन करत आहे. यामध्ये आपल्याला यश मिळत आहे. आधुनिक तंत्रज्ञान, संरक्षण प्रणाली सर्वच क्षेत्रात भारत स्वदेश निर्मितीवर मोठ्या प्रमाणात भर देत आहे. बातमी वाचा सविस्तर
१४ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी ५५ वर्षीय मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मुलीचे प्रेमसंबंध घरी सांगण्याची धमकी देऊन आरोपी मुख्याध्यापकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नागपूर समृद्धी महामार्गावर फूड प्लाझा आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) निविदा मागविल्या होत्या. मात्र, या निविदेला प्रतिसादच न मिळाल्याने फेरनिविदा काढण्याची नामुष्की एमएसआरडीसीवर ओढावली आहे. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरील आवश्यक त्या सोयी सुविधांची प्रतीक्षा लांबली आहे.
उपराजधानीत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीनिमित्त बाळासाहेब ठाकरे स्मृती शैक्षणिक कला, क्रीडा व सांस्कृतिक केंद्र उभारण्याचा प्रस्ताव अजूनही प्रशासनाच्या वेळकाढू धोरणामुळे अजुनही कागदावर आहे. राज्यात शिंदे फडणवीस सरकार असताना गेल्या सहा महिन्यापासून या प्रकल्पाला गती मिळाली नाही.
राज्यभरातील ५२० पोलीस हवालदारांची पोलीस उपनिरीक्षक पदावर पदोन्नती देण्यासाठी निवड करण्यात आली होती. मात्र, त्यांना संवर्ग न मागितल्यामुळे त्यांची पदोन्नती रखडली होती. परंतु, आता पोलीस महासंचालकांनी सकारात्मक पाऊल उचलले असून निवड झालेल्या हवालदारांची माहिती मागवण्यात आली आहे. लोकसत्ताने पदोन्नतीबाबत वृत्त मालिका प्रकाशित करून पाठपुरावा केला होता, हे विशेष.
पुणे : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी पालकमंत्री, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तातडीने पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलाविली आहे. या बैठकीत कसब्यातील उमेदवार निश्चित होण्याची शक्यता आहे. तसेच, पोट निवडणुकीसाठी भाजपकडून रणनीतीही निश्चित केली जाणार आहे. या बैठकीमुळे निवडणुकीच्या घडामोडींना वेग मिळणार आहे.
जामनेर तालुक्यातील गोद्री येथील अखिल भारतीय हिंदू गोर बंजारा आणि लबाना नाईकडा समाजाच्या महाकुंभासाठी राज्यभरातूनच नव्हे, तर देश-विदेशातून मदतीचा ओघ सुरू आहे. महाकुंभात संत-महंत, विविध राज्यांचे मुख्यमंत्री तसेच केंद्रीय मंत्र्यांचीही उपस्थिती राहणार आहे. सद्यःस्थितीत १५ लाख भाविकांना पुरेल एवढा धान्यसाठा झाला असून, इतर अत्यावश्यक वस्तूंच्या स्वरुपातही मदत येत असल्याची माहिती श्याम चैतन्य महाराजांनी दिली.
सध्या देशातील वातावरण बघता प्रत्येकाने भविष्याचा विचार करणे गरजेचे आहे. कामगार मंत्री असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पेन्शनचा अधिकार मिळवून दिला. परंतु, नंतर ती बंद करण्यात आली. ही योजना बंद करण्यात भाजपसोबत अन्य पक्षांचाही सहभाग आहे. खासगी कंपन्यांच्या फायद्यासाठी ही योजना बंद करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केला.
नौदलाच्या पश्चिम विभागाचे मुख्यालय असलेल्या मुंबईतील नौदल तळावर झालेल्या एका शानदार कार्यक्रमात INS Vagir ही पाणबुडी आज नौदलाच्या सेवेत दाखल झाली. या पाणबुडीच्या समावेशामुळे समुद्रात विस्तृत भागात गस्त घालत लक्ष ठेवण्याच्या नौदलाच्या क्षमतेत वाढ होणार आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. यानिमित्त आज दिवसभर शिवसेना (ठाकरे गट) आणि शिंदे गटाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेते मंडळींकडून बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनीही बाळासाहेबांचे स्मरण करत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. वाचा सविस्तर बातमी…
सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांवर आता पुणे महापालिकेने कडक कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. गेल्या १० दिवसांत अशा ३५३ जणांवर कारवाई करत साडेतीन लाख रुपयांचा दंड महापालिकेने वसूल केला आहे. या कारवाईसाठी पालिका प्रशासनाने विशेष पथक तयार केले असून ही मोहीम यापुढेही सुरू राहील, अशी माहितीही पुणे महापालिकेकडून देण्यात आली आहे.
आपल्या वादग्रस्त विधानांनी कायम चर्चेत राहणारे ऑल इंडिया इमाम असोसिएशनचे अध्यक्ष तथा मुस्लीम धर्मगुरु मौलाना मोहम्मद साजिद रशीदी यांनी पुन्हा एक वादग्रस्त विधान केलं आहे. गुजरातमधील सोमनाथ मंदिरची लूट करून मोहम्मद गझनीने कोणतंही चुकीचं काम केलं नसल्याचे ते म्हणाले. एनएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
Shivsena Criticized Shinde Group : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी ठाकरे गटाचे मुखपत्र असेल्या ‘सामना’तून शिंदे गटावर जोरदार टीका करण्यात आली आहे. बाळासाहेबांच्या जन्मदिनी गंगेच्या प्रवाहातील ओंडके आपोआप दूर झाले व काशीच्या हरिश्चंद्र घाटावर पोहोचले. त्याच घाटावर या हरा*** राजकीय चिता पेटेल आणि हीच बाळासाहेबांना त्यांच्या जन्मदिनी आदरांजली असेल, असं शिवसेनेनं ‘सामना’त म्हटलं आहे. तसेच मुंबई दौऱ्यावरूनही पंतप्रधान मोदींना लक्ष्य करण्यात आलं आहे.
Infinix स्मार्टफोनचे उत्पादन करणारी कंपनी असून, ही कंपनी लवकरच आपलं एक नवीन स्मार्टफोन भारतात लाँच करणार आहे. Infinix Note 12i असे या स्मार्टफोनचे नाव आहे. बातमी वाचा सविस्तर
संग्रहित फोटो
आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे. त्यानिमित्त ठाकरे गटातर्फे राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आले आहे.